प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें

काव्हूर- हा प्रसिद्ध इटालियन मुत्सद्दी ता. १।८।१८१० रोजीं ट्यूरीन येथें जन्मला. याचें घराणें फार जुनें असून याचा मूळपुरुष १२व्या शतकातला कोणी सॅक्सन योद्धा होता असें म्हणतात. काव्हूरच्या बापाचें नांव मार्क्विस मिचेल असें होतें. काव्हूरची आई जिनेवाकडील एका सरदार घराण्यांतील होती. हीं दोघेंहि पिडमाँटचा गव्हर्नर प्रिन्स बोर्जेस याच्या खासगीकडे  असत ( प्रिन्स बोर्जेस हा नेपोलियनचा मेहुणा होय ). काव्हूर हा दहा वर्षांचा असतांना ट्यूरिन येथील लष्करी शिक्षणाच्या शाळेंत दाखल झाला. तो वयाच्या सोळाव्या वर्षीं कॉलेजांतून बाहेर पडला. यापुढें त्यानें पाच वर्षें लष्करी नोकरींत घालविलीं. फुरसतींच्या वेळीं यानें इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. उदारमतवादी असल्यानें एकतंत्री राज्यपद्धति आणि भिक्षुकशाहीविरुद्ध तो होता. मतप्रदर्शनाच्या कामीं तो धोरणी नसल्यामुळें प्रथम प्रथम त्याच्यावर पोलिसचा डोळा असे. तो अद्यापि लष्करी अधिकारी असल्यानें  मंडळाचा सभासद नव्हता. शिवाय बंडाळी करण्यास त्या वेळचा काळ योग्य नव्हता असें त्याला वाटे, परंतु चार्लस आलबर्ट हा गादीवर आल्यानंतर त्यानें १८३१ सालीं आपल्या जागेचा राजीनामा दिला;  कारण चार्लस आलबर्टावर त्याचा विश्वास नव्हता. या वेळेपासून तो सरकारविरोधी पक्षाला मिळाला. परंतु त्या विरोधांत गुप्त कट वगैरेंचा गंधहि नव्हता. या पुढचीं कांहीं वर्षें त्यानें राजकीय व सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करण्यांत घालविली; व परदेशांत प्रवास करून तेथील माहिती मिळविलीं. फ्रान्स देशांत जी राज्यक्रांति झाली. तिचा पगडा काव्हूरच्या राजकीय मतांवर बराच बसला. त्यामुळें काव्हूरची खात्री झाली की, अनियंत्रित जुलमी राज्यपद्धति व बारभाईची खेती या दोन्ही गोष्टीपेक्षां कांहीं तरी विशिष्ट घटनेनें नियंत्रित झालेल्या राजसत्तेपासून देशाला बरेच फायदे होतील. तसेंच त्यानें ब्रिटिश राज्यपद्धतींचें जें सूक्ष्म अवलोकन केलें त्यामुळेहि त्याचीं वरील मतें दृढ झालीं.

अशा प्रकारें काव्हूरच्या विचारांचा विकास होत गेला, व इटली देशास परकीयांच्या बंधनापासून अजिबात मुक्त करण्याचे विचार त्याच्या मनांत घोळूं लागले. १८४७ सालीं नववा पायस या पोपनें उदारमतवाद्याकडे आपला ओढा दाखविला व ऑस्ट्रियाच्या विरुद्ध पक्षाचें आधिपत्य स्वीकारण्यास तो तयार झाला. यामुळें उदारमतवाद्यांच्या मतांनां जोराचें चालन मिळालें. १८४८ मध्यें सिसलीमध्यें प्रथम बंड उपस्थित झालें. त्यावेळी वर्तमानपत्रकारांतर्फे मंडळाच्या वतीनें बोलतांना काव्हूर म्हणाला कीं, ‘राजानें आतां कांहीतरी निश्चित धोरण स्वीकारून लोकांनां हक्क दिले पाहिजेत.’ त्याच सुमारास राजालाहि चोहोंकडून सर्व लोकांनीं भीड घातली व अखेरीस हक्कांची सनद देण्यास तो मोठ्या माराकुटीनें तयार झाला. सिसली व मिलान्स येथील बंडाच्या हकीकती जेव्हां काव्हूरला समजल्या, तेव्हां पिडमाँटनेंहि चळवळ करण्याची वेळ हीच आहे असें जाणून त्यानें आस्ट्रियाशीं लढाई करावी असा उपदेश चालविला. यावेळीं पिडमाँटची बिकट परिस्थिति झाली होती. ब्रिटिश सरकारचें व पिडमाँटचेंहि मोठेंसे बरें नव्हतें. काव्हूर या परिस्थितीला भ्याला नाहीं. त्यानें आपल्या एका लेखांत प्रसिद्ध केलें कीं, इंग्लंड पिडमाँटला खरी मदत करणार नाहीं तरी आस्ट्रियालाहि मदत करीलसें वाटत नाहीं. आणि जर इंग्लंडनें ऑस्ट्रियाला मदत केली तर इंग्लडाविरुद्ध राजा जरी उठला नाहीं, तरी इटलीची प्रजा इंग्लंड विरुद्ध उठेल. काव्हूरच्या या लेखाचा एवढा परिणाम झाला कीं, थोड्याच काळांत पिडमाँटनें ऑस्ट्रियाविरुद्ध लढाई पुकारली. ऑस्ट्रियाचें सैन्य व पिडमाँटचें सैन्य यांजकडें पाहिलें तर पिडमाँटच्या सैन्याचा ऑस्ट्रियापुढें टिकाव लागणें शक्य नव्हते. तेव्हां कांहीं किरकोळ चकमकी झाल्यानंतर तात्पुरता तह करण्यांत आला. मध्यंतरीं पिडमाँटमध्यें निवडणुकीची गडबड चालू असतां तींत काव्हूर हा निवडून आला. यावेळीं तो पार्लमेंटमध्यें हुजुर पक्षाच्या लोकांत बसत असे. पार्लमेंटमधील काव्हूरचें काम प्रथम प्रथम नीट होईना. त्याला फ्रेंज भाषेंत बोलण्याचा सराव असल्यानें तो इटालिअन भाषेंत बोलतांना अडे. लढाई चालू ठेवावयाची कीं नाहीं असा प्रश्न नवीन पार्लमेंटपुढें आला; कारण तहाची मुदत संपली होती. तेव्हां निर्कणीचा उपाय म्हणून राजानें लढाई चालू करण्याचेंच ठरविलें. लढाई झाली, परंतु पिडमाँटच्या लोकांचा तींत पराभव झाला. दुसरा व्हिक्टर इमॅनुअल हा गादीवर आला.

यावेळीं क्रीमिअन वॉर सुरू झाली होती; तेव्हा काव्हूरनें आपली मुत्सद्देगिरी चांगली प्रत्ययास आणून दिली. या लढाईंत पिडमाँटनें भाग घेण्याचीं काव्हूरचीं कारणें पुढीलप्रमाणें होती; पिडमाँटसंबंधाचा प्रश्न सर्वराष्ट्रीय करणें जरुरीचें होतें. शिवाय काव्हूरची दृष्टी नुसत्या पिडमाँटपुरती नसून सर्व इटालीपुरती होती. तेव्हां स्वातंत्र्य संभाळून इटालीला शिस्त पाळतां येते हें युरोपाला दाखवावयाचें होतें. परंतु याच्या मोबदल्यांत त्याच्या अपेक्षेप्रमाणें पिडमाँटला मदतींचें अभिवचन पाश्चात्य राष्ट्राकडून मिळवून देणें अशक्य होतें. कारण तसें केल्यास आस्ट्रिया रशियाशीं संगनमत करील ही त्यास भीती होती. शिवाय पिडमाँटमधील हुजूर पक्ष व राष्ट्रीयपक्ष हे दोन्हीहि परकीय राजकारणास प्रतिकूल होते. परराष्ट्रीय प्रधान जनरल दानोर्मिडा यानें या कामास नापसंती दर्शवून राजीनामा दिला. तेव्हां राजानें काव्हूरला ती जागा दिली. नंतर लौकरच पिडमाँटचें सैन्य क्रिमीआस रवाना झालें. लढाई संपल्यानंतर पॅरिस येथें जी परिषद् बोलाविण्यांत आली, तींत पिडमाँटच्या वतीनें काव्हूरला तेथें जावें लागलें. यावेळीं ऑस्ट्रियाच्या विरोधास न जुमानतां काव्हूरनें पिडमाँटला जगाच्या राजकारणांत मोठ्या राष्ट्राचा दर्जा मिळवून दिला. त्यानें त्यावेळीं स्वत:च्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर इटलीच्या प्रश्नासंबधानें नेपोलिअनचेंहि मत थोडेंबहुत वळविलें.

पुढें काव्हूरनें पिडमाँटचें लष्करी सामर्थ्य वाढविलें. परंतु त्याला हें माहीत होतें कीं, एकट्या पिडमाँटच्या हातून ऑस्ट्रियाशीं टक्कर देण्याचें काम होणार नाहीं. म्हणून त्यानें नेपोलिअनपाशीं मदत मागितली. तेव्हां ऑस्ट्रियानें पिडमाँटवर प्रत्यक्ष हल्ला केल्याशिवाय नेपोलिअननें या भानगडींत न पडण्याचें ठरविलें. अशा स्थितींत ऑस्ट्रियाला लढाई करावयास लावण्याखेरीज काव्हूरला दुसरा उपायच नव्हता. इटालीमध्यें लहान लहान बंडें उपस्थित झालीं. परंतु ऑस्ट्रियाशीं झगडण्याच्या बाबतींत इंग्लंड अजून नाखूष होतें व नेपोलिअनहि कांकूं करीत होता. अखेर नेपोलिअननें काँग्रेस बोलावून इटलीच्या प्रश्नाचा निकाल लावावा, अशी योजना काढली. यावर ऑस्ट्रियाहि म्हणाला कीं, पिडमाँटनें शस्त्रसंन्यास करावा. इंग्लंडनेंहि या योजनेस संमति देऊन आणखी सुचविलें कीं इटलींतील प्रत्येक प्रांताचा या काँग्रेसमध्यें प्रतिनिधी असावा. इंग्लंडचें न ऐकल्यास सर्वच राष्ट्रें पिडमाँटला सोडून देतील अशी काव्हूरला भीती वाटल्यामुळें त्यानें ती योजना मोठ्या नाखूषीनें कबूल केली. परंतु ऑस्ट्रियानेंच ही गोष्ट नाकबूल करून पिडमाँटनें शस्त्रसंन्यास करावा अशाबद्दल निर्वाणीचा खलिता पाठविला. ते हां खलित्याच्या बाबतींत सर्वांनांच राग येऊन फ्रान्स व इंग्लंड या दोन्ही राष्ट्रांनीं इटलीची बाजू पत्करिली. मात्र यापुढें लढाईंत फ्रान्सनें, एकाएकीं काव्हूरला कळूं न देतां ऑस्ट्रियाशीं तात्पुरता तह केल्यामुळें त्यालाहि तात्पुरता तह करावा लागला.

झूरिच येथील तह झाल्यानंतर पुन्हां १८५९ मध्यें काव्हूर मुख्य प्रधान झाला. तेव्हां त्यानें इटलीच्या एकीकरणाचा प्रश्न काढला; परंतु याला नेपोलियन संमति देईना. शेवटीं नाईस व सॅव्हाय हे प्रांत फ्रान्सला देण्याचें कबूल करून नेपोलियनला संतुष्ट करावें लागलें. अखेर एप्रिल महिन्यांत पिडमाँट पारमा, मॉडेना, टस्कनी व रोमाग्ना इतक्या संस्थानांची पार्लमेंट भरली.

नाईस प्रांत ही नॉरिबाल्डीची जन्मभूमी होती. हा प्रांत काव्हूरच्या कृतीनें हातचा गेल्यामुळें काव्हूर व गॅरिबाल्डी यांच्यांत वितुष्ट आलें. नेपोलियनला काव्हूरनें पोपचें रक्षण करण्याबद्दल वचन दिलें असल्याकारणानें रोमवर स्वारी करणें काव्हूरच्या दृष्टीनें इष्ट नव्हतें. परंतु गॅरिबाल्डीची तयारी पाहून काव्हूरनें पोपच्या सत्तेखालील संस्थानें आपल्या राज्यात जोडावयाचीं;  मात्र रोमला हात लावावयाचा नाहीं असें ठरविलें. अखेर सप्टेंबर १८५९ त व्हिक्टर इम्यान्युअलनें नेपल्सचें राज्य घेतलें.

यानंतर गॅरिबाल्डी व काव्हूर यांच्यांत पुन्हा तेढ उत्पन्न झाली. कारण गॅरिबाल्डी दक्षिण इटलींतील संस्थानांवरील आपली सत्ता सोडावयास तयार नव्हता व त्याच्या मनांतून रोमवर स्वारी करण्याचें होतें. काव्हूरनें पार्लमेंट सभा बोलावून या प्रश्नावर मतें घेतलीं. मतें काव्हूरच्या बाजूनें पडल्यामुळें गॅरिबाल्डीनें राष्ट्राच्या इच्छेला मान देऊन आपण जिंकलेले सगळे प्रांत उदारपणें व्हिक्टर राजाला देणगी म्हणून दिले.

यापूर्वीं कांहीं वर्षें रोमच्या पोपची सत्ता परकीय लोकांच्या जिवावर चालली होतीं. अशी स्थिति असेपर्यंत ‘संयुक्त इटली’  हें आपलें ध्येय साध्य होणें अशक्य आहे असें काव्हूरला वाटलें. म्हणून त्यानें १८६१ च्या जानेवारींत रोम ही इटलीची राजधानी व्हावी असा ठराव पार्लमेंटमध्यें आणला व तो पासहि झाला. परंतु नेपोलियनमुळें त्याला ही गोष्ट दिरंगाईवर टाकावी लागली. शिवाय पोपची सत्ता अबाधीत ठेवण्याचें वेडहि त्याच्या मनांत होतें. रोम व व्हेनीस हीं शहरें वगळून काव्हूरची बाकीची ‘संयुक्त इटली’ स्वतंत्र झाली होती. काव्हूरचीं आयुष्याचीं शेवटचीं वर्षें फार कष्टाचीं गेलीं. गॅरिबाल्डीला उदारपणें वागविण्याचें त्याच्या मनांत होतें. गॅरिबाल्डींशीं झालेल्या प्रसंगानें त्याचें आयुष्य कांहींसें कमी केलें यांत शंका नाहीं. तारीख ६ जून १८६१ रोजीं तो मरण पावला. त्याचा दफनविधि सँटेना येथें झाला.

काव्हूरच्या मृत्यूनें इटलीची फार भयंकर हानी झाली. त्याच्यासारख्या बुद्धिमान् व मुत्सद्दी पुरुषाची इटलीला अद्यापीहि गरज होती. टी आर्टम्, हा काव्हूरचा खासगी कारभारी, लिहितो कीं “काव्हूरला राजकीय बाबतींत उच्च उच्च ध्येयांचीं स्वप्नें कधीं पडत नसत. त्याच्या मतांचा विकास क्रमाक्रमानें होत जाई. सत्य व साध्य असेंल तें करण्यापलीकडे काव्हूरनें आपल्या प्रयत्‍नांचा संचार जाऊं दिला नाहीं.” मुत्सद्दीपणा व दूरदर्शित्व हे काव्हूरच्या अंगचे ईश्वरदत्त गुण होते. विचारानें तो नेमस्त व उदार होता. लष्कर थोडें असल्यानें ऑस्ट्रियाच्या विरुद्ध इतर राष्ट्रांशीं संगनमत करण्यातं त्याला आपली बुद्धि खर्चावी लागे. नेपल्सशीं झालेलें काव्हूरचें वर्तन राजकीयदृष्ट्या अनीतीचें होतें असें कित्येक टीकाकार म्हणतात. तसेंच यानें आपला मतें बदललीं असाहि याच्यावर आरोप आहे. काव्हूरचें ध्येय, इटली स्वतंत्र करून तिची पुनर्घटना करणें हें होतें व त्याच्या प्रीत्यर्थ त्यानें आपलें आयुष्य व बुद्धिमत्ता हीं खर्चीं घालून तें गांठलें.

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .