विभाग नववा : ई-अंशुमान
उनबदेव – मुंबई. पूर्वखानदेश. चोपडें तालुक्यांत अडावदच्या उत्तरेस तीन मैलांवर एक उजाड खेडें असून येथे एक उन्हाळें आहे. याचें ऊन पाणी एका देवळाच्या चौथर्याखालून निघतांना दिसतें व पुढें एका गायमुखांतून एका कुंडांत पडतें. येथें एक धर्मशाळा व दोन लहान देवळें आहेत. या पाण्यांत स्नान केल्यानें (त्यांत गंधक असल्यानें) त्वचेचे रोग बरे होतात अशी समजूत आहे. श्रीरामांनीं सारंग ॠषीचा रोग नाहींसा करण्याकरितां बाण मारून हा झरा उत्पन्न केल्याची दंतकथा आहे. पाण्याची उष्णता १४०० आहे. [मुं. गॅ. १२]