विभाग अकरावा : काव्य - खतें
कासिया- संयुक्त प्रांतांतील गोरखपूर जिल्ह्याचा पोटविभाग; यांत पद्रौना तहसिलीचा अंतर्भाव होतो. पोटविभागाचें मुख्य ठिकाण काशिया हें देवरिया-पद्रौना व गोरखपूर- पिराघाट रस्त्यावर रामभार सरोवरापासून जवळ आहे. येथून थोड्या अंतरावर बिशनपूर येथें महत्त्वाचे जुने अवशेष आहेत. गौतमबुद्ध ज्या ठिकाणीं मरण पावला त्या कुरुनगराचेच हे अवशेष असावेत असा पुष्कळ दिवस समज होता; परंतु चिनी प्रवाशांनीं कुरुनगराच्या इमारतीचें दिलेलें वर्णन अवशेषांतील इमारतींशीं मुळींच जुळत नाहीं.