विभाग अकरावा : काव्य - खतें
किल सोभ सिंघ- पंजाबमधील सियालकोट जिल्ह्याच्या पश्रूर तहशिलींतील एक शहर. हें शहर डेंघ नदीच्या तीरावर वसलेलें आहे. १८ व्या शतकांत भाग सिंघ अहलवालिया या शीख सरदारानें हें गाव वसविलें; व या ठिकाणीं किल्ला बांधून त्याला सौभसिंघ या आपल्या मुलांचें नांव दिलें. या गांवाची लोकसंख्या १९०१ मध्यें ३३३८ होती. या गांवांत काश्मीरी विणकर्यांची बरीच वस्ती असून ते पश्मीशाली विणतात. पांढर्या धातूंचीं भांडींहि येथें चांगलीं तयार होत असत. पण हल्लीं हा धंदा व शाली विणण्याचा धंदा हे दोन्हीहि डबघाईस आलेले आहेत. १८६७ मध्यें या गांवाला म्युनिसिपालिटी देण्यांत आली. म्युनिसिपालिटीचें उत्पन्न १९०३ -४ सालांत ४४०० रुपये होतें व खर्च ३७०० रुपये होता. येथील जिल्हाबोर्डातर्फे एक व्हर्नाक्युलर मिडल स्कूल स्थापन झालेलें आहे.