प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें  
 
किशनगड सं स्था न.- राजपुतान्याच्या मध्यभागांतील एक संस्थान. या संस्थानचें क्षेत्रफळ ८६८ चौरस मैल आहे. या संस्थानच्या मर्यादा:- उत्तरेस व वायव्येस जोधपूरचें संस्थान; पूर्वेस जयपूरचें संस्थान; पश्चिमेस व आग्नेयीस ब्रिटिशांच्या ताब्यांत असलेला अजमीरचा मुलुख व दक्षिण टोंकाला शहापुरा जहागिरी. या संस्थानचे नैसर्गिक रीतीनेंच दोन भाग पडलेले आहेत. यांपैकीं उत्तरेचा भाग हा दक्षिण भागापेक्षां मोठा असून तो बहुतेक वालुकामयच आहे. या वालुकामय प्रदेशांतून अरवली पर्वताच्या तीन रांगा एकमेकांस समांतर रेषांत, नैर्ऋत्येकडून ईशान्येकडे पसरलेल्या आहेत. या रांगांचीं पुष्कळ शिखरें असून त्यांपैकीं सर्वांत मोठें शिखर २०४५ फूट उंच आहे. दक्षिणेकडील भाग सपाट असून सुपीक आहे. या संस्थानांत तीन नद्या असून पुष्कळ ओढे आहेत. रूपनगर ही नदी ईशान्य दिशेनें वहात जाऊन सांबर सरोवराला मिळते. माशी नदी व दैन नदी या पूर्वगामी होऊन बनास नदीला मिळतात.

भू स्त र.- या पर्वतांच्या रांगांमध्यें व दर्‍यांमध्यें स्फटिकांचे रंगीबेरंगी दगड सांपडतात. आग्नेय व दक्षिणेकडील सपाट प्रदेशांत जंबूर दगड आढळून येतात. सरवारजवळ अभ्रकाचे दगड विपुल सांपडतात व तसेच मोठमोठ्या सुंदर व रंगीत जातीचे चुनखडीचे दगड आढळतात. किशनगडच्या राजधानीनजीक निरनिराळ्या प्रकारचे सोडालाइटचे दगड सांपडतात. हे अंधारात काहीं दिवस ठेवल्यास गुलाबी रंगांचे बनतात. पण त्यांना सूर्यप्रकाश दाखवितांच ते पुन्हां रंगविहीन होतात. दक्षिणेंतील मैदानवजा भागांत वज्रतुंड दगडांची विपुलता आहे.

प्रा णी.- या संस्थानांत काळवीट, हरीण, रानडुकरें व नीलगाई हे प्राणी विशेष आढळून येतात. यांशिवाय डोंगरांत चित्ते, तरस व लांडगे हेहि पुष्कल आहेत.

ह वा मा न.- येथील हवा कोरडी व निरोगी आहे. पण आक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत मात्र हिंवतापाची सांथ पसरविणारी हवा असते. उत्तरेकडील भागांत पावसाचें प्रमाण फार कमी आहे. दक्षिण भागांत मात्र पाऊस बरा पडतो. पावसाचें सरासरी प्रमाण २०।२१ इंच इतकें आहे.

संस्थानामधील शहरें व खेडीं यांची संख्या एकंदर २२१ आहे. १९०१ मध्यें संस्थानची लोकसंख्या ९०,९७० होती. पण १८९१ मध्यें १,२५,५१६ इतकी होती. म्हणजे १० वर्षांमध्यें शेंकडा २७ या प्रमाणांत लोकसंख्येचें मान उतरलें. याचें मुख्य कारण म्हणजे १९०० या सालांत येथें भयंकर दुष्काळ पडल्यामुळें येथील पुष्कळ लोक परस्थळीं निघून गेले व याच वर्षी तापाची सांथहि जोरांत सुरू झाल्यानें पुष्कळ माणसें दगावलीं हें होय. १९११ त ८७,१९१ आणि १९२१ त ७७,७३४ याप्रमाणें पुढील दोन दशकांतहि झपाट्यानें वस्ती कमी झाली. संस्थानच्या उत्तर भागाचे अरैन, बांदर शिंद्री, किशनगड व रूपनगर असे चार जिल्हे असून दक्षिण भागांत सरवार हा एकच जिल्हा आहे. या संस्थानांत किशनगड, रूपनगर व सरवार हीं तीन शहरें असून तिन्ही शहरांनां म्युनिसिपालिट्या आहेत.

१९११ च्या खानेसुमारींत जी लोकसंख्या भरली तींत ७६,६४२ हिंदू, ७६८५ मुसुलमान व ३१७६ जैन अशी वर्गवारी झाली. हिंदूधर्मीयांमध्यें वैष्णवपंथी लोकांचाच भरणा अधिक आहे. प्रसिद्ध निंबार्क संप्रदायाचा मुख्य गुरू हा रूपनगर जिल्ह्यांमधील सलीमाबाद या गावीं राहतो. संस्थानांत ढुंढारी हीच भाषा मुख्यत: प्रचलित आहे. पण उत्तरेकडील भागांत पुष्कळ लोक मारवाडी भाषा बोलणारेहि आढळतात.

येथें हिंदूंच्या पुष्कळ जाती असून त्यांपैकीं जाट, महाजन, ब्राह्मण, गुजर व रजपूत या जाती प्रमुख होत. या संस्थानच्या राजधानींत ‘दि युनायटेड फ्री चर्च ऑफ स्कॉटलंड मिशन’ याची एक लहानशी शाखा असून, शिवाय रूपनगर येथें ‘दि अमेरिकन मेथाडिस्ट चर्च’ या मिशनचा एक नेटिव्ह धर्मगुरूं रहातो.

संस्थानांतील मुख्य धंदा शेतकी हा आहे. संस्थानांतील शेंकडा ४५ लोक केवळ शेतीवर उदरनिर्वाह करणारे आहेत. संस्थानच्या निरनिराळ्या भागांत निरनिराळी शेतकीची स्थिति नजरेस येते. उत्तरेकडे म्हणजे ज्या ठिकाणी पर्जन्याचें मान कमी आहे व जर्मनहि विशेष सुपीक नाहीं त्या ठिकाणीं वर्षांत खरीपाचें तेवढें एकच पीक काढण्यांत येतें. या खरीपाच्या हंगामांत ज्वारी, बाजरी, मूग, इत्यादि धान्यांचें उत्पन्न होतें. संस्थानच्या मध्यभागांत पर्जन्य उत्तरभागापेक्षां अधिक पडत असल्याकारणानें या ठिकाणीं दोन पिकें काढून घेण्यांत येतात. खरीपाच्या हंगामांत मका, तीळ इत्यादिकाचें पीक काढण्यांत येतें व रब्बीच्या हंगामात गहूं, चणे, कापूस इत्यादींचें पीक काढलें जातें. दक्षिणेकडील भाग जात्याच सुपीक व त्यांतच पर्जन्यहि पुष्कळ पडत असल्यामुळें दोन्ही हंगामांत चांगलीं पिकें येतात. १९०३-४ सालीं एकंदर १५३ चौरस मैल जमीन लागवडीखालीं होतीं. तीपैकीं जवळ जवळ निम्या जमीनीला विहीरीं, तलाव व इतर साधनांनीं पाणी मिळण्याची व्यवस्था होती. पाणीपुरवठ्याच्या प्रश्नासंबधानें योग्य ती तरतूद करण्याचे दरबारनें प्रयत्‍न चालविले आहेत.

गु रें ढो रें.- संस्थानांतील गुरें गुजराथमधील गुरांच्या सारखीं मध्यम ठेवणीचीं पण कांटक अशीं आहेत. गुरांची निपज अधिक चांगली व्हावी यासाठीं हिस्सार व नागौर येथून खोंड आणविण्यांत आले आहेत. गुरांची निगा ठेवण्याला उत्तेजन यावें यासाठीं दरवर्षी आगस्ट महिन्यांत रूपनगर शहराजवळ सुरसर गांवीं गुरांचें प्रदर्शन भरविण्यांत येतें. खेंचराच्या निपजीबद्दलहि १९०१ सालीं प्रयत्‍न करण्यांत आले पण ते तितके फलद्रुप झालें नाहींत. शेळ्या, मेंढ्या यांची समृद्धि येथें असून त्यांचा उपयोग, लोंकर दूध, मांस यांच्यासाठीं करण्यांत येतो.

संस्थानांत जंगल असें फार थोडें आहे. अवघें ४१ चौरस मैल जंगल राखीव आहे. त्यांतून सागवान गवत व इतर किरकोळ जिन्नस मिळून अंदाजें १८,००० रुपयांचें वार्षिक उत्पन्न होतें व खर्च ४००० रुपयांपर्यंत होतो. किशनगड शहरनजीक सिलोरा दगडाच्या खाणी असून त्याच्या उत्तम फरशा तयार होतात. या फरशांचा तक्तपोशी व छप्पर यांच्यासाठीं उपयोग करण्यांत येतो. ह्या खाणी खास संस्थानच्या मालकीच्या आहेत. टोंक्रा गांवानजीक पांढर्‍या संगमरवरी दगडाच्या खाणी आहेत. नारवार नजीक तांबूस रंगाच्या व इतर कांहीं ठिकाणीं काळ्या रंगाच्या संगमरवरी दगडांची पैदास होते. एका काळ्या धातूपासून रंग काढण्याचा प्रयत्‍न साध्य झाला असून त्या रंगाचा उपयोग जोधपूर- बिकानेर रेल्वेच्या आगगाडीच्या डब्यांनां व रजपुताना माळवा रेल्वेच्या डब्यांना लावण्यांत येतो.

व्यापार.- संस्थानांत चिटाचें कापड, इतर निरनिराळ्या रंगाचीं कापडें, किनारी पाणी पिण्याचीं भांडीं व गवतापासून तयार होणार्‍या बाटल्या हा माल तयार होतो. समायिक भाडवलाच्या तत्वावर गिरण्या व कारखाने काढण्यासाठीं सरकारकडून नेहमीं उत्तेजन देण्यांत येतें. खुद्द संस्थानच्या मालकीच्या दोन वाफेवर चालणार्‍या कापसाचे गठ्ठे करण्याच्या गिरण्या आहेत. शिवाय सूत काढण्याची व विणण्याची एक गिरणी व साबणाचा कारखाना हे किशनगड शहरांत आहेत. कापूस, लोंकर, तूप, ओवा, जिरें वगैरे जिन्नसांची निर्गंत होते व साखर, मीठ, धान्य यांची आयात होते.

द ळ ण व ळ ण.- संस्थानच्या उत्तर भागांतून राजपुताना माळवा रेल्वेचा फांटा गेलेला आहे. या संस्थानच्या हद्दींत या रेल्वेची १३ मैल लांबी आहे. किशनगड हें एक या हद्दींतील स्टेशन आहे. संस्थानांतील रस्ते कांहीं खडीचे व कांहीं साधे आहेत. खडीचा रस्ता ३५ मैल असून बिनखडीचा ८० मैल आहे. येथें एकंदर ४ ब्रिटिश पोस्ट ऑफिसें आहेत. खुद्द दरबारनेंहि आपले स्वतंत्र पोस्ट खातें ठेवलें असून संस्थानांत १३ ठिकाणीं पोष्टें आहेत. पोस्ट खात्याचें वार्षिक उत्पन्न अंदाजें २४०० रुपयांचें असून खर्च १००० रुपयांपर्यंत आहे.

दु ष्का ळ.- संस्थानांत दुष्काळ वरचेवर पडतात व त्यामुळें महागाई प्राप्त होतें. साधारणत: दर आठ दहा वर्षांनीं एकदां तरी दुष्काळाचा प्रादुर्भाव होतोच. १८९९- १९०० या सालांत मोठा दुष्काळ पडला. त्यावेळीं दुष्काळनिवारणार्थ पुष्कळच प्रयत्‍न करण्यांत आले. बेकार व अन्नान्नगत झालेल्या मजुरांनां कामें देऊन त्यांनां अन्नवस्त्र पुरविण्यांत आलें. १९०१-२ या सालांतहि पुन्हां दुष्काळ पडला. यावेळींहि सरकारनें वरील उपाय अंमलात आणले.

शा स न प द्ध ति.- संस्थानचा राज्यकारभार स्वत: महाराज हे दोन दिवाणांच्या मदतीनें चालवितात. किशनगड जिल्ह्याची व्यवस्था फडणीस नांवाच्या एका अधिकार्‍याकडे सोंपविण्यांत आली असून इतर जिल्ह्यांवर स्वतंत्र अधिकारी नेमण्यांत आले आहेत या अधिकार्‍यांनां हाकीम असें नांव आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यांत करवसुली करतां तहशीलदार व नायब तहशीलदार नेमण्यांत आले आहेत. संस्थाननें न्यायखात्यासाठीं आपले स्वत:चे स्वतंत्र कायदे केले आहेत. हाकिमांनां सेकंडक्लास मॅजिस्ट्रेटचे अधिकार दिलेले आहेत. एका हाकिमाला मात्र थर्डक्लास मॅजिस्ट्रेटचे अधिकार दिलेले आहेत. या हकीमांसमोर सर्व प्रकारचे दिवाणी कज्जे चालतात. जे फौजदारी कज्जे यांच्या अधिकाराबाहेरचे असतील ते कज्जे किशनगड जिल्ह्याच्या फर्स्टक्लास मॅजिस्ट्रेटपुढें चालतात. किशनगड जिल्ह्यांतील दिवाणी काम स्मॉलकाज कोर्टांत व सदर दिवाणी कोर्टांत चालतें. अपील कोर्टाला अपिलें ऐकण्याचा अधिकार असून शिवाय सेशन्स जज्जाचे अधिकारहि या कोर्टाकडेच आहेत. कौन्सिल हें सर्वांत वरिष्ठ कोर्ट असून त्याच्यापुढें स्पेशल अपिलें चालतात. महाराजांनां फांशीं देण्याचाहि अधिकार आहे.

संस्थानचें वार्षिक उत्पन्न अंदाजें ८ लाख रुपये असून खर्च ५ लाख आहे. उत्पन्नाच्या बाबी म्हणजे जमीनमहसूल, जकात, न्यायखातें, स्टँप, कापसाच्या गिरण्या, व कारखाने या होत व खर्चाच्या बाबी शासनखातें, खाजगी, लष्कर पोलिस व पब्लिक वर्क खातें या होत. यावरून संस्थानची स्थिति समाधानकारक आहे असें दिसून येतें. संस्थानची टांकसाळ असून तेथें संस्थानांत चालणारीं नाणीं पाडण्यांत येतात. पण ब्रिटिश नाण्यांशीं यांचा विशेष मेळ बसत नसल्यामुळें विनाकारण अडथळा उत्पन्न होतो.

जहागिरी, मुआफी व खालसा अशा तीन तर्‍हेची जमीनदारी पद्धत येथें आहे. जहागीरदारांनां महाराजांच्या वाढदिवसाच्या प्रसंगीं, आपआपल्या सरंजामासह दरबारला हजर रहावें लागतें. या जहागिरी वंशपरंपरा चालणार्‍या असून वारसाच्या अभावीं महाराजांच्या संमतीनें दत्तक घेण्याची जहागिरदारांनां परवानगी आहे. संस्थानला अपायकारक असें वर्तन केल्यास जहागिरी जप्त करण्याचा महाराजांनां हक्क आहे. मुआफी म्हणजे खासगी इनामें होत, खालसा म्हणजे खास दरबारच्या मालकीची जमीन; याबद्दल शेतकर्‍यांकडून सारा घेण्याचा दरबारला हक्क आहे. हा सारा पैशाच्या रूपानें घेण्यांत येत नसून, शेतांतील धान्याच्या रूपानेंच घेण्यांत येतो. उत्पन्नाच्या १/४  ते १/३  इतका सारा घेण्यांत येतो. कांहीं बाबतींत मात्र पैशाच्या रूपानें सारा वसूल केला जातो.

राजपुतान्यांतील वीस संस्थानांत या संस्थानाचा शिक्षणाच्या बाबतींत चौथा नंबर लागतो. या संस्थानांतील सुशिक्षितांचें प्रमाण शेकडा ४.६  आहे. येथें २९  शिक्षणसंस्था असून पैकीं १७ सरकारी, दोन मिशनर्‍यांनीं चालविलेल्या व बाकीच्या खासगी आहेत. माध्यमिक शिक्षणाची अशी एकच सरकारी शाळा आहे.

संस्थानमध्यें एक मोठा दवाखाना व तीन छोटे दवाखाने आहेत. देवी काढण्याच्या बाबतींत हें संस्थान मागासलेलें आहे.

इ ति हा स. किशनगड संस्थानचे अधिपती हे रजपुतांच्या राठोड कुळांतील असून ते जोधपूरच्या राजा उदयसिंगाचे वंशज आहेत.

किसनसिंग कच्छवाह हा जोधपूरचा राजा उदेसिंग याचा नववा पुत्र होय. यानें किशनगड हें संस्थान इ.स. १६१३ मध्यें नवीन स्थापिलें. हा कच्छवाह कुळांतील होता. हा जहांगीरच्या हाताखालीं नौकरीस होता. यानें आपली बहीण जहांगीर यास दिली होती. तिच्याच पोटीं शहाजहान झाला. खुर्रम (शहाजहान) यानें बापा (जहांगीर) विरुद्ध बंड उभारलें असतां किसनसिंगानें त्याला सहाय्य केलें. प्रथम त्यानें जोधपुरच्या राण्याकडे- गजसिंगाकडे (हा किसनसिंगाचा पुतण्या होय) मदत मागितली, परंतु त्यानें दिली नाहीं. तेव्हां त्याचा दिवाण गोविंददास याजकडे मागितली, त्यानेंहि दिली नाहीं. त्यावर किसनसिंगाकडे मागितली. प्रथम किसनसिंगानें गोविंददासाचा खून केला व मग मदत केली. त्याबद्दल तो बक्षीस मागूं लागला तेव्हां त्याला स्वतंत्र संस्थान स्थापण्याची परवानगी मिळाली. त्यानें मारवाडच्या हद्दीबाहेर स्थळ पाहून तेथें एक नवीन शहर वसविलें आणि त्याला आपलेंच नांव दिलें. याचा प्रांत ओसाड असून त्यांत जाट लोकांची वस्ती जास्त होती. याचा खून सुरजसिंग यानें केला असें म्हणतात (इसवी सन १६१५). याला साहसमल, जगमल व भारमल असे तीन पुत्र होते. भारमलचा मुलगा हरिसिंग व नातू रूपसिंग होय. या रुपसिंगानें रूपनगरचें राज्य स्थापिलें. [टॉड-राज हिंदुस्थान; एतद्देशीय राज्यें इति. बील-ओरि. बॉया. डिक्श.]

किसनसिंगाच्या मृत्यूनंतर आतांपर्यंत त्याचे १६ वंशज गादीवर बसले. इ. स. १६४४ मध्ये रूपसिंग नांवाचा एक वंशज गादीवर बसला; तो शहाजहानचा फार आवडता असून त्यानें शहाजहानला त्याच्या स्वार्‍यांत पुष्कळच मदत केली व त्यामुळें शहाजहाननें त्याला मांदलगड वगैरे बरीच जहागीर व ५०००  सैन्याची सरदारकी दिली. किशनगडच्या गादीवर बसणारा सातवा राजा राजसिंग (१७०६- ४८) यानें शहाअलम बहादूरशहा याला पुष्कळ मदत केल्यानें त्याला मालपूर, सखार, इत्यादि जिल्हे बक्षीस मिळाले. पुढें बहादुरसिंगानें इ. स. १७६४-१७८१ पर्यंत राज्य केलें. या गादीवर बसणारा तेरावा राजा कल्याणसिंग (१७९७ -१८३२) हा होय. याच्या कारकीर्दींत हें संस्थान ब्रिटिशांच्या अधिकारांत आलें. कल्याणसिंग हा अर्धवट माणूस असल्यानें त्याचें व त्याच्या हाताखालील सरदारांचें बिनसून तो दिल्लीला पळाला. पुढें ब्रिटिश सरकारनें त्याला अनेक प्रकारच्या धमक्या देऊन किशनगड येथें आणलें व त्याच्यामध्यें सरदारांमध्ये कसाबसा सलोखा केला. इ. स. १८३२ मध्यें कल्याणसिंगानें आपल्या मुलाला (मोहकमसिंगाला) राज्य दिलें. मोहकसिंगाच्या मागें त्याचा दत्तकपुत्र पृथ्वीसिंग हा राज्यावर बसला. हा मोठा धोरणी राजा होता. त्यानें आपल्या कारकीर्दीत संस्थानांत पुष्कळच इष्ट सुधारणा केल्या. पुढें पृथ्वीसिंगामागून शार्दूलसिंह हा गादीवर आला व त्यानें आपल्या कारकीर्दीत संस्थानांत पुष्कळच इष्ट सुधारणा केल्या. पुढें पृथ्वीसिंगामागून शार्दूलसिंह हा गादीवर आला व त्यानें आपल्या बापाचें स्तुत्य धोरण पुढें चालू ठेवलें. इ. स. १८९२ मध्यें त्याला जी. सी. आय. ई. हा किताब मिळाला. तो १९०० सालीं वारल्यानंतर त्याचा मुलगा मदनसिंग हा गादीवर बसला. हाच हल्लीं संस्थानाधिपति आहे. सध्याच्या किशनगडच्या महाराजाला १७ तोफांची व के. सी. एस्. आय. आणि के. सी. आय. ई. या पदव्या आहेत. दत्तक घेण्याचा अधिकार त्याला आहे. इ. स. १९१४-१५ सालीं मदनसिंग फ्रान्सच्या रणभूमीवर लढण्यास गेला होता.

श ह र.- किशनगड संस्थानच्या राजधानीचें शहर. हें राजपुताना- माळवा रेल्वेवरील स्टशेन असून अजमीरच्या ईशान्येस १८ मैलावर आहे. किशनसिंगानें १६११ मध्यें हें शहर वसविलें. १९११ मध्यें या शहराची लोकसंख्या १०,४१८ भरली. गुंडोलाव सरोवराच्या कांठीं हें शहर व याच नावांचा किल्ला वसलेला असून या सरोवराच्या मध्यभागीं मोहकम विलास नांवाचा बाग आहे. महाराजांचा राजवाडा किल्ल्यामध्यें असून तेथून आसपासच्या सर्व प्रदेशाचें निरीक्षण करतां येतें. सन १८८६ सालीं या शहराला म्युनिसिपालीटी देण्यांत आली. म्युनिसिपालिटीकडे शहराची दिवाबत्तीची तजवीज, आरोग्यखात्याची व्यवस्था व कत्तलखान्याची व्यवस्था सोंपविण्यांत आली आहे. शहरांत एक पोष्ट व तारायंत्र ऑफिस असून, दोन तुरुंग आहेत. शहरांत एकंदर ११ शाळा असून त्यांतील तीन सरकारी व २ मिशनर्‍यांनीं चालविल्या आहेत. सरकारी हायस्कूल, आलाहाबाद विश्वविद्यालयाला जोडलेलें आहे. शहरानजीक हल्लींच्या महाराजांच्या नांवाची एक छोटीसी वसाहत वसली असून तिचें नांव मदनगंज आहे. या मदनगंजांत एक वाफेनें चालणारी कापसाच्या गठ्ठ्याची व कापूस वठण्याची व विणण्याची गिरणी आहे. दोन साबणाचे कारखाने आहेत. याशिवाय विणकाम, रंगकाम, रत्‍नांनां पैलू पाडण्याचें काम, पाणी पिण्याच्या भांड्यांचा कारखाना, इत्यादि कारखाने या शहरांत चालतात.

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .