विभाग अकरावा : काव्य - खतें
किंपुरुषवर्ष.- जंबुद्धीपाच्या नऊवर्षसंज्ञक भागांतील एक भाग. याच्या चतु:सीमा, उत्तरेस हेमकूट पर्वत दक्षिणेस हिमालय आणि पूर्व पश्र्चिम दिशांकडे क्षारसमुद्र, याप्रमाणें आहेत. यास हैमवतवर्ष असें नामांतर असून, येथें किन्नरांची वस्ती असे. आग्नीध्रपुत्र किंपुरुष येथील अधिपति होता. ( भार. भीष्म अ. ६ ).