विभाग नववा : ई-अंशुमान
उद्गीर, ता लु का.–हैद्राबाद संस्थान. बेदर जिल्ह्यांतील एक तालुका. १९११ सालीं लोकसंख्या जहागीर धरून १,००,२४२ होती. क्षेत्रफळ ६७६ चौरस मैल होतें. तालुक्यांत उद्गीर नांवाचें एकच शहर असून खेड्यांची संख्या १६४ आहे व त्यांत ५४ जहागिरी आहेत. १९०१ सालीं काळीचा वसूल तीन लक्ष होता. १९०५ सालीं कांहीं खेडीं नांदेड जिल्ह्यांतील देशलूर तालुक्याकडे गेलीं व बाकीचीं वरवाल राजुर्यापासून उद्गीरला जोडलीं. मिरारा (जहागीर), उद्गीर व बेदर तालुक्यांत असून त्यांत पंचेचाळीस गांवें आहेत व त्यांची लोकसंख्या २१,७३४ आहे.
श ह र.–हैद्राबाद संस्थान बेदर जिल्ह्यांतील उद्गीर तालुक्याचें मुख्य ठिकाण. लोकसंख्या १९११ सालीं ७,२१३ होती. येथें विजापूरच्या राजानें एक किल्ला बांधला असून १६३६ सालीं शहाजहान बादशहाच्या सरदारांनीं त्यास वेढा देऊन उद्गीर सर केलें. इसवी सन १७६० त निजाम व मराठे यांच्यामध्यें एक मोठी लढाई झाली होती व तींत निजामाचा सर्वस्वी पराभव होऊन मराठे सांगतील त्या अटी कबूल करून निजामानें तह केला. किल्ला १४९३ सालीं बांधला असून त्याच्या सभोंवतीं तट आहे. आंत दोन व बाहेर दोन असे दरवाजे होते, पण आतां सर्व पडलेले आहेत