विभाग नववा : ई-अंशुमान

उत्तर – मत्स्यदेशाधिपति विराट राजाच्या दोन पुत्रांतील कनिष्ठ. यास भूमिंजय असेंहि म्हणत असत. (भार. विराट. अ. ३५ श्लो. ९ ). विराट राजाचीं गोधनें कौरवांनीं हरिलीं त्यावेळीं याचें सारथ्य करण्याचें बृहन्नडेनें स्वीकारिलें, व हा युद्धास गेला, आणि बृहन्नडेच्या साह्यानें विजयी होऊन परत आला.
हा भारती युद्धांत पांडवांकडे होता व बहुत योद्ध्यांशीं युद्ध करून, शेवटीं शल्य राजाच्या हातून मरण पावला (भार. भीष्म. अ. ४७) याची स्त्री, हा मरण पावला त्या वेळीं गरोदर होती, व तिला पुढें इरावती नामक जी कन्या झाली होती तीच पुढें अभिमन्युपुत्र परीक्षित राजा यास दिली होती