विभाग नववा : ई-अंशुमान
उरवकोंड - मद्रास. अनंतपूर जिल्हा. गुत्ती तालुक्यांतील एक गांव. लोकसंख्या (१९०१) ९३८५ असून येथें नायब तहसिलदाराची कचेरी असते. मुख्य रस्ता चांगला रुंद असून दोहोंबाजूला झाडें लावलेलीं आहेत. गुत्ती तालुक्यांतील उरवकोंड ही व्यापारी घडामोडीची जागा असून येथील विणकामाची प्रसिद्धी बरीच आहे.