प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें  
 
कुडें- मुंबई इलाख्यांतील कुलाबा जिल्ह्यांपैकीं माणगांव तालुक्यांमध्यें, माणगांवापासून ६।। कोसांवर हें ५०० लोकवस्तीचें खेडें, राजपुरी खाडीपासून १ कोसांवर आहे. येथें साधारण २५० फू. उंचीच्या एका टेंकडींत बौद्धांचीं २६ लेणीं व ११ पाण्याचे हौद (कुंडें) आहेत. पहिलीं १५ लेणीं खालीं असून त्यांच्यावर ४० फू. उंचीवर दुसरीं ११ लेणीं आहेत. लेण्यांच्या समोर २।। कोस रुंदीची राजपुरी खाडी असून तिच्या दोन्ही भागास २०० ते ६०० फूट उंचीच्या टेंकड्या आहेत. पूर्वेस तळें व उत्तरेस घोसाळें हे किल्ले आहेत. फक्त ६ व्या लेण्याशिवाय बाकीचीं सारीं लेणीं साधीं व बिन नकशीचीं आहेत. या २६ पैकीं ५ चैत्य असून त्यांत दाघोबा आहेत. बाकीचीं २१ हीं रहाण्याचीं आहेत. त्यात असलेल्या शिलालेखांत त्यांनां लेणीं हा शब्द लाविला आहे. प्रत्येक लेण्यांत साधारणत: पुढील गोष्टी असतात:-  एक पडवी व दार, पाठीमागील भिंतींत एक खिडकी, आंतील खोली (एक अथवा दोन, तीन) व त्यांत निजण्याचे दोन तीन दगडी ओटे. दाराच्या दगडी चौकटींनां भोकें, नरमाद्या वगैरे ज्या खुणा शिल्लक आहेत त्यावरून तेथें लाकडाचीं दारें होतीं व हीं लेणीं केव्हां तरी वापरण्यांत होतीं असें ठरतें. खोल्यांतील बहुतेक दगडी भिंतीना मातीचा व भाताच्या तुसाचा गिलावा केलेला आहे. एवढेंच नव्हे तर, कांहीं भितींवर त्यावेळीं काढलेलीं चित्रें अद्यापीहि शाबूत आहेत. पुष्कळ लेण्यांत शिलालेख आहेत. एकट्या सहाव्या लेण्यांत तर सहा लेख आहेत. यांपैकीं ५ लेख हे इ. स. च्या ५ व्या अगर ६ व्या शतकांतील असून बाकीचे बहुतेक खि. पू. १ ल्या शतकांतील आहेत. त्यांत दात्याचें नांव व देणगीचें (लेणें अगर हौद किंवा चैत्य यांचें) नांव दिलेंलें आहे. बहुतेक दात्यांचीं नांवें बायकांचीं आहेत. त्यांतील एक तर ब्राह्मणाची स्त्री आहे. दात्यांच्या नांवांमध्यें पुष्कळ ठिकाणीं शिव हा शब्द आलेला आहे. हें आश्चर्यकारक आहे. लेणें नंबर १ याचा उपयोग हल्लीं गोठ्यासारखा होतो. येथील पडवींत दोन अष्टकोणी व चौकोनी खांब असून त्यांवर चंद्र किंवा दोन शिंगें कोरलेली आहे. ही खूण (अगर दागिना) फार प्राचीन (ख्रि. पू. १०० – इ. स. २००) काळचा असून, ती कान्हेरी व इतर पश्चिम हिंदुस्थानांतील लेण्यांत आढळते. आंत एक खोली आहे व एक दिवाणखाना आहे. त्यापलीकडे एक गाभार्‍याची खोली असून तिच्या भिंतीचा गिलावा शाबूत आहे. येथें १५X१४।। चौ. फुटाचा साधा असा दाघोबा आहे. या लेण्यांतील पडवीच्या डाव्या अंगास खोलीच्या दारावर एक ठळक अक्षरांचा शिलालेख आहे. त्यांत ‘महाभोजसदगेरी विजय याचा मुलगा जो महाभोज खंडपालित मंडव त्याचा लेखक व सुलसदत आणि उत्तरदता यांचा पुत्र शिवभूति यानें व त्याची बायको नंदा हिनें हें लेणें बांधिलें’ असा मजकूर आहे. दुसरें लेणें पहिल्यासारखेंच आहे; फक्त यांत दाघोबा व लेख नाहीं. तिसरें दुसर्‍यासारखेंच असून डाव्या हाताच्या भिंतीवर पुढील खंडलेख आहे. ‘भूतीचें लेणें.’ चवथ्या लेण्यांत पहिल्या लेण्याप्रमाणें दोन अष्टकोणी व दोन चतुष्कोणी नकशीचे खांब आहेत. यांत एक लहानशी गच्ची व एक ३४ फूट औरसचौरस दिवाणखाना आहे. पांचव्या लेण्यांतील भिंतीचा व छताचा गिलावा शाबूत आहे. पुढील पडवींत एक मोठें कुंड (पाण्यानें भरलेलें) आहे. आंत कांहीं दगडी ओटे व पांच खोल्या आहेत. यांत एकंदर तीन लेख आहेत. पटांगणांत उजव्या बाजूस पुढील अस्पष्ट लेख आहे `दोन कुंडांची देणगी’. यांतच दुसरा लेख आहे, त्यांत शिवदत्त व सातिमिता हीं दात्यांचीं नांवें आलीं आहेत. तिसर्‍या लेखांत पदुमनिका, नागनिका, थेर भदंत, पाटिमित, भदंत आगीमिता, बोधी व अशाल्हमिता हीं नांवें येतात. साहाव्यांत प्रथम एक पटांगण व दोन हत्ती आहेत. त्यांची उंची ११ फूट आहे. डावीकडील हत्तीच्या मागें एक लहान बुद्धमूर्ति कमळावर पाय ठेवून बसलेली आहे. खालीं (धर्म) चक्र, सहा हरिणें व नागांच्या मूर्ती आहेत. या बुद्धाच्या दोहोंबाजूस चवरी वारणारे आहेत. डावीकडचा अवलोकितेश्वर आहे. बुद्धाच्या डोक्यावर मुकुट धरलेले दोन विद्याधर आहेत. खालीं अगदीं अस्पष्ट असा एक संस्कृत लेख आहे. संस्कृत लेखावरून असें दिसतें कीं हे लेख महायानपंथीयांनीं कोरलेले असावेत. पडवींत दोन अष्टकोनीं खांब आहेत. डावीकडील खांबांवर एक बुद्धमूर्ति, चौरंगावर बसलेली (बाकी बहुतेक वर दिल्याप्रमाणें) आहे. खाबाच्या खालीं एक लेख आहे, त्यांत व्याघ्रका हें दान करणार्‍या बाईचें नांव आहे. याच खांबाच्या मागील बाजूस वरील व खालील नकशीकामांत एक ८ इंची व दुसरी ११ इंची अशा दोन बुद्धाच्या मूर्ती आहेत. उजव्या खांबावरहि, माथ्यावर २ बुद्धमूर्ती साध्या आसनावर वसलेल्या व त्यांखालीं तिसरी सिंहासनावर बसलेली (वर सांगितल्याप्रमाणें चवरीवाले, विद्याधर, हरिणें कमळें वगैरेसहित) अशा आहेत. याखालींच एक लेख आहे. त्यांतील दात्याचेंच नांव अस्पष्ट असल्यानें लागत नाहीं. पडवींतील डाव्या बाजूस एक सात ओळींचा शिलालेख आहे. हा जुना असून पालीभाषेंतील आहे. यांत आलेलीं नांवें शिवम्, शिवभूति, विजया, शिवपालित, शिवदत, सपिल, सपा, शिवपालिता, शिवदता व सुलसदता हीं असून, शिवाय पहिल्या लेण्यांत आलेलीं (लेखांतील) हि सर्व नांवें आहेत. या पडवीच्या पलीकडे चौकोनी दिवाणखाना आहे. त्याच्या भिंतीवर ५ व्या किंवा ६ व्या शतकांत खोदलेलें खोदकाम आहे. डावीकडील भिंतींत वरतीं चार बैठ्या बुद्धमूर्ती आहेत. त्या ध्यानस्थ (ज्ञानमुद्रेच्या) आहेत. त्याखालीं आणखी २ मूर्ती याच लेण्यांतील (पटांगणांतील हत्तीच्या मागें असलेल्या) मूर्तींप्रमाणें आहेत. येथेंच आणखी एक २८ इंच उंचीची कमळावर बसलेली बुद्धाची मूर्ती आहे; तिच्याभोंवतीं नागांशिवाय बाकीच्या मूर्तीवर सांगितल्याप्रमाणें आहेत. यांच्यावर एका उठावदार नकसकामांत एक दाघोवा व एक ज्ञानमुद्रांकित (ध्यानस्थ) बुद्ध आहे. या डाव्या भिंतींतील बहुतेक (तिन्हीहि) खोदकामांत लाविलेला रंग अद्यापि थोडा फार शाबूत आहे. उजव्या भिंतीवर डाव्या बाजूला कमळासनावर बसलेला २।। फूट उंचीचा बुद्ध आहे. त्याच्या जवळ चवरीवाले, विद्याधर व नाग हे आहेत. त्याच्या खालीं डाव्या बाजूस एक संस्कृत भाषेंतील ५ व्या ६ व्या शतकांतील शिलालेख आहे; त्यांत बुद्धसंघाचें दाता म्हणून नांव आहे. जवळच बरीचशीं नागांचीं व चवरीवाल्यांचीं चित्रें आहेत. त्याखालीं असलेल्या लेखांत संतदेवाचें नांव येतें. पुढें आणखी एक बुद्धाची मूर्ति कोरलेली आहे. दिवाणखान्याच्या पाठीमागें असलेल्या अष्टकोणी खांबावर मागें सांगितल्याप्रमाणें चंद्र कोरलेले आहेत. जवळच आंतील खोलींत जाण्याचा रस्ता आहे. त्याच्या कटिंजनावर पुढील आकृती कोरलेल्या आहेत. शार्दुल, माणसाळलेला वाघ, वाघाचा पेटा, बैल, जंगली वाघ, हत्ती, काळवीट वगैरे. या बहुतेकांच्या मागें एक बटुमूर्ति यांनां हांकीत आहे असें दाखविणारी आकृति कोरलेली आहे. या भिंतीवर दोन स्त्रीपुरुषांच्या (द्वारपाळाप्रमाणें) मूर्ती आहेत. डाव्या कोपर्‍यांत अशींच स्त्रीपुरुषांचीं आणखी चित्रें आहेत. यांचीं डोक्यावरील आच्छादनें व हात, पाय, कान वगैरेमधील अलंकार पाहण्यासारखे आहेत. पुष्कळांनां कमरपट्टेहि आहेत. आंतल्या खोलींत दगडी ओटे आहेत. या खोलीच्या आंत दुसरी खोली असून तींत अगदीं साधा असा दाघोबा आहे. त्याच्यावर एक छत्री कोरलेली आहे. या लेण्यांतील भिंती, छत व खांब वगैरेवर सर्वत्र गिलाव्याच्या व रंगाच्या खुणा आढळतात. सातव्या लेण्यांत एक पाण्याचें कुंड व दोन अष्टकोणी खांब पडवींत आहेत. येथील भिंतीवर थोडा गिलावा आहे. भिंतीच्या डाव्या शेवटास एक लेख आहे. त्यांत एका वैद्य घराण्यांतील सोमदेव, मामकवेजीय, इसिरखित, नाग, सिवघोष, इसिपालिता, पुसा, धम्मा व सपा इतकीं नांवें येतात. या लेण्याच्या बाहेर दुसरें एक कुंड असून त्यावर एक अस्पष्ट लेख असून कुंडव कुमाराचा त्यांत उल्लेख आहे. लेणें ८ यांत दगडी ओटे, दार व खोल्या वगैरे नेहमींसारखेंच आहे, विशेष कांहीं नाहीं. लेणे ९ यांत एक साधा दाघोबा आहे. भिंतीवर गिलावा दिसतो. पडवीच्या उजव्या टोंकास असलेल्या लेखांत ब्राह्मण उपासक अयीतिलु याची बायको ब्राह्मणी भयिला इच्या देणगीचें चेतियघर (चैत्यगृह) हा मजकूर आहे. लेणें १० यांतील खिडकीजवळील लेखांत वधुक माळ्याचा मुलगा शिवपिरित याचें नांव आहे. हें लेणें साधें आहे. लेणं ११ हेंहि साधें आहे. याच्या आंतल्या खोलींत एक लेख आहे. त्यांत मंडवच्या महाभोजाच्या मुलीचें नांव आहे. लेणें १२ हेंहि साधें आहे. याच्या पडवींत भिंतीवर एका सिंहाच्या चित्राजवळ राजमंत्री हालवी मुलगी गोयम्मा हिचें नांव असलेला लेख आहे. १३ व्या लेण्यांत पडवीच्या मागील भिंतीवर महाभोज सदकर सुदमसन याचें नांव असलेला एक लेख आहे. चौदावें लेणें साधें असून डाव्या बाजूच्या भिंतींवर खिडकीपाशीं लेख असून त्यांत करहाकड (कर्‍हाड)च्या महिक लोहाराचा उल्लेख आहे. जवळच कुंड असून त्यावरील लेखांत वासुलचें नांव कोरलें आहे. याच्याहि पुढें पडकीं अशीं दोन कुंडे आहेत. त्यांपैकीं एकावर एक लेख आहे, तो अस्पष्ट असल्यानें लागत नाहीं, लेणें १५ यांत ४ अष्टकोणी खांब आहेत. याच्या आंत एक दाघोबा आहे. भिंत, छत व खांब यांवरील रंग व गिलावा अजून थोडा बहुत आहे. पाठीमागील भिंतींत डाव्या हाताच्या दरवाजावर एक लेख आहे, रामदत, अधगछक अहिल, वेलिदत, कोची, वेलिदता या चैत्य कोरणारांचीं नांवें आहेत. १६ व्यांत दोन कुंडें व दोनचार खोल्या आहेत. येथें तीन लेख आहेत. दरवाजा व खिडकी यांच्यामध्यें (मागील भिंतीवर) एक लेख आहे, यांत सपिला, विजय, लोहिता, वेनहुया व बोधी हीं नांवें येतात. दुसरा लेख डावीकडील कुंडावर व तिसरा उजवीकडील कुंडावर असून त्यांत मुगुदा माळ्याचें नांव येतें. १७वें लेणें बहुतेक १६ व्या सारखेंच आहे. पुढील खोलींत मागील भितींवरील लेखांत व्यापारी नागाचें नांव येतें. लेणें १८च्या भिंतीवर गिलावा आहे. पडवींत लेख आहे, त्यांत व्यापारी वसुलनक असें नांव आहे. लेणें १९ यांत विशेष कांहीं नाहीं. लेणें २० वें हें बहुतेक पडलें आहे. लेणें २१ यांतील काम अपुरें आहे. त्याच्या दाराच्या डावीकडील कुंडावर लेख आहे, त्यांत १८ व्या लेण्याच्या लेखांतील वसुलनकचें नांव आहे. लेणें २२ यांत पाण्याचें कुंड आहे. बाकी साधें आहे. २३वें यांत एका खोलींत डावीकडील खिडकीवर लेख असून त्यांत पुसनक, वेहमित व सिवदता हीं नांवें येतात. लेणें २४ हें १३ व्या लेण्याप्रमाणें आहे. याच्या दाराच्या उजव्या बाजूस असलेल्या लेखांत अचलदास व असालमित हीं कारणारांचीं नांवें आहेत. २५ वें लेणें पडकें आहे. विशेष कांही नाहीं. लेणें २६ हें २५ ला लागून आहे. दोहोंतील भिंत पडली असून पडवींतींल उजव्या बाजूस एक ओटा आहे. मागील भिंतींत दरवाजा व एक खिडकी असून त्यापलीकडे एक साधी लहान खोली आहे. याप्रमाणें या लेण्यांची माहिती आहे. [बर्जेस- आर्किऑलॉजिकल सर्व्हे, वेस्ट. इंडिया व्हा. ४; केव्ह टेंपल्स; कुलाबा ग्या.].

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .