विभाग नववा : ई-अंशुमान

उत्तरापथ – उत्तर हिंदुस्थानचें प्रचारांतील एक नांव. तुलनार्थ ‘दक्षिणापथ’ पहा. उत्तरापथ शब्दाऐवजीं उदीचीपथ असेंहि रूप कधीं कधीं आढळतें. पश्विम चालुक्यांच्या इतिहासांत कनोजच्या हर्षवर्धनाला सर्व उत्तरपथाचा अथवा उत्तरेच्या प्रदेशाचा प्रभु म्हटलें आहे. याचा बृहत्संहितेंत उल्लेख आहे. (९.४१)