विभाग नववा : ई-अंशुमान
उदलगुरी - आसाम. दरंग जिल्ह्यातील मराळदाइ पोट विभांगातील एक गांव. हें हिमालयाच्या पायथ्याशीं आहे. हिवाळ्यांत या ठिकाणीं यात्रा भरते तेव्हां ल्हासा प्रांतांतील टोवंग येथील पुष्कळ लोक यात्रेला येतात. बाहेरून येणारे व्यापारी जिन्नस-तट्टें, बकरीं, सकलादी, मीठ व याक जनावरांच्या शेंपट्या हे होत. येथून बाहेर जाणारे व्यापारी जिन्नस तांदूळ, कापूस रेशमी कापड व पितळेचीं भांडीं इत्यादि. हिवाळ्यांत या ठिकाणीं एक दरबार भरत असतो. त्यावेळेस तिबेटी लोक सरकारच्या हुकुमानें तट्टांवर बसून चिनी पोषाख घालून येतात. तो देखावा पाहण्यासारखा असतो. हिंवाळ्यांत उदलगुरी किल्ल्यावर ४६ शिबंदी असते