प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें

कास (खोकला) नि दा न- वातजन्य, पित्तजन्य, कफजन्य, क्षतापासून व क्षयापासून, असे पांच प्रकारचे खोकले आहेत. हे एकापेक्षां एक उत्तरोत्तर बलवान आहेत आणि कोणत्याहि प्रकारचा खोकला असला तरी त्याची हयगय केली असतां तो क्षयावर जातो.

खोकला होण्यापूर्वी घशांत कंड सुटणें, अरुची व घशांत धान्याचें कुस अडकल्यासारखें वांटणें हीं लक्षणें होतात, कोंडलेला वायु खालून वरच्या बाजूस उलटून छातींत येऊन घशांत अडकून मस्तकांतील शिरांत भरतो. त्यामुळे अंग वर फेंकल्यासारखें वाटतें व डोळे बाहेर फेंकल्यासारखें वाटतें. तो वायु पाठींत छातींत व बरगड्यांत पीडा करून फुटक्या कांशाच्या भांड्याच्या नादासारखा शब्द करीत तोंडातून बाहेर पडतो हाच खोकला होय.

कारणभेदाप्रमाणें वेगानें बाहेर पडणार्‍या वायूचे अघातही भिन्न भिन्न प्रकाराचे होतात. आणि म्हणूनच निरनिराळ्या खोकल्यांत पीडा व शब्द निरनिराळ्या प्रकारचें होतात.

वातुळ पदार्थांनीं कुपित झालेला वायु, छाती, घसा व तोंड यांनां कोरड, हृदय, बरगड्या, छाती व डोकें यांत शूळ, मोह, अंत:क्षोभ, स्वरक्षीणता व कोरडी ढांस हा उत्पन्न करतो. त्या ढांसेचा वेग, पीडा व शब्द हे जबर असतात, अंगावर रोमांच उभे रहातात आणि मोठ्या कष्टानें कोरडा कफ पडला म्हणजे वायूचा जोर कमी होतो.

पित्ताच्या खोकल्यांत कफ व डोळे पिवळे होतात. तोंड कडू होतें, ताप, भ्रम, पित्ताची व रक्ताची उलटी, तहान, स्वर बिघडणें, घशांत धुरकटल्यासारखें वाटणें, आंबट ढेंकर येणें आणि खोकल्याची मोठी उमळ आली म्हणजे डोळ्यांपुढें काजवें दिसणें हीं लक्षणें होतात.

कफाच्या खोकल्यांत छातींत किंचित दुखणें, डोकें व हृदय ओलसर, थंड व जड होणें, घशास चिकटा येणें, हातपाय गळणें पनिस, उलटी, अरुची येणे, रोमांच उभे रहाणें आणि दाट, चिकट व पांढरा कफ पडणें हीं लक्षणें होतात.

कुस्ती वगैरे साहसाचीं कामें आपल्या शक्तीच्या बाहेर केल्यानें उरांत क्षत होतें ; त्या योगानें वायु कुपित होऊन पित्ताच्या मदतीनें बलवान होऊन खोकला उत्पन्न करतो. त्यांत रक्तमिश्रित पिंवळा, काळा, कोरडा, गांठाळलेला व कुजलेला असा पुष्कळ कफ पडतो. घसा दुखणे, छाती फाटल्यासारखी वाटते. तींत तीक्ष्ण सुया टोंचल्याप्रमाणें वेदना होतात, शूळ होतो, पेरीं फुटतात, ताप, दमा, तहान, स्वर बिघडणें व कंप येणें हीं लक्षणें होतात. पारव्याच्या शब्दासारखा घशांतून आवाज निघतो; बरगड्या दुखतात, हळू हळू वीर्य, रुची, पचनशक्ति, ताकत व कांती हीं क्षीण होतात. आणि अशा तर्‍हेनें तो क्षीण झाला म्हणजे त्यास रक्तामिश्रित लघवी होते; आणि मग पाठ व कंबर धरते.

राजयक्ष्मानिदानांत सांगितलेल्या क्षयाच्या साहसादि कारणांनीं क्षयरोग्याचे कुपित झालेले वातप्रधान दोष खोकला उत्पन्न करितात. त्यांत घाणेरड्या पुवासारखा पिवळा, दुर्गंधी, हिरवा व तांबडा असा कफ पडतो. बरगड्या उपटून काढल्याप्रमाणें वाटतात. हृदय पडतेंच कीं काय असें वाटतें. कारणावांचून उष्णाची किंवा थंडाची इच्छा होते, रोगी फार खातो, शक्ति क्षीण होते, तोंड तुकतुकीत व प्रफुल्लित दिसतें आणि दांत व डोळे शोभिवंत दिसतात. त्यानंतर रोग्यावर क्षयाचीं सर्व लक्षणें दिसूं लागतात.

क्षयापासून व क्षतापासून होणारे हे खोकले क्षीण मनुष्यांस झाले असतां त्यांचा नाश करितात. बलवान मनुष्यांस झाले असतां त्यांचा नाश करितात. बलवान मनुष्यांस झाले असतां ते याप्य असतात. आणि नुक्तेच झालेले असून जर वैद्य, औषध, रोगी व परिचारक यांची अनुकूलता असली तर साध्य होतात. एकदोषज खोकला साध्य आणि द्विदोषज व म्हातारपणामुळें झालेला खोकला याप्य होय.

खोकल्यावर औषधोपचाराची हयगय केल्यानें दमा, क्षय, वांती, आवाज बसणें इत्यादि अनेक दुर्धर रोग होतात म्हणून खोकला झाल्यास त्यावर शक्य तितका लवकर चांगला उपाय करावा.

चि कि त्सा:- केवळ वाताच्या खोकल्यावर प्रथम वातघ्न औषधांनीं सिद्ध केलेलें स्नेह, स्नेहयुक्त पेय, युष, मांसरस वगैरे खाद्यपेय पदार्थ, लेह, ध्रूमपान, अभ्यंग, घाम काढणें, परिषेक, व अवगाह हे उपचार करावे. मळाचा व वाताचा अवरोध असल्यास वातघ्न औषधाची बस्ती द्यावी.

पित्तयुक्तवातकासांत जेवणानंतर तूप व दूध यांचें पान आणि कफयुक्तकासांत स्निग्ध विरेचनें द्यावीं.

भुइकोहाळ्याच्या अगर उसाच्या रसांत गेळफळ व ज्येष्ठमदाचा कल्क कालवून उलटी होण्याकरितां द्यावा. कफ पातळ असल्यास मधुर औषधाशीं व कफ घट्ट असल्यास कटु औषधांशीं मिळवून निशोत्तराचें चूर्ण जुलाब होण्याकरितां द्यावें. रेंच होऊन दोष निघून गेल्यावर थंड, मधुर व स्निग्ध असा पेयादि क्रम सुरू करावा. आणि दाट असल्यास थंड, रुक्ष व कडु पदार्थमिश्रित पेयादि क्रम चालवावा.

कफाकासांत कफ पातळ असल्यास शमन व दाट असल्यास शोघनधूम प्यावा. मनशीळ, हरताळ, ज्येष्ठमद, जटामाशी, नागरमोथे व हिंगणबेटाची साल यांचा विधियुक्त धूम प्यावा. नंतर गूळ घातलेलें कोमट दूध प्यावें, हा धूम फार दिवसांचें जुने वाताधिक व कफाधिक खोकले ताबडतोब नाहींसे करतो.

कफाच्या खोकल्यांत पित्तासंबंधानें तमकश्वास उत्पन्न झाला असल्यास त्या त्या अवस्थेनुसार पित्तकासाची चिकित्सा योजावी. नुसत्या वातकासांत कफसंबंध असल्यास कफहारक चिकित्सा करावी. वातकासांत व कफकासांत पित्ताचा संबंध असल्यास पित्तनाशक चिकित्सा करावी. वातकफात्मक खोकला कोरडा असल्यास स्निग्ध व ओला असल्यास रुक्ष चिकित्सा करावी. पित्तयुक्त कफकासांत कडू औषधांनीं मिश्रित अशी चिकित्सा करावी.

उर:क्षतावर ताबडतोब लाखेचें चूर्ण दूध व मध यांतून प्यावें. हें औषध जिरल्यावर साखर घालून दूधभात खावा. ज्याच्या कुशी व बस्ती वगैरेत शूळ होत असेल आणि ज्याचें पित्त व अग्नि हीं मंद असतील, त्यानें मद्यांतून लाख प्यावी. ज्यास शौच्यास पातळ होत असेल त्यानें नागरमोथा, अतिवीष पहाडमूळ व इंद्रजव यांच्या चूर्णांतून लाख घ्यावी. निरनिराळ्या मार्गांनीं रक्त जाऊं लागल्यास ते ते मार्ग बंद करण्याची रक्तपित्तावरील चिकित्सा करावी.

ज्याचा अधोवायु बंद झाला असेल त्यानें बकर्‍याची चरबी सैंधव घालून दारूंत मिळवून घ्यावी. कृश, क्षयी, उर:क्षती, ज्यास झोंप कमी आहे व ज्याचा अग्नि प्रदीप्त आहे त्यानें दूध तापवून काढलेल्या सायीबरोबर तूप, मध व खडीसाखर घालून बकर्‍याची चरबी खावी. वातानें अंग दुखत असेल तर वातनाशक तेलें अंगास चोळावीं. प्रकृतींत पित्ताचा जोर असल्यास तूप चाटावें आणि वात अधिक असल्यास तें प्यावें. चाटलेलें तूप पित्ताची शांति करते आणि तें थोडे असल्यामुळें अग्नीस मंद करीत नाही. प्यालेलें तूप झपाट्यासरसें वायूस जिंकून जठराग्नीस शमवितें. ज्याचा अग्नी मंद आहे त्याच्या उर:क्षतावर, क्षयावर सांगितलेली दीपक चिकित्सा करावी. शौच्यास पातळ होत असल्यास स्तंभक चिकित्सा करावी.

क्षयाच्या खोकल्यांत प्रथम बृंहण व अग्निदीपन करावें. दोष फार वाढलेले असल्यास स्नेहयुक्त हलकें विरेचन द्यावें. पित्त, कफ व रसादि धातू क्षीण झाले असतां क्षयकासी रोग्यानें काकडशिंगी, दूध, चिकणा व अतिबला या औषधांनीं सिद्ध केलेलें तूप प्यावें. लघवीचा रंग बदलल्यास किंवा मूत्रकृछ्र झाल्यास भुइकोहळा किंवा कदंब व ताड यांच्या फळांनीं सिद्ध केलेलें तूप किंवा दूध प्यावें. शिस्न, गुद, ढुंगण व जांघाडे यांत सूज व वेदना असल्यास हलकी अशी तुपाची निवळी किंवा तेलतुपाचें मिश्रण यांची स्निग्ध बस्ती द्यावी. यावर मांसभक्षक लांडगा, वाघ वगैरेंचें मांस खाण्यास द्यावें. हें क्रूर पशूंचें मांस स्रोतांस चिकटून बसलेल्या कफास सोडवितें व त्यायोगें स्रोतें मोकळीं होऊन त्यांतून अन्नरस चांगल्या रीतीनें वाहून पुष्टि देतो. कूष्मांडक रसायन ( वा. चि. स्था. अ. ३ ) अगस्तिरसायन व च्यवनप्राश्यावलेह ( वा. चि. स्था. अ. ३ ) हीं औषधें द्यावीं. क्षयकास झालेल्या रोग्यास वातघ्न औषधांच्या काढ्यांत सिद्ध केलेलें दूध, काट किंवा विष्किर, प्रतुद व विलेशय प्राण्यांच्या मांसाचें सुर्वे द्यावे. उर:क्षताच्या खोकल्यावर जे धूम व जीं अनुपानें सांगितलीं आहेत ते धूम व तीं अनुपानें क्षयकासावरहि योजावीं. क्षयरोगावर जी बृंहण, अग्निदीपन आणि स्रोतसांची शुद्धि करणारीं औषधें आहेत तीं क्रम बदलून क्षयकासावर योजावीं. सारांश जेवढे कांहीं शक्तिवर्धक उपाय असतील ते सर्व यावर प्रशस्त आहेत. क्षयकास सन्निपातापासून उत्पन्न होतो व भयंकर असतो. म्हणून सन्निपातावरील चिकित्सा त्यांवर दोषबल नुसार केली असतां हितकर होते.

खोकल्यांत पथ्याकरितां साठेसाळीचा भात, गहूं, उडीद, मूग, कुळीथ, शेळीचें दूध, तूप, वांगीं, मुळा, चाकवत या भाज्या; लसूण, द्राक्षें, लाह्या, ऊन पाणी, मध, हे पदार्थ द्यावे.

मैथुन, दिवसा झोंप, दही, पिष्टमय पदार्थ, धूम्रपान व खीर हे पदार्थ कुपथ्यकारक आहेत.

लवंगादिगुटी, उन्मत्तभैरव, ताम्रपर्पटी, हेमगर्भरस आणि नागवल्लभरस हीं योगरत्‍नकरांतील औषधें खोकल्यावर गुणकारी आहेत. [ वाग्भट; चरक ; योगरत्‍नकार. ]

पा श्चा त्य वै द्य कां ती ल मा हि ती.- पाश्चात्य वैद्यक ग्रंथांत ‘रोगाचें स्वरूप, कारणें, लक्षणें, चिकित्सा’ यांचाच विचार प्राय: केलेला आहे. तथापि जनतेमध्यें रोग कोणता व लक्षणें कोणतीं यांविषयीं अज्ञान असतें. त्यांत लक्षणांसच रोग मानणें असा प्रकार वारंवार घडतो. तथापि कांहीं लक्षणांचा रोग म्हणूनच विचार करणें सोयींचें असल्यामुळें अग्निमांद्य, कावीळ इत्यादि रोगलक्षणांनां या ग्रंथांत स्वतंत्र स्थान मिळालें आहे. अशा थोड्या परंतु महत्वाच्या लक्षणांपैकी कास ऊर्फ खोकला होय.

खोकला म्हणजे घसा, कंठ, श्वासनलिका यांत दाह उत्पन्न करण्यासारखा कफ, श्लेष्मा, हे आंगतुक पदार्थ शिरतात व ते उच्छवासाच्या क्रियेनें बाहेर पडण्यास मदत व्हावी अशी निसर्गाची योजना आहे. म्हणून खोकला म्हणजे आगंतुक दाहकारक पदार्थ बाहेर निघेपर्यंत एकामागून एक ( प्राय: रोग्याकडून दबल्या न जाणार्‍या ) अशा अनेक उच्छवासांची मालिकाच होय अशी याची सोपी व्याख्या आहे. खोकला म्हणजे केवळ थंडी, गारठा, वारा, पडसें इत्यादि कारणांमुळें येणारें दुखणें यापेक्षां त्याचें महत्व लोकांस माहीत नसतें. परंतु खोकल्याच्या तीव्र व जुनाट स्वरूपामध्यें कित्येकवेळां चिंताजनक व काळजी करण्यासारख्या भयंकर व चमत्कारिक रोगांचें बीज असतें व खोकला हें त्या रोगाचें केवळ बाह्य लक्षण होय. अशा भयंकर रोगांपैकीं दमा, फुफ्फुसदाह, हद्रोग अगर हदयरोग, मलग्रंथिदाह फुफ्फुसावरणदाह, डांग्या खोकला, कफक्षय अगर राजयक्ष्मा या व इतर मुख्य रोगांचें वर्णन ज्ञानकोशांत त्या त्या सदराखालीं वाचावयास सांपडेल. या सर्व रोगांत खोकला हें त्यांच्या प्रधान लक्षणांपैकीं एक लक्षण असतें. या रोगांतील खोकल्यास साध्या पडसें, सर्दीच्या खोकल्याप्रमाणें निरुपद्रवी मानून त्यावर उपाय करणें चुकींचें होईल. याखेरीज आणखी अनेक रुग्णावस्थेमध्यें खोकला हें लक्षण म्हणून आढळतें. त्यांचें वर्णन त्रोटक असें पुढें दिलें आहे:- ( १ ) दीर्घकालीन मूत्रपिंडदाहामध्यें आंगतुक संकट म्हणून हृदय विकृत होतें व त्यावेळीं हद्रोगजन्य खोकल्याप्रमाणें हृदयावर व मूत्रपिंडदाहरोगावर उपचार करावेत. ही माहिती त्या लेखाखालीं वाचावयास सांपडेल. ( २ ) घटसर्प म्हणजे यूरोपीय देशांतील सांथीचा म्हणून गणलेला, घसा व श्वास मार्गांत चिकट पापुद्रा उत्पन्न करून देवीप्रमाणें अतिशय प्राणहानि करणारा, पूर्वीं असाध्य मानलेला परंतु हल्लीं लशीच्या तोडग्यामुळें व आधुनिक रोगप्रसारप्रतिबंधक उपायामुळें बराच सुसाध्य झालेला असा ताप होय. हिंदुस्थान देशांत हा आढळत नसल्यामुळें त्याचा अधिक विचार कर्तव्य नाहीं. या रोगांत श्वासावरोधानें उत्पन्न होणारें गुदमरणें टळण्यासाठीं कंठनाळछेद अगर श्वासनलिकाछेद या शस्त्रक्रिया एखादेवेळीं कराव्या लागतात. ( ३ ) कंठदाह, घसा व पडजीभ यांच्या दाहामुळें होणार्‍या खोकल्यास ठराविक उपाय न करितां तदनुरूप चिकित्सा केली पाहिजे. ( ४ ) जठरामध्यें पचनसंबंधीं बिघाड उत्पन्न होऊन झालेल्या खोकल्यावर मूळ रोगाची चिकित्सा करावी. ( ५ ) बाह्यकान अगर कानांतील तेलकट मळाच्या गांठी बनून कधीं खोकला उत्पन्न होतो. त्यावर नेहमींचे इलाज फुकट जाऊन केवळ मळ मऊ करून थोडे दिवस कान धुण्यानें खोकला बरा होतो. ( ६ ) बद्धकोष्ठ, दंत्तोद्भव, अपचन, कृमी इत्यादि दाहजनक कारणांमुळें आंतड्यांत दाहक्रियेस आरंभ होऊन खोकला झाल्याचीं उदाहरणें अपरिचित नाहींत. त्यांवर तदनुरूप इलाज करून मूळ रोगावर प्रहार केला पाहिजे. यावर खोकल्याच्या ठराविक गोळ्या, चाटणें व मिश्रणें निरुपयोगी होत. ( ७ ) मज्जातंतुजन्य रोग व उन्माद रोग यामध्यें रोग्यास “विनाकारण रोदन, हास्य व अशाच इतर लहरींप्रमाणे दिसणार्‍या लक्षणांबरोबर रोग्यास छातींत अगर इतर ठिकाणीं कांहीं विकृति नसून एकसारखी खोकल्याचा ढांस लागते. ती बरी होण्यास साध्या खोकल्यावरील इलाज न करितां उन्माद वातशामक उपचार करावे. अशांपैकीं बहुतेक स्त्रीरोगीच असल्यामुळें गर्भाशय व तदनुषंगिक इंद्रियें विकृत झालीं आहेत कीं काय यांची परीक्षा करवून त्यांवर इलाज केल्यानें हा रोग थांबतो.

या विवेचनावरून साधा खोकला व नानाविध रोगांचा सूचक म्हणून आलेला खोकला यांची परीक्षा तज्ज्ञांकडून करण्याचें महत्व कळून येईल. दुसर्‍या प्रकारच्या खोकल्यांत चांगल्या वैद्य, डॉक्टरांच्या सल्ल्यानें उपचार करावे. साध्या खोकल्यासाठीं देशी अगर इंग्रजी वैद्याकांतील चाटणें, वड्या तोंडांत धरण्याच्या व ढांस थांबणार्‍या गोळ्या, घसा, पडजीभ, यांवर लावण्याचीं तुरट व गोड औषधें या सर्व अगर एखाददुसर्‍या औषधाचा उपयोग करावा. याशिवाय छातीवर मोहरी वांटून तिचा लेप फडक्यावर पसरून छाती लालसर होईपर्यंत लावावा. टरपेंटाईन, कापूर, क्लोरोफार्म, मोहरी यांचीं वैद्य व डॉक्टर यांच्याकडून तयार झालेलीं तेलें छातीस चोळणें हाहि एक उत्तम उपाय आहे. वाफार्‍यानें कपडा ऊन करून त्या बोळ्यानें अगर जवसाच्या पोटिसानें खोकल्याच्या तीव्रतेप्रमाणे एकदोनदां अगर अधिक वेळां छाती शेकणें हाहि एक सुलभ व उत्तम घरगुती उपाय आहे. वरचेवर खोकला येण्याची संवय जडलेल्या रोग्यानें आपली एकंदर प्रकृति सुधारण्यासाठीं पौष्टिक औषधें व लोहयुक्त औषधें घ्यावींत. जुनाट खोकल्यासाठीं कॉडमाशाच्या तेलापासून बनवलेलें श्वेतमिश्रण फार उपयोगी असतें. गरम कपडे, ताजी व मुबलक कोरडी हवा, समुद्रस्नान, समुद्रकांठची हवा यांपैकीं अनुकूल असतील ते इलाज रोग्यानें करावे.

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .