विभाग अकरावा : काव्य - खतें
काळा चौतरा- याचें नांव काळा चबुत्रा, काळा चौत्रा असेंहि आहे. औरंगाबाद शहराबाहेर जवळच हें ठिकाण आहे. औरंगाबादेहून फौज बाहेर निघावयाची म्हणजे पहिला मुक्काम ( डेरेदाखल ) या ठिकाणीं होत असे. पुण्यास डेरेदाखल होण्याची जागा जशी गारपीर तशी ही असे. [ राजवाडे. खंड १; खरे. ऐ. ले. सं. ].