प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें   

कित्तुर- मुंबई इलाखा. बेळगांव जिल्हा. उ. अ. १५  ३५' व पू. रे. ७४  ५१’. संपगांवच्या दक्षिणेस सुमारें ७ कोसांवर हें एक जुनाट गांव आहे. येथें दर सोमवारीं आणि गुरुवारीं बाजार भरतो. बाजारांत गुरेंहि विकावयास येतात. येथें विणकामाचे व कांचेच्या बांगड्या तयार करण्याचे धंदे चालतात. येथें बसवाचें देऊळ असून त्यांत इ.स. ११८८ सालचा गोव्याचा राजा जयकेशी तिसरा याच्या वेळचा एक शिलालेख आहे. या शिलालेखांत कित्तूरच्या एका देवस्थान जमीनीच्या भांडणाचा निकाल ( दिव्य करून केलेला ) खोदला आहे. येथील लोकसंख्या सरासरी ६ हजार आहे;  शाळा पोष्ट वगैरे येथें आहे.

येथील किल्ला हल्लीं पडका आहे. तथापि एके काळीं तो फार महत्त्वाचा होता. एकांत एक असे दोन किल्ले आहेत. बाहेरच्या किल्ल्याचा घेर बेळगांवच्या किल्ल्याच्या घेराचा एक षष्टांश आहे. त्याबाहेर दोन खंदक आहेत. बालेकिल्ला बेळगांव किल्ल्याच्या एक दशांश घेराचा असून फार लहान आहे. तट दगड व मातीचा आहे. इंग्रजांनीं कित्तुर खालसा केल्यानंतर या किल्ल्याची दुर्दशा झाली. आंतील सार्‍या इमारती पडून गेल्या आहेत. पैकीं तेल्याचें देऊळ साधारण उभें आहे. देवळाच्या सज्यांत अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यांतच कित्तूरचा देसाई, त्याच्या दोन बायका व एक दिवाण यांच्या मूर्ती आहेत. कित्तूर यास गिजगण हक्की ( कोष्टीगांव ) असेंहि एक नांव आहे. देसायांचा वाडा फार उत्कृष्ट होता. त्याचा द्वारमंडप १०० फूट लांब व ३० फूट रुंद असून सागवानी सुंदर खांबाचा होता. वाड्याचें छत कोंरींव कामाचें होतें.
 
वर उल्लेखिलेल्या शिलालेखांत कित्तूर या गांवांचा उल्लेख प्रथम आलेला आढळतो. इ. स. १५३४ सालीं कित्तूर गांव बेळगांवच्या असदखानाचा नौकर युसफखान नांवाच्या तुर्क सरदाराला जहागीर होता. सोळाव्या शतकाच्या अखेरीस विजापूरकरांच्या सैन्याबरोबर हिरेप्पा आणि चिकाप्पा नांवाचे दोन लिंगाईत मल्ल आडनांवाचे भाऊ सावकारी करण्याकरतां या भागांत येऊन संपगांवास राहिले. कित्तुरकर देसायांचें हेच मूळ पुरुष होत. या दोघा भावांपैकीं हिरेप्पानें रणांगणावर मोठें शौर्य दाखविल्यावरून त्यास हुबळी परगण्याची सरदेशमुखी व समशेर-जंग-बहादुर हा किताब मिळाला. या कुळांतील पांचवा देसाई कित्तूर येथें स्थायिक झाला. संपगांव व बिडी हीं दोन ठाणींहि त्यांच्याच ताब्यांत होतीं. सतराव्या शतकाच्या अखेरीस सार्‍या कर्नाटकांत कित्तूरकर मुडी मल्लप्पा देसाई हाच प्रख्यात देसाई होता.

सावनूरचा नबाब रौफ खान यानें कित्तुरच्या देसायांशीं जे करारमदार केले त्यावेळीं हाच मुडी मल्लप्पा देसाई होता. इ. स. १७४६ सालीं सावनूरच्या नबाबास इतर मुलुखाबरोबर कित्तुर मराठ्यांच्या स्वाधीन करावें लागलें. इ.स. १७७८ सालीं हैदरानें खंडणी व इतर नजराणा देण्याच्या कबुलीवर हा मुलूख कित्तुरकरांकडे ठेवण्याचें कबूल केलें. इ. स. १७५६ सालापासून परसगड, संपगांव व बिडि हे परगणे कित्तुरकर देसायांकडे चालत आले होते. इ. स. १७७८ सालीं त्यांनीं गोकाक ताब्यांत घेतलें. परंतु इ.स. १७७९ सालीं परशुरामभाऊंनीं गोकाक सर केलें व देसायांस कैद केलें. इ. स. १७८५ सालीं टिपूनें कित्तुर, नरगुंद, रामदुर्ग वगैरे काबीज करून कित्तुर येथें आपली एक सैन्याची तुकडी ठेवली होती. पुढें टिपूचा नाश करण्याकरतां मराठे व निजाम हे एकत्र झाले असतां त्यांनीं कित्तुर येथें टिपूच्या बुर्‍हाणुद्दीन नांवाच्या सरदारावर गणेशपंत बेहेरे व तुकोजी होळकर यांच्या हाताखालीं २५ हजार सैन्य देऊन पाठविलें. त्यांनीं सार्‍या प्रांतांतून टिपूच्या सैन्यास हांकलून दिलें. तथापि कांहीं काळ कित्तूरचा किल्ला टिपूच्या ताब्यांत होता. पुढें इ. स. १७८७ सालीं टिपूस कित्तुर व इतर प्रदेश मराठ्यांच्या हवालीं करावा लागला.

तीन वर्षें ( इ. स. १७८५-१७८७ ) कित्तुर टिपूच्या ताब्यांत होतें. त्यावेळीं तेथील देसायांच्या जहागिरीचा सर्व कारभार टिपूचा सेनापति बद्र-उल्-झमान हा पहात असे. देसायांस फक्त कांहीं रक्कम तनख्यादाखल खर्चास मिळे. इ. स. १७९२ सालीं झालेल्या श्रीरंगपट्टणच्या तहान्वयें पूर्वीं टिपूच्या राज्यांत मोडणार्‍या कित्तूरच्या देसायांचा हा प्रदेश पुन्हां मराठ्यांकडे आला. तो पुढें दरबारनें परशुरामभाऊ यांनां सरंजामांत लावून दिला. भाऊनीं कित्तुरास आपला एक मामलेदार ठेवून तें ठाणें धारवाड सुभ्यांत दाखल करून तेथील देसायांस बेगमीस नेमणूक करून दिली. या देसायांनीं मराठ्यांनां अतोनात त्रास दिला होता. मरांठ्यांचे शत्रू जे हैदर व टिपु त्यांनां हें मराठ्यांच्या विरुद्ध नेहमीं मिळत व मराठ्यांच्या मुलुखांत आवडाव करीत असत म्हणून वरील योजना दरबारनें केली. इ. स. १८०० सालीं धोंड्या वाघानें मराठ्यांचे सेनापति धोंडोपंत गोखले यांच्या पिछाडीवर कित्तुरजवळ आकस्मिक छापा घातला व धोंडोपंतास ठार मारलें. याच धोंडोपंतांनीं इ. स. १७९१ सालीं धोंड्या वाघास पराजित केलें होतें. कित्तुर परगणा धोंड्या वाघाच्या ताब्यांत बरेच महिने होता. इ. स. १८०२ सालीं कित्तुरकर मल्लसरजच्या ( १७८२-१८१६ ) देसायांच्या ताब्यांत कित्तूर सभोंवतालचा सालीना चार लाख रुपये उत्पन्नाचा मुलूख असून तो सालीना पेशव्यांस ६० हजार रुपये खंडणी देत असे. याच वर्षी जनरल वेलस्ली श्रीरंपट्टणाहून पुण्यास बाजीराव पेशव्यांच्या मदतीस जात असतां या देसायांनीं त्यास मदत केली होती. त्यामुळें त्यांचा सरंजाम कायम राहिला. इ. स. १८०९ सालीं या देसायांस पेशव्यांनीं पुण्यास बोलविलें होतें.

त्यावेळीं झालेल्या ठरावांन्वयें त्याची जहागीर त्याच्याकडे रहावी असें ठरलें व त्यास `प्रतापराव’ हा किताब देण्यांत आला. याजबद्दल देसायांनीं पेशव्यांनां सालीना एक लाख, पांच हजार रुपये खंडणी द्यावी असें ठरलें. प्रतापराव किताब मिळाला याच्या स्मरणार्थ देसायांनीं नंदगडाजवळ प्रतापगड नांवाचा एक किल्ला बांधला.

इ. स. १८१७ व १८१८ सालीं झालेल्या धामधुमींत कित्तुरकर देसायांनीं आपले यजमान जे पेशवे त्यांच्या विरुद्ध इंग्लिशांस मदत केली. बेळगांवच्या लढाईंत त्यानीं इंग्रजांनां लढाऊ सामान देऊन बरीच मदत केली. इ. स. १८२४ सालीं ह्यात असलेला देसाई निपुत्रिक मरण पावला, त्यावेळीं दत्तकाला जहागिरीची मालकी मिळावी असा प्रजेनें प्रयत्‍न केला. परंतु धारवाडच्या कलेक्टरच्या सांगीवरून इंग्रज सरकारनें दत्तकास मानलें नाहीं. कलेक्टरच्या मनांत सर्व जहागीर जप्त करून दत्तकाची चौकशी चालवावी असें होतें. त्याच्या या म्हणण्याचा विचार सरकारांत चालूं असतांच कित्तूरच्या प्रजेनें २३ ऑक्टोबर १८२४ रोजीं बंड केलें व कलेक्टर थ्याकरे यास कैद केलें. परंतु इंग्रजांनीं वेढा घालून कांहीं दिवसांनीं किल्ला घेतला व कित्तूर संस्थान खालसा केलें. यावेळीं इंग्रजांनीं किल्ल्यांत जी लूट केली तींत १६ लक्ष रुपये रोख व ४ लक्षांचें जवाहीर, पुष्कळ घोडे, एक हजार उंट, कित्येक हत्ती, ३६ तोफा, पुष्कळ बंदुका, तरवारी व दारू गोळा वगैरे बराचसा माल होता.

इ. स १८२९ सालीं सांगोलीच्या रायाप्पा पाटलानें देसायांच्या दत्तक मुलास पुढें करून पुन्हां बंड उभारलें परंतु लवकरच त्याचाहि मोड करण्यांत आला. पहिल्या बंडांत रायाप्पा सामील होता. त्यासाठीं त्याच्या इनाम जमीनी इंग्रजांनीं जप्त केल्या होत्या; हें बंडाचें कारण होतें. रायाप्पाच्या सोबत्यांनींच फितूर होऊन त्याला इंग्रजांच्या स्वाधीन केलें. [ ज. बाँ. ब्रँ. रॉ. ए. सो. पु. ९; बाँ. गव्ह. सिले. पु. १२; विल्क्स-साऊथ इंडि. पु. २; स्टोक्स-बेळगांव; डफ हिस्टरी मराठा; खरे-ऐति. ले. सं. बेळगांव ग्याझि. ]

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .