प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें  

कासार- हा शब्द तांब्या पितळेंची भांडीं करणें व  विकणें हे व्यापार करणारे आणि बांगड्याच्या धंदा करणार्‍या जातीं यांना लावतात. यांची वस्ती मुंबई इलाखा, वर्‍हाड, मध्यप्रांत व मध्यहिंदुस्थान यांतून आहे. विशेषत: मुंबई इलाख्यात कांसार वस्ती अधिक आहे. धंदा दोन प्रकारचा एका शब्दानें दर्शविला जातो त्यापैकीं एका प्रकारच्या म्हणजे भांड्याच्या धंद्याला जातिवाचक दोन शब्द; यामुळे आकडे घोटाळ्याचे झाले आहेत. इ. स. १९११ च्या खानेसुमारींत ३६,२२८ तांबट नोंदले गेले, पैकीं २६९१३ मुंबई इलाख्यात, ४५७२ वर्‍हाडमध्यप्रांतांत व ५७४३ मध्यहिंदुस्थानांत होते. यांमध्यें बोगारांचा समावेश नसावा. संस्कृत कांस्यकार शब्दापासून कांसार शब्द बनलेला असावा अशी व्युत्पत्ति कांहीं जणांनीं दिली आहे. ती खरी असल्यास अशी कल्पना सुचते कीं पूर्वी कोशांचें काम करणारा एखादा वर्ग असावा, तो भांडी व बांगड्या करीत असावा व पुढें बांगडी करणारे आणि भांडी करणारे निराळे झाले असावेत आणि त्यानंतर काशांचीं भांडीं जाऊन पितळेचीं आलीं असावींत व काशांच्या बांगड्या जाऊन कांचेच्या आल्या असाव्यात. जातींचे स्पष्टीकरण करण्यास थोडेसें पृथक्करण केलें पाहिजे तें पुढीलप्रमाणें करतां येईल.

(१) त्व ष्टा कां सा र.- हीं भांडी करणारी जात. या जातींत समेळ, दांडेकर, कडु, लोंबर, हजारे, गोडांबे ही आडनावें येतात. लोकसंख्या निश्चित नाहीं. कदाचित् पांचपासून दहा हजारपर्यंत असावी. या जातींस तांबटहि म्हणतात. हा कारागिरांचा वर्ग होय. ही जात निवृत्त मांस नाहीं.

(२) बोगार.- या जातीचा धंदा भांडीं विकणें हा होय. करणें नव्हे, हा व्यापार्‍याचा वर्ग होय, कारागिरांचा नव्हे. यांतील काहीं मंडळी जैन आहेत. कांहीं वैष्णव आहेत पण दोघांचा लग्नव्यवहार होतो. याचा धंदा बांगड्या विकणेंहि आहे. बागड्या विकणारांस बांगड म्हणतात. शेदोनशें वर्षें ही जात लोखंडाचाहि व्यापार करीत आहे. यांत मणेरी म्हणूनहि धंदा करणारे लोक आहेत. ते स्त्रियांस लागणारा माल विकतात. सुमारें दोनशें वर्षांपूर्वीं यांत तंटे झाले आणि त्याच्या शाखा पडल्या, व त्यामधील लग्नव्यवहार थांबला. त्यामुळें एक दुसर्‍यास “तगर’’ म्हणूं लागलें. व एक दुसर्‍यांस आपले लोकवळे आहेत असें सांगू लागले. पण आज या संबंधाचा पुरावा नाहीं. या जातींत कंदले, राव, रासने, डागरे, पुसलेकर, वेळापुरे, रागोळे अशीं आडनावें आहेत. ही जात निवृत्तमास आहे. ही नागपूरपासून पुण्यापर्यंत व दक्षिणेकडे सोलापूर बेळगांवपर्यंत पसरली आहे. गोव्यांतील कांसार व हे कासार याच्यांत एकी करण्याची खटपट चालू आहे.

(३) पा चा ल कां सा र.- हीं निवृत्तमांस जात आहे. या जातीचीं घरें पुण्यामध्यें पाच पंचवीस असतील. हिचा धंदाहि त्वष्टा कासाराप्रमाणें भांडीं घडविण्याचा आहे. या जातीमध्यें पंडित, भोकरें, जितकर, दस्तुरकर अशीं आडनावें आहेत. यांची वस्ती महाराष्ट्रात चार पांच हजारांहून अधिक नसावी. या तिन्ही जाती कालिकादेवीस आपली देवी समजतात. आणि कालिकापुराणांन उल्लेखिलेली जात आपलीच असें मानतात.

त्व ष्टा का सा र.- हे आपणाला त्वष्टाकांसार म्हणवितात व विश्वकर्म्यापासून आपली उत्पत्ति लावितात. कांसार आपणाला ब्राह्मण म्हणवितात व पुष्कळ बाबतींत ब्राह्मणासारखें दिसतातहि. हे गळ्यांत जानवीं घालतांत व ब्राह्मणी गोत्रें मानतात. आपल्या ज्ञातीचें भिक्षुक तयार करण्याचीं याची खटपट तांबट धंद्याच्या मोठ्या किफायतीमुळें फारशी सिद्धीस गेलेली दिसत नाहीं.

कांसारांत कुळें व देवकें आहेत. एकच देवक असणार्‍या घराण्यांत परस्पर लग्नसंबंध होत नाहींत. दक्षिणेंत देवकांच्या ऐवजीं गोत्रें रूढ आहेत. व सगोत्रविवाह निषिद्ध मानिला जातो. दक्षिणी कांसारांत मौजीबंधन असतें, पण कोंकणीं कांसारांत तें नसतें. कुंकू लावणें, गडगनेर, सीमांतपूजन, घाणा, देवप्रतिष्ठा, वाङ्‌निश्चय, रुख्वत व सप्तपदी या गोष्टी लग्नविधींत मुख्य होत. घटस्फोट मान्य नाहीं.

कांसार हे कालीचे उपासक आहेत. बहिरीचंडिका, एकवीरा, कुमारिका, खंडोबा. महालक्ष्मी यांहि यांच्या कुलदेवता असतात. सोलापुर वगैरे कांहीं ठिकाणीं जैन कांसार आढळतात. यांचा और्ध्वदैहिक विधि ब्राह्मणांप्रमाणेंच असतो. हे मद्यमांसाशन करितात; पण ब्राह्मणांखेरीज दुसर्‍या जातीच्या हातचें खात नाहींत.

ज्ञातींचें मुख्य वस्तीचें ठिकाण मुंबई व पुणें हीं शहरें होत. मुंबईंत आजमासें तीन चार हजार किंवा अधिक वस्ती असून पुण्यांत सुमारें दीड हजार वस्ती आहे. अलिबाग, भिवंडी, पेण, पनवेल, वसई, नासिक व निझामचें राज्य यांतूनहि वस्ती आढळते. मुंबईत, ज्ञातींच्या पंचायती आहेत आणि त्याचप्रमाणें गावोंगांवींहि आहेत. मुंबईतल्या पंचायतीला विशेष महत्व आहे. पंचायतीचा अध्यक्ष मुंबईंत तीन वर्षांनीं निवडला जातो. तो वंशपरंपरेनें निवडला जात नाहीं आणि हाच नियम बहुतकरून सर्व गांवीं लागू आहे. मुंबईमध्यें पायधुणीवर कालीकादेवीचें देऊळ आहे. त्याशिवाय कादेवाडींत तीन चाळी आणि सोनापुरांत एक धर्मशाळा आहे. कालिकादेवीच्या सर्व चाळीच्या उत्पन्नाचा उपयोग ज्ञातीच्या धार्मिक, सामाजिक व इतर उपयुक्त बाबींकडे केला जातो. ह्या सर्व इस्टेटीची किंमत सुमारे तीन चार लाख होईल. त्याचप्रमाणें पुणें, सातारा, पनवेल, पेण, रत्‍नागिरी, उरण, निजामपुरा, किहीम इत्यादि गावांत ठिकठिकाणीं इस्टेटी आहेत. त्या सर्व इस्टेटींचें उत्पन्नाचा विनियोग लोकांच्या खासगी कामाकरितां होत नाहीं. ज्ञातीच्या हक्काचा पूर्वाधारें चालत आलेला ( म्हणजे एक मण ताब्यामागें ) अर्धा पैसा हल्लीं ज्ञातींत एकी नसल्यानें वसूल होत नाहीं. पंचायतीचे निवाडे लिहून ठेवण्याची पद्धत आहे. परंतु ते फार वर्षांचे नाहींत. मध्यंतरीं असलें रेकार्ड विकून टाकिलें. पंचायतीचें निकाल अमलांत आणण्याकरिता बहिष्कृत ठेवणें हें साधन ज्ञातीच्या स्वाधीन आहे. परंतु तें फार दिवस टिकत नाहीं. कारण कांहीं लोक मध्यस्थी करून ते रद्द करवितात. ज्ञातीच्या पंचायतीपुढें ज्ञातीच्या हिताचें प्रश्न येतात. ब्राह्मणाशिवाय इतर जातीबरोबर अन्नोदिक व्यवहार होत नाहीं. ज्ञातींत पोटजाती मुळींच नाहींत. ज्ञातींत मुंज, विवाह इत्यादि संस्कार कोंकणस्थ व देशस्थ ब्राह्मण करितात. ज्ञातींचे प्रश्न जातच सोडविते आणि शास्त्राधारासंबंधानें ब्राह्मणांचा सल्ला घेते पण अशी वेळ फार क्वचित येते. ज्ञातीचें सर्व संस्कार वेदोक्त धर्माप्रमाणे उपाध्यायाकडून करून घेतात. कांही वर्षांपूर्वी आपण ब्राह्मण कीं क्षत्रिय असा प्रश्न निघाला होता पण त्यापासून काहीं निष्पन्न झालें नाहीं. ज्ञातीच्या इतिहासासंबंधानें ज्ञातीची मंडळी येणेंप्रमाणें माहिती देतात:- या ज्ञातीचा जनक त्वष्टा होता. त्वष्टा हा विश्वकर्म्याचा मुलगा होता. विश्वकर्मा हा भुवनाचा पुत्र व बृहस्पतीचा भाचा होता. तो आंगिरा वंशांतला होता. विश्वकर्मा रथकारांचा गुरू असून महातपस्वी होता. मनु, मय, त्वष्टा, शिल्पी व दैवज्ञ ( विश्वज्ञ ) हे पांच देवर्षी होते. हे सर्व विश्वकर्म्याच्या मुखापासून झालेले होते. काष्ट, सुवर्ण, शिल, लोह आणि ताम्र या पांच प्रकारचें शिल्पकर्म करणार्‍या विश्वकर्म्याच्या पांच पुत्रांस, रथकार अशी संज्ञा होती. ह्यांनीं वैदिक कर्मांनें संस्कार करावा व त्यांच्या वंशांत झालेल्यांचाहि उपनयन संस्कार करावा असा अधिकार होता. चार वेद आणि त्यांचीं सहा अंगें ह्या सर्वांनां जाणणारे जे विद्वान ब्राह्मण असतात, त्यांचा जो धर्म वेदांनीं सांगितला तोच धर्म विश्वकर्म्याचा आहे, व त्याच्या वंशांत उत्पन्न झालेल्यांचांहि आहे’’ ( पंचाल ब्राह्मण्य निर्णय पुस्तक पृष्ठें ८६, ८९, १०२). ज्ञातीमधील वृद्ध गृहस्थांच्या तोंडून परंपरागत जी हकीकत सांगण्यांत येते तीवरून पहातां कांसार श्री कालिका देवीचे उपासक व सोमवंशी क्षत्रियकुलोत्पन्न आहेत. या समजुतीला पुष्टि कथाकल्पतरू ग्रंथांतल्या हकीकतीवरून मिळतें. हा ग्रंथ ओवीबद्ध मराठी भाषेंत असून ३०० वर्षांपूर्वी नाशिक क्षेत्रीं कृष्णयाज्ञवल्की नांवाच्या ब्राह्मणानें पुराणग्रंथाच्या माहितीनें लिहिला. त्यांत कार्तवीर्य सहस्त्रार्जुन ह्याचा पुत्र धर्मपाल व चोलराजाची कन्या चंद्रगुप्त ह्या दोघांपासून जे पुत्र झाले तेच पुढें देवीच्या आज्ञेवरून कांस्य, ताम्र वगैरे धातू बनविण्याची कला शिकून त्या कलेचे प्रचारक झाले, व तेव्हांपासून ते कांस्यकारा व कासार ह्या नांवानें लोकांत प्रख्यात झाले अशी कथा दिलेली आहे, व ही कथा  पद्मपुराणांतर्गत कालिकामहात्म्यावरून लिहिली आहे, असें कर्त्यानें म्हटलें आहे. त्वष्टा ब्राह्मण आहेत ह्यासंबंधानें बराच उहापोह झाला होता म्हणून आज ज्ञातीचे लोक आपणाला त्वष्टा कासार असें म्हणवितात.

गेल्या तीनचारशे वर्षांत ज्ञातींचीं स्थलांतरें धंद्यापरत्वें झालीं परंतु तीं कायमचीं झालीं नाहींत. ज्ञातींत पूनर्विवाह होतो, परंतु तो धनिक किंवा संभावित कुटुंबें करीत नाहींत ज्ञातींत पुरुषास रखेल्यापासून झालेल्या मुलांची जात झालेली नाहीं. ज्ञातींतल्या स्त्रियांस अधर्मव्यवहारानें सजातीय पुरुषांपासून मूल झाल्याचें एकहि उदाहरण आढळून आलें नाहीं. याचीं आडनावें पुढील प्रमाणें आहेत. हजारे, दांडेकर, गोडावे (ध्ये), आर्ते, लोंबर, कडु, पिंपळे, पुरोहित, वाडेकर, येडेकर, त्रिभुवने, शेटे, सोष्टें, तांबडे, समेळ वडके, गोडे, (ड्ये), मुळे, करडे, इनामदार, डेरे, कवळे, पारंगे, इश्वाद, तालीम, तांबट, शिंग्री, पोटफोडे, निजामपूरकर, साप्ते, खुळे, बोसलीकर, डाखणे, तांबट, पाटील, पुसलेकर, साळवी, दवणकर, मांडके, पारिंगे, लांजेकर, देशमुख, पोरे, मोरे, गंभीर, रणशिंगे, रात, बोधे व म्हशेटे.

गो त्रें.- गालभ्य, अंजीरा, भृगु, काशप, अत्रीय, भारद्वज, इत्यादि यांचीं गोत्रें आहेत.

दे व कें.- एकविरा, बहिरीभवानी, हामजाईनिमजाई, महालक्ष्मी, जमनाबाई इत्यादि कासारांचीं देवकें होत.

कां हीं प्र सि द्ध पु रु ष.- कै. नारायण भाई दांडेकर ( शिक्षणखात्याचे पहिले नेटिव्ह डायरेक्टर, हे वर्‍हाडांत होते ). कै. बाळकृष्ण गोपाळ तालीम ( कॉन्ट्रॅक्टर हैदराबाद संस्थान ). कै. रामकृष्ण माणिकजी येडकर ( व्यापारी ). कै. रामकृष्ण पुरुषोत्तम वाकनीस ( इनामदार ). रा. रा. आनंदराव वामन शेटे ( ऑनररी मॅजिस्ट्रेट ). भास्कर रामचंद्र आर्ते एम. ए. ( प्रोफेसर बरोडा कॉलेज ).

सं स्था.- त्वष्टाकांसार विद्योत्तेजक मंडळी को आपरेटिव्ह सोसायटी; त्वष्टाकांसार ज्ञाती संस्थान मुंबई; कासार समाजोन्नति मंडळ मलकापूर (वर्‍हाड). ज्ञातीचे त्वष्टासेवक नामक मासिक ( संपादक, रामकृष्ण महादेव समेळ ).

या ज्ञातींतील बरेच सुशिक्षित लोक निरनिराळ्या धंद्यांत व मोठ्या दर्जांवरहि आहेत.

बो गा र.- ही जात बरीच मोठी आहे. या जातींतील जैन मंडळी; कांसार जात सर्वच जैनधर्मी आहे असें भासविण्यासाठीं आणि सर्व कासारांनीं जैन बनावें यासाठीं खटपट करीत आहे. सर्व कांसार मूळचे जैन पण पेशव्यांच्या जुलमामुळें ब्राह्मणानुयायी झाले अशीं मतें ते प्रतिपादन करीत आहेत. सोलापूरकर जैनकासार पंचमंडळीकडून पुढील महाराष्ट्रीय जैनकासार मंडळीची माहिती आली आहे. “खानेसुमारींत तांबट लोकांनींहि कासार म्हणून लिहून दिलें आहे. सातारा, रत्‍नागिरी, पुणें, बेळगाव, सोलापूर, पंढरपूर, कर्नाटक, निजाम हैद्राबाद, अहमदनगर, धुळें, वर्‍हाड वगैरे प्रांतांतील कासार पूर्वीपासून जैनधर्मी असल्यामुळें खानेसुमारींत आपली जात कांहींजणांनी ‘जैन’ म्हणून लिहून दिली आहे; यामुळें लोकसंख्या बरोबर कळत नाहीं. कांसार लोक सोमवंशी आहेत. कांसार व बोगार एकाच जातीला म्हणतात. भांडीं विकणारास बोगार म्हणतात. काकणें ( बांगड्या ) विकणारास कांसार म्हणतात.

जातीच्या गांवोगांव पंचायती आहेत. विशेष पंचायती धर्माधिकार्‍यांच्या हद्दींतील गांवोगांवचे पंच मिळून धर्माधिकार्‍यांच्या हद्दींतील गांवोगांवचे पंच मिळून धर्माधिकार्‍याच्या सल्ल्यानें करितात. धर्माधिकार्‍यास भट्टारक म्हणतात. कांसारांत भट्टारकांच्या तीन गाद्या आहेत. कारंजा मुक्कामीं एक गादी आहे. तेथील भट्टारकास देवेंद्रकीर्ति म्हणतात. दुसरी गादी मलखेड ( निजामराज्यांत ) येथें आहे. तेथील भट्टारकास रत्‍नकीर्ति म्हणतात. तिसरी गादी हुपस ( कर्नाटकांत ) येथें आहे. येथील भट्टारकास देवेंद्रकीर्ति म्हणतात. कांहीं ठिकाणीं जातीचा अध्यक्ष निवडला जातो. कांहीं ठिकाणीं तो वंशपरंपरेनें असतो. प्रत्येक गावांत जातीचीं देवळें आहेत. त्यांच्या व्यवस्थेकरितां घरें, जमीनजुमला व जंगम मालमत्ता आहे. त्याच्यावर त्या गांवच्या पंचांची सत्ता आहे. त्या मालमत्तेची किंमत नक्की माहीत नाहीं. त्या त्या गांवच्या व शहरच्या मानानें आहे. देवळांत पूजेकरितां पूजारी नेमलेला असतो. तो देवळाच्या व्यवस्थेकरितां योग्यतेनुसार वर्गणी वसूल करीत असतो. धर्माधिकारी वर्षासन वसूल करतात. गांवचे लहानसहान निवाडे लिहून ठेवण्याची पद्धत नाहीं. धर्माधिकार्‍याच्या समक्ष मोठी पंचायत झाल्यास तिचा निवाडा मठांत लिहून ठेवावयाची पूर्वीपासून वहिवट आहे. बहुतकरून गांवचे निवाडे गांवकरीच अमलांत आणतात. जर ते कोणी ऐकले नाहींत तर धर्माधिकार्‍याकडून दंड किंवा शासन म्हणजे बहिष्कारपत्र आणून ते अमलांत आणतात. धर्माधिकारी बहुमतानें नेमलेला असल्यामुळें तो जात पंचायतीच्या निवाड्याप्रमाणें शासन करण्यास पूर्ण अधिकार आहे;  सरकारच्या मंजुरीची जरुरी नाहीं. धर्मनियमाविरुद्ध कोणत्याहि व्यक्तींनें वर्तन केल्यास त्याबद्दल प्रश्न येतात. महत्त्वाचे प्रश्न आलेले धर्माधिकार्‍याच्या दप्तरांत मिळतात. या जातीच्या सदृश अशा पंचम, चतुर्थ, सेतवाळ इत्यादि जैनधर्माप्रमाणें वागणार्‍या जाती दक्षिणेंत आहेत. इतर भिन्न जाती पुष्कळ आहेत. जैन जातींत पुष्कळ पोटजाती आहेत. त्यांपैकीं पंचम व चतुर्थाबरोबर बेटीव्यवहार सुरू झाला आहे. जैन जातीबरोबर अन्नोदक व्यवहार चालतो. जातींमध्यें जैन उपाध्यायाकडून विवाहादिक संस्कार करवितात. जातीचे कोणतेहि प्रश्न धर्माप्रमाणे सोडविले जातात. वैदिकधर्मी ब्राह्मणांच्या सल्ल्यांची बिलकुल जरुरी पडत नाहीं. जातीच्या अगर व्यक्तीच्या उद्योगाप्रमाणें व्यक्तीस चातुर्वर्ण्य व्यवस्थेंत स्थान मिळतें. पूर्वीं कांसार ही जात क्षत्रिय होती असें पुराणांच्या आधारें जातीचें म्हणणें आहे. जातीचे कागदपत्र मलखेड होंबुज, कोल्हापूर येथील धर्माधिकारी व सातारा येथें रांगोळे याजकडे आहेत. जातीचा इतिहास महापुराण व कालिकापुराणावरून प्रमाणबद्ध आहे. कालिकापुराण ग्रंथाचा शंभरसव्वाशें वर्षांचा हस्तलिखित पुरावा हजर आहे. गेल्या दोनतीनशें वर्षांत महाराष्ट्र व मध्यप्रांतांत पेशव्यांचा अम्मल असतांना ब्राह्मणांचें तेज या जातीवर पडून ही जात ब्राह्मणानुयायी झाली आहे. त्यावेळीं ब्राह्मणशाही असल्यामुळें जैनधर्माधिकार्‍यांना महाराष्ट्रांत फिरणें, उपदेश करणें व आपली खंडणी वसूल करणें फारच बिकट झालें. त्यामुळें कांसार लोक ब्राह्मणानुयायी झाले आहेत. याजबद्दल पुरावा सातार्‍याचे रांगोळे यांच्या घराण्यांत मिळतो. मलखेडच्या धर्माधिकार्‍यांनीं सातार्‍यास जाऊन कांसारांस “तुम्ही आमचे शिष्य आहात व आम्हांस मानलें पाहिजे’’ असें सांगितलें. त्यानंतर सातारकरांनीं कांही प्रश्न विचारले. त्यांनीं त्यांस समर्पक उत्तरें देऊन मानपान स्वीकार करून घेतले आहे. याबद्दल कोल्हापूर सरकारांत निवाडे झाले आहेत. याबद्दल लेखी कागदपत्र रा. रा. रामभाऊ रांगोळे सातारकर ( हल्लीं मुक्काम बारामती ) यांजकडे आहेत. इंग्रजी राज्यापूर्वी पेशव्यांच्या काळांत जैनधर्मावर गदा आली. तिचा परिणाम अद्यापि दिसून येतो. अलीकडे थोडाबहुत जैनधर्माचा प्रकाश महाराष्ट्रांत कासार मंडळींवर पडत चालला आहे. १९१७ च्या कार्तिकमासीं मलकापुर ( वर्‍हाड प्रांत ) येथें कांसार परिषद भरल्यावेळीं जैनधर्मी व अन्यधर्मी पुष्कळ कासार मंडळींमध्यें शरीरसंबंध, आप्तपणा व भाऊबंदकी जुळली. त्यावेळेंस एका जातीमध्यें धर्म विरोध का ? याबद्दल विचार उत्पन्न झाला. जैनधर्मी कालिकापुराण पुष्कळ मंडळींनीं घेऊन त्याचा विचार मन:पूर्वक चालविला आहे. तारीख ८।६।१८ रोजीं पुणें मुक्कामी शेठ शंकरराव मुरुडकर यांचे अध्यक्षतेखालीं कासार लोकांची सभा भरली त्यावेळी कासार समाजाचा पूर्व इतिहास सांगतेवेळीं आम्ही पूर्वी जैन होतो, तोच धर्म आमचा असावा वगैरे वाटाघाट झाली.

हल्लीच्या कालमानास अनुसरून पुनर्विवाह सुरू आहे. निराश्रित विधवा व मुलांची तरतुद जातीनें कांही केली नाहीं.

गु ज रा थ- गुजराथेंत तांबट लोक मुख्यत: मोठ्या शहरांतून दिसतात. सिधपुरांत तांबट नाहींत. सिधपुरांत तांबें वितळत नाहीं अशी म्हण आहे. अशी एक गोष्ट सांगतात कीं, पावागडास पांच बंधू राहत असत; ते कालिका मातेचे भक्त असत व ते तिची झांजा वाजवून पूजा करीत. देवी त्यांच्यांवर इतकी प्रसन्न झाली कीं “तुम्हीं धातू वाजवून किंवा टोकून पोट भराल’’ असा तिनें त्यांस वर दिला. पितळ ठोकण्यापासून पितळेंचीं, तांब्याचीं व कासें या धातूंची भाडीं तयार करण्यापर्यंत यांची प्रगति झाली आहे. बगाय, बारमेय, भट्टी, इत्यादि ६ आडनावें त्यांच्यांत आहेत. भट्टी, गोहेळ व परमार या आडनांवावरून त्यांच्यात रजपूत रक्ताचा अंश असावा असें दिसतें. कालिकामाता ही याची कुलदेवता होय. चाम्पानेरी, मारू, सिहोर व विसनगरा हे यांच्यांत ४ पोटभेद आहेत. विसनगरांशीं चाम्पानेरी तांबट रोटीबेटीव्यवहार करतात पण बाकींच्या वर्गांत रोटीबेटीव्यवहार होत नाहीं. मारू व मारवाडी लोक जानवें घालतात. दिसण्यांत, पोषाखांत व चेहेर्‍यांत कंसारा लोक वाणी व कुणबी यांच्याप्रमाणेंच आहेत. बायका देखण्या आहेत पण त्या पातिव्रत्याविषयीं फारशी दक्षता बाळगीत नाहींत असें गँझिटियकार विधान करितात.( मुं. गॅ ९ भा. १ ). कच्छमंधील कांहीं तांबट मासे व बकर्‍याचें मांस खातात व मद्यपानहि करतात. बाकीचे तांबट शाकाहारी आहेत. ज्या ज्या धातूचीं भांडीं हे घडवितात त्या त्या धातूवरून यांस नांव मिळतें; उदाहरणार्थ तांबाघड, पितळघड, व सोनार इत्यादि. हे लोक बहुतेक स्वत:च्याच घरीं कामें करतात व त्यांच्या बायकाहि चाती फिरवणें, झिलई देणें वगैरें कामांत त्यास मदत करतात. तांब्याचीं व पितळेचीं निरनिराळ्या आकाराचीं भांडीं ते घडवितात. काठेवाडांतील सिहोर येथील व उत्तर गुजराथेंतील कडी व वीसनगर येथील कंसारालोक आपल्या कामांत तरबेज असून नेहमीचीं भांडी करून शिवाय टांक दौती, पानसुपारीचे डबे, देवांच्या मूर्ती, दिवे, घंटा वगैरे वस्तूहि ते करतात. तांबटास भांड्याच्या वजनाप्रमाणें पैसे मिळतात. कल्हई लावणें मोडीचीं भांडीं विकत घेणें वगैरे कामाकरितां हे लोक शहरभर हिंडतात.

कंसार लोक शांत व समाधानी असून त्यांस गुडगुडी ओढण्याचा नाद आहे व गाण्याचीही आवड आहे. यांच्या बायका आश्विन शुल्कपक्षांत फेर धरून कांहीं गाणीं म्हणतात. या लोकांस समाजांत मान असून ते आपणांस ‘महाजन’ म्हणवून घेतात. ते धार्मिक असून रामानंदी, शैव, वल्लभाचार्य इत्यादि पंथाचे अनुयायी आहेत व सर्वजण कालिका मातेस अतिशय पूज्य समजतात. हिंदूंच्या देवतांत भजतात व त्यांच्या  देवळांतहि जातात. नेहमींचे उपासतापास, सणवार ते पाळतातच; त्यांचा मुख्य सण म्हणजे आश्विन शु. ९ मी या दिवशीं होम करून रात्रीं एका हातांत कण्हेरीच्या फुलांची माळ व दुसर्‍या हातांत मशाली घेऊन ते नाचतात व उड्या मारतात. एखाद्याच्या अंगांत देवी येते व तो तरवारीनें आपली जीभ कापीन असें भय घालतो. चेटुक, जारणमारण व शकुन यांवर त्यांचा फारसा विश्वास नाहीं. गाय, उंदीर, हत्ती, साप व चाष यांस ते पूज्य समजतात.

व र्‍हा ड- म ध्य प्रां त.- कांहीं जिल्ह्यांत यास तामेरा म्हणतात पण कांहीं जिल्ह्यांत तामेरा व कांसार यांच्या भिन्न जाती आहेत. सोनारांच्या खालोखाल यांचा येथें मान आहे.

रा. ब. सदाशिव जयराम देहाडराय यांनीं कासारांच्या उत्पत्तीची अशी कथा सांगितली आहे कीं, सहस्त्रार्जुनाचा मुलगा धर्मपाल हा यांचा पूर्वज होता. अर्जुन हा इक्ष्वाकूचा पणतू असून तो घोडी व नाग यांच्या संयोगापासून झाला होता म्हणून मराठी कासार स्वत:ला अहिहयवंशीय म्हणवितात. धर्मपालाची आई परशुरामकृत क्षत्रियवधाच्या वेळीं पळाली दुसरी एक अशी कथा आहे कीं, एका सोमवंशी राजानें चोरिली होती. त्याच्या चार बायकांच्या पुत्रांनीं सूड घेण्याकरितां तप करून बाण मागण्याच्या ऐवजी चुकून `वाण’ मागितलें. त्यामुळें हे धातुपात्रें विकूं लागले. कांहीं कासार धर्मपालास रतनपूरच्या हैहय रजपूतांचा पूर्वज समजतात. उत्तरहिंदुस्थानांत व संयुक्त प्रांतांत थटेरा लोक आपलें मूलस्थान दक्षिणेंतील रतनपूर गांव सांगतात. यावरून रतनपूर हें कांशाचीं भांडीं करण्याचें फार पुरातन काळचें स्थान असावें असें दिसतें. या लोकांत मराठी कासार देशकर, झाडे व अयोध्यावासी असे वर्ग आहेत. भरेवस वर्ग फार नीच समजला जातो. त्यांच्या व गोंडांच्या चालीरीतींत पुष्कळ साम्य आहे. यांच्यांत कांहीं स्वैर संबंधाच्या उत्पत्तीचे लोक आहेत. त्यांस टाकले, विदुर, लौंडी, बच्चे असें म्हणतात.

कांसारांत अहिहय लोकांचीं सर्व गोत्रे प्रचारांत आहेत. उत्तरेकडील जिल्ह्यांत यांचीं नावें राहण्याच्या गांवावरून पडली असून असगोत्रविवाहाचीच चाल तेथें रूढ आहे. यांच्यांत आते, मामे व मावसभावंडांचीं लग्ने निषिद्ध आहेत. यांच्यांत भवानी देवीची पूजा फार महत्त्वाची असते. ‘मंदो अमावास्या ( फाल्गुन वद्य ) हा फार महत्त्वाचा सण आहे. त्या दिवशीं प्रत्येक कासार ज्ञातिभोजनांत जेवावयास आलाच पाहिजे; न आला तर वर्षभर तो वाळीत पडतो या अमावस्येस ते दुकान बंद करून आपल्या सर्व हत्यारांची व यंत्रांची पूजा करतात.

मंडला व हट्टा येथें कांशाचीं भांडी अद्याप चांगलीं होतात.

सं यु क्त प्रां त.- या प्रांतमधील कांसार लोकांनां कासेरा असें म्हणतात. कासेरा जात संघटित दिसते. मिर्झापूरचे कासेरा लोक स्वत:स क्षत्रिय म्हणवितात. परशुरामानें क्षत्रिय- निर्दालन केलें तेव्हां हा धंदा स्वीकारणें आम्हांस प्रांप्त झालें असें तें सांगतात. कासेरांच्या सात पोट जाती आहेत. त्या पुर्विया, च्छावन, गोरखपुरी, टांक, तंजारा, भरिया व गोलार या होत. ब्रिजि, जैम्नापरा, जीनपुरी, कनौजीय, मणिपुरिया, असे कांहीं प्रांतिक भेदहि आहेत. अहीरबन्सी, छत्री, टाक, सोमबन्सी इत्यादि नांवें कांहीं रानटी टोळ्यांशीं त्यांचा सबंध दर्शवितात. कासेरा लोकांत असगोत्रविवाह रूढ आहे.

प्रतिष्ठित कासेरामध्यें बालविवाह रूढ असून साधारणपणें दहा किंवा बारा वर्षांच्या मुलींचीं लग्ने करितात. अविवाहित लोक किंवा विधवा व विधुर यांमध्यें व्यभिचार झाला तर तो उपेक्षणीय गणला जातो व गुन्हेगाराला बहिष्कृत न करितां दंड करण्यांत येतो. पहिली बायको वंध्या असेल तर जितक्या बायका संभाळता येतील तितक्या करण्याची यांच्यांत मुभा असते. ‘चर्‍हावा’ व डोला’  असें यांचें लग्नाचे दोन प्रकार असून  `डोला’ गरीबांकरितां असतो. `सगाई’ प्रकारानें विधवांनां लग्नें करिता येतात व नवरा मृत झाला तर त्याच्या धाकट्या भावाबरोबर किंवा अन्य पुरुषांशीं त्यांनां लग्न करितां येतें. अन्य जातीशीं व्यभिचार केला तर नवर्‍याला बायको सोडतां येते. पालन केलें नाहीं किंवा धर्मत्याग केला म्हणून बायकोहि नवरा सोडूं शकते. सोडचिठ्ठी दिलेल्या स्त्रियांनां त्याच जातींत पुन: लग्न करितां येत नाहीं.

साधारणपणें कासेरा लोक वैष्णव किंवा नानकपंथी आहेत. पांचोव्रन, पीर, दुर्गा अशा त्यांच्या देवता आहेत. तिवारी ब्राह्मण हे कासारांचे पुजारी असतात मृतांची व्यवस्था नेहमींच्या रीतीनें लाविली जाते. मृतांनां पिंड देण्याचीहि चाल कासेरांमध्यें आहे.

या लोकांच्या धंद्यासंबंधीं बराच मतभेद आढळून येतो. जस्त, तांबें व कथील असल्या मृदु धातुंचें मिश्रण करून पेले, वाट्या व ताटें तयार करणें हा कासेरांचा मुख्य धंदा असून त्यांनीं तयार केलेल्या भांड्यांवर नक्षी करणें व झिलई देणें या कला थाथेरा लोकांच्या आहेत असा नेस्फील्डचा अभिप्राय आहे. ( ब्रीफ रिव्ह्यू. २९ ). होई म्हणतो कीं, कानपुरास पितळेचीं भांडीं करणार्‍यांनां थाथेरा, कासेरा किंवा भरिया अशीं नांवें आहेत ( मोनोग्राफ १९८ ). मिर्झापुरास पितळ किंवा मिश्र धातूंची भांडीं करणार्‍यांनां कासेरा म्हणतात. लखनौचा धालिया किंवा धालनेवाला हा कासेरांप्रमाणेंच एक कारागीर आहे व त्याचा धंदा म्हणजे जस्ताचे दागिने करणें हा असतो. क्षत्रियांप्रमाणें आपणहि पूर्वीं जमिनदार होतो असा हे लोक बहाणा करितात. सर्व कासेरा लोक जानवें घालतात. मासें, मेंढ्या व बकरी यांचें मांस हे खातात पण दारू पीत नाहींत. अहीर, बारी, नाइ, कायस्थ व कलवार खेरीज करून ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य यांनीं शिजविलेली ‘पक्की रसोई’ ते खातात.

[ क्रूक. एन्थावेन, रिस्ले आणि हिरालाल, सेन्ससरिपोर्ट, मुं. गॅ. त्वष्टा कासार ज्ञाती संस्थान ( मुंबई )चे रिपोर्ट, त्वष्टासेवक मासिक, कासार मासिक ( वेळापुरे ) ].

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .