विभाग नववा : ई-अंशुमान
उन – मध्यहिंदुस्थान. इंदूर संस्थान. नेमाड जिल्ह्यांतील पुरातन जागा. येथील लो. सं. १९०१ सालीं १२५६ होती. पूर्वीं हें स्थळ कांहींसें बरें होतें. हल्लीं निवळ खेडें झालेलें आहे. येथें एक जैन देऊळ बाराव्या शतकांतलें असून धारच्या परमार राजाचा शिलालेख आहे. तुकोजीराव होळकरांनीं तलाव बांधण्यांचीं कामें सुरू करून मक्ते दिले त्यावेळीं मक्तेदारांनीं वरील देवळांची फार नासाडी केली. या ठिकाणीं एक पोष्ट आफीस व शाळा हीं आहेत.