विभाग नववा : ई-अंशुमान
उरगप्पा दंडनाथ – इरुगप दंडाधिनाथ (आफ्रेक्ट कोश) हा कवि लष्करी खात्यांतील मोठ्या पदवीचा सरदार होता. कोणीं म्हणतात कीं, विजयानगरचा राजा हरिहरराय याच्या पदरीं हा असे. याची गति संस्कृत व्याकरणांत चांगली होती. यानें नानार्थरत्नमाला आणि एकाक्षर निघंटु असे २ कोश केले. [ कविचरित्र. आफ्रेक्ट कोश ].