विभाग नववा : ई-अंशुमान
उनियार. – राजपुताना. जयपूर संस्थान. मालपूर जिल्हा (निझामत्) यांतील उनियार जमीनदारीचें मुख्य शहर. बनास नदीला मिळणार्या तलवा नदीच्या कांठीं असून जयपूर शहरापासून ७२ मैल आहे. गांवाला तटबंदी असून किल्ला आहे. १९११ सालीं ४६१३ लो. सं. होती. उनियारचे रावराजे कच्छवाह रजपूत असून नरुक पंथाचे आहेत. हे जयपूरदरबारला ३७६०० रुपये दरसाल खंडणी देतात. या ठिकाणीं एक प्राथमिक शाळा आहे. सबंध जमीनदारींत १ शहर व १२४ खेडीं आहेत. १९११ सालीं जमीनदारीची लो. सं. ३३७०८ होती. जयपूर संस्थानांत उनियार हा फार सुपीक भाग असून रावराजांनां दरसालचें उत्पन्न ३ लक्ष रुपये आहे.