विभाग अकरावा : काव्य - खतें
किंग्स्टन- किंग्स्टन हें जमेकाची राजधानी व मुख्य बंदर आहे. याची लोकसंख्या १९११ मध्यें ५७,३७९ होती. हें शहर सर प्रांतांच्या आग्नेय किनार्यावर आहे. शहरांत मुख्य मुख्य सरकारी इमारती आहेत. जमेका ज्ञानवर्धक मंडळाचें एक सार्वजनिक ग्रंथसंग्रहालय, पदार्थसंग्रहालय व कलाकौशल्यमंदिर ( आर्ट गॅलरी ) अशा संस्था आहेत. येथील हवा रुक्ष व निरोगी आहे. भूकंपानें पोर्ट रॉयलचा नाश झाल्यामुळें इ. स. १६९३ मध्यें किंग्स्टन शहर वसविण्यांत आलें. १७०३ व १८०२ सालांत हें अनुक्रमें व्यापारी व राजधानीचें शहर झालें. आगीमुळें ह्या शहराची पुष्कळदां राखरांगोळी झाली. इ. स. १९०७ मध्यें भूकंपाचे भयंकर धक्के या शहरास बसले होते.