प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग नववा : ई-अंशुमान

उत्पादन – अर्थशास्त्रांत उत्पादनाचें महत्व एका अर्थानें सर्वांत अधिक आहे; कारण सर्व राष्ट्रांचें पोषण व संस्कृति हीं उत्पादनावर अवलंबून असतात. दारिद्र्य, श्रीमंती, युद्धाची पात्रता हीं सगळीं उत्पादनाचीं फळें आहेत. एका दृष्टीनें असें म्हणतां येईल कीं पाश्चात्य राष्ट्रांचें आमच्या वरील सांस्कृतिक वर्चस्व हेंहि त्यांच्या अधिक यशस्वी व कार्यक्षम अशा उत्पादनाचें फल आहे.

उत्पादनाचीं तीन मुख्य अंगें गणलीं जातात; (१) मानवीश्रम, (२) नैसर्गिक शक्ति व जमीन इत्यादिक निसर्गदत्त वस्तू, (३) भांडवल अथवा उपकरणें. फिझिओक्रॅट्सची उत्पादनाची कल्पना अशी होतीं कीं शेतकी हेंच खरें उत्पादन आहे. कारण त्यांत खर्ची घातलेल्या मालापेक्षां अधिक माल तयार होतो. कारखाने, व्यापार यांमध्यें असें होत नाहीं. म्हणून त्याच्या आर्थिक संप्रदायांत शेतकीस प्राधान्य दिलें जात होतें. नंतर स्मिथनें कारखान्यांचा उत्पादक अशा कर्मांत समावेश केला. परंतु व्यापार, रेल्वे वगैरेनीं इकडचा माल तिकडे नेणें हीं स्मिथच्या मतानें अनुत्पादकच होती. नंतर मिलनें उत्पादनाची विस्तृत व्याख्या करून या सर्वांचा उत्पादनांत समावेश केला, कारण या सर्वांपासून‘उपयुक्तता’ सिद्ध होते. आधुनिक अर्थशास्त्रज्ञ तर वस्तूचा उपभोग घेईपर्यंतच्या सर्व क्रिया उत्पादक आहेत असें समजतात व हेंच युक्तीस धरून आहे. जो माल ज्या ठिकाणीं निरुपयोगी तेथून तो उपयुक्त आहे त्या ठिकाणीं आणणें हें वस्तुतः उत्पादनच आहे. या नवीन विचारपद्धतीमुळें पूर्वींची कांहीं श्रम उत्पादक व कांहीं श्रम अनुत्पादक ठरविण्याची योजना त्याज्य ठरली आहे.

श्रमामध्यें शाररीक श्रमाबरोबर मानसिक श्रम व नवीन कल्पना उत्पन्न करण्याचे श्रम यांचीहि गणना करणें युक्त आहे. असें न केल्यानें समाजसत्तावादी लोकांच्या अनेक कल्पना व सिद्धांत दूषित झाले आहेत.  त्याचप्रमाणें देखरेख करण्याचे श्रम सुद्धां उत्पादनास अत्यावश्यक आहेत.  श्रमामध्यें दुःख असल्यामुळें व मनुष्य स्वाभवतःच सुखप्रवण असल्यामुळें श्रमाकरितां द्रव्य, पारितोषिक किंवा तत्सदृश्य कांहीं तरी इष्ट वस्तु द्यावी लागते. हीच मजुरी, तनखा या नांवानें प्रसिद्ध आहेत. ही मजुरी इतकी असली पाहिजे कीं आवश्यक श्रमाचें दुःख सहन करण्यास कांहीं मनुष्यांनीं तरी तयार झालें पाहिजे.

जमीन व नैसर्गिक वस्तू यांमध्यें हवापाणी भूगोलाच्या दृष्टीनें देशाची रचना व भूस्तरशास्त्राच्या दृष्टीनें समृद्धता यांचा समावेश होतो. हीं जशीं उत्तम, मध्यम व कनिष्ठ असतील त्या मानानें उत्पादन व देशाची संपत्ति हीं उत्तम, मध्यम व कनिष्ठ असतात. जमीन विपुल असून शिवाय ती रासायनिक द्रव्यांनीं भरलेली अशी पाहिजे. लोकवस्तीच्या मानानें जमीन कमी पडल्यास त्याचा उत्पादनावर फार घातक परिणाम होतो. धान्य महाग होत जाऊन कारखाने वगैरे उत्पादनाच्या अन्य शाखांनां कष्टदायक स्थिती उत्पन्न होते. म्हणून एका बिघ्यापासून शक्य तितकें जास्त उत्पादन होण्याची व्यवस्था केली पाहिजे. यानंतर पाणी व त्यापासून उत्पन्न केलेली वीज, वारा व त्यापासून चालणार्‍या पवनचक्क्या, सर्व नैसर्गिक शक्ति यांचाहि जमीन व नैसर्गिक शक्ति यांमध्यें समावेश होतो.

भांडवल हें पूर्वींच्या श्रमानें उत्पन्न केलेल्या संपत्तीमधून बचत करण्यापासून उत्पन्न होतें. भांडवल हें उत्पादनास साहाय्यक असलें पाहिजे व त्यापासून वार्षिक प्राप्ति कांहीं तरी झाली पाहिजे. पूर्वीचें भांडवल असल्याशिवाय नवीन उत्पादन होणें अशक्य आहे. समाजसत्तावाद्यांच्या मतें भांडवल हें चोरीनें व अन्यायानें मिळविलेलें असतें. परंतु हें मत चुकीचें आहे.

जगाच्या इतिहासांत उत्पादनामध्यें पुढील अवस्था दिसून येतात. (१) कुटुंबरचना, या अवस्थेंत प्रत्येक कुटुंब हें आपल्यापुरतें उत्पादन करतें.  (२) जातिवाररचना या अवस्थेंत एका धंद्यांतील लोक श्रेणी अथवा ‘गिल्ड’ करून उत्पादन करतात. (३) मोठ्या व्यापार्‍याच्या द्वारें प्रत्येक घरीं वस्तू उत्पादन करणें, या अवस्थेंत श्रेणी मोडून व्यापार्‍यांच्या हातांत उत्पादन केंद्रीभूत होतें. (४) मोठे करखाने. या अवस्थेंत हजारों मजूर एका इमारतींत एकत्र करून एखादा व्यापारी किंवा कंपनी उत्पादन आपल्या पूर्ण कह्यांत ठेवते. पहिल्या दोन अवस्थांत उत्पादन लहान प्रमाणावर असतें व दुसर्‍या दोन अवस्थांत तें अतिशय मोठ्या प्रमाणावर असतें. मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यास अनेक यांत्रिक साधनांच उपयोग करण्यास सांपडतो व प्रत्येक वस्तूमागें उत्पादनाचा खर्च फार कमी येतो. शिवाय प्रत्येक मनुष्यास एकच काम दिल्यानें त्याची कार्यक्षमता वाढते. मोठ्या प्रमाणावर उत्पन्न करण्याची क्लृप्ति साधली म्हणजे देशाबाहेर माल पाठवून व्यापारवृद्धि करण्यास सुरुवात होते व अशा रीतीनें साम्राज्यतृष्णा व व्यापरतृष्णा या दोनहि अनावर होतात. हीं दोनहि दृश्यें यूरोपांत गेलीं तीन शतकें दिसून येतात. हल्लींच्या कालीं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणें हेंच श्रेयस्कर समजलें जातें व त्यामुळें पूर्वींच्या अवस्थांत हिंदुस्थानसारखे देश या जीवनकलहांत मागें पडतात. मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यास भांडवलाची समृद्धि असावी लागते, त्यामुळें ज्या देशांत बँकिंग पूर्णावस्थेस जाऊन पोंचलें आहे असे देश जास्त प्रमाणावर उत्पादन करून ज्या देशांत कमी भांडवल आहे त्या देशांशीं सहज स्पर्धा करतात व त्यांनां मागें टाकतात. यांत्रिक साधनांशिवाय अति मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणें शक्य नसतें व याच कारणाकरितां सर्व व्यापारी देश कारखान्यांकडे जास्त लक्ष पुरवितात.

शेतकी व कारखाने हे समप्रमाणांत असावेत. नुसता कृषिप्रधान देश निर्धन असतो व एकाच उद्योगावर अवलंबून असल्यामुळें तेथें दुष्काळाची भीति जास्त असते. म्हणून हिंदुस्थानसारख्या देशांत अनेक उद्योगधंदे स्थापणें इष्ट आहे; आतां या धंद्यांत यांत्रिक उत्पादन असावें किंवा सर्व वस्तूं हातानें कराव्या हें निश्चित ठरवितां येणार नाहीं; परंतु होईल तितकें कलाकौशल्याचें काम हातानें करावें हें उत्तम. एकाच तर्‍हेच्या हजारों वस्तू करावयाच्या असल्यास यांत्रिक साधनांचा उपयोग करावा. यांत्रिक उत्पादन अजीबात वर्ज्य करणें इष्ट नाहीं; परंतु शक्य तितकें तें मर्यादित राहील असें करावें.

उत्पादन व उपभोग यांमध्यें मोठी खिंड पडतां कामा नये. हल्लींच्या काळीं उत्पादन हें मागणीपेक्षां पुष्कळ वेळां जास्त असतें, त्यामुळें कारखानदारांचें नुकसान होतें व पुष्कळांचीं दिवाळीं निघतात. प्रत्येक कारखानदारानें आपल्या वस्तूंनां किती मागणी येईल याचा बारीक अंदाज केला पाहिजे; परंतु हल्लींच्या पद्धतींत हें शक्य नसते व त्यामुळें ही पद्धति म्हणजे यांत्रिक उत्पादन हेंच वर्ज्य करावें, असें अनेकांस वाटूं लागलें आहे; परंतु हें मत अगदींच एकांगीं आहे. जास्त माल झाल्यास तो कमी दरानें देऊन टाकून पुढील वर्षीं व्यवस्थित अंदाज करणें हा खरा मार्ग आहे. उत्पादनावर सरकारी नियंत्रिण असावें असें कांहींचें मत आहे; परंतु हें तत्त्व व्यक्तिस्वातंत्र्यास विघातक असल्यामुळें ग्राह्य मानतां येत नाहीं. सहकारितत्त्वावर दुकानें काढणें हा फाजील उत्पादन टाळण्यास एक मार्ग आहे. कारण सोसायटीचे सभासद किती आहेत व त्यांची मागणी किती आहे, हें प्रत्येक दुकानास माहीत असतें. सर्व उत्पादन अशा रीतीनें सहकारी मंडळांच्या ताब्यांत गेल्यास उत्पादन व उपभोग यांचा निकट संबंध होईल. उत्पादनांत सुधारणा करून तेवढ्याच श्रमानें व तेवढ्याच भांडवलावर दुप्पट किंवा दीडपट उत्पादन केल्यास अतिशय फायदा होईल. हल्लींच्या काळीं सर्व देशांत अमर्याद वेळ व मेहनत फुकट जाते असें निदर्शनास आलें आहे व त्यामुळें पुष्कळ लोकांचें लक्ष उत्पादनाची शक्ति व कार्यक्षमता वाढविण्याच्या युक्त्यांकडे वेधलें आहे. या सर्व युक्त्यांचा विचार करणें प्रस्तुत शक्य नाहीं पण हिंदुस्थानांत याविषयीं विचार होणें फार इष्ट आहे. येथील उत्पादनाची शक्ति अतिशय अल्प आहे. शंभर रुपये भांडवल व एका दिवसाचे श्रम यांनीं जें कार्य येथें होतें त्याच्या कित्येक पट इंग्लंड व जर्मनी येथें होतें. यास कौशल्य वाढविणें हा एक उपाय होय. त्याचा मार्ग शाळा व यांत्रिक कामाचे वर्ग काढणें हा आहे. परंतु याशिवाय दुसर्‍या मार्गांचाहि अवलंब केला पाहिजे. हे सर्व मार्ग फुकट जाणारे पदार्थ वांचविण्याच्या स्वरूपाचे आहेत. याविषयीं प्रत्येक कारखानदारानें अतिशय दक्ष राहिल्यास लक्षावधी रुपयांची बचत होईल हें नि:संशय आहे. शिवाय मजुरांचें आरोग्य उत्तम ठेवणें, त्यांनां मलेरिया इत्यादि रोग न होतील अशी तजवीज ठेवणें, त्यानां प्रसन्न ठेवण्याकरितां करमणुकीचीं साधनें उत्पन्न करणें व बोनस अगर नफ्याचा कांहीं भाग त्यांनां देऊं करून त्यांची कारखान्याविषयींची हितबुद्धि दृढ करणें हेहि मार्ग अमलांत आले पाहिजेत. हल्लींची मजूरवर्गाविषयींची अनास्था नाहींशी होऊन त्या वर्गाविषयीं कळकळ उत्पन्न झाली पाहिजे. अशी योजना न झाल्यास भांडवलवाले व मजूर यांमधील विरोध विकोपास जाऊन समाजसत्तावाद अधिक फैलावेल व सामाजिक क्रांति घडवून आणण्याविषयीं मजूर उपक्रम करूं लागतील.

हिंदुस्थानच्या दृष्टीनें येथील उत्पादन अधिक वाढविण्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. हल्लीं दर माणशीं प्राप्ती ४० रुपयांची आहे ती निदान शंभर रुपये होण्यास उत्पादन अडीचपट झालें पाहिजे. हें करण्यास शेतकी, कारखाने व व्यापार या तिहींमध्यें प्रगति झाली पाहिजे व ती प्रगति करण्यास प्रत्येक सुशिक्षित मनुष्यानें झटलें पाहिजे. देशांचें दारिद्र्य घालविणें म्हणजे उत्पादनाची मर्यादा वाढविणें होय.  

उत्पादनावर सरकारचें नियंत्रण असावें किंवा नाहीं ह्या प्रश्नासंबंधानें दोन मतें आहेत. एका पक्षाच्या मतें उत्पादन हें व्यत्तिस्वातंत्र्यावर अवलंबून असावें. ज्याला जें पटेल तें त्यानें उत्पन्न करावें. उत्पन्न केलेली वस्तु आरोग्याच्या दृष्टीनें इष्ट आहे किंवा घातक आहे, नीतिदृष्ट्या उपभोग घेण्याच्या लायकीची आहे किंवा नाहीं या प्रश्नांत सरकारनें लक्ष घालूं नये. दुसर्‍या पक्षाच्या मतें अर्थशास्त्र व नीति यांचा निकट संबंध आहे व त्यामुळें उत्पादनावर समाजसत्तेची अर्थात् सरकारची पूर्ण दृष्टि पाहिजे. नीतीस अपायकारक असे पदार्थ अजीबात बंद केले पाहिजेत किंवा त्यांच्या उत्पादनाचें कांहीं विशिष्ठ तत्त्वांवर नियंत्रण केलें पाहिजे. उत्पादनाच्या कामांत व्यत्तिस्वातंत्र्याचें तत्त्व अतिशय घातक आहे. हें मत रॉशर, हिल्डब्राँडप्रभृति जर्मन ऐतिहासिक संप्रदायाच्या अर्थशास्त्रज्ञांनीं फार मुद्देसूद रीतीनें प्रतिपादन केलेलें आहे व हेंच मत जास्त ग्राह्य आहे. इंग्लंडमध्येंहि हल्लीं या मतास अधिक पुष्टि मिळत आहे असें प्रचलित वादविवादांवरून दिसून येईल. याच तत्त्वावर मद्यप्राशन अगदीं संकुचित क्षेत्रांत ठेवण्याविषयीं हिंदुस्थानांतील लोकमताचे धुरीण सरकारास आग्रह करीत आहेत.

नीतिदृष्ट्या उच्चनीचपणा ठरवून उत्पादनांमध्यें एक प्रकारची श्रेणि लावितां येईल; जिवंत रहाणें हें नीतिदृष्ट्याहि आवश्यक असल्यामुळें सर्व प्रकारच्या आवश्यक अन्नांचें उत्पादन हें सर्वांत वर ठेवलें पाहिजे. त्यानंतर देशाचें संरक्षण करण्यास आवश्यक असें उत्पादन याचा अधिकार क्रमानें प्राप्त होतो. त्याच्याखालीं संस्कृतीस आवश्यक परंतु अनीतीस पोषक नाहींत अशा चैनीच्या पदार्थांचें उत्पादन ठेवलें पाहिजे व सर्वांच्या खालीं अगदीं कनिष्ठ दर्जाचें उत्पादन म्हणजे शरीरास, नीतीस व संस्कृतीसहि विघातक अशा वस्तूंचें उत्पादन हें होय. या शेवटल्या उत्पादनास होईल तितका प्रतिबंध प्रत्येक राष्ट्रानें केला पाहिजे. कांहीं वस्तू नीतिदृष्ट्या आवश्यक आहेत किंवा नाहींत यासंबंधानें वाद आहे. उदाहरणार्थ औषधें, विशिष्ट प्रकारचे कपडे, कनिष्ठ कादंबर्‍या व काव्यें.  परंतु हा वाद अर्थशास्त्राच्या तत्त्वानुसार सोडवितां येण्यासारखा नसल्यानें याचें निवारण नीतिशास्त्रावरच सोंपविलें पाहिजे. प्रत्येक मनुष्यास नीतिमान करण्याचा प्रयत्‍न केल्यास सरकारी नियंत्रणाशिवाय हा प्रश्न आपोआप सुटेल व अनीतिमान् उत्पादनास कोणीच मदत न केली म्हणजे तें सहज नष्ट होईल. परंतु ही गोष्ट कठिण असल्यामुळें कांहीं शतकें तरी सरकारनें उत्पादनाचें नियंत्रण करणें आवश्यक आहे.

उत्पादन शक्य तेवढें बहुविध असावें. होतां होईल तों सर्व तर्‍हेच्या वस्तू प्रत्येक देशास निदान प्रत्येक मोठ्या देशास करतां आल्या पाहिजेत. हें बहुविध उत्पादन करण्यास पुष्कळ वेळां संरक्षक जकातीच्या पद्धतीची आवश्यकता असते. अशी परिस्थिति उत्पन्न झाल्यास कोणत्याहि देशानें संरक्षक जकाती ठेवण्यास मागेपुढें पाहूं नये. याच मार्गानें अमेरिकेंतील संयुक्त संस्थानांनीं आपलें उत्पादन सर्वांगीण व बहुविध करून घेतलें व त्याच मार्गाचा हिंदुस्थानास अवलंब केला पाहिजे. हें करण्यास दिरंगाई झाल्यामुळें आजपर्यंत या देशाचें अपरिमित नुकसान झालें आहे. (ले. प्रो, व्ही. एन. गोडबोले.)

   

खंड ९ : ई ते अशुमान  

 

  ईजिप्त

  ईजियन समुद्र

  ईजियन संस्कृति
  ईटन-इंग्लंड
  ईडनिंबू
  ईथर
  ईदर
  ईदिग
  ईव्हशाम
  ईशोपनिषद
  ईश्वरकृष्ण
  ईश्वरीपूर
  ईश्वरसिंग
  ईसॉप
  ईस्ट इंडिया कंपनी
  ईस्ट इंडीज
  ईस्टर
  ईस्टर बेट
  ईस्टविक्, एडवर्ड बॅक् हाऊस
  ईक्षणयंत्र
 
  उकाँग
  उकुंद
  उखाणे
  उखामंडळ
  उग्रसेन
  उचकी (हिक्का )
  उचले व भामटे
  उचाड
  उच्च-पंजाब
  उच्च शहर
  उच्च
  उच्छर
  उंज
  उज्जनी
  उज्जयन्ताद्रि
  उझानी
  उंट
  उटकटारी
  उटकमंड
  उंड
  उंडवलें
  उंडविन
  उडियासांझिया
  उडीद
  उडुपी
  उड्र
  उतथ्य
  उत्तंक
  उत्तनगरै
  उत्तमपालेयम
  उत्तर
  उत्तर अमेरिका
  उत्तरध्रुवप्रदेश
  उत्तरपाडा
  उत्तर मेरूर
  उत्तर सरकार
  उत्तरा
  उत्तरापथ
  उत्तानपाद
  उत्पल
  उत्पादन
  उत्रौला
  उदमलपेट
  उदयगिरी
  उदयन
  उदयनाचार्य
  उदयपूर
  उदयप्रभसूरि
  उदयभानु
  उदयसिंह
  उदर
  उदलगुरी
  उदाजी पवार
  उदासी
  उंदिरखेड
  उंदीर
  उदेपुरी बेगम
  उदेपूर संस्थान
  उदेपूर गांव
  उदेपूर शहर
  उदेपूर
  उदेय्यार पालेयम्
  उंदेरी
  उद्गाता
  उद्गीर
  उद्गीरची लढाई
  उद्दंड
  उद्दंडपुर
  उद्दालक
  उद्धव
  उद्धव गोसावी
  उद्धवचिद्घन
  उद्धव नाला
  उद्धव योगदेव
  उद्बोधनाथ
  उद्वेग रोग
  उन
  उन-देलवाडा
  उनबदेव
  उना
  उनियार
  उनी
  उन्कल
  उन्नाव
  उन्माद
  उन्सरी
  उपकन्चा
  उपकेशगच्छ
  उपनयन
  उपनिधि
  उपनिषदें
  उपनेत्र
  उपप्लव्य
  उपमन्यु
  उपरवार
  उपरि
  उपरिचर
  उपवेद
  उपशून्य
  उपसाला
  उपांशु
  उपेनंगडी
  उपेन्द्र परमार
  उप्पर
  उप्माक
  उप्रई
  उप्लेटा
  उंबर
  उम्बेक
  उबेरो
  उंब्रज
  उमत्तूर
  उमरकोट
  उमर खय्याम
  उमरखान
  उमरखेड
  उमरबिन खत्तब
  उमरावती
  उमरी
  उमरेठ
  उमरेड
  उमा
  उमाजी नाईक
  उमापति
  उमापति शिवाचार्य
  उमाबाई दाभाडे 
  उमीचंद
  उमेटा
  उमेदवारी
  उमेरिया
  उर
  उरगप्पा दंडनाथ
  उरण
  उरल पर्वत
  उरलि
  उरवकोंड
  उरिया, उडिया
  उरी
  उरुळी
  उरोगामी
  उर्दुबेगी
  उर्फी, मौलाना
  उर्मिया सरोवर
  उर्मिया, शहर
  उर्वशी
  उलघबेग मिरझा
  उलूक
  उलूपी
  उलेमा
  उल्का
  उल्बारिया
  उल्म
  उल्लतन
  उल्लाळ 
  उवा
  उशना, वैदिक
  उशीनर
  उकूर
  उषा
  उष्टारखाना
  उष्णता
  उष्णताजन्य विद्युत
  उष्णतामापन
  उष्णता-रसायनशास्त्र
  उष्णतावहन
  उष्णमानमापक यंत्र
  उस्का
  उस्तरण
  उस्मान
  उस्मान नगर
  उस्मानाबाद
  उळवी
 
  ऊदाइन (बेंझाईन)  
  ऊदाम्ल
  ऊदिदिन
  ऊदिन
  ऊदिल अल्कहल
  ऊदिल प्रायोज्जिद
  ऊदिल भानन
  ऊधमबाई
  ऊरूस्तंभ
  ऊर्ध्वपातनक्रिया
  ऊस
 
  ऋग्वेद
  ऋचीक
  ऋणमोचन
  ऋतु
  ऋतुपर्ण
  ऋत्विज
  ऋभु वैदिक
  ऋषभ
  ऋषि
  ऋषिऋण
  ऋषिक
  ऋषिपंचमी
  ऋषियज्ञ
  ऋषिवरण
  ऋष्यमूक
  ऋष्यवान
  ऋष्यशृंग
  ऋक्षरजा
 
  एओलिस
  एकचक्रा
  एकत
  एकतत्त्ववाद
  एकदंत भट्ट
  एकनाथ
  एकबटाना
  एकर
  एकरुक
  एकलव्य
  एकलिंगजी
  एकादशरुद्र
  एकादशी
  एकिल्
  एक्झीटर
  एक्रान
  एक्स
  एक्स-ला-चॅपेल
  एगमाँट लॅमोरल कौंट ऑफ
  एगिनकूर
  एचर्ड
  एंजिन
  एट्ना
  एट्रूरिया
  एडगर
  एडन
  एडन कालवा
  एडप्पल्ली
  एन्डर
  एडवर्ड
  एडवर्डसाबाद
  एडिंबरो
  एडेन जॉर्ज - लॉर्ड ऑकलंड
  एडेसा
  एडोम
  एड्रियन
  एदलाबाद
  एनमे
  एनॅमल
  एन्नोर
  एपिक्टेटस
  एपिक्यूरस
  एपिनस, फ्रान्झ उलरिच थिओडार
  एपीडॉरस
  एंपीडोक्लिस
  एफेसस
  एबनी (अबनूस)
  एबल सर फ्रेडरिक
  एंब्रान
  एमडेन
  एमॅन्युअल व्हिक्टर
  एमिनाबाद
  एमीन्स
  एमेअस
  एमेरी
  एम्मेट रॉबर्ट
  एरंडी
  एरंडोल
  एरन
  एरनाड
  एरवल्लर
  एरिडु
  एरिथ्री
  एरिनपुर
  एरियन
  एरिलिगारू
  एरोड
  एर्नाकुलम
  एलगंडल
  एलाम
  एलाय
  एलिआकॅपिटोलिना
  एलिचपूर
  एलिझाबेथ
  एलिस
  एलेनबरो
  एलेफन्टा
  एल्जिन
  एल्जिन लॉर्ड
  एल्फिन्स्टन मौंट स्टुअर्ट
  एल्ब
  एल्बा
  एल्युथेरापीलीस
  एल्युसिस
  एल्सिनोर
  एसर हजन
  एसेक्स परगणा
  एस्किमो
 
  ऐतरेय आरण्यक
  ऐतरेय उपनिषद्
  ऐतरेयब्राह्मण
  ऐन
  ऐनापुर
  ऐनी-अकबरी
  ऐनुद्दीन
  ऐनू
  ऐमक
  ऐयनर
  ऐरणी
  ऐरावत
  ऐहिकवाद
  ऐहोळ
 
  ओक
  ओक वामन दाजी
  ओकटिवन
  ओकपो
  ओकलंड शहर
  ओकहॅम
  ओकुमा, कौंट
  ओकू
  ओकेन, लॉरेन्झ
  ओकोनेल डॅनियल
  ओक्लाहामा
  ओच्चन
  ओजिब्वा
  ओझर
  ओझा
  ओट
  ओटावा
  ओट्टो
  ओडर नदी
  ओडेसा
  ओडोनेल हेनरी जोसेफ
  ओतारी
  ओतुर
  ओध
  ओनला
  ओनेगा
  ओन्गोले
  ओपोर्टो
  ओफीर
  ओब्रायन वुइल्यम स्मिथ
  ॐ ( ओम् )
  ओमान
  ओम्स्क
  ओयामा
  ओरई
  ओरॅंग ऊटंग
  ओरकझई
  ओरछा
  ओरावन
  ओरिसा 
  ओरिसा कालवे
  ओरिसांतील मांडलिक संस्थानें
  ओर्मेरॉड एलिअनॉर
  ओलपाड
  ओल्डहॅम
  ओल्डहॅम थॉमस
  ओल्डेनबर्ग
  ओवसा
  ओवा
  ओवेन, रॉबट
  ओवेन सर रिचर्ड
  ओव्हिड
  ओशीमा
  ओषण
  ओसवाल
  ओसाका अथका ओझावा
  ओस्कार
  ओस्टीयाक
  ओहम्, जार्ज सायमान
  ओहममापक
  ओहिओ
  ओहिंद
  ओळंबा
 
  औक अथवा अवुक जमीनदार
  औट्रम
  औतें
  औदीच्य ब्राह्मण
  औद्देहिक
  औद्योगिक परिषद
  औंध
  औंधपट्टा
  औधेलिया
  औनियाति
  औरंगझेब अलमगीर
  औरंगाबाद
  औरंगाबाद सय्यद शहर
  और्व
  औशनस
  औसले सर विल्यम
  अं
  अंक
  अंकगणित
  अंकचक्र
  अंकलगी
  अंकलेश्वर
  अंकाई टंकाई
  अंकिसा
  अंकेवालिया
  अॅंकोना
  अॅंकोबार
  अंकोर
  अंकोला
  अंग
  अंगठी
  अंगडशाहा
  अंगडि
  अंगडिपूरम
  अंगद
  अंगदशिष्टाई
  अंगदिया
  अंगरखा
  अंगापूरकर (हरि)
  अंगारा
  अंगुत्तर निकाय
  अंगुर शेफ
  अंगुळ
  अंगोरा शहर
  अॅंगोला
  अॅंग्विल्ला
  अंघड
  अंचलगच्छ
  अंज-(अॅंटिमनी)
  अंजनगांव
  अंजनगांव बारी
  अंजनगांव सुर्जी
  अंजनवेल
  अंजनी
  अंजनेरी
  अंजार
  अंजिदिव
  अंजी
  अंजीर
  अंजू
  अंजेंगो
  अॅंजलिको फ्रा
  अॅंटनान-रिव्हो
  अॅंटवर्प
  अंटिओक
  अॅंटिग्वा
  अॅंटियम
  अॅंटिलीस
  अॅन्टिव्हरी
  अन्टीगोनस गोनाटस
  अॅन्टीगोनस सायक्लॉप्स
  अॅन्टीपेटर
  अॅन्टीलिया
  अॅंटोनिनस पायस
  अॅंटोनियस ( मार्कस )
  अंडवृध्दि
  अण्डाशयछेदनक्रिया
  अॅंडीज
  अंडें
  अंडोरा
  अंडोल
  अंडोला
  अॅंड्रासी ज्युलियस
  अॅंड्रिया डेल सार्टो
  अॅंड्रोमेडा
  अॅंड्रयूज थॉमस
  अंतगड
  अंतधुरा
  अंतर इब्नशद्दाद
  अंतराल
  अंतर्गळ
  अंतर्वेदी
  अंतर्ज्ञान
  अंताजी ( उर्फ बाबुराव ) मल्हारराव बर्वे
  अंताजी माणकेश्वर
  अंताजी रघुनाथ
  अंतालिमा
  अंतुर्ली
  अंतूर
  अंतोबा गोसावी
  अंत्रपुच्छदाह
( अपेंडिसाइटीज )
  अंत्रावरणदाह
( पेरिटोनिटिस )
  अॅंथनी सुसान ब्रौनेल
  अंदमान आणि निकोबार बेटें
  अंदमान बेटें
  अंदाळ
  अंदोरी
  अंध किंवा आंध
  अंधक
  अंधत्व
  अंधरगांव
  अंधळगांव
  अंधारी नदी
  अंब
  अंबत्तन
  अंबर ( धातु )
  अंबर
  अंबर उदी
  अंबरखाना
  अंबरनाथ अथव अमरनाथ
  अंबरनाथ
  अंबरपेठ
  अंबराम्ल
  अंबरीष
  अंबलक्कारन्
  अंबलपुलई
  अंबलवासि
  अंबष्ठ
  अंबहटा
  अंबा
  अंबा, (तालुका)
  अंबागड
  अंबागडचौकी
  अंबाजी इंगळे
  अंबाजी दुर्ग
  अंबाजी पुरंधरे
  अंबाडी
  अंबा भवानी
  अंबाला
  अंबालिका
  अंबाली
  अंबासमुद्रम
  अंबिका
  अंबिका दत्त व्यास
  अंबिकापूर
  अंबुशी
  अंबूर
  अंबेर
  अंबेला
  अंबेहळद
  अंबोयना
  अंबोली
  अंभोरा
  अंशुमान
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .