विभाग नववा : ई-अंशुमान
उना त ह शी ल. – पंजाब. होशयारपूर जिल्ह्यांतील एक तहशील. क्षेत्रफळ ७१६ चौ. मै. आहे. शिवालिक पहाडाच्या रांगांमधील साहेन नांवाची एक मोठी खडकाळ दरी याच तहशीलींत असून बिआस नदी येथून उगम पावते. शिवाय सतल्ला नदीच्या डाव्या तीरावर जंदबारी नांवाचा तालुका उना तहशीलींत मोडतो. १९११ सालीं लो. सं. २३१८५७ व खेड्यांची संख्या ५२६ होती. तहशीलींत उना व आनंदपूर हीं दोन मोठीं गांवें असून काळीचें उत्पन्न १९०३-०४ सालीं ३ लक्ष होतें.
गां व. – पंजाब. होशायारपूर जिल्हा. उना तहशीलीचें मुख्य शहर. याची लो. सं. १९०१ सालीं ४७४६ होती. पहिला शीख गुरु बाबा नानकापासून कालाधाढी घराण्यांतून बेडी वंशाचे राजे उतपन्न झाले होते. त्यांची मुख्य जागा उना शहरीं असल्यामुळें या गांवाला महत्त्व आलेलें आहे. व्यापार वगैरे फारसा नाहीं. १८६७ सालीं म्यु. कमिटीची स्थापना झाली. १९०२-०३ सालीं उत्पन्न ३८०० असून खर्च २९०० रुपये झाला. ऐथें एक शाळा असून सरकारी दवाखाना आहे.