प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें    

कुटुंब- या शब्दाची व्याख्या काय करावी असा प्रश्नच येतो. सांपत्तिक दृष्ट्या म्हणजे कांहीं वस्तूंच्या मालकीचें अधिष्ठान या दृष्टीनें व्याख्या करूं लागलों तर विवाहित अविवाहित असा भेद करावा लागेल. शिरोगणतीकारांनीं एकत्र वस्ती हें कुटुंबाचें मुख्यत्व मानून हॉटेल हें एक कुटुंब धरलें आहे. येथें स्त्रीपुरुषांची कायदेशीर संयुक्त स्थिति हीच कल्पना घेऊन त्या दृष्टीनें कुटुंबसंस्थेच्या विकासाचें विवेचन करण्यांत येत आहे.

या विषयासंबंधानें यूरोपमध्यें जे विचार प्रचलित होते आणि अर्वाचीन समाजशास्त्रज्ञांकडून जे विचार वदले गेले त्यांचा थोडक्यांत परामर्ष घेतला पाहिजे. यूरोपांतील सामान्यत: प्रचलित कल्पना जेथून उगम पावल्या तीं स्थळें येणेंप्रमाणें:-

एक विचाराचा उगम बायबलापासून होय. यांत सर्व मनुष्यमात्राची उत्पत्ति एका कुटुंबापासून दाखविली आहे. आणि त्या कुटुंबांचें स्वरूप सध्याच्या हिंदु कुटुंबापासून फारसें भिन्न नाहीं. म्हणजें बायबलावर भक्ती ठेवणार्‍या यूरोपियन लोकांची अशी कल्पना होती कीं, सध्याचें कुटुंबाचें जें स्वरूप आहे तें जवळ जवळ अनादि व सनातन आहे. फरक येवढाच कीं, पूर्वीं अनेक बायका एक नवरा करीत असत, परंतु तें सध्यां प्रचलित नाहीं.

आरिस्टॉटलच्या कल्पना हा यूरोपिअन विद्वान लोकांचा विचाराचा आणि माहितीचा दुसरा उगम होय. ऑरिस्टॉटलची कल्पना अशी कीं, कुटुंबापासून ग्राम झाला व ग्रामापासून राष्ट्र झालें व कुटुंबाची उत्पत्ति मालमत्ता, दासदासी इ. यांचें आश्रयस्थान या एका घटकामुळें व मनुष्याचा स्त्रीशीं संबंध या दुसर्‍या घटकामुळें झाली. थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे जवळजवळ एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत म्हणजे नवीन संशोधक येऊन विचारांवर हल्ला करीपर्यंत लोकांची अशी समजूत होती कीं आज कुटुंबाचा जो प्रकार आढळून येत आहे तो पूर्वापार आहे. जुन्या कल्पनांवर ज्या शास्त्रज्ञांनीं मोठ आघात केले त्यांमध्यें मॅक्लेनन बाकोफन मॉर्गन आणि वेस्टरमार्क यांच्या नावांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. घराण्याच्या शासनासंबंधानें शास्त्रज्ञांमध्यें दोन शब्द प्रथमत: प्रचारांत आले. एक शब्द म्हणजे जनकराज्य ऊर्फ पेट्रिआर्की हा होय आणि दुसरा शब्द म्हटला म्हणजे मातृराज्य मेट्रिआर्की म्हणजे मातृकन्या परंपरा हा होय.

विवाह ही संस्था स्थापन होण्यापूर्वीं सर्व पशूंप्रमाणें अनियंत्रित व्यवहार होता असें मत १८६६ पासून १८८० पर्यंत व्यक्त झालें. यांत मॅक्लेनन वगैरे ग्रंथकारांनीं असें दाखवून दिलें कीं, आज ज्याप्रमाणें बापाच्या मार्फत नातें ओळखतां येतें व मानलें जातें त्याप्रमाणें पूर्वीं  मानलें जात नसून केवळ आईमार्फत मानलें जात असे. आईमार्फत नातें मानण्याची चाल पाहून अशी कल्पना काढली गेली कीं मुलाचा बाप कोण हें जेव्हां अनिश्चित असेल तेव्हांच आईमार्फत नातें ओळखण्याची प्रवृत्ति पडावयाची. आज बर्‍याच अंशीं हा पद्धति मलबार येथें आहे हें सांगितलें पाहिजे. कारण मलबारमध्यें बापाच्यामार्फत नातें लक्षांत घेत नाहींत. नंबुद्री ब्राह्मणास ब्राह्मणीपासून झालेला मुलगा आपल्या सावत्र बहिणीबरोबर म्हणजे आपल्या बापाचा ज्या बाईबरोबर ‘संबंध’ झाला असेल त्या बाईच्या मुलीशीं पुन्हा ‘संबंध’ करू शकतो. मुलाची आई कोण याचें ज्ञान प्रत्यक्ष होणे शक्य आहे. परंतु मुलाचा बाप कोण हें केवळ अनुमान आहे. अशा प्रसंगीं आई ही घराण्याची मुख्य समजली जावी हें स्वाभाविक आहे; आणि आई ज्यावेळीं घराण्याची मुख्य असेल त्यावेळेस दुरून अवलोकन करणारास ती परिस्थिति अनियंत्रित व्यवहारासारखी वाटावी यांत नवल नाहीं. आणि मातृशासित घराण्यांत अनेकपतित्व हेंहि असणें स्वाभाविकच आहे. तेव्हां ज्यास अनियंत्रित व्यवहार असें म्हणतां येईल त्या परिस्थितींत आणि मातृशासित समाजांत फारसें अंतर नाहीं. त्याअर्थी समाज मातृशासित होता असें म्हणणें काय आणि स्त्रीपुरुषव्यवहार अनियंत्रित होता असें म्हणणें काय जवळजवळ सारखेंच. स्त्रीपुरुषांचा परस्पर व्यवहार जरी पूर्णपणें अनियंत्रित असला तरी त्याच्या अस्तित्वाबरोबरच मातृशासनाची कल्पना करावयास पाहिजे. कां. कीं. मातृशासनाशिवाय अनियंत्रित स्त्रीपुरुषव्यवहार देखील अशक्य आहे.

ज्या विकसित संस्कृतीविषयीं आपणांस कांहीं ज्ञान आहे, त्या सर्वांत पितृशासित कुटुंबपद्धतीच चोहोंकडे अगदीं ज्ञात कालापासून प्रचलित आहे. याला फक्त मलबारचें उदाहरण अपवाद आहे. मातृशासित कुटुंबपद्धति आज केवळ प्राचीन अवशेषांच्या अनुमानानें काढली आहे. पितृसत्ताक कुटुंबपद्धतींत दिवसानुदिवस फरक एवढाच झाला कीं स्त्रियांच्या व्यक्तित्वाची जाणीव अधिकाधिक होऊं लागली व ती जसजशीं होऊं लागली तसतशी अनेकप नीपद्धति कमी होऊं लागली. स्त्रियांनां गृहव्यवहारांत कसें वागवावें याविषयींच्या कल्पना अधिकाधिक उज्वल होऊं लागल्या. गुलामासारखी जी स्थिति होती ती धाकट्या भागीदारासारखी झाली.

चालू कुटुंबपद्धतींत फारसा फरक पडणें शक्य नाहीं. स्त्रीपुरुष यांची समता पूर्णपणें स्थापिली जाणें शक्य नाहीं. कां कीं स्त्रियांस गर्भारपण व त्यामुळें परावलंबन उत्पन्न होतें. स्त्रियांची पुरुषांपेक्षां प्राप्ती करण्याची शक्ति कमीच असते. जेव्हां ती अधिक असते तेव्हां कुटुंबांत खरें पुढारीपण स्त्रियांसच येतें. तथापि केवळ द्रव्यार्जनावरून कुटुंबव्यवस्थेमध्यें अखेरचा निर्णय ठरविण्याचा अधिकार उत्पन्न होत नाहीं. ज्या स्त्रिया धंदा करीत आहेत आणि त्यामुळें जनतेस जबाबदार आहेत त्या स्त्रियांस विवाह करण्यास उत्तेजन म्हणून मातृसत्ताककुटुंबपद्धतींत कांहीं सुधारणा करून ती पद्धति पितृसत्ताक कुटुंबपद्धतीबरोबरच अर्वाचीन समाजांत चालू करावी अशा तर्‍हेचे विचार प्रगट होऊं लागले आहेत. पण त्या विचारांकडे स्त्रीवर्गाचेंहि लक्ष ओढलें जात नाहीं. [कुल, गोत्र, देवक, “प्रजापतिसंस्था” “मातृकन्यापरंपरा” “यूथावस्था” हे लेख पहा.].

भा र ती य कु टुं ब प द्ध ती चा इ ति हा स.- भारतीय कुटुंबपद्धतीमध्यें विशिष्टपणा असा कांहीं नाहीं. आजचें भारतीय वैशिष्ट्य विवाहविषयक नियमांत आहे. कुटुंबविषयक नियमांत नाहीं. वेदकालापासून आजपर्यंत सर्व समाज पितृसत्ताक कुटुंबाचाच आहे. प्राचीन धर्मशास्त्र पहातां त्यांत अनेक प्रकारचे मानलेले पुत्र (पहा) यांत कदाचित् थोडें वैशिष्ट्य आढळेल. तथापि स्त्रीस्वातंत्र्यनिषेध, नवर्‍याचें महत्त्व, पित्राज्ञेचें महत्व इत्यादि गोष्टींमध्यें कांहीं वैशिष्ट्य नाहीं हें सर्वच ठिकाणीं दिसून येतें. आजच्या परिस्थितीसंबंधानें एवढेंच म्हणतां येईल कीं, उद्योगधंद्यांच्या विकासामुळें येणारी वैयक्तिक जबाबदारी आणि वैयक्तिक अधिकार यांचा अपूर्ण विकास ज्यांत झाला आहे, आणि व्यक्तीस मदत करणार्‍या दानसंस्था वृद्धिंगत न झाल्यामुळें संबंधिजनांचा अन्योन्याश्रय ज्यांत आज अधिक कायम आहे, असा आजचा समाज आहे. अजून कांहीं ठिकाणीं एका घराण्यांतील २५।३० कुटुंबें क्वचित एकाच वाड्यांत रहातात.

समाइक कुटुंबपद्धति रूढ असूनहि घरांच्या संख्येशीं कुटुंबांच्या संख्येचें निकट सादृश असलेलें दिसून येतें. येथें कुटुंब म्हणजे पतिपत्‍नी, त्यांचीं मुलें व आश्रित असा अर्थ यूरोपीय कुटुंबपद्धतीप्रमाणें विवक्षित आहे. हिंदुस्थानांत घरांची संख्या ६३.७ लक्ष असून पंधरा किंवा अधिक वयाच्या विवाहित स्त्रियांची संख्या ६४.६ लक्ष आहे. एकंदर लोकसंख्येच्या मानानें अल्प असलेल्या उच्च जाती सोडून दिल्या तर समाइक कुटुंबपद्धति जितकी सर्वत्र रूढ आहे अशी जी जनसमजूत आहे तितकी ती नाहीं असें दिसून येईल. मुसुलमान, रानटी टोळ्या व हिंदूच्या हलक्या जाती यांमध्यें ही पद्धत क्वचितच आढळते. या सर्व वर्गांत अशी चाल आहे कीं, लग्नें होण्याबरोबर किंवा मुलें होऊं लागतांच तरुण पुरुष आपला स्वतंत्र संसार थाटतात; आणि एकत्र राहिलेले असले तरी कुटुंबांतील कर्ता मयत होतांच ताबडतोब विभक्त होतात. शिवाय बायकांचे अंत:कलह, आपल्या नवर्‍याच्या पैशावर इतरांस आधार मिळतो, याबद्दल त्यांच्यांत दिसून येणारें असहिष्णुत्व आणि सासुरवासांतून मुक्त होऊन स्वतंत्र होण्याची नैसर्गिक वांछा इत्यादि कारणांमुळें समाइक कुटुंबपद्धतींतहि एक प्रकारची विध्वंसक प्रवृत्ति वावरत असते. एखाद्या कुटुंबाची इस्टेट अथवा मालमत्ता समाईकच असते पण चुली मात्र वेगळ्या होतात. जमीनदार व व्यापारी यांच्यांत हा प्रकार असलेला आढळतो. एखादें कुटुंब समाइक पद्धतींचे असूनहि पुष्ळकदां असें घडून येतें कीं, त्या कुटुंबांतील कोणी तरी घरांतून दूर जाऊन आपला संसार करतो व अशा रीतीनें त्या मूळ कुटुंबांचींच तीन किंवा ४ घरेंहि होऊं शकतात. दुकानें किंवा तसल्याच वस्ती नसलेल्या इमारतींनां घरें असें खानेसुमारींत उल्लेखलें आहे. कारण त्या इमारतींची काळजी वहाणारा त्या स्थळीं रात्रीस वस्तीस असतो. दर घरटी सरासरी लोकसंख्या ४.९ इतकी आहे. स्कॉटलंडांत ती ४.८ असून इंग्लंड व वेल्स येथें ५.२ इतकी लोकसंख्या आहे.

कित्येक प्रांतिक अहवालांवरून असें मत बनतें कीं, समाइक कुटुंबपद्धतीची विभक्त व स्वतंत्र होण्याकडे दिवसेंदिवस जास्त प्रवृत्ति होऊं लागली आहे. व्यक्तिस्वतंत्रतेची प्रवृत्ति, एकंदर रहाणींत होणारी वाढ व त्यामुळें एकत्र रहाण्याची आर्थिक स्थितीमुळें अशक्यता, आगगाड्यांमुळें वाढत्या प्रमाणांत होणारें स्थलांतर, इत्यादि कारणांमुळें समाइक पद्धति अशक्य ठरूं पहात आहे. खालील आंकड्यांवरून या गोष्टीची कल्पना होईल. परंतु आंकड्यावर जास्त विश्वास ठेवणेंहि गैरच आहे. दर घरटीं सरासरी लोकसंख्या (१८८१) ५.८, (१८९१) ५.४, (१९०१) ५.२, (१९११) ४.९ होती.
[संदर्भग्रंथ: - लेखांत सर्व आले आहेत.]

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .