विभाग नववा : ई-अंशुमान
उदेपूर शहर. – राजपुताना. जयपूर संस्थानांतील शेखावत निझामत (जिल्ह्या) मधील एका पोट विभागाचें मुख्य शहर. हें जयपूर शहरापासून वायव्येस सरासरी ६० मैलांवर आहे. शहराला जरी तटबंदी नाहीं तरी तें अरवली डोंगरावर वसलें असल्यामुळें सुरक्षित स्थितींत आहे. लो. सं. १९११ सालीं ७७४३ होती. जयपूर संस्थानच्या नाग शिबंदीचें हें राहण्याचें ठिकाण होय. लढाईच्या अगर दुसर्या अशाच संकटाच्या प्रसंगीं शेखावतीचे सरदार लोक पुढें काय करावें म्हणून याच ठिकाणीं जमून विचार करीत. कर्नल टॉडचें असें म्हणणें आहे कीं उदेपूरचें प्राचीन नांव कुसुंबी होतें.