विभाग नववा : ई-अंशुमान

उन्कल. – मुंबई इलाखा. धारवाड जिल्हा. हुबळीच्या उत्तरेस सुमारें तीन मैलांवरचा एक गांव. गांवांत तीन जुनीं देवळें असून तीं सर्व जखनाचार्यानें बांधलेलीं आहेत असें म्हणतात. यांपैकीं दोन म्हणजे कळमेश्वराचें व वीरभद्राचें देऊळ, हीं लहान व नवीन बांधणीचीं दिसतात. पण तिसरें चंद्रमौलेश्वराचें देऊळ काळ्या दगडाचें असून त्याच्या भिंती व खांब नक्षीदार आहेत. उन्कलच्या पडक्या किल्ल्यास जाण्याच्या रस्त्यावर दोन शिलालेख आहेत. [मुं. गॅ. पु. २२]