विभाग अकरावा : काव्य - खतें
कुडवासल- मद्रास इलाख्यांत तंजावर जिल्ह्याच्या नणिलम् तालुक्यांत डेप्युटी तहसिदाराचें ठाणें. येथें जनानी रेशमी वस्त्रें विणलीं जातात. कुडवासल व कुम्भकोणम् ही दोन्हीं नांवें ‘भांडें किंवा पात्र’ या अर्थाच्या तामिळी शब्दांपासूनच निघालीं असल्याचें सांगतात. (कुड=भांडें वासळ=तोंड) व दोन्हीं गांवासंबंधीं दतकथा आहेत. असें सांगतात कीं, विष्णुवाहन जो गरुड तो अमृतकुम्भ (पात्र) घेऊन जात असतां त्या कुंभाचें तोंड येथें पडलें व पात्राचा दुसरा भाग कुंभकोणम् येथें पडला.