प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें  
 
कुणबी- कुणबी, कणबी किंवा कुळंबी अशींहि या जातीचीं नांवें आढळतात. मनुस्मृतींच्या ७ व्या अध्यायांत ११९ वा श्लोक व त्यावरील कुल्लूकाची व्याख्या यांच्या आधारें कुळंबी यांची फोड पुढीलप्रमाणें होते. एकेक नांगरास सहा बैल लागतात याला षड्ग व नांगर म्हणतात. अशा दोन नांगरांनीं जेवढी जमीन वाहिली जाईल तेवढील कुल अशी संज्ञा आहे. यावरून कुल हा शब्द मनुसंहितेपासून भारतवर्षांत प्रचलित आहे. या कुल शब्दाचा उच्चार मराठींत आदेशप्रक्रियान्वयें कुळ असा होतो. एका कुळाचा म्हणजे १२ बैलांनीं वाहिलेल्या जमीनीचा जो कर्ता त्यांचें नांव कुळपति. कुळपति-कुळवइ-कुळवी- कुणबी असा हा शब्द बनला असावा. पूर्वी कुणबी ही जात नव्हती तर नुसता धंदा होता. तो सध्यां जात झाला आहे.

गुजराथी कुणब्यांत मूळ गुजर जातीचाच भरणा जास्त आहे. आणि दक्षिणी व कोंकणी कुणब्यांत मराठा जातीचा भरणा आहे. अहमदाबादेकडे बहुतेक कुणब्यांनां (गुजराथींत कुणब्यांनां कणबी असें म्हणतात.) पाटीदार (पाटील) अशी संज्ञा आहे. खेडा जिल्ह्यांत फक्त लेवा कुणब्यांनां पाटीदार म्हणतात व बाकीच्या सर्वांनां कणबी म्हणतात. याशिवाय देसाई, अमीन आणि पटेल याहि अधिकारदर्शक पदव्या तिकडे प्रचलित आहेत. यांचा परस्परांत बेटीव्यवहार होतो. अशा कुणब्यांच्या खालील कुळ्या आहेत. (१) अंजना, (२) डांगी, (३) गुजर, (४) कडवा, (५) लेवा, (६) मातिया, (७) मोमना, (८) पट्टाणी, (९) उड. यांपैकीं लेवा आणि कडवा या दोन जातींमध्यें रोटीव्यवहार आहे पण बेटीव्यवहार मात्र नाहीं. उड हे इतर कोणत्याहि कुळीशीं रोटी व बेटीव्यवहार करीत नाहींत. पट्टाणी हे लेवा आणि कडवा यांच्याबरोबर जेवतात पण लग्न करीत नाहींत. लेवा आणि कडवा हे मतिया, अंजना, मोमना आणि डांगी यांच्याशीं फारसा संबंध ठेवीत नाहींत. धर्माच्या आणि चालीरीतींच्या बाबतींत लेवा, कडवा, अंजना, डांगी, उड आणि पट्टाणी यांच्यांत फारसा भेद नाहीं. मतिया, मोमना या अर्धवट मुसुलमान असल्यामुळें इतर कुळ्यांपेक्षां त्यांचा विधि निराळा असतो. मोठ्या गांवांतील कुणबी हे साधारणत: वाण्याप्रमाणें पोषाख वगैरे बाबतींत दिसतात. खेड्यांतील कुणबी हे वर्णानें जास्त काळे पण मजबूत असतात.

गुजराथी कुणबी हे गुजराथी भाषा बोलतात. यांच्यात सर्वसाधारण पुढील नांवें आढळतात. अम्रा, भीमो, छोटा, दलसुक, हिरा, पुंजा, वाला वगैरे. अलीकडे या नांवाच्या पुढें जी, भाई, दास, लाल आणि चंद हीं उपपदें लावण्याची चाल पडली आहे; जसें भिमजी  इत्यादि. बायकांमध्यें पुढील नांवें सर्वसाधारण आहेत. अंबा, बेणा, दाही, दिवाळी, कुनवर, लाडू, मेघा, रुपाडी, तेजा वगैरे. या नांवानांहि अलीकडे बाई हा शब्द जोडूं लागले आहेत. आईकडून चवथ्या अथवा ५ व्या पिढींपूर्वीं एकच पूर्वज असेल तर दोन घराण्यांत शरीरसंबंध होत नाहीं. सख्या बहिणी सख्या जावा होऊं शकतात. बालविवाहाची चाल सर्रास प्रचारांत आहे. तसेंच बहुपत्‍नीत्वाची चालहि प्रचारांत आहे. मात्र पाटीदार लोक ती फारच क्वचित उपयोगांत आणतात. नवर्‍यानें बायकोला काडी मोडून दिली तर बायकोस कांही एक पैसा द्यावा लागत नाहीं. पण बायकोनें फारकत मागितली तर तिला मात्र नवर्‍याच्या दुसर्‍या लग्नाचा खर्च द्यावा लागतो. मोठीं झालेलीं मुलें हीं बापाजवळ रहातात, व लहान मुलें आईबरोबर जातात. बाईच्या पहिल्या गर्भारपणामध्यें ७ महिन्यांत ज्योतिषानें ठरविलेल्या दिवशीं खोळोभरणीचा (ओटीभरण) विधि करतात. जिची सर्व मुलें जिवंत आहेत अशा स्त्रीकडून गर्भारबाईची ओटी तांदुळ, केळीं, सुपार्‍या, नारळ आणि कुंकू यांनीं भरतात. ही ओटी सात वेळ भरतात आणि आठव्या खेपेस ओटीमधलें तांदुळ मडक्यामध्यें ठेवतात. त्याच मडक्यामध्यें बकर्‍याच्या सात लेंड्या, उंदराच्या सात लेंड्या, कच्च्या सुताच्या सात गुंड्या, वडाचीं सात फळें, सात सुपार्‍या, सात खारका, तांब्याचीं सात नाणीं आणि एक रुपया हीं ठेवतात. मडक्याच्या तोंडाभोंवतीं सुताचा दोरा गुंडाळून त्यावर एक नारळ ठेवतात. नंतर कुलोपाध्यायानें सांगितल्याप्रमाणें ती गर्भार बाई त्या नारळाची आणि सुगडाची पूजा करते. नंतर त्या सुगडामधील तांब्याचे सात पैसे भिक्षुकास देतात. व इतर जिनसांचें व सुगडाचें मोठ्या काळजीनें रक्षण करतात. गर्भारबाईची नणंद तिच्या उजव्या मनगटाला एक चांदीची राखडी बांधते.

ही राखडी ती बाई प्रसूत होईपर्यंत हातांत बांधलेली असते. प्रसूतीनंतर ती राखडी पुन्हां तिच्या नणंदेला परत करतात; व त्याच वेळीं मुलगा झाल्यास आणखी कांहीं नजराणा करतात. गर्भारशीस तिच्या नातेवाईकांकडे डोहाळजेवणास बोलावतात. तेव्हा  एक रुपयापासून पांच रुपयांपर्यंत रोख अगर वस्त्राचा आहेर करतात. याला वायन् असें म्हणतात. पहिलटकरीण स्त्री ही आपल्या माहेरीच बाळंत होते. मूल झाल्यानंतर न्हावी अथवा दुसर्‍या कोणत्याहि जातीचा माणूस ती बातमी मुलाच्या बापास कळविण्यास पाठवितात. त्याच्या बरोबर नूतन मुलाच्या पायाचा कुंकवाचा ठसा कागदावर उठवून पाठवितात. याबद्दल त्याला दोनपासून पांच रुपयांपर्यंत देणगी मिळते. पांचव्या दिवशीं संबंध नाळ कापतात. षष्ठीची पूजा नेहमीप्रमाणें सर्वसाधारणच असते. दहाव्या दिवशीं जरी सोहेर फिटला तरी मुलाच्या बाबतींत २५ दिवस व मुलीच्या बाबतींत ३० दिवसपर्यंत अशुद्ध मानतात. ३५ व्या अथवा ४० व्या दिवशीं बाळंतीण शुद्ध होते. मुलीचा बाप आपल्या नातवास पाळणा वगैरे देतो. नांव ठेवण्याचा विधि यांच्यांत नसतो. ब्राह्मण उपाध्याय सांगेल यावेळीं, सहाव्या किंवा बाराव्या दिवशीं किंवा पहिल्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या महिन्यांतील शुभ दिवशी नांव ठेवतात. बहुतेक कुणब्यांच्या गळ्यांत तुळशीच्या मण्यांची माळ असते. अलीकडे खेडा आणि भडोच जिल्ह्यांतील पाटीदार लोक जानवीं घालूं लागले आहेत. सात पासून अकराव्या वर्षांच्या आंत लहान मुलाच्या गळ्यांत जातीच्या गुरूकडून माळ बांधवितात. लग्नामध्यें मागणीचा प्रकार दोन्हीकडून होतो. वाङ्गनिश्चय वराच्या बापाकडून जर मोडला गेला तर वधूच्या बापानें जो पैसा पूर्वी दिलेला असतो तो त्याला परत मिळतो. परंतु मुलीच्या बापानें वाङनिश्चय मोडला तर मात्र पैसा परत मिळत नाहीं. हुंडा हा कुळिआ अथवा अकुळिआ (कुलवान अथवा अकुलवान) घराण्यावर अवलंबून असतो. वर कुलवान असला तर १ हजारापासून २ हजारापर्यंत हुंडा मिळतो, आणि अकुलवान असेल तर पांचशें पासून हजारापर्यंत मिळतो. पाटीदार लोक अकरा वर्षाच्या आंत, आणि साधे कुणबी ११ ते १६ च्या आंत लग्ने लावितात. लग्न ठरल्यानंतर मुलीचा बाप उपाध्यायाबरोबर लग्नपत्रिका देऊन मुलीच्या बापाकडे पाठवितो. व त्याच्या आईला देण्यासाठीं एक रुपया देतो. लग्नापूर्वीं तिसर्‍या अथवा चवथ्या दिवशीं गणपतिपूजन आणि दोन दिवसांपूर्वी ग्रहशांति हीं दोन्हीं घरीं करतात. लग्नदिवशीं नवर्‍याचा मामा त्याला आणि नवरीचा मामा तिला दागदागिन्यांचा आहेर करितात. मुलीच्या घरीं शमीचा मांडव घालतात. नवरदेव लग्नाला निघण्यापूर्वी त्याच्या डोळ्यांत काजळ घालून आणि कपाळाला कुंकवाचा टिळा लावून त्याच्या ओंझळींत तांदूळ, सात सुपार्‍या, दोनतीन विड्याचीं पानें आणि एक रुपया देतात. ज्वारी, विड्याचीं पानें, मीठ व पैसें वगैरेंनीं त्याची दृष्ट काढतात. पाटीदार लोकांमध्ये नवरदेवाच्या मागें बायका (खुद्द त्याची आईसुद्धां) नसतात. इतर कुणब्यांमध्यें या मिरवणुकींत बायका असतात. वरमाईच्या हातांत दिवा असतो, सीमांतपूजनाच्या नवरदेवाला व त्याच्या वर्‍हाडाला गूळ पाणी देण्याचा हक्क नाव्ह्याचा असतो. लग्नमंडपापाशीं नवरदेव आल्यानंतर नवरीची आई त्याला आंत घेऊन जाते व नांगर, बाण, रवी ह्या तेथें ठेवलेल्या वस्तू त्याला दाखविते व मंडपांत घेऊन जाते. नंतर दोन्हीकडील गणपतिपूजन झाल्यावर नवरदेवाच्या उजव्या आंगठ्याची पूजा वधूचे आईबाप करतात. नवरा आणि नवरी यांच्या गळ्यांमध्यें तांबड्या दोर्‍यांच्या माळा घालतात. त्यांचे हात जोडून त्यावर एक कापडाचा तुकडा घालून परस्परांच्या वस्त्रांची गांठ मारतात. नंतर वधूच्या आईनें केलेली गुळपापडी ही वर आणि वधू यांनां खाऊ घालतात. त्यानंतर नवरदेव हा आपल्या सासूचा पदर धरतो व कांहीं देणगी मिळाल्याशिवाय तो सोडीत नाहीं. यानंतर वधूवर गणपतीची पूजा करतात व येथें लग्नविधी संपतो. लग्नाच्या दुसर्‍या दिवशीं नवरीकडील पुरुषमंडळी नवरदेवाच्या घरीं जाऊन कुसुंबा (अफुचें पाणी) पानविधि करितात. जे कुसुंबा पीत नाहींत त्यांनां केशराचें पाणी प्यावयास देतात. पुढें मुलीचा बाप उपाध्याय, न्हावी, माळी आणि कुंभार यांनां बक्षिसें देतो. त्यानंतर तिसर्‍या दिवशीं नवरीच्या घरच्या मांडवाची पूजा करून नवरदेव नवरीला घरीं घेऊन जातो.

नात्र अथवा पाटाची चाल सर्व कुणब्यांत आहे; पण खानदानीच्या लोकांमध्यें ती क्वचितच उपयोगांत येते. खंबायत प्रांतांत लेवा, कडवा आणि पट्टाणी या कुळ्यांमध्यें धाकट्या दिराशीं पाट लावण्याची चाल आहे. विधवेच्या बापाला २५ पासून ७५ रुपयांपर्यंतची रक्कम भावी (दुसरा) नवर्‍याकडून मिळते. रविवार आणि मंगळवार याच दिवशीं रात्रीं पाट लावितात. विधवेला तिच्या घरून नवर्‍याच्या घरीं नेण्यासाठीं पांच आप्त लोक येतात. वधूवर एकमेकांकडे तोंड करून बसल्यानंतर दोहोंच्यामध्यें मातीच्या परळांत एक दिवा ठेवतात, आणि त्यांनां त्या परळाकडे खालीं पहाण्यास सांगतात. ते तसे पाहूं लागले असतां एकमेकांचीं डोकीं लागलीं म्हणजे हा विधि संपतो. त्यानंतर नवर्‍यानें दिलेल्या बांगड्या ती बाई हातांत घालते. यानंतर कांहीं ठिकाणीं पाण्यानें भरलेली पितळेची घागर डोकीवर ठेवून ती बाई आपल्या नवर्‍याच्या घरांत प्रवेश करते.

वाण्याप्रमाणे आणि इतर पांढरपेशा वर्गाप्रमाणें यांच्यांतहि पुढील अनेक धार्मिक पंथ आहेत. बीजमार्गी, दादूपंथी, कबीरपंथी, माधवगणी, प्रणामी, रामानंदी, स्वामीनारायण आणि वल्लभाचार्यी. कांहीं थोडे फार जैनहि आहेत. मुसुलमान अवलियांनांहि हे मानतात. आपापल्या पंथाच्या देवांची हे पूजा करतात. हे ब्राह्मणाला श्रेष्ठ मानून त्यांचा मान ठेवितात. हे आपल्या धर्मगुरूला लग्न वगैरे प्रसंगीं एक रुपया, आणि कंठी (माळ)धारण प्रसंगीं सव्वा रुपया दक्षणा देतात. यांचा जादूटोणा आणि पिशाच्चादिकांवर भरंवसा असल्यामुळें आजारीपणांत अथवा संकटप्रसंगीं कोळी, वाघ्री अथवा ब्राह्मण जातीच्या देवर्षीचा सल्ला वगैरे घेतात. हे अक्षय्यतृतीयेच्या दिवशीं शेतीच्या कामाला प्रारंभ करतात. विहीर खणतांना किंवा पहिली नांगरट करतांना हळदी कुंकवांनीं जमिनीची पूजा करतात. बागांस प्रथम पाणी देतांना विहिरींतल्या पाण्याची पूजा करून विहिरीजवळ एक दिवा ठेवून तींत खोबरें टाकतात. पक्ष्यांमध्यें नीळकंठ (चास) याला ते पवित्र मानतात. अश्विनांतील वसुबारशींच्या दिवशीं कुणब्यांच्या बायका गाईंची पूजा करून गाईच्या शेणांत सांपडणारें हें धान्य गाईच्या दुधांत मिसळून खातात. यांचीं तीर्थयात्रेचीं ठिकाणें इतर प्रख्यात हिंदू क्षेत्रें आहेतच पण त्यांशिवाय त्या प्रांतांतील आंबाजी, बहुचराजी, डाकूर, द्वारका आणि उनाई या तीर्थांनां ते पवित्र मानतात.

मनुष्य मृत्यूपंथास लागला म्हणजे कुलोपाध्यायाच्या (हा बहुधा औदीच्य ब्राह्मण असतो) हातून अथवा इतर ब्राह्मणाच्या हातून तुपाचा दिवा त्या माणसाच्या अंथरुणाजवळ ठेवतात. प्रेताची हजामत करण्याची चाल यांच्यांत आहे. प्राण गेल्यानंतर जवळचे नातेवाईक मोठ्यानें शोक करतात. त्याला प्राणपोक (मृत जीवाला परत बोलावणें) म्हणतात. अहमदाबादकडील पाटीदार लोकांमध्यें मेलेल्या माणसाचें नांव कोळशानें कौलावर लिहून भंग्याच्या हातीं मेलेल्याच्या आप्तांकडे (तो प्रसंग कळविण्यासाठीं पाठवितात. मृताच्या तिरडीला चारी कोपर्‍याला चार नारळ बांधतात. तिरडीपुढें चालणार्‍याच्या हातांत मडकें किंवा ताब्याचें भाडें असतें. प्रेतामागून बायकाहि कांहीं अंतरापर्यंत जाऊन एके ठिकाणीं थांबून आपली छाती बडवितात व नंतर घरीं येऊन स्नान करतात. चितेवर प्रेताचें डोकें उत्तरेकडे करतात. सर्व प्रेत जळून गेल्यानंतर अग्नीमध्यें थोडेंसे तूप ओततात. तिसर्‍या दिवशीं राख भरल्यानंतर चितेच्या जागीं पाण्यानें भरलेलें एक मडकें ठेवतात. नंतर घरीं आल्यावर एक पाण्याचें मडकें त्यांत थोडेसें दूध घालून तें घराच्या छपरावर ठेवतात. दहाव्या दिवशीं सर्व पुरुष क्षौर करतात. १२ व्या व १३ व्या दिवशीं होणारें श्राद्ध कायतिया ब्राह्मणाच्या हातून करवितात. दहाव्या दिवसापासून तेराव्यापर्यंत भाऊबंद व मित्र यांनां आणि बाराव्या व तेराव्या दिवशीं सर्व जातीला जेवण घालतात. मेलेला माणूस जर वृद्ध असेल तर जातींतील बायका त्यांच्या घरीं सकाळ आणि संध्याकाळ रडण्यासाठीं म्हणून एक महिना जातात, आणि तरुण असेल तर सहा महिने जातात.

अंजना कुणब्यांशिवाय बाकीचे कोणतेहि कुणबी मद्यमांस खात नाहींत.

सर्वसाधारण कुणब्यांचा धंदा शेतीचाच आहे. कांहींजण मात्र कोष्ट्याचा, कापड आणि धान्य विकण्याचा, सरकारी नोकरीचा, व्यापाराचा आणि सावकारीचा धंदा करतात. पुष्कळजण खेड्याचे मुखीया (पोलिस पाटील) असून त्यांनां त्याबद्दल रोख अथवा जमीनीच्या रूपानें मुषाहिरा मिळतो. मुखी हे मातादार अगर वतनदार या वर्गांतून नेमतात. गुजराथी कणबी हे लष्करांत नोकरी करीत नाहींत. कणब्यांपैकीं कडवा आणि लेवा हे दोन वर्ग मालगुजारी करतात.

अं ज ना कु ण बी:- याच्यासंबंधीं माहिती ज्ञानकोश विभाग ७ पान ७७ मध्यें पहा.

डं गी क ण बी.- यांचें ठिकाण महाकांठा. मूळचे अंजनाच आहेत. त्यांची यांची पंगत होते पण लग्नें होत नाहींत. भिल्लांची भाषा आणि पोषाख यांनीं उचलल्यामुळें यांचा दर्जा कमी झाला आहे.

गु ज र क ण बी.- हे पूर्व आणि पश्चिम खानदेशांत आढळतात. यांच्यांत आठ पोटभेद आहेत. ते (१) अनाल, (२) दाळे, (३) दोरे, (४) गरी, (५) कडवा, (६) कापर, (७) लोंढारी, किंवा बाड. (८) रेवा अथवा लेवा. दाळे यांची वस्ती तापीच्या कांठीं शहादे, तळोदे आणि रावेर या तालुक्यांत व बर्‍हाणपूरकडे आहे. जामनेरचा देशमुख हा गरी गुजर आहे असें म्हणतात. परंतु तो स्वत:स रेवा गुजर असें म्हणवितो. इकडील रेवा अथवा लेवा हे गुजराथेंतील लेव्यांपैकीच असावे. ते आपल्याला श्रेष्ठ  म्हणवितात आणि फक्त ब्राह्मणांच्या हातचें खातात. कडवा, अनाल आणि दाळे हे लोक खानदेशांत फार थोडे आहेत. कडवा हे गुजराथेंतील कडव्यांपैकीच असून त्यांच्याप्रमाणेंच बारा वर्षांतून एकदां लग्न करण्याची चाल यांच्यात आहे. जे कापूस लोंढतात (कापसांतली सरकी चरकांतून काढतात) त्यांनां लोंढारी असे म्हणतात. कापर ही कुळीं थोडीशी हलकी मानतात.

क ड वा.- अमदाबाद आणि कडी (बडोदे संस्थानानांतील एक तालुका) या दोन प्रांतांत यांची वस्ती आहे. लेव्यांचा व ह्यांचा निकटचा संबंध आहे. एका दंतकथेवरून कडवा हे सीता आणि राम यांचा मुलगा कुश याचे अनुयायी किंवा वंशज होते व दुसर्‍या दंतकथेवरून पार्वतीनें केलेल्या मातीच्या चित्रांत शंकरानें जीव घालून सजीव केलेल्या प्राण्यापासून यांची उत्पत्ति मानतात. शंकरानें यांनां अहमदाबादेच्या उत्तेस २० कोस असलेलें उंज गांव वस्तीस दिलें. त्या ठिकाणीं एक पार्वतीचें देऊळ बांधलेलें आहे. सर्व कडवा कुणबी या देवळाला आणि खेड्याला आपल्या जातीचें मूलस्थान मानतात आणि आपले नवस फेडण्यासाठीं दूरदूर ठिकाणांहून येथें येतात. त्यांच्या शाखांच्या कांहीं नावांवरून त्यांचें म्हणणें असें आहे कीं, आपण काबूलहून पंजाबामधून गुजराथेंत आलों. यांच्यांत लालचुडावाला (यांच्या बायका लाल बांगड्या वापरतात), काळाचुडावाला आणि अहमदाबादी असे तीन भाग आहेत. लेवा कुणब्यांप्रमाणेंच यांच्यांतहि कुळी आणि अकुळी असे दोन भेद आहेत. उत्तर गुजराथेंत मूल झाल्यानंतर अथवा नवर्‍याची संमति घेतल्याशिवाय बायकोला फारकत मागतां येत नाहीं. यांच्यात ९।१० अथवा ११ वर्षांनीं एकदा लग्न करण्याची चाल आहे. अलीकडे ही चाल मोडून पांच अथवा एक वर्षांवर आणून ठेवण्याचा प्रयत्‍न सुरू आहे. पण सर्व जात ह्या सुधारणेस अद्याप कबूल नाहीं. यांच्यामध्यें मूळच्या ५२शाखा असून त्यांचीं नांवें पंजाबांतील त्या त्या गांवावरून पडलीं आहेत. या शाखांमध्यें गांवांतल्या गांवांत परस्पर बेटीव्यवहार होत नाहीं. हल्लीं सुद्धां हे कडवे आपल्या गांवाच्या बाहेरील दुसर्‍या शाखेशीं लग्न करितात, आणि आपल्याला गावांचेंच नांव धारण करितात; जसें नरोद गांवचे ते नरोदिया.

याप्रमाणें नव्या नव्या शाखा उत्पन्न होणें सुरूच आहे. या एकंदर शाखांचीं नांवें ज्यांनां पहावयाचीं असतील त्यांनीं ती एन्थोवेन याच्या ट्राइब्स् अ‍ॅन्ड कास्टस् ऑफ बाँबे या पुस्तकांच्या दुसर्‍या भागाच्या १४६, १४७, १४८ या पृष्ठांवर पहावीं. यांच्यांत सामाजिक चालीरीती पुष्कळ आहेत. थोड्या वर्षांपूर्वी १।१ महिन्यांच्या, एवढेंच नव्हे तर गर्भांतीलहि मुलांचे वाङनिश्चय लावीत असत. गर्भारशा बायका खरोखरच मांडवांतील बोहल्याभोंवतीं प्रदक्षणा घालून वाङिनिश्चयाचा विधि पार पाडीत. यांच्यांत लग्नें वर सांगितल्याप्रमाणें वार्षिक मुदतीचीं असल्यानें योग्य नवरा मिळण्यास पंचाईत पडते. त्यासाठीं पुढील प्रकार उपयोगांत आणतात. सामान्य लग्नाच्या मुहूर्तावर  मुलीचें लग्न एका फुलाच्या गुच्छाशीं लावतात व मग तो गुच्छ विहिरींत अथवा नदींत फेंकून देतात. यावर ती मुलगी विधवा बनते. यानंतर सवडीप्रमाणें मग तिचें दुसरें (नांवाचें) लग्न किंवा नात्र (पाट) करितात. एखाद्या विवाहित पुरुषाशीं, त्याला थोडेसे पैसे देऊन तिचे लग्न लावितात; परंतु त्याच्याकडून लागलीच तिचा घटस्फोट करून घेतात. लग्नापूर्वी उंजा येथील उमेची पूजा प्रथम करितात. नंतर जोशी लग्नासाठीं मुहूर्त पहातो. तो फाशानें पाहतो. ज्या वर्षावर फांसा पडेल तें अथवा त्यापुढील वर्ष लग्नासाठी ठरवितात. या वर्षांत बहुधां वैशाख तच लग्न लावतात.

ले वा.- हे गुजराथी कुणब्यांत सर्वांत जास्त आहेत. हे सर्वत्र गुजराथेंत (विशेषत: आनंद, नडियाद व बोरसल इकडे) पसरलेले आहेत. कच्छामध्येंहि हलाई व वाघदिआ या नांवाखालीं ते आहेत. गुजराथेंत यांचे पाटीदार व कणबी असे दोन भाग आहेत. पाटीदार हे आपल्या मुली कणब्यांनां देत नाहींत, त्यांच्या मात्र करतात. पुन्हां पाटिदारांत कुळी व अकुळी असून कुळी हे अकुळ्यांनां मुली देत नाहींत; यांच्या बायका बाहेर (बुरख्याशिवाय) पडत नाहींत, तसेंच यांच्यात पाटाची चाल नाहीं. यांच्यांत लग्नास, वाण्याप्रमाणें गोल (खेड्यांचा समूह) आहेत. एकाच गोलांत लग्नव्यवहार होतो. पूर्वी हे कुळी पाटीदार शेतकरी व सरकार याच्यांत मध्यस्त असून कर वसूल करण्यांत रयतेस फार त्रास देत असत. यांच्यांतील लग्नांत अतीशय खर्च करण्याच्या पद्धतींमुळें हे कर्जबाजारी असत. उत्तम कुळाशीं संबंध जोडण्यासाठीं फार चढाओढ लागे व पुष्कळ पैसा खर्च होई.

म ति आ.- मत या शब्दापारून मतिआ हें नांव पडलें. हे लोक जलालपूर आणि बार्डोली या तालुक्यांत असून धर्मानें अर्धवट हिंदू व अर्धवट मुसुलमांन आहेत. यांच्यांतील अडनांवांवरून व पूर्वीच्या लेवा कणब्यांशीं आढळलेल्या नात्यावरून हे मूळचे हिंदू लेवा कणबी हात असें ठरतें. सरासरी तीनशें वर्षांपूर्वीं लेवा कणब्यांची एक टोळी काशीयात्रा करण्यास जात असतां अहमदाबादजवळील गरमठ या गांवीं मुक्कामास राहिली. तेथें इमामशहा नांवाचा एक मुसुलमान फकीर होता. त्यानें चमत्कार करून काशींचे दर्शन त्या टोळीला बसल्या जागींच करून दिलें. त्यामुळें तिच्यापैकीं पुष्कळांनीं त्या फकिराला आपला गुरू केलें अशी दंतकथा आहे. हल्लीं यांच्यांत वैष्णव व पिरान असे दोन भेद आहेत. वैष्णव मतिआंनीं रामानंदी व दादूपंथी हे दोन पंथ स्वीकारले आहेत. हे सामान्य हिंदू उपास तापास पाळतात व यात्रा करतात. वैष्णव मतिआ यांनीं सर्व मुसुलमानी चालीरिती सोडून ते लेवाप्रमाणें वागतात. परंतु लेवा हे त्यांच्याबरोबर भोजन करीत नाहींत. आणि लग्नेंहि लावीत नाहींत. पिरान हे भाषा व पोषाख लेवा यांच्याप्रमाणे करितात. यांच्यांत विधवा हीं धाकट्या दिराशीं पाट लावते. पहिल्या वराला प्रथम शमीशीं लग्न लावल्याशिवाय घटस्फोट केलेल्या स्त्रीशीं अथवा विधवेशीं लग्न करतां येत नाहीं. यांच्या लग्नांत मोध ब्राह्मण लागतात. मतिआ बाईला मूल झाल्यानंतर १२ व्या दिवशीं ती. जवळच्या विहिरीची पूजा करून तिच्याजवळ दोन गवर्‍या एका दोरीला बांधून ठेवते. ती बाई ४० दिवस अशुद्ध असते व घरांतील कोणत्याहि वस्तूस शिवत नाहीं. ४० व्या दिवशीं बाळंतिणीच्या खालींतील जमीनसुद्धां खरडून काढितात, आणि त्याच दिवशीं मुलाचें नांव ठेवितात.

हे स्वत:स अथर्ववेदी म्हणवितात. हे सत्पंथी मताचे अनुयायी आहेत. पिरान, अहमदबाद वगैरे ठिकाणच्या मुसुलमानी पिरांची पूजा करितात. पिरानचा इमामशहा याचें शिक्षापत्री हें धार्मिक पुस्तक ते पूज्य मानतात, आणि ते ज्यांना पाठ येतें त्यांनां काका म्हणतात. हे काका ह्या पंथाचीं सर्व धार्मिक कृत्यें करितात. यांच्यांत पंचिआ (सुरभाईचे अनुयायी). सतिआ (महमूदचे अनुयायी.) अठिया (बाकर अल्लीचे अनुयायी) असे तीन भेद आहेत. पाप नाशार्थ ‘लाहेउतारणी’ हा विधि करतात. हा विधीची साग्र माहिती वर दिलेल्या एन्थॉवेनच्या पुस्तकांत आहे. प्रत्येक मतिआ शेतकरी या काकांच्या तर्फे आपल्या गुरूला अर्धामण धान्य व एक रुपया दर एक नांगरापाठीमागें पाठवितात. हे लोक रमजानचे उपवास व इतर मुसुलमानीं सण पाळतात. मतिआ लोक आपलीं  प्रेतें पुरतात. ते प्रेताला मुसुलमानी धरतीच्या तिरडीमधून नेतात आणि मुसुलमानांप्रमाणेंच त्या प्रेताचें मातींत दफन करतात. नंतर देवाची प्रार्थना हिंदू व मुसुलमान दोन्ही पद्धतीची करितात. हें हिंदुप्रमाणें दहा दिवस सुतक पाळतात. तेराव्या दिवशीं मेलेल्याचा निकट आप्त बर्‍हाणपूर, नवसरी वगैरे ठिकाणच्या त्यांच्या पंथांच्या मुख्य पीरांनां कपडेलत्ते वगैरेंचे नजराणे पाठवितो. हे मद्यमांसनिवृत्त आहेत.

मो म ना.- यांची मुख्य वस्ती कच्छमध्यें आहे. हे मूळचे हिंदू असून वर आलेल्या इमामशहानें यांनां मुसुलमान केलें. इ. स. १६९१ तील मोमनांचे गुजराथेंत बंड झाल्यानंतर कच्छ प्रांतामध्यें रहावयास गेले. यांनां मोमीन असेंहि म्हणतात. यांच्यांतील एका पंथाचा इमाम सद्रुद्दिन होता. हे लोक शेंडीं ठेवितात व गुजराथी भाषा बोलतात, पण यांचा पेहराव मुसुलमानी असतो. हे लोक शेती आणि मजुरी करितात हे नांवाचे शिया पंथी आहेत. यांच्या सर्व चालीरीती व आचारविचार हिंदूप्रमाणेंच आहेत. हे गोकुळअष्टमी, दिवाळी वगैरे सण पाळतात व एकमेकांना भेटण्याच्या वेळीं रामराम करतात. यांच्या जातींतील सर-पंच भुजजवळच्या मानकुव गांवीं रहातो. यांचे जातीविषयक सर्व तंटे तोच तोडतो. हे लोक मुसुलमानांत मिसळत नाहींत, मांस खात नाहींत आणि रमजानचे उपास पाळीत नाहींत. हे आपल्य स्वत:ला लेवा कणबी असें म्हणवितात. यांनां मुसुलमान म्हटलेलें खपत नाहीं. यांपैकीं हल्लीं पुष्कळ स्वामीनारायणपंथी बनले आहेत. यांच्या लग्नांत बोहालें किंवा होम वगैरे नसून वधूवरांच्यामध्यें एका चौरंगावर तीन दिवे ठेवितात. त्यांनां ब्रह्मा, विष्णु व महेश मानून त्यांच्यासमक्ष जातीचा मुखां (मुख्य) हा लग्न लावितो. या विधीला दुव असें म्हणतात. पाटहि याच रीतीनें लावतात. घटस्फोट फक्त नवर्‍यालाच करतां येतो. यांच्या देवळाला खान असें म्हणत असत परंतु हल्लीं ते धर्मशाळा म्हणूं लागले आहेत. या धर्मशाळेंत एका पाटावर एक मातीचा घट ठेविलेला असून त्यांत पिरान येथील माती व पाणी भरलेलें असतें. हे लोक प्रेतें पुरतात; जाळीत नाहींत. भाद्रपदमासीं इतर हिंदूप्रमाणें पितृपक्ष करितात. हे शाकाहारी असून मुसुलमानांबरोबर जेवीत नाहीत. रजपूत दर्जी व लोहार हे यांच्या हातचें खातात.

उ दा.- उदा नांवाच्या एका भगताचे हे अनुयायी असल्यानें यांनां उदा असें म्हणतात. हे कबीरपंथी आहेत. या एकंदर गुजराथी कणब्यांची संख्या सव्वा नऊ लाख आहे. [बडोदा सेन्सस रिपोर्ट १९०१].

म रा ठी कु ण बी- यांची एकंदर लो. सं. वीस लाखांपर्यंत आहे. मराठी कुणबी हे जातीनें बहुतेक मराठे व कांहीं क्षत्रिय आहेत. मराठे म्हणजे तत्रस्थ, त्या त्या गांवच्या जातीचे होत. तळहेरी किंवा कोंकणी कुणबी हे आपल्यास क्षत्रिय न म्हणवितां शूद्र म्हणवितात.

यांच्यांत (१) मराठा, (२) कोंकणी, (३) खानदेशी (४) तलहेरी म्हणजे ठाणे जिल्ह्यांतील व (५) कानड्यातील काळे;  असे पांच भेद आहेत. या सर्वांत अकरमाशे ही एक स्वतंत्र शाखा आहे. हल्लीं मल्हारी कोळीहि आपल्यास कुणबी म्हणंवू लागले आहेत.

कुणब्यांपैकीं थोडेसे लोक दक्षिणेंत पाटील व देशमूख आहेत; कांहीं जण सरकारी नौकर आहेत; पुष्कळजण सैन्यांत शिरले आहेत. हे लोक पैशाच्या दृष्टीनें सुखी आहेत. मात्र जे शेतकरी आहेत ते गरीब आहेत. हे बागाईत उत्कृष्ट करितात. कामांत त्यांनां त्यांच्या बायकामुलांची मदत होते. पुष्कळजण शेतीवर मजुरी करतात. त्यांनां साला(वर्षा)वर पगार ठरवितात. दूध, दहीं, तूप वगैरे विकण्याचाहि धंदा हे करतात. हल्लीं या जातींतील पुष्कळ लोक मुंबईस गिरण्यांत मजूर म्हणून राहूं लागले आहेत.

मराठा कुणबी:- यांच्या देवकावरून हे मराठे जातीचे आहेत असें दिसतें. यांच्यांत ५ या अंकाला फार शुभ मानतात. मराठा व मराठा कुणबी यांत फारसा भेद नाहीं; व असला तरी तो सांगतां येत नाहीं इतका सूक्ष्म आहे. पुण्याकडे “कुणबी माजला, मराठा झाला”  अशी एक म्हण आहे. त्यावरून चांगला ऐपतदार कुणबी व मराठा एकच अशी समजूत दिसते. गरीब मराठा व श्रीमंत कुणबी यांच्यांत सोयरीक होते. कुणब्यांतील अगदीं खालचा गरीब वर्ग हा मूळच्या जातींपैकीं असावा असें कांहींचें म्हणणें आहे. या जातींतील पुरुष व स्त्रिया शरीरानें धट्टे कट्टे असतात. घराबाहेर यांचा पोषाख चांगला असतो. पावसाळ्यांत हे घोंगडी वापरतात. यांची भाषा मराठी आहे. बहुतेक प्रत्येक कुणब्यास एक उपाध्यायानें ठेविलेलें (रासनांव), एक घरांतील माणसांनीं ठेविलेलें व एक टोपण अशीं तीन नांवें असतात. राशीनांवें अशीं:- अमृत्या, बाबाजी, रावजी, सखु, भागु इ. घरांतील नावें वडील माणसें ठेवतात तीं, खंडु, पांडु, रघु, काशी, पार्वती अशीं असतात. टोपण किंवा आवडतीं नांवें बाप अगर मामा ठेवितो. तीं अप्पा, बाबू, बाई, ताई अशीं ठेवितात. यांच्यांत जातगंगा असते व तिचा मुख्य व ती जातिविषयक तंटे तोडतात. हा सरपंच लोकनियुक्त असतो. पैशाचा दंड व जातीस जेवण ही शिक्षा असते. एकाच कुळांत व देवकवाल्यांत सोयरीक होत नाहीं. मावसबहिणीशीं लग्न लावीत नाहींत;  मात्र मामेबहिणींशीं लावितात. सख्या बहिणी सख्या जावा होतात. मुलींचीं लग्नें ३ ते १२ व मुलांचीं १६ ते २५ वयाच्या दरम्यान करतात. ऋतु प्राप्त झाल्यावर सुद्धां मुलीचें लग्न होतें. बहुधा विधुरच विधवेशीं पाट लावतो. पाटाच्या मुलांनां लग्नाच्या मुलांइतका हिस्सा मालमत्तेंत मिळत नाहीं. मूल जन्मल्यानंतर व त्याची नाळ कापल्यावर ती त्याच्या तोंडांत घालून मग ती पुरतात. पांचवी, सहावी व सातवीची पूजा इतरांप्रमाणेंच असते. बाळंतिणीस १२ दिवस कोण्याहि पुरुषाचें तोंड पाहूं देत नाहींत. सहावीच्या दिवशीं जातीस जेवणहि घालतात. बाराव्या दिवशीं सर्व घर झाडून सारवून स्वच्छ करतात. एक बकरें मारून त्याच्या रक्तांत ऊन पाणी व मसाला मिसळतात. याला रक्ती म्हणतात. हाडें व मांस एका भांड्यांत व काळीज दुसर्‍या एका भांड्यांत शिजवितात. नंतर बाळंतीण गांवाबाहेर जाऊन त्याचा नैवेद्य सटवाईस दाखविते. मुलाचें नांव ठेवण्यास ब्राह्मण जोशी लागतो. बाळंतिणीस तिसर्‍या महिन्यांत मुलानें मान सावरावी म्हणून एक बकर्‍याचें मुंडकें शिजवून घालतात व मुलाच्या गळ्यांत बजरबट्टु व ताईत बांधतात. बाळ बाळंतीण देवीच्या दर्शनास जातात. तेव्हां देवीपुढें महार किंवा मांगाकडून एक बकरें मारवितात. त्याचें मुंडकें व चार तंगड्या देवीपाशीं ठेवून बाकीचा भाग प्रसाद म्हणून शिजवून खातात. मुलाचें जावळ एक वर्षांनंतर काढतात. मुलगा सातव्या वर्षी आपल्या बापाबरोबर गुरें चारणीस व शेतांत काम करावयास जाऊं लागतो. लग्नाचा मुहूर्त जोशी ठरवितो. मुलीचा बाप गरीब असेल तर त्याला १०० ते १५० रु. वधुदक्षणा द्यावीं लागते. लग्नविधि बहुतेक मराठ्यांप्रमाणेंच होतो. हळद दळावयाच्या कामांत स्त्रियांप्रमाणेंच पुरुषहि भाग घेतात. वराला स्नान घालण्याच्या वेळीं जोशी हजर रहातो. लग्नापूर्वीं नवरदेवाचा निकटचा आप्त व त्याची बायको हीं एक कुर्‍हाड व १२ ते १५ हात लांबीचा दोर व जें देवक असेल तें घेऊन मारुतीच्या देवळांत जाऊन पांच पालवीची विधी करतात. लग्न लावण्यास ब्राह्मण लागतात. लग्न झाल्यानंतर सुतवणें हा विधि करितात व त्यानंतर कन्यादान होतें; तें मामा करतो. लग्नाच्या तिसर्‍या चवथ्या दिवशीं वराचा बाप गांवांतील बलुतेदारांच्या बायकांनां खण किंवा पैसा देतो. पुढें वर व वधु यांचे आईबाप परस्परांस पोटझांकणीचा अहेर करितात. झालीच्या वेळीं नवरदेवाच्याकडील एक माणूस झाल पळवून नेतो, त्यास वधूकडील माणसें कांदे फेंकून मारतात. यावेळीं वर वधूच्या देवघरांतील एखादा देव चोरून घेतो व सासर्‍यानें कांहीं बक्षिस दिल्याखेरीज तो परत करीत नाहीं. नवरीला घरीं आणल्यानंतर वराच्या घरीं खंडोबाची तळी भरतात व झेंडानाच करितात. पाटाची चाल हलकी मानतात. पाट लावणार्‍या नवर्‍यासहि कमी लेखतात. पाट शेतांत व अंधार्‍या रात्रीं लागतो. त्यावेळींहि तो ब्राह्मण लावतो. वधूवर पश्चिमेकडे तोंडें करून उभीं रहातात व ब्राह्मण मंगलाष्टकें म्हणून पाट लावितो. त्या रात्रीं तें जोडपें शेतांतील झोंपडीतच राहतें. ब्राह्मण त्यानंतर सचैल स्नान करतो. बहुतेक कुणबी माळकरी अगर वारकरी आहेत. सर्व हिंदू देवतांची ते पूजा करितात. शिवाय ग्रामदेवतांचे टांक करून ते पूजतात. हे भैरवाला कौल लावून बरेंवाईट पाहतात. वर्षांतून दोनदां पेरणी-कापणीच्या वेळीं हे भैरवाची पूजा करितात व कोंबडें अगर बकरें मारितात. याचप्रमाणें देवीचीहि पूजा करितात व भग(बळी)देतात. गुरावर अगर माणसांवर रोग पसरविणार्‍या जखाई, जोखाई अशा कांहीं देवी आहेत व त्यांनां संतुष्ट ठेवल्यास त्यांच्या पासून भीति नसते असें हे मानतात. खंडोबा हेंहि याचें एक प्रमुख दैवत आहे. कोण्या शत्रूवर रोग घालवावयाचा असेल अगर त्याचें वाईट व्हावें असें वाटल्यास, हे लोक म्हसोबास तसें संकट घालतात व हेतु पुरा झाल्यावर कोंबडें अगर बकरें कापतात. म्हसोबाप्रमाणेंच वेताळालाहि शत्रूच्या मागें लावतात. त्यांची जत्रा महाशिवरात्रीस असते. सर्व हिंदू सण हे पाळतात. कुणबी बायांचा नागपंचमी हा मोठा सण आहे. त्यादिवशीं त्या सापाच्या वारुळापाशीं जाऊन त्याची पूजा करून त्याभोंवती फेर धरून नाचतात व गातात. पुरुषांत पोळ्याचा सण मोठा असतो. नांगरण्यापूर्वीं जमीनीची पूजा करितात. भाताच्या पेरणीच्या वेळीं भैरोबाची पूजा करून जातिभोजन घालतात. पेरणीपूर्वीं प्रत्येक मंगळवारीं एखादें कोंबडें मारून शेतांत त्याचें रक्त शिंपडतात. तसेंच तिवड्याच्या खालीं तें आपापलीं देवकें पुरतात. आणि सात दगड (पांच पांडव व दोन वनदेव) मांडून त्यांची पूजा करितात. भात कापण्यापूर्वी त्याची गरी घातल्यावर व तें झोडल्यावर अशा प्रत्येक वेळीं, या सात देवांना कोंबड्या बकर्‍यांचा बळी देतात. धान्य मोजण्याच्या वेळीं व वरील सर्व वेळीं बहुधा उपाध्याय हजर असतो व त्याला त्यावेळीं दक्षणा देण्यांत येते. ज्योतिबा, नरसोबाची वाडी, पंढरपूर वगैरे ठिकाणीं हे यात्रेस जातात. याचा मंत्र, जादु टोणा, भूतेंखेतें मुहूर्त, शकुन यांवर विश्वास आहे. साधीं दुखणीं हीं त्यामुळें येतात असें ते मानतात. त्याबद्दल देवांस कौल लावणें जाणत्या (मंत्रज्ञा)ची आज्ञा ऐकणें, कोळ्याच्या हातचें पाणी पिणें वगैरे उपाय करितात. भूत, झेंटिंग व हडळ यांचीं यांना (आपल्या गुराढोरांस व बायकांमुलांस त्रास होईल म्हणून) फार भीति वाटते, कुणबी केव्हांहि दुसर्‍या कुणब्याच्या ऐश्वर्याची, गुराढोरांची किंवा सुंदर स्त्रियांची स्तुति करीत नाहीं; कारण, तसें केल्यास नेहमीं वावरणारीं भुतेंखेतें ती ऐकून त्यांच्या पाठीस लागून त्यांचा नाश करितील. यांचा उपाध्याय देशस्थ ब्राह्मण व गुरु बहुधा गोसावी असतो. हे प्रेतें जाळतात. प्रेताच्या तोंडावर गुलाल व विड्याचीं पानें ठेवतात. आणि शेजारीं भात, एक पैसा व चतकोर भाकरी ठेवून मग नेहमीं प्रमाणें प्रेत स्मशानांत नेतात; विसाव्याच्या जागीं प्रेत ठेविल्यावर वरील भात, पैसा व भाकरीचा तुकडा सर्व दिशांस फेंकतात व एक दगड उचलून त्यास जीवखडा म्हणतात. बाकीचा विधि सर्वसाधारण असतो. दुसर्‍या दिवशीं हे लोक राख भरतात व तेथें २ भाकर्‍या व दोन मडकीं पाण्यानें भरून ठेवितात. तिसर्‍या दिवशीं खांदेवाल्यांना खोबरें खावयास देऊन त्यांच्या खांद्यास तेल चोळतात. दहाव्या दिवशी व पुढें मराठ्याप्रमाणें सर्व क्रिया करतात. ब्राह्मणांत जसा अश्मा असतो तसा यांच्यात वरील जीवखडा असतो. तेराव्या दिवशीं उपाध्यायास दक्षिणा देऊन कावळ्यास भात खाऊं घालतात. दर महिन्यांस एक माणूस (पितर म्हणून) पांच महिन्यापर्यंत जेवावयास घालून पांचव्या महिन्यानंतर आप्तेष्टांस जेवणावळ देतात. हे मांसाहारी व मद्यपी असून बकरीं, मेंढ्या, ससा, हरिण व मासे वगैरे खातात. यांचें मुख्य अन्न म्हणजे ज्वारी, तांदूळ व शाकभाजी हें होय.

कों क णी कु ण बी.- मुख्यत: रत्‍नागिरी व कुलाबा या जिल्ह्यांत हे आहेत यांनां सामान्यत्वें तिळोरी असें म्हणतात. ते आपण क्षेत्रिय असल्याची प्रौढी मिरवत नाहींत; क्षुद्रत्वांतच समाधान मानतात. ज्यांच्या बायका जास्त बळकट असतात. भाषा कोंकणी मराठी. यांच्यांत कुळें नाहींत. एकाच आडनांवाच्या घराण्यांत लग्नें होत नाहींत. हे पाटाची चाल कमी मानीत नाहींत; मात्र घटस्फोटाची चाल बंद आहे. लग्न मराठा कुणब्याप्रमाणेंच होतात. पाट मात्र भावी नवर्‍याच्या घरीं लागतो. यांच्या बहिरी, झुगाई, नवलाई वगैरे कोंकणी मुख्य देवता आहेत. भूतपिशाच्चांवर यांचा भरंवसा आहे. यांचे उपाध्याय चित्पावन, कर्‍हाडे अगर देवरुखे ब्राह्मण असतात. ह्यांचें मुख्य अन्न नागली व वरी होय. हेहि मराठा कुणब्यांप्रमाणें मद्यमांसाहारी असून त्यांच्याच सारखे बकरीं मासे वगैरे खातात.

का ळे कु ण बी- हें वर्णानें काळे असल्यानें यांनां हें नांव मिळालें असून हे बेळगांव व कानडा जिल्ह्यांत आहेत. यांनां कोंकणी असेंहि म्हणतात. हे मूळचे गोव्याकडील असून पोर्तुगीजांच्या धर्मच्छळामुळें हे या प्रांतांत (१६ व्या शतकांत) आले असें सांगतात. यांची भाषा कोंकणी आहे. यांच्या वस्तीच्या प्रत्येक गांवीं एक मिराशी व एक गावडा असतो. मिराश्याचें काम धार्मिक व गावड्याचें सामाजिक असतें. प्रथम मिराशी आपल्या शेतांत नांगर घालील तेव्हां बाकीचें गांवांतील सारे कुणबी नांगर घालतात व त्यापूर्वीं मिराशाला नारळ वगैरे देतात. तसेंच कुणब्यानें मारावयाच्या प्राण्यांची मान कापण्याचा हक्क या मिराशाचा असतो. गावड्याच्या वर (१०।१५ खेड्यांचें गावडे मिळून) एक करियदी गावडा असतो. या करियदी गावड्यावर एक प्रधान गावडा व दुसरा सर किंवा राजगावडा असे २ अधिकारी असतात. किरकोळ सामाजिक गोष्टी जातसभा करियदी गावड्याच्या अध्यक्षतेखालीं भरवून निश्चित करतात. मोठ्या भानगडीच्या गोष्टी व तंटे मोठी सभा राजगावड्याच्या अध्यक्षत्वाखालीं भरवून निकालांत काढतात. राजगावडा हा निकालाच्या बाबतींत अखेरचा अधिकारी आहे. त्यानें दिलेला निकाल वादीप्रतिवादींनां कळविण्याचें काम प्रधानगावड्याचें असतें. यांच्यात पुष्कळ कुळें आहेत. त्या प्रत्येकाची देव देवता निराळी आहे. एका कुळांत सोयरीक होत नाहीं. यांच्यांत लग्नांत लिंगायत किंवा ब्राह्मण उपाध्याय असतो. वराचा बाप वधूच्या बापास १२ रु. २० मण धान्य व पोषाख देतो. वधूवरांनीं जोडलेल्या हातावर पाण्याची धार सोडली म्हणजे त्याला धारे म्हणतात व हाच लग्नांतील मुख्य बंधनकारक समारंभ होय. हे पाटाला कमी लेखतात. घटस्फोटाची बंदी आहे. यांचा धर्म बहुतेक पिशाच्चपूजेवर अवलंबून आहे. स्वर्गनरकादि कल्पना त्यांनां ठाऊक नाहींत. मृत्यूनंतर प्रत्येक माणूस त्याच्या पापपुण्याप्रमाणें वाईट अगर चांगलें भूत बनतो असें त्यांचें मत आहे. यांनां नैवेद्य देणें झाल्यास मिराशी व घाडी यांच्या हातून दाखवितात. सर्व दु:खें या भूतांपासून होतात असें ते मानतात. यांच्यापैकीं कांहींवर लिंगायतपंथाचा पगडा बसला असल्यानें ते जंगल उपाध्ये नेमतात व बसव आणि नंदी यांची पूजा करतात. प्रेतें बहुधा पुरतात. गर्भारशी अगर बाळंतीण मेल्यास तिला रहात्या खेड्याच्या बाहेर दूर पुरतात; कारण तिचें भूत जबरदस्त असतें. तिला पुरल्या जागेपासून घरापर्यंत भाजलेले तांदूळ अगर दुसरें धान्य फेंकतात. याचें कारण त्या भुताला सांगतात कीं जोपर्यंत हें धान्य उगवणार नाहीं तोपर्यंत तूं खाड्यातून उठूं नको.' वास्तविक तें धान्य भाजलेलें असल्यानें केव्हांच उगवणार नाहीं व त्या जबरदस्त भुतानेंहि आपल्या खाड्यांतून केव्हांच उठूं नये असा हेतु असतो. यांचें सुतक ३ दिवसच असतें. हे वन्यपशुपक्षी यांचें मांस खातात; पाळीव जनावरांचें खात नाहींत. बदकें, कोंबडीं वगैरेंना हे फार अशुद्ध मानतात. त्यांनां स्पर्श झाला तर हे स्नान करतात किंवा अंगावर गोमूत्र शिंपडतात. हे मद्यपान मुळींच करीत नाहींत. फक्त ब्राह्मणांच्या हातचें हे खातात.

त ल हे र कु ण बी.- ठाणें जिल्ह्यांत तळघाटाखालीं यांची मुख्य वस्ती आहे. तळचे ते तलहेरी होत. यांच्यांत कांहीं स्थानिक, व कांही गुजराथेंतून व महाराष्ट्रांतून आलेले असे दोन वर्ग आहेत. स्थानिक कुणबी यांच्यांत व सोनकोळ्यांत फारसा फरक नाहीं. देवकांवरून व चालीरीतींवरून मराठे व कुणबी ओळखूं येतात. यांच्यांत रोटीबेटीव्यवहार होतो.

खा न दे शी कु ण बी.- यांच्यांत सात शाखा आहेत. (१) घाटोळे, हे अजंठाघाटावरून आले. हे तिरोळेबरोबर जेवतात पण लग्नें लावींत नाहींत. (२) लोणी, यांनां मूळचे रहिवासी (अनार्य) मानतात व ते गिरणा व तापी कांठीं रहातात. हे तिरोळे, पांजणे, गुजर व वाणी यांच्या हातचें खातात. मात्र आपआपल्यांतच लग्नें करतात. (३) कुंभार, ही शाखा फार थोडी व अतिशय दरिद्री आहे. (४) वंजारी, हे मूळचें चारण वणजारी जातींचे होते पण हल्लीं बरींच वर्षें त्यांनीं इकडे वस्ती करून व शेती करून आणि यांच्या चालीरीती उचलून स्वत:स कुणब्यांत गणून घेतलें आहे. (५) पांजणे, यांच्यांत चार पोटभेद आहेत ते कंडारकर, नवघरी, रेवे व थोरगव्हाणे हे होत. यांत मुख्य रेवेच असून बाकींच्या तिघांची उत्पत्ति भांडणतंट्यामुळें झाली आहे. सावदे तालुक्यांतील थोरगव्हाण या गांवचे ते थोरगव्हाणे व भुसावळ तालुक्यांतील कंडारीगांवचे ते कंडारकर होत. मुख्य जातींतून फुटलेल्या नऊ घरांच्या वंशजांपासून नवघरी निघाले. हल्लीं ते या जिल्ह्यांत सर्वत्र थोडथोडे आहेत. (६) तिडोळे किंवा तिरोळे, हे मूळचे उत्तर उत्तरहिंदुस्थानांतींल असून दादर पवार या जातीचे वंशज होत असें म्हणतात. (७) मदराज ही सातवी शाखा आहे. या सातीहि शाखा एकमेकांच्या हातचें खातात, पण आपलीच शाखा इतरांपेक्षां श्रेष्ठ आहे असें मानून परस्परांत लग्नें मात्र लावीत नाहींत. ज्ञानेश्वरींत ‘कुणबट कुळवाडी' हा शब्द येतो.

व र्‍हा डी कु ण बी.- मध्यप्रांतांत व वर्‍हाडांत यांची लो. सं. १४ लाखांवर असून गोंडाच्या खालोखाल यांचीच वस्ती त्या प्रांतांत फार आहे. हे गुजराथेंतून खानदेश व खानदेशांतून या प्रांतांत पुष्कळ वर्षांपूर्वीं आले (१४ वें शतक). मराठी राज्य झाल्यावर यांची भरती फारच झाली. इकडील कुणब्यांत पुढील शाखा आहेत. (१) झाडे, हे अगदीं प्रथम आलेले असून यांच्यांत गोंड रक्तांचें मिश्रण आढळतें. (२) मानवा, हे चांद्याकडे आढळतात, यांच्यांत माना लोकांचें मिश्रण सांपडतें. हे लग्नकार्यांत ब्राह्मणांस बोलावीत नाहींत. यांच्या बायकांचा पोषाख गोंड बायकांप्रमाणें असतो. (३) खैरे व (४) धानोरे (धनगरापासून झालेले) यांनां इकडे हलके समजतात. (५) तिरोळें, हे उच्च जातीचे असून यांच्यांतच देशमुखादि वतनदार आहेत. (६) छिंदवाड्यांत गाढव जातीचे कुणबी आहेत. हे पूर्वीं गाढवें पाळीत. नेमाडांत गुजर कुणबी आहेत. या कुणब्यांत लग्नप्रसंगीं न्हावी व धोबी यांचें फार महत्व असते. न्हावी वधूवरांचे पाय धुवून सर्व वर्‍हाडाला कुंकू लावतो. तिरोळे जातींत हगरे, आगलावे वगैरे ६६ कुळें आहेत. नवरदेव लग्नास निघाला म्हणजे त्याच्या हातीं शिदोरी बांधलेली एक कुदळ असते. थाटाच्या लग्नास लालव्याह व गरीबीच्या लग्नास सफेदव्याह म्हणतात. नेमाडमधील कारवा कुणबी हेहि गुजराथी कुणब्यांप्रमाणें १२ वर्षांनीं एकदाच घरांतील व जातींतील सारीं लग्नें उरकून घेतात. सिंहस्थांतच लग्नें झालीं पाहिजेत असा त्यांचा नियम आहे. लग्नाच्या दिवशींच एखादी बाई बाळंत होऊन तिला मुलगी झाली तर त्या जन्मलेल्या मुलीचें लग्न तिच्या १२ व्या दिवशींच करतात. कुमारीनें व्याभिचार केल्यास प्रायश्चितानें ती शुद्ध होते. तिरोळ्यांत व वांदेकरांत राख ठेवण्याची चाल आहे. पाट लावण्याच्या वेळीं भावी वर आपल्या उजव्या पायानें चौरंगावर (विधवेच्या पहिल्या नवर्‍याच्या नांवानें) ठेवलेली एक सुपारी उडवितो व मग न्हावी ती अडकित्तानें फोडतो. यानें पहिल्या नवर्‍याच्या पिशाच्याचा कांहीं अडथळा होत नाहीं असें म्हणतात. मूल होईनासें झाल्यास यांच्या बायका अनेक जादूटोणे करतात. हे लोक प्रेतें जाळतात व पुरतातहि. विधवा आपलें मंगळसूत्र तोडते. मात्र १२ व्या दिवशीं पुन्हां बांगड्या भरते. पोळ्याचा सण हा यांच्यांत मुख्य आहे यांच्यांत मुसुलमानी चाली बर्‍याच शिरल्या आहेत. यांचीं घरें बहुधां कुडाचीं असतात. हे पावसाळ्याचे ४ महिने खेरीजकरून बहुधां नेहमीं शेतांत निजतात. हे मांसभक्षक आहेत. मध्यप्रांतांतील पोटजाती आपापसांत बेटीव्यवहार करीत नाहींत. [बाँबे ग्याझे. पु. १८ ट्राईब्स अँड कास्ट्स् ऑफ बाँबे व्हा. २; सी. पी. इ.]

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .