विभाग नववा : ई-अंशुमान
उदमलपेट, ता लु का – मद्रास. कोइमतूर जिल्ह्यांतील तालुका. याचें क्षेत्रफळ ५६६ चौ. मैल असून लोक सं. १९०१ सालीं १५९८०४ होती. खेड्यांची संख्या ८६ असून उदमलपेट या नांवाचें एकच शहर आहे. काळीची जमा १९०३-०४ सालीं २४८००० होती. तालुक्याचा बराच भाग सपाट असून दक्षिणेस अनैमलइ पहाड असल्यामुळें त्या भागांत जंगल जास्त आहे. दरसाल पावसाचें मान २२ इंच असतें. जमीन बहुधा लाल रंगाची आहे. परंतु कांहीं भाग काळा आहे. त्यांत कापूस पुष्कळ पिकतो.
गां व :- मद्रांस. कोइमतूर जिल्ह्यांतील उदमलपेट तालुक्याचें मुख्य ठिकाण. यांची लो. सं. (१९११) १०४४५. पैकीं अष्टमांश मुसलमान लोक आहेत. कापूस, धान्य व कपडा यांचा मोठा व्यापार चालतो. येथील व्यापारी कोमटी, नाटुकोटु चेटी, व मुसलमान असतात. येथील लोहार फार कुशल म्हणून प्रसिद्ध आहेत. या ठिकाणीं जिल्हा मुनसफची कचेरी आहे.