विभाग नववा : ई-अंशुमान
उद्गाता, वै दि क.- यज्ञ कर्मांतील मुख्य चार ॠत्विजांपैकीं एक. यज्ञकर्मांत याच्याकडे सामगायनाचें काम असतें. यज्ञामध्यें याच्या गणांत आणखी प्रस्तोता, प्रतिहर्ता व सुब्रह्मण्य या ॠत्विजांचा समावेश होतो. याच्यासंबंधीं माहिती‘वेदविद्या’ (ज्ञानकोश विभाग २ पृष्ठ ३७२) या विभागांत आली आहे.
पौ रा णि क.–(स्वायंभूचा वंशज) ॠषभदेव कुळांतील प्रतीह राजाच्या तीन पुत्रांतील कनिष्ठ. हा यज्ञकर्मप्रिय असून, त्यांत हा परम निपुण होता. म्हणून याचें हें नांव पडलें होतें. (भाग स्कं. ५, अ. १५. प्रा. को.)