विभाग नववा : ई-अंशुमान
उदबोधनाथ – एक महाराष्ट्र कवि. राशिन गांवचा यजुर्वेदी वाजसनेयी शाखेचा ब्राह्मण, आडनांव ठिपसे. नांव उद्धव. गैबीनाथाची शिष्या गुप्तनाथा हिनें उद्धवास उपदेश देऊन उद्बोध असें त्याचें नांव ठेविलें. उद्बोधनाथाचीं पदें, अभंग वगैरे रचना आहे. पदें योगमार्गी दिसतात. नाथाचे बरेच शिष्य होते, त्यांपैकीं केसरीनाथ पुढें प्रसिद्धीस आला.
उद्बोधनाथानें शके १६०९ त, वैशाख वद्य ९ स समाधि घेतली. यांची समाधि राशिन येथे आहे. [सं. क. का. सू. महाराष्ट्र कविचरित्र. महाराष्ट्र सारस्वत. ]