विभाग नववा : ई-अंशुमान
उबेरो – मुंबई. सिंध. सक्कर जिल्ह्यांतील तालुका. याचें क्षेत्रफळ ४६६ चौ. मै. असून लो. सं., १९०१ सालीं ४३०९८ होती. तालुक्यांत ७९ खेडीं असून तालुक्याचें ठाणें उबेरो येथें असतें. काळीचें व इतर बाबी मिळून उत्पन्न २ लक्ष आहे. पाण्याचा पुरवठा माहीवा नदीपासून अनिश्चित प्रकारचा असल्यामुळें शेतकर्यांचीं स्थिति चांगली नाहीं. तालुक्यांत जहागीर जमीनी पुष्कळ आहेत.