विभाग अकरावा : काव्य - खतें
कुट्टापरान्तक- अपरान्तांत जे अनेक भाग प्राचीन काळीं होते त्यांपैकीं एकाला कुट्टापरान्त किंवा कुट्टापरान्तक म्हणत. अपरान्त म्हणजे कोंकण. कुट्ट हा शब्द कुडाळ या शब्दांतील कुड या शब्दाचा पूर्वगामी दिसतो. तेव्हां दक्षिण कोंकणांतील जो कुडाळदेश तोच कुट्ट या शब्दानें प्राचीन किंवा मध्यकालीं प्रथित होता. अन्तक हा उपशब्द आहे. यासच पुढें १३व्या शतकांत (एका ताम्रपटांत) कुडुवलपत्तन असें नांव आहे. मुसुलमानी (बहामनी) अमलांत कुडाळ हें नांव प्रचारांत आलें (कुडाळ पहा) (भा. इ. सं. मं. वा. इ. १८३६).