प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें  
 
किर्लोस्कर, बळवंत पांडुरंग उर्फ अण्णासाहेब- यांचा जन्म सन १८४३ त मार्चच्या  ३१ तारखेस धारवाड जिल्ह्यांतील गुर्लासूर येथें झाला. लहापणींच हे हनुमानजयंतीसारख्या उत्सवाच्या वेळीं खेळगडी जमवून नाटकें करीत. आण्णाचें बारा वर्षांपर्यंतचें शिक्षण मराठी व कानडी भाषेंतून घरींच करून घेण्यांत आलें होतें. त्यानंतर इंग्रजी दोन इयत्ता कोल्हापुरास पूर्ण झाल्या. चौदाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला व पुढील अभ्यास त्यांनीं धारवाडास केला व तेथें मुलकी परीक्षा दिली.

कविता करण्याचा नाद त्यांनां लहानपणापासून जडला. अण्णांचे वडील उत्तम संस्कृतज्ञ असल्यानें अण्णांनीं त्यांजवळ संस्कृत रघुवंश व शाकुंतल वाचलें होतें. हरिदासांस कथेला उपयोगी अशीं पदें ते करून देत.

इ. स. १८६३ मध्यें त्यांच्या आजोबांनीं त्यांनां पुण्यास विद्याभ्यासास पाठविलें. पुण्यास अण्णा विश्रामबागेंतील शाळेंत जात असत. पण या वेळीं त्यांनां स्वच्छंदानें राहण्याची संवय होऊन ते नाटकें पाहूं लागले व नाटकमंडळ्यांनां पदें करून देऊं लागले;  अशा पदांपैकी “समुद्रमंथन” “विक्रमचरित्र” हीं पदें आहेत. अभ्यास सोडून व घरच्या मंडळींनां थापा देऊन त्यांनीं पुण्यास आपली एक नाटककंपनी उभारण्याचा उद्योग चालविला व त्याप्रीत्यर्थ जवळचे दागिने विकून व कर्ज काढून कांहीं पैसा उभा केला. त्यांच्या मंडळींत कांहीं मोठीं घरंदाज चांगलीं मुलें होतीं. तेव्हां पहिला प्रयोग पुण्यास न करतां नगरास करण्याचें ठरवून त्याप्रमाणें तेथें “विक्रमचरित्र” “बाजीराव याचा फार्स” वगैरे खेळ केले. त्यांच्या कंपनीचें नांव “भरतशास्त्रोत्तेजक” असें होतें. पुढें सारी मंडळी फुटली व अण्णांनांहि घरच्या माणसांच्या दपटशा आला, तेव्हां ते गुर्लासुरास परत गेले. ही गोष्ट १८६६ सालीं म्हणजे त्यांच्या २३ व्या वर्षी घडली.

घरीं बसल्या बसल्या त्यांनीं “शिवाजी” वर ५०० आर्या रचून त्या “दक्षिणाप्राइज कमीटी” कडे परीक्षणार्थ पाठवून दिल्या. कमीटीचा त्यांवर उत्तम अभिप्राय मात्र मिळाला; बक्षिस लाभलें नाहीं.

यापुढें अण्णा धारवाडास वकीलीच्या अभ्यासाकरितां राहिले;  पण तीहि परिक्षा हुकली. तेव्हां बेळगांवास एका इंग्रजी शाळेंत शिक्षकाची जागा त्यांनीं पत्करली. पण त्यांच्या नाटकी व्यवसायामुळें तें काम त्यांच्या हातून योग्य प्रकारें पार पडेना. तथापि आठ वर्षें त्यांनीं बेळगांवास काढलीं. त्या अवधींत त्यांनीं नाट्याभ्यासांत बरीच प्रगति केली. १८७३ सालीं त्यांनीं “श्री शांकरदिग्विजय” नांवाचें शंकराचार्यांवर एक गद्य नाटक लिहिलें.

शाळेच्या नोकरीला कंटाळून, त्यांनीं पोलीसखात्यांत जमादारीचा नोकरी धरली, पण लवकरच तीहि सोडून रेव्हेन्यू कमिशनरच्या ऑफिसांत ते गेले. या ऑफिसांत असतां १८८० मध्यें तें फिरतीबरोबर पुण्यास आले व तेथें त्यांनां पारशी कंपनीचें उर्दू नाटक पहाण्यास मिळालें. त्यांतील ऑपेरापद्धतीचें नृत्य, गायन, अभिनय, देखावे वगैरे पाहून आपल्या भाषेंत असेंच एक नाटक वठवावें असें त्यांच्या मनानें घेतलें व त्याप्रमाणें त्यांनीं शाकुंतलाचें मराठी भाषांतर करण्यास सुरुवात केली. याच सुमारास पुढें प्रसिद्धीस आलेली मोरोबा वाघोलीकर, बाळकोबा नाटेकर, नाना शेवडे यांसारखी मंडळी त्यांनीं आपल्यांत ओढली व शांकुतल नाटकाची चार अंकी रंगीत तालिम १३ आक्टोबर १८८० या मुहूर्तावर केली. लवकरच हा प्रयोग नाटकगृहांत झाला व उत्पन्नहि चांगलें आलें. सुरुवातीला यश आलेलें पाहून आण्णांनीं सर्व शाकुंतलाचें पूर्ण भाषांतर करून संपूर्ण नाटकाची तालीम करून दाखविली.

ऑफीसच्या दौर्‍यावर ज्या वेळीं ते पुण्यास येत त्या वेळीं तेथें या नाटकाचे जाहीर प्रयोग होत. पुढें त्यांनीं केवळ नाटकाकरितांच म्हणून सहा महिन्यांची रजा घेतली, व “संगीत सौभद्र” हें नाटक बसविलें. अण्णांची कंपनी इंदूर, देवास वगैरे ठिकाणीं फिरली. होळकर सरकारनें तिला चांगला आश्रय दिला. त्यांनीं पुन्हा लेखणी हातांत धरून “रामराज्यवियोग” हें नाटक रंगविण्यास सुरुवात केली (१८८४). पण दुर्दैवानें हें सर्वोत्कृष्ट नाटक त्यांनां पुरें करतां आलें नाहीं.

रेव्हेन्यू कमिशनरच्या ऑफिसांतून आपली बदली करून घेऊन ते इंदूर सरकारचे कायम नोकर बनले; पण तेथें फार दिवस नोकरी करण्याचें त्यांच्या कपाळीं नव्हतें. आपल्या कंपनीला सुस्थिति आणून देण्याच्या कामांत त्यांनां बरेच श्रम पडून ते आजारी झाले. तेव्हां विश्रांतीकरितां मंडळींनां रजा देऊन व आपणहि रजा घेऊन ते गुर्लासुराला परत गेले. तेथें त्यांची प्रकृति अधिकच क्षीण होत जाऊन ता. २ नोव्हेंबर १८८५ रोजीं त्यांचा अंत झाला.

अण्णांचा स्वभाव दिलदार व मनमिळाऊ असे. ते फारच थट्टेखोर असत असें म्हणतात. त्यांनां पाठीमागें बायकोशिवाय कोणी नव्हतें. ती नुकतीच (१९२१) मृत्यु पावली. [मासिक मनोरंजन सप्टेंबर १९२२; मराठी रंगभूमि].

या चरित्रनायकाची महती कोणती असा प्रश्न विचारणारा महाराष्ट्रीय आज आढळणार नाहीं. अण्णांची महाराष्ट्र नाट्यसृष्टींतील कृति पुढें आहेच. महाराष्रनाट्याला मोहक व उच्च स्वरूप देणार्‍यांत अण्णांचा दर्जा नि:संशय फार वरचा लागेल. वत्सलाहरण, सुरतसुधन्वा, वगैरेंसारखीं लळितस्वरूपी नाटकें १८८० च्या पूर्वीं होत; त्यात मधुर गायन, अभिनय, शृंगार यांचा पूर्ण अभाव असून रंगभूमीवर दोनतीन तास धांगडधिंगा घालण्यापलीकडे व असंस्कृत मनाची निकृष्ट प्रकारची करमणूक करण्यापेक्षां त्यांचा जास्त उपयोग नसे. कला या दृष्टीनें पाहता तीं गचाळ म्हणून टाकावी लागतील यांत शंका नाहीं. तेव्हां महाराष्ट्रनाट्यसुंदरीला गांवढळपणा सोडावयाला लावून अण्णांनीं तिला उत्तम प्रकारें नटविली. त्याचें पहिलें शाकुंतल नाटक भाषांतरित असलें तरी भाषा, पदें व अभिनय यांनीं त्या वेळच्या प्रेक्षकवर्गास इतकें मोहित केलें कीं, नाटकगृहांकडे झुंडीच्याझुंडी वळूं लागल्या. “सौभद्र”  नाटक स्वतंत्र असून त्या दृष्टीनें पहातां त्याचा दर्जा फार वर लागेल. त्यांतील पद्यें इतकीं लोकप्रिय झालीं कीं ज्याच्या त्याच्या तोंडीं, किंबहुना कथेंतूनहि तीं ऐकूं येऊं लागलीं. भाऊराव, मोरोबा, नाटेकर यांच्यासारखीं एकावर एक चढ पात्रें रंगभूमीवर आलीं. शिवाय ‘नच सुंदरि करूं कोपा’ यांसारखीं कानडी चालीवर रचलेली पदें तर प्रेक्षकांचीं अंत:करणें थरारून सोडीत. अण्णांचें तिसरें नाटक “संगीत रामराज्यवियोग अंक ३” हें होय. हेंहि सौभद्राप्रमाणेंच स्वतंत्र पौराणिक नाटक असून त्यांतील अभिनय करावयास फार कठिण आहे. मंथरेचा नट कै. भाऊरावासारखा असल्यावाचून नाटकाला रंग चढणार नाहीं असें भाउरावाचें उर्फ भावड्याचें काम पाहिलेल्या नाट्यप्रेमीचें मत आहे. हें नाटक अपूर्ण आहे. अण्णा आपल्या मंडळींत नटाचें कामहि करीत. शाकुंतलमधील त्यांचें शार्डगरवाचें काम इतकें प्रेक्षणीय असें कीं, डॉ. किलहॉर्न साहेब सुद्धां एक वेळीं तें पाहून खुष झाले होते. एकदां शकुंतलेस (भावड्यास) “भीता वेपते” करण्यासाठीं शार्ङरवानें (अण्णांनीं) रंगभूमीवरच काठी मारली होती. बहुधां अण्णा मुख्य पार्ट्याचीं कामें स्वत:कडे घेत नसत. अण्णांनीं नाटककंपनीची रहाणी भिकार न ठेवतां एखाद्या संस्थानाप्रमाणें तिला खर्च चालविला. तीच पद्धत हल्लीं मोठमोठ्या कंपनींतून दृष्टीस पडते. याप्रमाणें अण्णा किर्लोस्कर म्हणजे आधुनिक महाराष्ट्रीय नाट्याचें जनक म्हणतां येतील. अण्णा किर्लोस्करांचें एक सुंदर चरित्र रा. मुजुमदारानीं लिहिलें आहे. अण्णांची किर्लोस्कर कंपनी १९१३ सालापर्यंत विशेषत: रा. राजहंस (बालगंधर्व) यांच्या अस्तित्वामुळें महाराष्ट्रांत पहिल्या दर्जाची नाटककंपनी म्हणून चालली होती. रा. मुजुमदार यांकडे त्याचें बरेंच श्रेय येतें. पण पुढें कंपनी फुटून तिच्या अनेक शाखा झाल्या. तरी रा. मुजुमदारांनी अद्यापि मूळ किर्लोस्कर कंपनी चालविली आहे. पुणें येथील किर्लोस्कर थीएटर हें अण्णांचें स्मारकच आहे.

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .