विभाग नववा : ई-अंशुमान
उद्धव योगदेव – औरंगजेबानें इ. स. १६९० त रायगड काबीज करून येसुबाई व शाहू यांनां पकडून नेलें, त्यावेळीं त्यांच्याबरोबर हा होता. याला राजाज्ञा अशी पदवी त्यावेळीं होती. शाहू औरंगजेबाच्या कैदेंत असतां त्याचा राजकीय कारभार उद्धवपंतच पाही. यानेंच शाहूकरितां मुली पाहून त्याचीं लग्नें केलीं. शाहू दक्षिणेंत आला तरी उद्धवपंत मागें येसुबाईबरोबर राहिला होता. [म. रि. म. वि. ३ पृ. ३०१]