विभाग अकरावा : काव्य - खतें
कासेगावं.- मुंबई इलाख्यापैकीं, सातारा जिल्ह्याच्या वाळवें तालुक्यांतील खेडें. हें सातारा-कोल्हापूर रस्त्याजवळ कर्हाडच्या दक्षिणेस ११ मैलांवर व पेठेच्या उत्तरेस ४ मैलावर आहे. येथील लो. सं. ( १९०१ ) ५४८२. आहे. तालुक्यांतील भरभराटीच्या गांवांपैकीं हें एक आहे. येथील व्यापारी सधन असून ते कोंकण प्रांताशीं तंबाखू, मिरची व ऊंस या जिनसांचा व्यापार करितात. येथील रहिवाशी भांडखोरपणाबद्दल व गुन्हे करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत.