विभाग नववा : ई-अंशुमान
उदेपूर गां व – आसाम टिपराहिल्ल संस्थानांतील एका पोटविभागाचें मुख्य स्थान. टिपरा संस्थानची ही जुनी राजधानी होती. सांप्रत तिचा नाश झाला असून हल्लीं सर्वत्र दाट जंगल व मोठीं सरोवरें मात्र अस्तित्वांत आहेत. त्रिपुरेश्वरीचें देऊळ पूर्वबंगाल्यांत प्रसिद्ध असून दरसाल हजारों लोक यात्रेकरितां येतात. हें देऊळ सोळाव्या शतकाच्या आरंभींचें आहे.