प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें

काशी- हें संयुक्त प्रांतांतील बनारस जिल्ह्यांचें मुख्य ठिकाण आहे. हें गंगेच्या कांठीं वसलेलें असून संयुक्त प्रांतांत लोकसंख्येच्या मानानें लखनौच्या खालोखाल आहे. हें कलकत्यापासून ४७९ व मुंबईपासून ९४१ मैल दूर आहे. येथें यात्रेकरू नेहमीं येत जात असल्याकारणानें येथील लोकसंख्या नेहमी बदलत असते. इ. स. १९२१ सालीं या शहराची एकंदर लोकसंख्या १,९८,४४७ होती व इ. स. १९११ मध्यें १,९९,८६८ असून त्यापैकीं हिदूंची लोकसंख्या १,४२,७५६, मुसलमानांची ५५,४०७ व ख्रिस्त्यांची ९८१ होती. गांवाजवळच कँटोनमेंट असून तेथें इ. स. १९११ सालीं ३९३६ लोक रहात होते.

काशी हें भरतखंडांतील अत्यंत प्राचीन शहरांपैकीं एक शहर होय. याला हिंदुस्थानचें अथेन्स अगर रोम असें म्हणतां येईल. काशीचा इतिहास म्हणजे हिंदुधर्माचाच इतिहास असें म्हटल्यास वावगें होणार नाहीं. आर्यांच्या संस्कृतीचें, विद्यांचें व तत्वज्ञानाचें माहेरघर म्हणून या शहराची ख्याति असून अद्यापिहि ती थोड्या फार फरकानें तशीच कायम आहे. वैदिक धर्म व बौद्ध धर्म या ठिकाणाहून सर्व भरतखंडात विस्तार पावले. सर्व भरतखंडांत हें शहर अत्यंत पवित्र असें यात्रेचें ठिकाण मानलें जातें.

या शहराला काशी नांवाच्या प्राचीन वेदकालीन राष्ट्रावरून हें नाव पडलें असावें असें दिसतें. या काशी लोकांच्या राजाला काशीराज असें म्हणत असत व या काशीराजासंबंधीं पुष्कळ दंतकथा या प्रांतांत प्रचलित आहेत. काशी याचा धात्वर्थ (काश्) चकाकणें असा असून सर्व शहरांत चकाकणारें शहर या नात्यानें त्याला काशी हें नांव पडलें असावें असें कांहीचें मत आहे पण तें बरोबर असेल असें वाटत नाहीं. प्रसिद्ध व्याकरणकार पाणिनी यानें काशी लोकांचा आपल्या ग्रंथांत उल्लेख केलेला आहे व त्याचप्रमाणें ख्रिस्तीशकापूर्वी पुष्कळ संस्कृत व पाली ग्रंथातहि या लोकांचा उल्लेख आढळतो. बृहत्संहितेंत काशी या शब्दाचा जनवाचक व स्थलवाचक, असा दोन्ही तर्‍हेनें उपयोग केलेला आहे. अर्थातच बृहत्संहिताकालीं ‘काशी’ हें नावं स्थलालाहि लावण्यांत येत असावें असें सिद्ध होतें. भरतखंडांतील सोळा संस्थानांपैकीं काशी हें एक संस्थान होतें असें बौद्धग्रंथात म्हटलेलें आढळतें.

पण काशी शहराला काशी हें नांव पडण्यापूर्वी ‘वाराणशी’ हें नांव असावें असें दिसतें. वरणा व असि या दोन नद्यांमधील प्रदेशांत हें शहर वसलें असल्यानें या शहराला वाराणशी हें नांव पडलें असावें अशी समजूत आहे. बौद्धांच्या जातक ग्रंथांत व कांही संस्कृत ग्रंथांत ‘वाराणशी’ या नांवानें काशी शहराचा उल्लेख आढळत. बनार राजा या शहरावर राज्य करीत होता. त्यावरून त्याला ‘बनारसी,- वाराणशी’ असें नांव पडलें असावें असाहि कित्येकांचा तर्क आहे. याशिवाय या शहराला ‘अविमुक्त’ हें नांव पुराणांत दिलेलें आढळतें. तसेंच या शहराला जातकग्रंथांत सुदस्तन, पुष्पावती वगैरे उपनामें दिलेलीं आहेत. अठराव्या शतकांत दिल्लीच्या महंमदशहानें या शहराचें नांव ‘महंमदाबाद’ ठेवण्याचा यत्‍न केला, पण त्यांत त्याला यश आलें नाहीं.

इ ति हा स.- राजा दिवोदासानें हें काशी शहर वसविलें अशी दंतकथा प्रचलित आहे. पण त्यासंबंधीं खात्रीलायक पुरावा मिळत नाहीं. ख्र. पू. ६०० च्या पूर्वी कोसल राजांनीं हें शहर व त्याच्या आसपासचा मुलूख जिंकून घेतला. पुढें ख्रि. पू. ५०० च्या सुमारास मगधराजाची सत्ता प्रबळ होऊन कोसलांच्या ताब्यांतील सर्व प्रदेश मगधदेशच्या शैशुनाग राजांच्या ताब्यांत गेला. त्याबरोबर काशी हें मगधांच्या ताब्यांत गेलें. यानंतर अनुक्रमें मौर्य, शुंग, गुप्त इत्यादि राजांनीं या शहरावर आपला अंमल बसविला होता. ख्रिस्ती शकाच्या सातव्या शतकांत काशी शहर हर्षवर्धनाच्या ताब्यांत गेलें. पुढें बाराव्या शतकांत कनोजच्या गहरवार राजाच्या ताब्यांत हें शहर आलें या राजघराण्यांतील शेवटचा राजा जयचंद याचा १९२३ मध्यें महंमद घोरीनें पराभव केला. तेव्हांपासून काशीं हें मुसुलमानी सत्तेखाली आलें.

महंमद घोरी हा काशीस लुटालूट करण्यास आला होता. तेथील विश्वेश्वराचें देऊळ औरंगझेबानें १६६९ च्या सप्टेंबरांत मोडलें. काशी व प्रयाग हीं क्षेत्रें मुसुलमानांकडून परत घेण्याबद्दल पेशव्यांनीं अखेरपर्यंत खटपट केल्याचें प्रसिद्धच आहे.

श्री. थोरले माधवरावसाहेब हे स्वर्गवासी होण्याच्या आधीं सरासरी १।। महिन्यापूर्वीं त्यांनीं राज्यांतील मुख्य प्रतिष्ठित मुत्सद्यांकडून जिच्या अंमलबजावणीबद्दल शपथा घेवविल्या होत्या त्या नऊ कलमी यादींत काशीक्षेत्राचा संबंध पुढीलप्रमाणें आला आहे. “श्रीकासीप्रयाग हीं दोन्ही स्थळें सरकारांत ( मराठी साम्राज्यांत ) यावीं, असा तीर्थरूपांचा ( नानासाहेबांचा ) हेतु होता. त्यास प्रस्तुत ( प्रयत्‍न ) करावयाजोगे दिवस आहेत. दहावीस लक्षांची जहागीर मुबदला पडली तरी देऊन दोन्ही स्थलें हस्तगत करावीं (असा) प्रयत्‍न करावा.” श्री. मा. गोपिकाबाई यांची इच्छा काशीयात्रा करण्याची होती असें या यादींतच म्हटलें आहे. “ती. मातुश्री बाईसाहेबांचा हेत कासीस जावयाचा आहे. त्यास सुपथा पडल्यावर यात्रा घडवावी.” पेशवे यांच्या घराण्याचा उत्कर्ष व्हावा म्हणून नारायण दीक्षित पाटणकर यांनीं अनुष्ठान केलें होतें. तदंगभूत प्रतिवर्षी एक लक्ष ब्राह्मणभोजन व एक कोटी दूर्वादलसमर्पण करण्याचें व्रत थोरले बाजीराव यांच्या वेळेपासून पेशवे यांनीं पत्कारिल्याचें प्रसिद्ध आहे. त्यास अनुलक्षून यादींत पुढील कलमें आहेत: “कासीस दोन लक्ष ब्राह्मणभोजन करावें, दक्षणा दोन पैसे प्रमाणें वि. कासीचे ब्राह्मणांस वर्षासनें आहेत ती (पिढी दर) पिढी देऊन वर्षास पावती करीत जावीं.”

श्री. नानासाहेबांच्या वेळेस काशी घेण्याच्या खटपटीस चांगलेंच तोंड लागलें होतें. इ. स. १७६४ पूर्वी काशी देण्याचें सफदरजंगानें कबूल केलें होतें. तेव्हां पेशव्यांनीं बाबूराव महादेवास अंमल बसविण्यात तेथें धाडलें. त्यावेळीं मात्र सफदरजंग (अयोध्येचा नबाब) काशी देण्यास अळंटळं करूं लागला. याच वेळीं जयाप्पा शिंदे यांनींहि काशी घेण्याबाबत फार खटपट केली होती. परंतु ते १७५५ त वारल्यामुळें ही मसलत तहकूब राहिली. पुढें १७५८-५९ त दत्ताजी शिंद्यांनीं पुन्हां प्रयत्‍न सुरू केला. इतक्यांत अबदालीचें बंड व पानिपत प्रकरण होऊन त्यामुळें हाहि यत्‍न मागें पडला. यानंतर केव्हांहि हें क्षेत्र मराठ्यांनां मिळालें नाहीं. श्री. नानासाहेबांनीं १७४३ च्या सुमारास हिंदुस्थानांत स्वारी केली. त्या वेळीं ते काशीजवळ येऊं लागले असतां, सफदरजंग यानें काशीच्या ब्राह्मणांना भीति घातली कीं, तुम्ही आपले ब्राह्मण राजास मागें फिरवा, नाहीं तर तुम्हांस बाटवून मुसुलमान करूं. त्यावर नारायण दीक्षित ( पाटणकर ) यांनां पुढें करून काशीकर ब्राह्मण श्रीमंताकडे अर्ज करण्यास आले. तेव्हां “ब्राह्मणांस माझ्यामुळें त्रास होत असेल तर मी काशीस येत नाहीं. मात्र मला गंगास्नान घडावें. असें त्यांनीं  त्यांनां उत्तर दिलें व ब्राह्मणांबरोबर जाऊन गंगास्नान करून परत आले.

रघुनाथराव दादा पेशवे यांचे चिरंजीव चिमणाजीपंत (ज्यांना यशोदाबाई यांनां दत्तक दिलें होतें.) यांनां पेशवाईनंतर इंग्रजानें पेनशन देऊन ठेविलें होतें. ते तेथेंच वारले.

शहाअलमशहा दिल्लीकर हा इंग्रजांच्या गोटांत काशीस कांहीं दिवस होता, नंतर तेथून महादजी शिंदे यांच्या आश्रयास आला. येथें स्नानसंध्या करून राहण्याचा बेत रघुनाथरावदादांनीं अनेकवार केला होता. [ मुस. रिया; मरा. रिया. मध्य वि; इति. संग्रह; राज. खं. १; ४; १२. ].

पुढें इसवी सन १७७५ च्या नंतर इंग्रजांचा अम्मल या शहरावर सुरू झाला, तो अद्यापिहि चालू आहे. इंग्रज गव्हर्नर हेस्टिंग्ज याच्या राजवटींत काशीं संस्थानचा नबाब वझीर अल्लीनें मध्यें बंडें केलीं पण तीं निष्फळ ठरलीं व संस्थान अयोध्येंच्या नबाबाच्या रांज्यांतून निघून कंपनीच्या मुलुखांत पडलें. पुढें हेस्टिंग्ज व राजा चेतसिंगाचें भांडण होऊन काशी शहर कंपनीकडे आलें. इंग्रजांच्या अंमलाखाली काशी शहराला पुन्हां बरें दिवस प्राप्त झाले. धार्मिक बाबतींत ढवळाढवळ न करण्याचें धोरण इंग्रजांनीं ठेवल्यामुळें, काशी हें पुन्हां धर्माचें पीठ होऊन बसलें. येथें अक देवळें बांधण्यांत आलीं, व हिंदु धर्माचें पुनरुज्जीवन होऊं लागलें.

दे व ळें, ती र्थें व घा ट.– चिनी प्रवासी ह्युएनत्संग हा ७ व्या शतकांत हिंदुस्थानांत आला होता त्यावेळीं काशीमध्यें ३० बुद्धविहार व १०० हिंदूंचीं देवालयें होतीं असें त्याच्या प्रवासवृत्तावरून समजतें. आजमितीस काशींत १५०० हून अधिक देवळें आहेत. यांपैकीं जवळजवळ निम्याहून अधिक देवळें ब्रिटिशांच्या अमदानींत बांधलीं गेलीं. नदीच्या कांठीं उभें राहिलें असतां आपल्याला घाटांची रांगच्या रांग दृष्टीस पडते. हे घाट फार सुंदर बांधलेले आहेत. हे घाट फार पवित्र मानले जातात. या घाटांची संख्या ४० हून अधिक आहे. त्यांतल्या त्यांत प्रसिद्ध घाट म्हणजे, असिसंगम, दशाश्वमेध, मणिकर्णिका, पंचगंगा व वारणासंगम हे होत. याशिवाय इतर घाटहि प्रेक्षणीय आहेत. पुष्कळ हिंदू राजांनीं आपआपल्या खर्चांनी आपल्या नांवाचे घाट बांधविले आहेत. जयपूरचा राजा मानसिंग यानें एका दिवसांत एक लाख छोटीं देवळें बांधलीं असें म्हणतात. प्रत्येक घाटासंबंधानें कांहीं दंतकथा प्रसिद्ध आहेच. दशाश्वमेध व मणिकर्णिका या घाटांसंबधीं तर असंख्य दंतकथा प्रसिद्ध आहेत. दशाश्वमेध घाटासंबंधीं अशी दंतकथा सांगतात कीं, राजा दिवोदासानें आपल्या धर्मबळाच्या जोरावर काशींतून सर्व देवांनां हांकलून लावलें. शिवाला पुन्हां काशींत येण्याची इच्छा झाल्यामुळें त्यानें ब्रह्मदेवाला दिवोदासाकडून तशी परवानगी मिळविण्याची विनंति केली. ब्रह्मदेवानें एका वृद्ध ब्राह्मणाचा वेष धारण करून तो दिवोदासाकडे आला. त्याची पूजा करून त्याला काय इच्छा आहे तें मागण्यास राजानें सांगितलें. ब्रह्मदेवानें दिवोदासाजवळ एका यज्ञाचें साहित्य पुरविण्याबद्दल विनंति केली. यज्ञसाहित्य जमा करणें अत्यंत भानगडीचें काम असल्यामुळें, दिवोदास हा कांहीं तरी चूक करील व अशा रीतीनें आपली अयोग्यता प्रस्थापित करील असें ब्रह्मदेवाला वाटत होतें. पण दिवोदास हा लेचापेचा नव्हता त्यानें एका यज्ञाचेंच नव्हे तर दहा यज्ञांचें सर्व साहित्य त्या वृद्ध ब्राह्मणाला पुरविलें. त्या साहित्याच्या योगानें त्या ब्राह्मणानें दशाश्वमेध केला. अशा रीतीनें या दशाश्वमेध घाटाला अत्यंत पवित्रता प्राप्त झाली, कार्तिक अमावस्येच्या दिवशीं दशाश्वमेधघाटावर देवताविसर्जनाचा समारंभ होतो व तो फार प्रेक्षणीय असतो.  दशाश्वमेधाच्या दक्षिणेस शीतलाघाट आहे. नंतर चौकीघाट लागतो. या घाटावर एक मोठा अश्वत्थवृक्ष असून त्याच्या खालीं एक लिंग असून भोंवती पुष्कळ सपार्कृती व इतर मूर्ती आहेत. नंतर केदारघाट येतो. या केदारघाटावर सर्व रोगनिवारक गौरीकुंड आहे. त्यानंतर थोडेसें चालून गेल्यावर शिवाल घाट लागतो. अशा रीतीनें पुष्कळ घाट लागल्यावर मानमंदिर घाटाचा देखावा दिसूं लागतो. या घाटाच्या वरच्या बाजूस एक मोठी इमारत आहे. हा घाट व ही इमारत अंभेरचा राजा मानसिंग यानें बांधविली. हा राजवाडा पुढें राजा जयसिंग या प्रसिद्ध ज्योतिष्यानें वेधशाळेसाठीं उपयोगांत आणिला. या घाटानंतर नेपाळी घाट लागतो. पण सर्वांत महत्त्वाचा घाट म्हणजे मणिकर्णिका घाट होय. कार्तिक महिन्यांत अगर एखाद्या उत्सवाच्या प्रसंगीं या घाटावर जो देखावा दृष्टीस पडतो तसा देखावा जगामध्यें इतर ठिकाणी क्वचितच दृष्टीस पडतो असें हॅवेलनें म्हटलें आहे. या घाटासंबंधीं काशीखंडात पुढील कथा आहे:- “विष्णूनें या ठिकाणीं आपल्या चक्रानें विहीर खणलीं व ती आपल्या घामानें भरून काढली. नंतर तो तेथून उत्तरेच्या दिशेस थोड्या अंतरावर जाऊन तपश्चर्या करीत बसला. कांहीं वेळानें त्या ठिकाणीं शंकर आले व त्यांनीं त्या विहिरींत डोकावून पाहिलें, तों त्यांना त्या विहिरींत कोट्यावधि सूर्यांचें तेज दृष्टीस पडलें. त्यामुळें ते अत्यंत प्रसन्न होऊन विष्णूची स्तुति करूं लागले व वाटेल तो वर मागण्यास त्यांनीं विष्णूला आज्ञा केली. विष्णूनें त्यांना या कुंडांत निरंतर रहाण्याचा प्रार्थना केली. या मागण्यानें शंकरांना फार आनंद झाला व त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यामुळें त्यांच्या कानांतून मणिकर्णिका(जल) विहिरींत पडलें व त्यावरून या कुंडाला मणिकर्णिका हें नांव पडलें. हें कुंड अत्यंत पवित्र मानलें जातें. या घाटावरील आणखी एक महत्त्वाचें स्थळ म्हणजे ‘चरणपादुका’ हें होय. या चरणपादुकांचेंहि प्रत्येक भक्त भक्तिभावानें पूजन करतो. यानंतर शिंदेघाट, बाजीरावघाट, भोसलेंघाट, रामघाट, चोरघाट हे लागल्यावर पंचगंगाघाट लागतो. या ठिकाणीं धूतपापा, सरस्वती, किरण, यमुना व गंगा यांचा अदृश्य संगम झाला आहे असें मानतात. कार्तिकांत येथील देखावाहि पाहण्यालायक असतो. यानंतर गायघाट वगैरे बरेच घाट लागतात पण ते विशेष महत्वाचें नाहींत.

काशीमधील सर्व देवळांचें यथार्थ वर्णन करावयाचें म्हणजे एक मोठा ग्रंथच होईल. म्हणून त्यांतल्या त्यांत महत्वाच्या देवळांचेच अगदीं थोडक्यांत वर्णन लिहिलें आहे. त्रिलोचनघाटावर त्रिलोचनाचें देवालय आहे. वैशाख महिना या देवाचें सतत पूजन करण्यांत घालविल्यास त्याला मोक्ष मिळतो अशी समजूत आहे. रामनगरभागांत व्यासेश्वर नांवाचें एक देवालय आहे. रामनगरभागांत राहणार्‍या प्रत्येक मनुष्यानें या व्यासेश्वराचें माघांत दर्शन घेतलें असतां त्याला पुनर्जन्माची भीति नाहीं अशी दंतकथा प्रचलित आहे. अन्नपूर्णेचें देवालय तेथें होणार्‍या अगणित अन्नदानासाठीं प्रसिद्ध आहे. हें देवालय बाजीराव पेशवे यांनी बांधलें. या देवालयाच्या भोंवतीं भिक्षेसाठी असंख्य भिक्षेकरी  जमलेले असतात. या देवालयाच्या नजीक गणेश अगर विनायकपालचें देऊळ आहे. प्रत्येक यात्रेकरूंनें या देवालयाचें दर्शन घेतलेंच पाहिजे, त्याशिवाय त्याची यात्रा पुरी झाली नाहीं असें मानण्यांत येतें. सर्वांत प्रमुख देऊळ म्हणजे विश्वेश्वरांचे देऊळ होय. हें सोन्यानें मढविलेलें आहे. विश्वेश्वररूपी शिवाची मूर्ती या देवळांत असून ही मूर्ति सर्व शहरांचे संरक्षण करतें असें मानण्यांत येतें. विश्वेश्वर हा काशीशहराचा राजा आहे असें तेथील लोक समजतात. हें स्थान फार पवित्र मानलें जातें. हें देऊळ फारसें सुंदर नाहीं व विशेष मोठेंहि नाहीं. लाहोरचा राजा रणजितसिंग यानें या देवळाला सोन्याचा मुलामा दिला. हें देऊळ इंदोरच्या अहिल्याबाई राणीनें बांधलेलें आहे. विश्वेश्वराच्या खालोखाल भैरवनाथाचें देऊळ महत्त्वाचें मानलें जातें. भैरवनाथ यास शहराचा कोतवाल समजतात. राक्षस अथवा दुष्ट लोकांपासून हा शहराचें रक्षण करतो अशी समजूत आहे. याशिवाय बिंदुमाधव, दुर्गा इत्यादि देवतांचीं पुष्कळच देवालयें आहेत. ज्ञानवापी, नागकूप, पिशाचमोचन कुंड इत्यादि प्रमुख कुंडेंहि प्रसिद्ध आहेत.

काशीच्या भोंवतालची कांहीं मैल जागा अत्यंत पवित्र मानली जाते. प्रत्येक यात्रेकरूला काशीभोंवतीं प्रदक्षिणा घालावी लागते. याला पंचक्रोशीची यात्रा असें म्हणतात. या पंचक्रोशी यात्रेला मणिकर्णिका घाटापासून सुरुवात होते. तेथून निघून, यात्रेकरू पहिल्या दिवशीं असिसंगम घाटापर्यंत जातो व तेथून जवळच असलेल्या एका खेडेगांवांत विश्रांति घेतो. दुसर्‍या दिवशीं तो धूपचंदीपर्यंत जातो;  तेथून तिसर्‍या दिवशीं तो रामेश्वर येथें येतो. चौथ्या दिवशीं शिवपूर येथपर्यंत त्याची यात्रा होते. पाचव्या दिवशीं शिवपुराहून तो कपिलधारेला येऊन पोहोंचतो व सहाव्या दिवशीं कपिलधारेहून वर्णा-संगम येथें येऊन मणिकर्णिकेला परत येतो. वाटेंत त्याला जवळ जवळ ६०० देवालयें लागतात. प्रत्येक ठिकाणीं त्याला पुष्कळ दानधर्म करावा लागतो.

फार प्राचीन काळापासून काशी शहराची तीर्थस्थान या नात्यानें प्रसिद्धि आहे. आपल्या धर्माचीं तत्त्वें लोकांनां पटवून देण्याकरितां बुद्धानें या शहराजवळ असणार्‍या सारनाथ या ठिकाणीं वास्तव्य केलें. त्यावरून बुद्धकाळीं काशी हें धर्माचे केंद्र होतें असें सिद्ध होतें. बुद्ध धर्माचा जरी काशीच्या आसपास पुष्कळ प्रसार झाला होता तरी काशी शहरांत ब्राह्मणीधर्मांचेच वर्चस्व होतें ! ह्युएनत्संग ज्यावेळीं काशी येथें आला त्यावेळीं देखील काशीमध्यें शिवभक्तांची संख्या पुष्कळ होती, असें त्याला आढळून आलें.

जैनांचा सातवा तीर्थंकर सुपार्श्वनाथ याचा जन्म काशींतच झाल्यानें हें स्थान जैनांनींहि पवित्र मानिलें आहे. बचराज व असिसंगम या घाटांच्या दरम्यान पुष्कळ जैन देवालयें आहेत. मुसुलमानांच्याहि मशिदीं या ठिकाणीं पुष्कळ आहेत;  व मुसुलमानी पीराची पूजा करणारेहि कित्येक हिंदू लोक आढळतात.

काशीं हें ज्याप्रमाणें फार प्राचीन काळापासून धर्माचें माहेरघर होतें त्याचप्रमाणें तें इतर विद्यांचेंहि पीठ होतें. निरनिराळ्या शास्त्रांचें या ठिकाणीं अध्ययन केलें जात असे. इ. स. १८१७ मध्यें वेदांचें अध्ययन करणारे ८९३ विद्यार्थी असून वेदशास्त्रपारंगत असे ४८ आचार्य होते, असें वॉर्डनें म्हटलेलें आहे. तसेंच पणिनीच्या व्याकरणाचें अध्ययन करणारे २१८ विद्यार्थी असून, त्यांनां शिकविणारे १८ गुरू होते असेंहि त्यानें लिहिलें आहे. यांशिवाय धर्मशास्त्र, न्यायशास्त्र इत्यादि इतर शास्त्रांचेहिं अध्ययन केलें जात असे.   विज्ञानेश्वर हा मिताक्षरेवरील प्रसिद्ध भाष्यकार येथें अध्यापनाचें काम करीत असे. एखाद्या नवीन धर्मप्रवर्तकाला आपलें तत्व प्रचलित करावयाची इच्छा असल्यास त्यानें काशी येथें येऊन तेथील पंडितांची खात्री पटवून देण्याचा प्रघात असे. त्याप्रमाणें, आद्यशंकराचार्य हे आपल्या शिष्यगणांसमवेत या ठिकाणीं आपल्या तत्वज्ञानाची माहिती देण्याकरतां आले होते. यांशिवाय, कबीर चैतन्य, वल्लभाचार्य, तुळशीदास इत्यादि महान् साधु हेहि काशींत येऊन आपल्या मतप्रसारार्थ राहिले होते. १८।१९ व्या शतकांत या शहरांत पुष्कळच शास्त्रीपंडितांचा भरणा होता. १८१० च्या सुमारास हत्ती “विद्यालंकारा” नांवाची एक वंगपंडिता काशींत शास्त्रांचें अध्यापन करीत असे, असें ग्रीयरसननें म्हटलें आहे. अद्यापि देखील संस्कृत भाषेचें अध्ययन व अध्यापन या ठिकाणीं चाललेलें आढळतें. ब्रिटिशांचा अंमल सुरू झाल्यापासून या ठिकाणीं पाश्चात्य शिक्षणाच्या शाळाहि स्थापन झाल्या आहेत. इ. स. १७९१ मध्यें बनारस कॉलेज स्थापन झालें. हें सरकारी असून त्याला संस्कृत कॉलेजहि जोडलेलें आहे. इ. स. १८९८ मध्यें, डॉ. अ‍ॅनी बिझांट बाईंच्या खटपटीनें सेंट्रल हिंदु कॉलेजची स्थापना झाली. या कॉलेजमध्यें बी. ए. पर्यंतचा अभ्यास करून घेण्यांत येत असून तें अलाहाबाद येथील विश्वविद्यालयास जोडलेलें होतें. या कॉलेजांत धार्मिक व नैतिक शिक्षणहि दिलें जात असें. शिवाय या कॉलेजला जोडून एक मुलींची शाळा उघडण्यांत आली होती. हल्लीं हे कॉलेज नवीनच स्थापन झालेल्या हिंदु विश्वविद्यालयास जोडलें आहे. १७ व्या शतकांत राजा जयसिंगानें जें महाविद्यालय स्थापिलें तें हल्लीं मिशनरी संस्थेच्या ताब्यांत आलें आहे. याशिवाय मिशनरी सोसायटीच्या व म्युनिसिपालिटीच्याहि पुष्कळ शाळा असून पाच सहा वाचनालयेंहि आहेत.

उ द्यो ग धं दे.– येथें पितळेंचें सामान चांगल्या प्रकारचें तयार होतें. किनखाप, रेशीम, जर, मोती व लाखेंचे सामान उत्कृष्ट प्रकारचें तयार केलें जातें. येथें दोन बर्फाचे कारखाने, सात विटांच्या भट्ट्या, दोन रसायनशास्त्रीय संस्था, दोन लोखंडाचे, चार चुन्याचे, एक गालिचाचा असे बरेच कारखाने व कांहीं छापखाने आहेत. सुमारें १५ नियतकालिकें येथें निघतात. पण तीं महत्त्वाचीं नाहींत. संस्कृत कॉलेजतर्फे, येथें ‘पंडित’  नांवाचें मासिकपुस्तक पूर्वी प्रसिद्ध होत असे.

पु रा ण व स्तु सं शो ध न- काशीच्या आसपास व खुद्द काशी शहरांत पुराणवस्तुसंशोधनाला पुष्कळच क्षेत्र आहे. काशींच्या आसपास लहान लहान अशीं असंख्य देवळें आहेत व ती राजा मानसिंगानें एका दिवसांत बांधविलीं अशी दंतकथा आहे. पण त्या देवालयांच्या शिल्पाकडे पाहिलें असतां, तीं मानसिंगाच्याहि पूर्वीचीं दिसतात. त्यांपैकीं बरीचशीं बौद्धकालीन् दिसतात. हल्लीं सारनाथाच्या आसपासचीं देवळें खणून बाहेर काढण्याचें काम चालू आहे. मुसलमानांनीं उद्धवस्त केलेल्या अशा बर्‍याच इमारती येथें आहेत. औरंगझेबाच्या मशीदीच्या मागें एका देवळाचा अवशेष आहे. या अवशेषावरून त्या ठिकाणी पूर्वी एखादें भव्य ब्राह्मणांचें अगर जैनांचे देवालय असावें असें वाटतें. कदाचित तेथें एखादें धर्माची चर्चा करण्याचें मंदिर असावें असेंहि मानण्याला जागा आहे. तसेंच अर्हइ कँगुरा नांवाची एक मशीद असून तेथें पूर्वी एक बुद्धाचें अगर हिंदूंचें धर्ममंदिर असावें असें दिसते. राजघाटाच्या पश्चिमेस ‘भैरव का तलाव’ म्हणून एक तलाव असून त्या ठिकाणीं जुन्या इमारतीचे अवशेष सांपडतात. त्या तलावाजवळील एका मोठ्या इमारतीच्या वरच्या भागावर एक लाटभैरवाची मूर्ति आहे. ही मूर्ति व तीवरील शिल्प पाहिलें असतां ती अशोककालीन असावी असें दिसतें. बकरीच्या कुंडाच्या आसपासहि पुराणवस्तुसंशोधनाला योग्य अशीं पुष्कळ स्थळें आहेत.

क ला.- काशीमध्यें शिल्पकला, चित्रकला, वगैरे कलांचे उत्कृष्ट नमुने पहावयाला मिळत नाहींत. देवळांच्या भिंतीवर जीं चित्रें काढलेलीं आढळतात तींहि सुंदर नाहींत. मुसलमानी मशीदी अगर ब्रिटिश अमदानींत बांधलेलीं देवळें जरा बरीं बांधलेलीं दिसतात. तरी पण कलेच्या दृष्टीनें त्यांत विशेष प्रेक्षणीय असें काहीं आढळून येत नाहीं.

कँ न्टो न में ट – काशी शहराच्या पश्चिमेस यूरोपियन लोकांचें रहाण्याचें ठिकाण आहे. त्याला कँटोनमेंट असें म्हणतात. या ठिकाणीं टांकसाळ, फ्रिन्स ऑफ वेल्स हॉस्पिटल, टॉऊन हॉल इत्यादि मोठ्या इमारती आहेत.

काशी संस्थानची माहिती ‘बनारस जमीनदारी’ या लेखाखालीं येईल.

[ संदर्भग्रंथ- ई. बी, हॅवेल- बनारस १९०६, शेरिंग-दि सेकेड सिटी ऑफ दि हिंदूज (७८६८)]; इं. गॅ. ७ तीर्थ यात्रा- प्रबंध. ].

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .