विभाग अकरावा : काव्य - खतें
कूंग्ययोन- खालच्या ब्रह्मदेशांत हंथवडी जिल्ह्यांतीलस एक तहशील. हिचें क्षेत्रफळ ४३८ चौ. मै. असून खेड्यांची संख्या १२९ आहे. मुख्य ठिकाण कुंग्यगोन. याची लो. सं. १९११ सालीं ८१३४९ होती. १९०३ -०४ सालीं लागवडीचें क्षेत्रफळ २६७ चौ. मै. असून काळीचें उत्पन्न ५,२५,००० होतें.