विभाग नववा : ई-अंशुमान
उद्दालक – आरुणि. गौतमगोत्रोत्पन्न अरुणि ॠषीचा पुत्र व धौम्य ॠषीचा शिष्य. आरुणि हा पंचाल देशांतला म्हणून यास आरुणि पांचाल असेंहि म्हणत. गुरूच्या शेतास घातलेला मातीचा बांध पाण्याच्या प्रवाहामुळें राहीना म्हणून, यानें स्वतः बरेच दिवस एकसारखें आडवें पडून पाणी थांबविलें होतें. या एकनिष्ठ सेवेमुळें धौम्य ॠषि प्रसन्न होऊन त्यांनीं उद्दालकावर अनुग्रह केला. यास श्वेतकेतु व नचिकेत असे दोन मुलगे व सुजाता नांवाची मुलगी होती. [म. भा. आदि. ३]