विभाग नववा : ई-अंशुमान
उत्पल - शैव संप्रदायी; काश्मीरचा शैव तत्त्ववेत्ता, उदयाकराचा मुलगा उत्पल. हा इ. स. ९३० च्या सुमारास उदयास आला. हा सोमानंदाचा शिष्य होता. त्यानें प्रत्यभिज्ञासूत्र, अजडप्रमातृसिद्धि आणि परमेश स्तोत्रावलि, हे ग्रंथ लिहिले आहेत. याच वेळीं भट्ट नारायण हा होऊन गेला. त्यानें स्तव-चिंतामणि हा ग्रंथ लिहिला आहे.