प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें    

कीटक अथवा षट्पद– संघ संधिपाद वर्ग. सबंध प्राणिशास्त्रांत हा वर्ग अत्यंत मोठा आहे. झुरळें, टोळ, चतुर, माशा, पिसवा, पतंग, पिंगूळ, पोरकिडे वगैरे सर्व प्राणी या वर्गांत मोडतात. सहा पाय ही या वर्गांतील प्राण्यांची विशेष खूण असल्यामुळें यांनां षट्पद असें नांव देण्यांत आलें आहे. या वर्गांतील प्राण्यांच्या मुख्य खुणा म्हटल्या म्हणजे शीर्ष, वक्ष आणि उदर असे शरीराचे स्पष्ट रीतीनें व्यक्त असलेल तीन प्रदेश होत. शीर्षावर पृष्ठभागीं शृंगें व खालीं दंष्ट्रा, प्रथम पार्श्र्वोष्ठ व द्वितीयपार्श्र्वोष्ठ असे भाग लागलेले असतात. वक्ष पृष्ठावर पंखांची एक जोडी अथवा दोन जोड्या बहुधा असतात. श्र्वासोच्छ्वासाकरितां वातनलिकांचा व्यूह सर्व शरीरांत पसरलेला असतो.

परिपूर्णतावस्थेंतील रूपांतरें या वर्गांतील प्राण्यांत सामान्यत: दिसून येतात. यांच्यांत अगदीं प्रथमावस्था म्हणजे अंडीं, त्यानंतर अळी अथवा सुरवंट; (ही सुरवंटावस्था अत्यंत खादाड असते) पुढें कोश; या अवस्थेंत अळी स्वत: भोंवती कांहीं आवरण तयार करून त्यांत रहाते. शेवटीं पूर्णावस्था. हीं रुपांतरें सर्वच प्राण्यांत दिसून येतात असें नाहीं. झुरळ, टोळ, गवत्या (प्रेइंग मँटिस) इत्यादि प्राण्यांत यांचा मागमूसहि नसतो.

कीटक वर्गांतील प्राणी जल, स्थल, आकाश वगैरे सर्व ठिकाणीं असतात.

कीटक वर्गाची सामान्य शरीररचना पूर्णपणें कळण्यास झुरळ याची शरीररचना पाहिलेली बरी. कारण झुरळ हा प्राणी त्या वर्गाचा प्रतिरूप मानल्यास वावगें होणार नाहीं. झुरळाविषयीं पूर्ण विचार केल्यावर या वर्गांतील इतर प्राण्यांतील फरक सहज समजण्यासारखे आहेत.

झु र ळ.- हा प्राणी सर्वत्र आढळून येतो. आपल्या इकडे स्वयंपाकघरांत, दूधदुभत्याच्या फडताळांत, अडगळींत, पुस्तकें, कपडे इत्यादींच्या पेट्यांत, संडासांत हा प्राणी आढळतो. झुरळांच्या निरनिराळ्या जाती आहेत. कित्येकांनां पंख असतात तर कित्येकांनां नसतात. कित्येक अगदीं खुरटीं असतात.

एखादें झुरळ हातांत घेऊन पाहिलें असतां असें आढळून येईल कीं, झुरळांत उभयांगसादृश्य दिसून येतें. अवयवांनां सांधे असून पाय सहाच आहेत. झुरळ वर्गाच्या प्राण्यांची हीच विशेष खूण आहे. म्हणून यांना ‘षट्पद’ असें म्हणण्यांत येतें.

शीर्षाच्या पृष्ठावर एक जोड, चालावयाच्या संयुक्त पादांच्या वक्षाच्या उदरतलावर तीन जोड, उदरावर श्वसनरंध्रे आणि शरीराचे वक्ष, शीर्ष, उदर असे तीन भाग हीं यांचीं सामान्य लक्षणें होत.

झुरळांच्या सुमारें हजार जातींचें वर्णन केलें गेलें आहे. यांपैकीं साधारण पांच सहाच माणसाळलेल्या म्हणजे मनुष्यवस्तींत सांपडणार्‍या आहेत. झुरळाची प्रवास करण्याची शक्ति अपूर्व आहे असें म्हणतात. झलिझाबेथच्या कारकीर्दीपर्यंत इंग्लंडांत एक देखील झुरळ आढळून येत नसे. आतां अमेरिकन, जर्मन व हिंदुस्थानांतील अशीं सर्व प्रकारचीं झुरळें तेथें आढळून येतात.

मुंबईत या सर्व जातींची भरपूर वस्ती आढळते. पुण्यांतहि हीं बरींच आहेत. रानटी जाती तर पुष्कळच आहेत. पंख नसलेली मोठी जात अथवा पंखांची जात छेदन क्रियेस चांगली. अर्थात् पुढील वर्णन या जातींनांच लागू पडेल.

झुरळें हीं निशाचार आहेत. दिवसा फटींतून वगैरे लपून बसून रात्रीं भक्ष्यशोधनार्थ हीं बाहेर पडतात. हीं इतकीं खादाड असतात कीं त्यांनां सर्वभक्षक असें नांव दिल्यास कांहीं वावगें होणार नाहीं. वनस्पती, जोडे, पुस्तकें, कपडे वगैरे कांहीं त्यांच्या तडाक्यांतून सुटत नाहीं.

झुरळ हें कीटकवर्गाची जीं आठ अथवा नऊ निरनिराळीं कुळें ठरविलेलीं आहेत त्यांपैकीं ‘ऋजुपक्ष’ (आर्थोप्टेरा) या कुलांत येतें. या ‘ऋजुपक्ष’ कुलांत कीटकसृष्टींत ज्या चार रुपांतरांच्या स्थिती अथवा आश्रम असतात ते आढळून येत नाहींत. कोश, अळी वगैरे भेद यांच्यात आढळून येत नाहींत. झुरळांच्या अंड्यांचा एखाद्या तपकिरीच्या डबीसारखा लहान कोश असतो. या कोशांतून पांढरें परंतु पूर्ण अशा स्थितींतच झुरळ बाहेर पडतें. त्यानंतर काती टाकून पूर्ण असें झुरळ लालसर तपकिरी रंगाचें वाढतें.

झुरळाची अन्न वगैरे खाण्याची क्रिया पहावयाची असल्यास थोडेसें अन्न घालून लहनशा काचेच्या पेटींत काहीं झुरळें ठेवावींत. म्हणजे प्रथम शृंगांनीं (अँटेनी), नंतर प्रथमपार्श्वाष्ठावरील स्पर्शेंद्रियांनीं (मॅक्सिलरी पल्प) ते चाचपून पहातात. यानंतर खाण्याची क्रिया दंष्ट्रानीं (मँडिबल) दोन्ही बाजूंनी कशी करतात हें पहावें. ही खाण्याची क्रिया आपल्याप्रमाणें अथवा उंदीर, ससा, बेडूक यांच्याप्रमाणें वरून खालीं जबडा मिटून होत नाहीं; तर दाराच्या फळीप्रमाणें दोन्ही बाजू मिटून खेंकडा, झिंगी वगैरे प्राण्यांप्रमाणें असते.

यानंतर श्वसनक्रिया पहाण्याकरितां उदराकडे वळावें. आपली जशी छाती श्वासोच्छ्वासामुळें लहान मोठी होत असते. तसें झुरळाचें उदर लहानमोठें होत असतें. उदरांतून हा श्वासोच्छवास होत असल्यामुळें ही उदराची खालींवर होण्याचीं क्रिया सुरू असते. झुरळाला ही श्वसनरंध्रयुग्में एकंदर दहा असतात.

झुरळ मारावयाचें असल्यास त्यास प्रथम रुंद तोंडाच्या बाटलींत अथवा कांचेच्या पेल्यांत घालावें व नंतर क्लोरोफार्म, पेट्रोल किंवा मेथिलेटेड स्पिरिट् यांचे थोडेसे थेंब त्या बाटलींत टाकावेत म्हणजे थोड्याच वेळांत गुदमरून तें मरतें.

मेलेलें झुरळ हातांत घेऊन पाहिलें म्हणजे त्याच्या शरीराचें कवच आपल्याला कठिण असें आढळून येईल. उदराचे भाग दहा असून ते वलयांकित असल्याचें दिसेल. झुरळाचें जें वरचें कवच तेंच त्याच्या अस्थी होत. झुरळ हा प्राणी अपृष्ठवशांतील होय; आणि अपृष्ठवंशांतील प्राण्यांत एका माखलीशिवाय कोणालाच अंतरास्थी नसतात. खेंकडा वगैरे प्राण्यांत या बाह्यास्थी चुन्याच्या द्रव्याच्या असतात;  तशा मात्र त्या झुरळांत नसतात.

येणेंप्रमाणे सामान्य विवेचन झाल्यावर आतां आपण झुरळाचे जे मुख्य तीन भाग त्यांपैकीं पहिल्या प्रथम उदर घेऊन तपासावयास लागूं.

उदराचे दहा वलयांकित भाग असतात. हें पूर्वी सांगितलेलेंच आहे. आतां या प्रत्येक वलयाचे दोन भाग पडतात-पाठीकडील वा पोटाकडील. पृष्ठाकडील भागाला पृष्ठवलयार्ध (टर्गम) व पोटाकडील भागाला अधोवलयार्ध (स्टर्नम) असें म्हणतात. हीं वलयें मागील वलयांत पुढाल वलय म्हणजे थोडक्यांत कौलांप्रमाणें बसलेलीं असतात. हे वलयांकित भाग जेथें एकमेकांवर जातात त्या संधीमधील, त्याचप्रमाणें पृष्ठवलयार्ध व अधोवलयार्ध ज्या ठिकाणीं सलंग्न होतात तेथील बाह्यस्थितीचे भाग मऊ असतात. पृष्ठवलयार्ध व अधोवलयार्ध यांमधील या संधीस मृद्वंग असें म्हणतात.

उदर जरा ओढून वर करून पाहिलें असतां मद्वंगांत असलेलीं श्वसनरंध्रें स्पष्ट दिसतील. उदरावर यांचीं आठ युग्में असून वक्षावर दोन युग्में असतात.

कांहीं झुरळांत हीं दहाहि वलयें स्पष्टपणें दिसून येतात. कांहीं झुरळांत विशेषत: माद्यांत आठवा आणि नववा वलयांकित भाग हे सातव्या वलयांकित भागाखालीं इतके झांकून जातात कीं छेदनाशिवाय अगर ताणून पाहिल्याशिवाय ते दिसणें जवळ जवळ अशक्य असतें. दहावा म्हणजे शेवटचा वलयांकित भाग उचलून पाहिला म्हणजे गुदद्वार दिसून येतें. गुदद्वाराच्या दोन्ही बाजूस जे कठिण झालेले भाग असतात त्यांनां गुदपत्रें अगर गुदपर्ण (पॉडिकलप्लेट्स) असें म्हणतात. कांहीं जीविशास्त्रज्ञ या गुदपर्णांनां अकरावा वलयांकित भाग मानतात. दहाव्या पृष्ठवलयार्धाच्या खालील बाजूनें दोन गुदस्पर्शक रोम (अ‍ॅनल सर्सी) बाहेर आलेले असतात. गुदस्पर्शक रोम नर व मादी या दोघातंहि असतात.

अधोवलयार्धांतील प्रथमवलयार्ध अगदीं आदि स्वरूपांत असतें. नरांत हीं नऊच दृष्टीस येतात. अधोवलयार्धांतील नवव्यास बारीक असंयुक्त असे दोन ‘कंटक’ झालेले असतात. हे कंटक फक्त नरांतच सापडतात. मादीला हे नसतात. गुदपर्ण व दहावा पृष्ठवलयार्ध भाग हे छेदिले म्हणजे आंत सूक्ष्म आंकडे असलेला असा भाग दिसतो. तो दहाव्या अधोवलयार्धाची बाह्य वाढ असावी असें दिसून येतें. या वाढीचा उपयोग संयोगीकरण होतांना मादीचें जननेंद्रिय उघडण्याकडे होतो.

मादींत फक्त सातच अधोवलयार्ध दिसून येतात. बाकीची तीन जननविवर होण्याकरितां सातव्याखालीं झाकलेलीं असतात. सातवें अधोवलयार्ध मोठें असून बोटीच्या आकाराचें असतें. याचे दोन भाग उभे झालेले असतात. संयोगीकरणांत याचा उपयोग होतोच; शिवाय चिकटून बीजकोश ठेवण्यास नीट जागा सांपडेपर्यंत तो घट्ट धरून ठेवण्याकडेहि याचा उपयोग होतो. पुष्कळ माद्या हा बीजकोश जननविवरांत धरून ठेविलेल्या स्थितींत दृष्टीस पडतात. नेहमीं झुरळांचें निरीक्षण केलें तर हा प्रकार सहज नजरेस येण्याजोगा आहे.

आठवा आणि नववा वलयांकित भाग सातव्याखालीं झांकला गेल्यामुळें त्याचे पृष्ठवलयार्धांचे भाग अत्यंत अरुंद झालेले असतात. मादींत आठव्या वलयांकित भागाच्या अधोवलयार्धावर एक उभें छिद्र असतें. हेंच बाह्ययोनीछिद्र होय. नववा अधोवलयार्थ भाग म्हणजे लहानशी वांकडी तबकडी असून हिच्यावर शुक्रकोश असतो. या शुक्रकोशांत नरामधील शुक्राचा संचय केला जातो. बीजकोश बाहेर येतांना या शुक्रकोशाजवळून जातो व तो तसा जात असतांना त्यांत शुक्रांतील सूक्ष्म शुक्रबीज प्रवेश करतात व नंतर फलद्रुपता होते.

अखिल कीटकवर्ग घेतला तरी त्यांत वक्षाचे तीन भाग असलेले आपणांस आढळून येतील. शीर्षाकडील प्रथम भागाला ‘पूर्ववक्षवलय’ असें म्हणतात. त्याच्या जवळचा भाग ‘मध्यवक्षवलय’ व नंतर उदराजवळचा जो वक्षाचा भाग त्याला ‘अपरवक्षवलय’ किंवा `पश्चिमवक्षवलय’ असें म्हणतात. उदराच्या वलयाप्रमाणें या वक्षांच्या वलयांमध्यें देखील दोन भाग दिसून येतात. पाठीकडील भागाला `अधोवलयार्ध’ असें म्हणतात. पूर्ववक्षवलयाचा पृष्ठवलयार्ध तिन्ही पृष्ठवलयार्थांमध्यें सर्वांत मोठा असून पूर्वभागीं शीर्षावर पसरलेला असतो व पश्चिमभागीं मध्यवक्षवलयाच्या पृष्ठवलयार्धाला झांकून टाकतो. मध्यवक्षाच्या पृष्ठवलयार्धांच्या बाजूस प्रथमपक्ष असतात. ही पहिली पंखाची जोडी बरीच बळकट असून ती निव्वळ उडण्यास उपयोगी पडणारी अशी जी दुसरी पंखाची जोडी असते तिला झांकून तिच्या संरक्षणाचें कार्यहि ही प्रथमपक्षाचीच जोडी करते. दुसर्‍या पंखाची जोडी अपरवक्षपृष्ठवलयार्धांला चिकटलेली असते. ही पंखाची जोडी अगदीं पातळ व लिवलिवीत असून हिच्यावर ‘शिरांचे’ अगदीं जाळें झालेले दिसतें. छत्रीच्या काड्या ज्याप्रमाणें छत्रीला उपयोगी पडतात, त्याचप्रमाणें हें जाळें या पंखांनां उपयोगीं पडतें. उडत नसतांना हे पंख घडीच्या पंख्याप्रमाणें एकमेकांवर झांकले जाऊन प्रथमपक्षाच्या जोडीखालीं ठेवले जातात.

या ठिकाणीं हें लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, या पंखांवर जें आपण शिरांचें जाळें म्हटलें आहे त्याची ‘सपृष्ठवंशांतील’ प्राण्यांच्या शिरांशीं अगदीं तुलना करतां यावयाची नाहीं. कारण या शिरा जरी रुधिरमार्ग म्हणून उगम पावलेल्या असल्या तरी त्यांच्या बहुश: वातनलिका स्थापित झालेल्या असतात.

पंखांची उत्पत्ति प्राणिशास्त्रवेत्यांनीं वायुनलिकेपासून लाविलेली आहे. झुरळ चिरून पाहिलें म्हणजे श्वसनरघ्रांनां जोडून असलेल्या ज्या वायुनलिका दृष्टीस पडतात व त्यांचा जसा आकार, पोकळी इत्यादि सूक्ष्मदर्शकांतून दिसतात, त्याचप्रमाणें पंखांतील शिरांच्या जाळ्याची रचना स्पष्ट दिसून येते. यावरून वरील म्हणण्यास बरीचशी पुष्टि येते. शिवाय उडावयाच्या वेळीं पंखांत अशी हवा भरली गेली म्हणजे उडणें अर्थातच तितकें सोपें जाणार आहे.

आतां प्रत्येक पक्षाच्या अधोवलयार्धावर एक एक पायांची जोडी असते. पूर्ववक्षाचा अधोवलयार्ध फार लहान असतो. मादीमध्यें पूर्णपणें व नरामध्यें अल्पांशानें मध्यवक्षाचा अधोवलयार्ध उभा दुभागलेला असतो. अपरवक्षांचा अधोवलयार्ध मात्र दोहोंमध्येंहि विभागलेला असतो.

सर्व कीटकवर्गांमध्यें फक्त सहाच पाय आढळून येतात. यावरून याला षट्पादवर्ग असें म्हणण्यांत येतें. यांपैकीं प्रत्येक पायांची जोडी वक्षाच्या प्रत्येक वलयाला एक एक याप्रमाणें जोडलेली असते. या पायांनां चलनवलन करतां यावें म्हणून ठिकठिकाणीं सांधे असतात.

पायाचे साधारणत: पाच विभाग असतात. पहिल्या भागाला कटिसंधि (कोक्सा), दुसर्‍यास द्वितीयसंधि (टोकँटर) व तिसर्‍यास उरुसंधि (थाय) व चवथ्यास जंघासंधि (टिबिआ) असें म्हणतात. शेवटीं अगदीं तळवा अथवा कूर्चसंधि येतो. तळव्याचे सहा भाग असून गुळगुळीत जागेवरूनहि झुरळास चालतां यावें म्हणून त्यास कांटेरी गिरद्या असतात. तळव्याच्या अगदीं शेवटच्या भागास नख्यांचा एक जोड असतो व त्यामध्यें एक लहानशी गिरदी असते.

येथवर उदर व वक्ष यांविषयीं विवेचन झालें. आतां आपण राहिलेल्या भागाकडे वळूं. हा राहिलेला भाग म्हणजे शीर्ष होय.

वक्ष व उदर यांचे निरनिराळे वलयांकित भाग आपणांस नेत्रांनीं सहज दिसण्याजोगे असतात. त्याप्रमाणें शीर्षामध्यें मात्र ते नसतात. पूर्णावस्थेंत तर हे भाग सहज दिसून येणें शक्य नसतें. गर्भाची वाढ होत असतांनाच हे भाग स्पष्टपणें दिसून येणें शक्य असतें. आणि हें निरीक्षण करूनच प्राणिशास्त्रवेत्यांनीं शीर्षाचे सहा भाग ठरविले आहेत ते असे:- (१) पहिल्या भागावर म्हणजे शृंगांच्या पुढें नेत्र असतात. (२) शृंगें असलेला भाग. (३) पूर्वदंष्ट्राभाग- हा भाग गर्भवाढ होत असतांनाच नाहींसा होतो. (४) दंष्ट्रांचा भाग. (५) प्रथमपार्श्वोष्ठांचा भाग. (६) द्वितीयपार्श्वोष्ठांचा भाग.

सदरहूप्रमाणें डोक्याला आच्छादणारा जो कठिण भाग असतो त्यास ऊर्ध्वकपालकवच (एपिक्रेनियम) असें म्हणतात. या शीर्षकवचावर इंग्रजींतील वाय् या अक्षराप्रमाणें मधोमध संधिरेषा असते. मात्र ही संधिरेषा उलटी असते. म्हणजे तें अक्षर उलटें करून त्याचा जसा आकार होईल तसा ह्या संधिरेषेचा आकार असतो. या संधीरेषेचे खालील जे दोन पाय अथवा फांटे असतात त्यांच्या दोन्ही टोंकास दोन पांढरे वर्तुलाकृति अवयव असतात. या अवयवांचें कार्य काय असावें याविषयीं निश्चित असें काहींच सांगतां येत नाहीं. कित्येकांच्या मतें हे झुरळाचे साधे नेत्र असावेत तर कित्येक हें त्याचें घ्राणेंद्रिय आहे असें प्रतिपादितात.

संधीरेषेच्या खालील शीर्षाचा जो भाग असतो त्यास पुर:कपालकवच (क्लायपिअस) असें म्हणतात. या पुर:-कपालकवच्याच्या खालील बाजूस एक पदर जोडलेला असतो त्यास उर्ध्वोष्ठ असें म्हणतात. नंतर नेत्राच्या मागें व खालीं असा आलेला जो भाग असतो त्यास ‘कपोल’ असें म्हणतात.

शीर्ष हें वक्षाला अत्यंत लहान अशा मानेनें जोडलेलें असतें. शीर्षाच्या दोन्ही बाजूस दोन काळसर भाग दिसतात ते दोन संयुक्त नेत्र होत. निरनिराळ्या नेत्रांचा हा समूह असल्यामुळें यास संयुक्त नेत्र असें म्हणतात. यांतील प्रत्येक नेत्र जर सूक्ष्मदर्शकांतून पाहिला तर त्याचा आकार बाहेरून षट्कोनी असल्याचें दिसून येतें.

वरच्या बाजूनें उर्ध्वकपालकवच, खालच्या बाजूनें पुर:-कपालकवच व बाहेरील बाजूंनीं नेत्र यांच्यामध्यें शृंग लागलेलें असतें. याचे सत्तर ते नव्वद संधिभाग असतात. याच्यावर पुष्कळ कांटेहि असतात. यांचा उपयोग स्पर्शेद्रियासारखा होतो. कांहीं शास्त्रज्ञ त्यांचा उपयोग घाण्रेंद्रिय व कर्णेंद्रिय यांच्याप्रमाणेंहि आहे असें म्हणतात. साधारणत: सबंध कीटकसृष्टींत या शृंगांचीं एकापेक्षां अधिक जोडी आढळून येत नाही. पुष्कळ वेळां नर कीं मादी हा भेद या शृंगावरून ठरवितां येतो. ढोबळ दृष्टीनें पाहूं गेलें तर झुरळांत यावरून कांहींच ठरवितां येणार नाहीं. तरी पण सूक्ष्म निरीक्षणानें हें शृंग नराला मादीपेक्षां लांब असल्याचें आढळून येईल. शिवाय या शृंगाच्या तळापासून तिसरा संधिविभाग मादींत नराच्या दुप्पट लांब असतो. शीर्ष, वक्ष व उदर या तिन्ही भागांचें बाह्य पर्यालोचन आतां संपलें. आतां छेदनक्रियेंकडे आपणांला वळावयाचें आहे.

प्रथमत: आपण तोंडांतील निरनिराळ्या भागांकडे वळूं. तोंडाची पूर्वमर्यादा दर्शविणारा भाग म्हटला म्हणजे उर्ध्वोष्ठ (लेब्रम) होय. त्याच्या बाजू, दंष्ट्रांची जोडी व त्यांच्या खालीं दबलेल्या प्रथमपार्श्वोष्ठांची जोडी ह्यांनीं झालेल्या आहेत. त्याची पश्चिममर्यादा दर्शविणारा भाग म्हणजे द्वितीयपार्श्वोष्ठांची जोडी होय. हे भाग नीटपणें काढतां येण्यास झुरळाचें तोंड वर केलें पाहिजे. एवढ्याकरितां झुरळाचें आपण ज्या बशींत छेदन करणार (अशा बशा पॅराफिन् अथवा मेण घालून केलेल्या असतात) तींत त्याला उलटें ठेवावें व पूर्ववक्षाच्या दोन्हीं बाजूंस पृष्ठवलयार्धाला दोन टांचण्या थोड्या तिरप्या (त्यांचीं) वरचीं टोकें शरीरावर येणार नाहींत अशा तर्‍हनें) टोंचाव्यात. नंतर तोंड थोडें ओढून अर्थात् मानेला थोडा ताण देऊन तिच्याहि एका अगर दोन्ही बाजूंना-ज्याप्रमाणें सोयीस्कर पडेल त्याप्रमाणें- टांचण्या टोंचाव्यात, म्हणजे तें त्याच स्थितींत स्थिर राहील. नंतर धाकटा चिमटा घेऊन (ज्या चिमट्यांचीं टोकें बारीक असतात) त्यानें उर्ध्वोष्ठांच्या पुढून तो आंत घालून तो अवयव शक्य तितक्या सावधगिरीनें बाहेर ओढून काढावा. यापेक्षां प्रथम उर्ध्वोष्ठच चाकूच्या मदतीनें चिमट्यानें सोडवून घेतल्यास चांगलें. यानंतर प्रथमपार्श्वोष्ठ (फर्स्ट मॅक्सिला) व दंष्ट्रा (मँडिबल्स) सोडवून घ्यावींत. हीं सोडवून घेतल्यावर करसूक्ष्मदर्शकानें अथवा छेदनसूक्ष्मदर्शकांतून याचें निरीक्षण करावें. ह्या दंष्ट्रा (मँडिबल्स) म्हणजे झुरळाच्या दाढा होत. यांमध्यें निरनिराळे विभाग नसतात. त्या अत्यंत बळकट असून त्यांच्या आंतील कडेला सहा अथवा सात दांते असतात. त्या पुर:कपालकवच व ऊर्ध्वकपालकवचाच्या खालील टोंकाशीं जोडलेल्या असतात.

दोन्ही पार्श्वोष्ठ फांद्या फुटून बनलेले असतात. त्या प्रत्येकाला दोन भागांचा मूळसंधि (प्रोटोपोडाइट) असून त्याच्यापुढें अंत:प्रसर (एंडोपोडाइट) व बहि:प्रसर (एक्सोपोडाइट) मिळून त्याचे तीन विभाग असतात.

मूलसंधि म्हणून जो भाग आपण म्हणतों त्याच्याच अंत:प्रसर व बहि:प्रसर या फांद्या असल्याचें दिसतें. अंत:प्रसर भाग दोन अवयव मिळून झालेला असतो. त्यास ‘गॅलिआ लॅसिनिआ’ व `तपासीनिआ’ असें म्हणतात. मूळ संधीच्या भागाचे दोन उपभाग असतात त्यांस संघसंधि (कार्डो) व ‘स्तंभसंधि’ (स्टिपिओ) असें म्हणतात. यांतील ग्यालीआचा आकार गोल चपटा झालेला असून त्यांवर कठिण असें केंस असतात. या ग्यालिआच्या योगानें लॅसिनिआचीं तीक्ष्ण टोकें असतात त्यांचें संरक्षण होतें. बहि:प्रसर लॅसिनिआ व गॅलिआ जेथून निघतात त्यांच्याजवळूनच म्हणजे स्तंभापासूनच निघतो. याचे फिरून पांच तुकडे असतात. प्रथमचे जे याचे भाग असतात ते फार लहान असतात. बाकीचे तीन लांब लांब असतात. या सर्व भागांवर लहान लहान केंस असतात.

द्वितीय पार्श्वोष्ठांकडे (सेकंड मॅक्सिलि) आतां आपण वळूं. द्वितीयपार्श्वोष्ठ साधारणत: प्रथमपार्श्वोष्ठासारखाचअसतो. याचे मूळसंधिभाग मात्र एकत्र सांधलेले असतात. त्यांच्या दोन तुकड्यांची एक तबकडीच झालेली असते असें म्हटल्यास चालेल. या तबकडीच्या भागांनां ऊर्ध्वहनु (सबमेंटम्) व हनु (मेंटम्) अशीं नांवें आहेत. हनु(मेंटम्) लहान असून त्यालाच अंत:प्रसर व बहि:प्रसर हे भाग जोडलेले असतात. दोन्ही अंत:प्रसरांनां कधीं कधीं एकदम जिव्हिका (लिगुला) असें नांव देण्यांत येतें. यातहि लॅसिनिआ व पॅरोग्सॉसी असे प्रथमपार्श्वोष्ठाप्रमाणेंच दोन भाग असतात. बहि:प्रसराचे तीन तुकडे असून त्या भागाला ओष्ठस्पर्शेंद्रिय (लेबिअल् पल्प) म्हणतात.

छेदनास आरंभ करण्यापूर्वीं झुरळाचे पंख व पाय अजीबात कापून टाकून त्याचा पृष्ठभाग वर करावा व दोन्ही बाजूंनीं टांचण्या टोंचून मेण घातलेल्या ताटलींत अथवा बुचाच्या लांब पसरट तुकड्यावर त्याला घट्ट बसवावें. कित्येक वेळा मेण थोडें वितळवून त्यांत खालचा भाग चिकटवून बसवितात. या मेणांत काजळ घातल्यास चांगलें. कारण मागील बाजू काळी झाल्यामुळें झुरळाचे भाग स्पष्ट दिसून येतात. अशा रीतीनें झुरळ घट्ट बसल्यावर मग छेदनास आरंभ करावा. पहिल्या प्रथम पृष्ठवलयार्ध व अधोवलयार्ध यांमध्यें जी कड असते ती अगदीं हलक्या हातानें चिरून घ्यावी. ही कड उदर व वक्ष यांच्या दोन्ही बाजूनें घ्यावी. नंतर हलकेंच एकामागून एक तुकडा सोडवून टाकावा. ही सर्व छेदनक्रिया पाण्यांत केल्यास फार चांगलें पाण्यांत सर्व भाग जसेच्या तसेच राहून स्पष्ट दिसतात. शिवाय वलयाचे भाग काढून टाकतांना त्यांच्याच खालीं असलेलें हृदय जाऊं न देण्याची खबरदारी घ्यावी.

शीर्षाच्या अलीकडील म्हणजे पूर्ववक्षासकट पृष्ठाकडील सर्व अर्धवलयें काढून टाकलीं म्हणजे झुरळाचें अंत:कपाट मोकळें झालें. हें सर्व पांढरट पदार्थानें भरून गेल्याचें आढळून येईल. ही सर्व चरबी होय.

अगदीं बाल्यावस्थेंत झुरळाच्या कवचमय वेष्टनांतून हृदयाची संकोचन व प्रसरण क्रिया स्पष्टपणें पहावयास सांपडते. हें हृदय म्हणजे एक लांबच लांब नळी असून ती पूर्ववक्षापासून उदराच्या शेवटापर्यंत गेलेली असते. ही स्नायूंची असते. अन्ननलिकेच्या वरील बाजूस हिचा शेवट असतो. त्याचप्रमाणें शरीराच्या इतर भागांतून जातांना याला बाजूनीं फांद्या वगैरे फुटत नाहींत.

शरीराच्या सर्व पोकळींत खूप चरबी भरलेली असते. ही पांढरट असून तिच्यांत तेलाचे थेंब व कांहीं टाकाऊ पदार्थ सांपडतात. वातनलिकांचें जाळें या चरबींत सर्वत्र असते.

चिमटा, चाकू व कात्री यांच्या साह्यानें शक्य तितकीं चरबी काढून टाकावी. यानंतर पचनेंद्रियनलिका बाजूला काढून घ्यावी. ही काढतांना वातनलिका व चरबी हीं खरडून टाकवींत. मात्र असें करताना, अन्ननलिकेजवळचे लालापिंड, माल्पिचिअन नलिका व मागच्या बाजूकडील जननेंद्रिय न दुखविण्याची विशेष काळजी घ्यावी.

पचनेंद्रियाचे साधारण तीन भाग करतात ते असे: -

प्रथम भाग अथवापूर्वपचनेंद्रिय तोंडांतील पोकळी (मुख क्रोड)
अन्नलिका (ओइसोफॅगस)
अन्नाशय (क्रॉप)
मंथनिका अथवा मंथिनी (गिझर्ड)
द्वितीय भाग अथवा
मध्यम पचनेंद्रिय
चिलीफिकस्टमक
तृतीय भाग अथवा
पश्चिमपचनेंद्रिय
तन्वांत्र (इलिअम)
बृहदांत्र (कोलोन)
गुद (रेक्टम)प्रथमभागावर शरीरपृष्ठावरील कवचाचें चिटीन आवरण आंतून पसरलेलें असतें. मुखक्रोडांत एक लहानशी जिव्हा असते. मुखक्रोडापासूनच अन्ननलिका निघते. ही अन्ननलिका डोक्याच्या वरच्या भागावरील मेंदूवत् ज्ञानकंदाच्या खालीं त्यांच्यापासून निघालेल्या पार्श्वरज्जूंचें जें एक वर्तुळ होतें त्यामधून जाते. वक्षांतून पुढें जातांना ही रुंद होत जाऊन तिचा अन्नकोश अथवा आहारकोश नंतर आंवळून जाऊन त्याच्यापेक्षां जाड असलेली अशी स्नायूंची मंथिनी (गिझर्ड) होते. मंथिनी (गिझर्ड)चा आडवा छेद घेऊन पाहिल्यास तींत सहा कठीण दाते असल्याचें आढळून येतें. या मुख्य दात्यांमध्यें लहान लहान उंचवटेहि पुष्कळ असतात. या दात्यांच्या पुढें लहान लहान कंटकयुक्त सहा गिरद्यांसारखे अवयव असतात. त्यांचा उपयोग अन्न गाळण्याप्रमाणें होतो. प्रथमभाग येथें पूर्ण होतो.

मध्यभाग म्हणजे फार अरूंद व आंखूड नलिका असते. हिच्याच पुढील बाजूंस यकृतअंधनलिका (हेपॅटिक कॅलिआ) असतात. या सात अथवा आठ असतात.

पश्चिमभाग अथवा तृतीय भाग मागच्या बाजूस वेष्ठिलेला असून पूर्वभागाप्रमाणें तो देखील कवचानें वेष्टिलेला असतो. या पश्चिमभागाचा प्रथमभाग लहान व अरुंद असून त्यालाच मल्पिघिअन नलिका जोडलेल्या असतात. त्यांचा उपयोग मल अथवा किटत्याजकाप्रमाणें होतो. विशेषत:  कीटकसृष्टींत त्या नैट्रोजनयुक्त त्याज्य द्रव्य टाकतात. त्या एकंदर साठसत्तर असतात. त्यांचा रंग पिवळसर असतो व लांबी एक इंच असून सर्व उदरभर त्या पसरलेल्या असतात. या पूर्व भागाला आत्र अथवा तन्वांत्र असें म्हणतात. पश्चिम- भागाचा जो मध्यभाग असतो तो चांगला लांब रूंद असून त्यास बृहदांत्र असें म्हणतात. यानंतरचा भाग म्हणजे ‘गुद’ होय व तो गुदद्वाराच्या योगानें बाहेर उघडला जातो.

झुरळाचे लालापिंड फार मोठे असतात. हे पुष्कळसे गोलक एके ठिकाणीं मिळून झालेले असतात. निरनिराळ्या स्रोतस नलिकांनीं ते एकत्र सांधलेल असतात. या स्तोतसनलिकांचें पुढें एकच स्रोतस होऊन तें अन्ननलिकेच्या बाजूनें जाऊन जिभेच्या जरा अलीकडे तोंडांत उघडतें. हे लालपिंडाचे झुबके अन्ननलिकेच्या दोन्ही बाजूंस असतात.

पुंजननेंद्रियें:- लहान (वयानें) झुरळांत त्यांच्या उदराच्या पांचव्या पृष्ठवलयार्धाखालीं मुष्क असतात. हाहि एक शाबुदाण्यासारख्या गोळ्यांचा झुबका असून त्यांनांच पुढें स्त्रोतस जोडलेलें असतें. शुक्रस्रोतस म्हणजे मुष्कामधून वीर्य नेणारी नळी. ही सर्व चरबीनें पूर्ण वेष्टिलेली असल्यामुळें सांपडण्यास फार कठीण जाते. वयातीत नरांमध्यें यांचें काम झाल्यामुळें त्या झिजून जातात व त्यामुळें त्यांच्यांत त्या कधीहि सांपडत नाहींत. दोन्ही बाजूंचें शुक्रस्रोतस मागें खालीं येऊन शुक्राशयाला मिळतात. झुरळ अगदीं लहान असताना त्याचा पांढरा रंग गेला असतांना त्याच्यामध्यें हा शुक्राशय बनतो व तो प्रत्येक बाजूवर लहान दीर्घवर्तुळाकृति असतो. पुढें दोहोंबाजूवरील शुक्राशय एकवटून व फुटून त्यांचा एकाद्या गोंड्याप्रमाणें किंवा तुर्‍याप्रमाणें आकार होतो. या गोंड्यासारख्या शुक्राशयाच्या बुंध्यापासून निक्षेपण स्रोतस निघते व तें गुदद्वाराच्या खालीं बाहेर उघडतें. यानंतर संयोग आंकडे येतात. यांचा उपयोग पूर्वीं सांगितलाच आहे.

स्त्रीजननेंद्रियें:- अंडकोश म्हटला म्हणजे लहान लहान होत गेलेल्या आठ नलिकांचा झालेला असून त्या नलिका अंडकोशामध्यें येऊन मिळतात. प्रत्येक नलिकेची लांबी सामान्यपणें दहा मिलिमीटर असून तींत लहानमोठ्या आकाराचीं अंडीं एकापाठीमागें एक असल्यामुळे ती एखाद्या माळेप्रमाणें दिसते. अंडस्त्रोतसाच्या जवळील अंडीं मोठालीं असून वरील बाजूचीं बारीक असतात. लहान अंडयांमधील केंद्र स्पष्ट दिसतें व त्यामध्यें कल्क किंवा बलक बहुधा नसतोच. परंतु तीं मोठमोठीं होत जाताना हळूहळू त्यांच्यांत कल्क अथवा बलक जमत जाऊन चैतन्यकेंद्र दिसेनासें होतें. या सर्व नलिका वरच्या बाजूंनीं बारीक धाग्याशीं एकत्र मिळालेल्या असतात. अंडस्त्रोतसें लहान असून आठव्या अधोवलयार्धावरील योनींत तीं उघडतात. अंडस्रोतसें एकत्र मिळण्याच्या पुढील भागीं म्हणजे नवव्या अधोवलयावर एक लहानशी पिशवी असते. हाच शुक्रकोश होय. शेवटच्या ज्ञानकंदाच्या जोडीजवळच मागील बाजूस हा असतो.

या शुक्रकोशाच्या मागील बाजूस पुष्कळसें फांटे फुटलेले व पांढुरके असे लुक्कणपिंड असतात. यांच्यांतून बीजकोश ज्या पदार्थाचा बनलेला असतो. तो पदार्थ स्त्रवतो. यांतील डावीकडचा भाग उजव्यापेक्षां मोठा असतो.

ज्ञानेंद्रियव्यूह:- कटिकवर्गांतील ज्ञानेंद्रियव्यूह सामान्यपणें गांडूळ अथवा खेंकडा या प्राण्यांतील व्यूहरचनेंप्रमाणेंच असतो. म्हणजे प्रत्येक भागाला दोन ज्ञानकंदांचे मणी असून त्यांतून ज्ञानरज्जू जात असतात. प्रत्येक वलयाला ज्ञानकंदांचा मणी बहुश: असतोच. मात्र कित्येकवेळां कांहीं मणी एकत्र संघटित झालेले असतात.

शीर्षामध्यें अन्ननलिका पार्श्वज्ञानरज्जूंच्या कमानींनें वेष्टित असते. हे पार्श्वज्ञानरज्जू मेंदूवत शीर्षज्ञानकंदाच्या जोडीपासून निघून अन्ननलिकेच्या खालील बाजूस दोहोंबाजूनें मिळतात. हे पहाण्याकरितां पुर:कपालकवच व उर्ध्वकपालकवच हें शीर्षावरील भाग चाकूनें काढून घेतले पाहिजेत. नंतर कंपोल, दंष्ट्रा व पार्श्वोष्ठाचे कांहीं भाग काढून टाकावेत. म्हणजे अन्ननलिकेसभोंवतालची कमान दिसून येईल.

हे सर्व भाग नीटपणें पहावयाचे असतील तर आल्कोहलमध्यें घालून ज्याचे सर्व भाग कठिण झाले आहेत असें झुरळ घेतल्यास चांगलें.

मेंदूवत शीर्षज्ञानकंदांची जोडी दोन ज्ञानकंदांचे गोलक बनून झालेली असते. या गोलकांपासून नेत्र, शृंगें वगैरेंना ज्ञान रज्जू जात असतात. यांतूनच खालील बाजूनें ऊर्ध्वोष्ठाला ज्ञान रज्जू जातात. एवढ्यावरून मेंदूवत शीर्षज्ञानकंदांची जोडी तीन ज्ञानकंदांच्या जोड्या संयुक्त होऊन झालेली असावी असें अनुमान निघतें.

मेंदूमधून निघणार्‍या दोन्ही बाजूंच्या ज्ञानरज्जू अन्ननलिकेच्या खालीं येऊन एकत्र मिळतात. तेथें अन्ननलिकाधोज्ञानकंदांची जोडी असते. यांमधून तोंडाचे मागील भाग, दंष्ट्रा, पार्श्वोष्ठाच्या दोन्ही जोड्या यांनां ज्ञानतंतू जात असतात. यावरून हा ज्ञानकंदांचा गोलक देखील तीन भाग मिळून झाला असावा असें शास्त्रज्ञाचें म्हणणें आहे. यानंतर वक्षाच्या ज्ञानकंदाच्या गोलकांनां सुरुवात होते.

छेदनानंतर ही ज्ञानकंदांची सांखळी नीट दिसावी म्हणून पचनेंद्रियें व जननेंद्रियें बाजूला काढावीत. त्याचप्रमाणें चरबी, स्नायू वगैरे खरडून टाकावींत. अशा रीतीनें वक्ष व उदर यांच्या खालच्या बाजूनें जाणारी ज्ञानकंदांची साखळी स्पष्ट दिसूं लागेल.

वक्षाच्या प्रत्येक वलयांत ज्ञानकंदांच्या गोलकांची एक जोडी असते. उदरांत फक्त सहाच जोड्या सांपडतात. शेवटली जोडी सातव्या अधोवलयार्धावर असते. व हिच्यांतूनच  मागील भागांना फांटे जातात.

उदरांतील निरनिराळ्या भागांनां जाणारें देखील ज्ञानरज्जूचें एक जाळें असतें.

श्वसनेंद्रियें:- झुरळाच्या उदर व वक्ष यांच्यावर श्वसनरंध्रें असतात हें आपणांस माहीत आहेच. या श्वसनरंध्रांना जोडून असणार्‍या वातनलिका सर्व शरीरभर पसरलेल्या असतात. या वातनलिका शरीरांतून भागाभागांतून गेलेल्या असल्यामुळें प्राणवायूचा पुरवठा सर्व भागास अगदीं प्रत्यक्षपणें मिळत असतो. या नलिकाहि एकमेकांत भिनून त्यांचें एक सर्व शरीरभर जाळेंच पसरलेलें असतें. अशा रितीनें प्राणवायूचा पुरवठा असल्यामुळें रुधिराभिसरणाचा व्यूह अथवा शिरा धमन्यांचें जाळें असण्याची जरूरी नाहीं. आणि याच कारणामुळें हृदयाशिवाय इतर रक्तवाहिन्या झुरळांत दिसून येत नाहींत.

वातनलिका परिपूर्णतावस्थेंतील बाह्यास्तरापासून झालेल्या असतात. अर्थात चिटिनचें लवचिक व नागमोडी रीतीनें बनलेलें अंतरवेष्टन त्यांत झालेलें असतें. याच्यामुळें त्यांना ताठ उघडें रहातां येतें.

सूक्ष्मदर्शकांतून एखादी वातनलिका पाहिल्यास हें नागमोडी अंतर्वेष्टन स्पष्ट दिसून येतें.

जनन अथवा प्रजोत्पादन:- संयोगानंतर शुक्रमादींतील शुक्रकोशात सांठविलें जातें. अंडें ५ मि.मि. लांब असून त्याला लालसर तपकिरी कवच असतें; व त्याच्या कडेच्या बाजूस अत्यंत सूक्ष्म अशीं छिंद्रे असतात. योनींतून अंडी बाहेर जातांना शुक्रकोशातून शुक्रबीज येऊन या बारीक छिद्रातून आंत जातात व गर्भीभवन होतें.

एका वेळीं सोळापर्यंत अंडीं घातलीं जातात. हीं संयोगआंकड्याच्या मध्यें पकडलीं जाऊन लुक्कणीपिंडांतील लुक्कणाच्या स्त्रावानें त्यांच्या भोंवतीं एक कोश बनविला जातो. प्रथम हा बीजकोश मादी जननविवरामध्यें आठवडापर्यंत धरून ठेवितें. नंतर चांगलीशी निवार्‍याची जागा पाहून तेथें तो चिकटविते.

उत्तरयूरोपांत अंडीं एक वर्षपर्यंत उबलीं जात नाहींत परंतु हिंदुस्थानांत बीजकोश घातल्यानंतर एक महिन्याच्या आंत झुरळें बाहेर आल्याचें दृष्टीस पडलें आहे. शैशवावस्थेंत यांचा रंग पांढरा असतो. परंतु लवकरच तीं काळसर पिंगट अथवा तांबडीं व्हावयास लागतात. पंखाशिवाय त्यांचे सर्व भाग मोठ्या झुरळाशीं जुळतात. सर्व आयुष्यांत तीं सात वेळां कात टाकतात कांहीं शास्त्रज्ञांच्या मतें हिंदुस्थानी झुरळें पूर्णावस्थेस येण्यास चार वर्षे लागतात परंतु हा सर्व परिस्थितीचा प्रश्न आहे. थंड हवेत पूर्णावस्था प्राप्त होण्यास उष्ण हवेंतील कालापेक्षां जास्त काळ लागतो.

वर्गीकरण:- कीटकवर्गाचें एकंदर आठ गण पाडलेले आहेत, ते असे:-

(१) हीनपक्ष.- (अ‍ॅप्टेरा) यांस पंख नसतात; अंगावर खवले अथवा केंस असतात. रूपांतर अगदीं होत नसतें.  क्वचित नेत्रहि नसतात. उदराच्या शेवटीं कित्येकांनां लांब दोन तीन केंस असतात. उदाहरण- कसर.

ऋजुपक्ष:- (आर्थोंप्टेरा) यास पंखांच्या दोन जोड्या असून पुढलीच्या खालीं मागली जोडी झांकलेली असते. पहिली जोडी कठिण असून दुसर्‍या म्हणजे उडण्याच्या उपयोगी असणार्‍या पंखांच्या जोडीचें रक्षण करण्याचें काम तिच्याकडे असतें. रूपांतर अर्धवट होत असतें. तोंडांत चावून खाण्याच्या दाढा असतात. उदा. – टोळ, झुरळ, गवत्या.

(३) शिराल पक्ष (न्यूरोप्टेरा). पातळ लवचिक पंखांच्या दोन जोड्या, पंखांवर पुष्कळशा शिरा, तोंडांत चावून खाण्याजोगी रचना. रूपांतर कधीं पूर्णपणें होतें तर कधीं अपूर्ण असतें. उदा.- चतूर, वाळवीं.

(४) कवचपक्ष:- (कोलेओप्टेरा) यांची पंखांची पहिली जोडी अत्यंत कठीण झालेली असते. तोंडांत चावून खाण्याची योजना केलेली असते. रूपांतर पूर्णपणें होत असतें. उदा. पिंगळू.

(५) विरलपक्ष (हिमेनोप्टेरा):- पंख अत्यंत पातळ. तोंडांत चावून चाटण्याजोगी रचना. रूपांतर पूर्ण होतें. उ. मधमाशी, गांधीलमाशी, मुंगी.

(६) अर्धकवचपक्ष:- (हेमिप्टेरा) तोंडांत टोंचून शोषून घेण्याजोगी व्यवस्था. पंख कधीं सारखें कधीं विषम. रूपांतर अपूर्ण, उदा. ढेंकूण, उवा.

(७) द्विपक्ष (डिप्टेरा):- पंखांची एकच जोडी तोंडांत निव्वळ चाटून शोषण्याजोगी रचना. रूपांतर पूर्ण. उदा. डांस, माशी, पिसू इत्यादि.

(८) सशल्क पक्ष (लेपिस्टोप्टेरा):- पंखांच्या दोन जोड्या. त्यांवर चित्रविचित्र खवले. पार्श्वोष्ठाची लांबचलांब नळींसारखी शुडा बनणें, रूपांतर पर्ण उ. पतंग. [लेखक- प्रो. व्ही. एन. हाटे; प्रो. टी. जी. यवलेकर].

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .