प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें     

कुत्बशाही- हें राज्य म्हणजे प्राचीन वरंगळचें काकतीयांचेंच राज्य होय. तें १४२३ मध्यें अहमदशहा बहामनी यानें बुडविलें. हा प्रदेश गोदा व कृष्णा यांच्यामधील होय. पूर्वेस बंगालचा उपसागर व पश्चिमेस बेदरीराज्य ही त्याची हद्द होती. प्रदेश मूळचा फार सुपीक होता, हिंदू व मुसुलमान राजांनीं कालवे खणून जास्त सुपीक केला. यांच्यावर इराणांत जन्मलेल्या एका तुर्की सरदाराला महंमद गवान यानें सुभेदार नेमिलें. याचें नांव कुत्बुद्दीन (कुत्बउल मुलक,) याला इराणांतून इकडे आल्यानंतर प्रथम महंमदशहा बहामनीनें आश्रय दिला. पुढें वाढत वाढत कुत्ब उल् मूल्क हा वर सांगितल्याप्रमाणें सुभा झाला. याला १४९३ त जामकोंडाचा किल्ला घेण्यास पाठविलें असतां तेथें तो मेला. त्यानंतर त्यांचा मुलगा सुलतान कुली याला याच्या पदव्या व अधिकार मिळाले व गोवळकोंड्याची जहागीर मिळाली. गवानला अन्यायानें फांसावर चढविल्यावर यानें बेदरचा संबंध सोडला आणि १५१८ त स्वतंत्र होऊन सुलतान कुलिकुत्बुशहा ही पदवी घेतली व कुत्बशाहीचा संस्थापक झाला. हा पराक्रमी व महत्त्वाकांक्षी होता. यानें राज्यविस्तार बराच केला. गोवळकोंडा येथें त्यानें राजधानी केली. प्रथम हें लहान खेडें होतें तें त्यानें वाढविलें. मुसुलमानी धर्माचा तो अभिमानी होता व त्यामुळें तो हिंदु प्रजेस त्रासहि देई. त्यावरून कमामेंत कंडापिली व ओढ्या या प्रांतांच्या हिंदू राजांशीं त्याच्या लढाया होत. विजयानगरच्या कृष्णानें याचा १५१६ त पराभव करून त्याचा पुष्कळ देश काबीज केला होता. बेरिदशहा व आदिलशहा यांच्याशींहि त्यानें लढाया मारल्या होत्या. शेवटीं शेवटीं त्याचा मुलगा जमशीद यानें बंड केलें असतां त्यास यानें कैदेंत ठेविलें. एकदा शहा एका मशीदीची बांधणी पहात असतां जमशीदच्या सांगण्यावरून कोतवाल हमदानी यानें जंबियानें त्याचा खून केला. त्यावेळीं तो ९० वर्षांचा होता; त्यानें साठ वर्षें (१६ वर्षें सुभेदारी व ४४ वर्षें स्वतंत्र) राज्य केलें. याची कारर्कीद १५१२-१५४३ च्या दरम्यानची होय.

ज म शी द.- (१५४३-१५५०) यानें वडील भावास कैदेंत टाकून व त्याला आंधळें करून तख्त बळकाविलें. यानें आदिलशहावर स्वारी केली. तींत याचा पराभव झाला; त्यामुळें पुढें तो स्वार्‍यांच्या भानगडींत पडला नाहीं. तो बहुधा विलासांत निमग्न असे. शेवटीं हा १५५० त मेला. याच्या कारकीर्दींत जगदेवराव (निंबाळकर?) हा मराठा सरदार फार पुढें आला. जमशीदनंतर त्याचा मुलगा सुभान गादीवर आला. परंतु थोडक्याच दिवसांत तो पदच्युत झाला.

इब्राहिम.- (१५५०-१५८०) हा जमशीदचा भाऊ; जमशीदच्या धाकानें विजयानगरच्या राजाजवळ आश्रयास होता. याला जमशीदच्या मरणानंतर दरबारी मंडळीनें (सुभानला काढून) गादीवर बसविलें. हा कृतघ्न होता. ज्या विजयनगरकरांनीं त्याला आश्रय दिला त्याच रामराय राजाविरूद्ध हा इतर मुसुलमान शहांनां सामील होऊन त्यानें विजयनगर बुडविलें. व उपकारकर्त्याचें ऋण अशा रीतीनें फेडलें. हुसेन निजामशहाचा हा स्नेही होता.

यानें १५६४ त राजमहेंद्रीवर चढाई केली. परंतु तेथील हिंदु राजांनीं त्याचा पराभव केला. प्रथम रामराजाचा व आदिलशहाचा स्नेह होता, पण तोहि शेवटीं रामराजांच्याविरुद्ध गेला. इब्राहिमनें बेरिदशहावर अपराधापासून स्वारी केली असतां रामरायानें त्याचा निषेध केला होता. तें शल्य त्याच्या मनांत सलत होतें. मागें सांगितलेल्या जागदेवरायानें याला गादीवर बसविण्यांत श्रम केल्यानें त्याला यानें दिवाण केलें. त्याच्या हाताखालीं रायाराव नांवाचा एक प्रख्यात मराठा सरदार होता. यावेळीं राज्यांत मराठ्यांचें प्रस्थ फार माजलें होतें तें मुसुलमान लोकांनां न रुचून त्यांनीं जगदेवाबद्दल शहाचे कान भरले. तेव्हां शहाची त्याच्यावर गैरमर्जी झाली. जगदेव गोवळकोंड्याहून निघून शहाचा प्रांत उद्ध्वस्त करीत वर्‍हाडपर्यंत गेला. बुर्‍हाणच्या निजामानें त्याला आश्रय दिला; परंतु पुढें तेथून तो निघाला व पुन्हां कुत्बशाहींत लुटालूट करूं लागला. त्याच्या पदरीं आरबी, इराणी, हबशी, मराठे वगैरे फौज होती. इब्राहिमला त्याच्याशीं सामना देववेना. इब्राहिम व हुसेन निजाम यांनीं आदिलशहावर स्वारी केली. तेव्हां जगदेव व विजयानगरकर रामरायाचा भाऊ व्यंकटाद्रि हे आदिलशहाला मिळून त्यांनीं या स्वारी करणार्‍यांचा पराभव केला. जगदेवानें पुढें तर कुत्बशहाचे बहुतेक किल्ले व प्रांत घेतले. तेव्हां नाइलाजानें इब्राहिमनें त्यांच्यांशीं तह केला. इब्राहिमनें यानंतर ओढ्या, चंद्रबार व कंडदेव पल्ली येथील हिंदु जमीनदारांनां आपले मांडलिक बनविले. याचा दिवाण मुरारराव म्हणून होता. त्यानें प्रजेस फार त्रास दिला. शहा १५८० त मेला. त्याला एकंदर तीस मुलें झालीं त्यानें लढाया बर्‍याच मारल्या. तो विद्वान होता व प्रजाहिततत्पर होता. त्यानें बर्‍याच सुंदर इमारती बांधल्या. गोवळकोंड्याचा तट इब्राहिमबाग, फुलबाग, इब्राहिमतला, हुसेनसागर, वडवलचा बंधारा, पाठशाळा वगैर कामें यानें केलीं. व्यापारास यानें चांगलें उत्तेजन दिलें. न्यायहि तो बरा करी. यानें वडील मुलास वीष देऊन मारलें होतें.

म ह म द.- (१५८०-१६११) हा इब्राहिमचा तिसरा पुत्र. १२ व्या वर्षीं गादीवर बसला. यानें विजयानगरकराची एक शाखा पेनकोंड्यास होती ती बुडविण्याकरितां पुष्कळ मोहिमा केल्या; पण त्या व्यर्थ गेल्या. यानें आपली बहीण आदिलशहास देऊन या दोन राज्यांत सख्य केलें. याच्या वेळीं गोवळकोंड्याची वस्ती दाट होऊन पाणीपुरवठा चांगला नसल्यामुळें पांच कोसांवर चांगली जागा पाहून यानें तेथें एक नवीन शहर वसविलें. याची भागावती (भागमती) नांवाची एक आवडती स्त्री होती. तिचें नांव त्यानें या नव्या राजधानीस ठेंविलें. त्याचा मुलगा हैदर यानें भागानरचें हैद्राबाद असें नाव पुढें बदललें. महंमदनें भागानरास पाणीपुरवठा उत्तम केला. जुम्मामशीद, चार मिनार, दवाखानें, हमामखाने, बगीचे वगैरे त्यानें तयार केले. यानें फारशीं युद्धें केलीं नाहींत. याच्या दरबारीं इराणचा वकील राहिला होता. इराणचा शहा अब्वास यानें आपली मुलगी याच्या मुलास देण्याचा विचार केला होता. याच्या कारकीर्दींत प्रख्यात मीर जुम्ला किंवा अमीर उलमुल्क हा दिवाण होता (मीरजुम्ला पहा.) हा शहा चौतीस वर्षे राज्य करून १६२६ त मेला. यानें लोकोपयोगी कामांत अडीच कोटी रुपये खर्च केले. हा विद्वान होता. यानें ‘कुलिआत् कुत्बशाह' म्हणून एक फारशी, हिंदी व दक्षिणी कवितांचें मोठें पुस्तक प्रसिद्ध केलें आहे.

अ ब्दु ल्ला हु से न.- (१६२६-१६७२) हा महंमदचा पुत्र. यानें शांततेनें राज्य केलें. या वेळीं शहाजहाननें निजामशाही बुडविली आणि आदिलशहापासून खंडणी घेतली.नंतर याच्या वर शहाजहान चालून आला असतां यानेंहि खंडणी कबूल केली (१६३४). याचाहि वजीर मीरजुम्ला होता. औरंगझेब हा दक्षिणचा सुभेदार झाला असतां व मीरजुम्ल्याचें व शहाचें वांकडें आलें असतां मीरनें औरंगझेबचा आश्रय घेतला. औरंगझेबास गोंवळकोंड्याची संपत्ति पाहिजे होती. आणि औरंगझेबानें कांहीं तरी निमित्त काढून व मागण्या मागून त्या नाकारल्याबद्दल गोंवळकोंड्यास वेढा दिला.

अखेरीस शहाजहानच्या सक्तीच्या हुकुमावरून नाइलाजानें औरंगझेबनें वेढा उठविला व तह केला; कुत्बशहाची मुलगी सुलतान महंमदला दिली. त्यानें अमीनला बंधमुक्त करून जुम्ल्याची संपत्ति व जहागीर सोडली. मोंगलाल थकलेली खंडणी देऊन रामगीर जिल्हाहि दिला. या स्वारींत मोंगलाला फारसा फायदा झाला नाहीं असें औरंगझेंबानें बापास कळविलें. मात्र सारी लूट स्वत: दाबून ठेवून उलट २० लाखांचें कर्ज त्यानें बापास दाखविलें. यानंतर १६६६ त कुत्बशहानें समदु:खी जाणून औरंगझेबाविरुद्ध आदिलशहास मदत केली. या सुमारास शिवाजी छत्रपति याचा धुमाकुळ सुरू झाल्यानें यानें त्यांच्याशीं सालीना पांच लक्ष खंडणी देण्याचें ठरवून तह केला (१६६८). पुढें त्यानें मराठ्यांनां त्रास दिल्यामुळें महाराजांनीं १६७२ त ह्याच्यावर स्वारी केली व बरीच संपत्ति काबीज करून त्याचा मोड केला (अबदुल्ला कुतबशहा पहा ज्ञानकोश विभाग ६). याच वर्षीं शहा मरण पावला.

अ बू ह स न.- अबदुल्ला निपुत्रिक होता म्हणून त्याचा जांवई अबु हसन (१६७२-१६८७) हा गादीवर आला. हा गादीवर येण्यापूर्वीं बराच विषयासक्त व मद्यपी होता. गादीवर बसविण्यांत याला मादण्णा(मदन)पंतानें बरीच मदत केल्यानें त्याला यानें दिवाणपद व त्याचा भाऊ अकण्णा (एकनाथ)पंतास सेनापतिपद दिलें. मादण्णाच्या कारकीर्दीत राज्यांत फार सुधारणा झाल्या. यावेळीं आदिलशाही दुर्बळ झाल्यानें व मोंगल आपल्या नाशावर टपलेला पाहून यानें मादण्णाच्या संमतीनें शिवाजी महाराजाशीं प्रथम मैत्रीचा व नंतर मांडलिकीचा तह केला (१६७६). संभाज छत्रपतीशींहि तोच तह त्यानें कायम ठेवला. शिवाजी छत्रपती हे कर्नाटकांत मोहिमेवर गेले असतां यानें त्यांना सैन्याची मदत दिली होती. पुढें (१६७७) मोंगलांचा दिलेलखान व विजापूरकरांचा अबदुल करीम हे एकत्र होऊन गोवळकोंड्यावर आले, तेव्हां मादण्णानें त्यांचा पराभव केला. पुढें १६८३ त खासा औरंगझेब दक्षिणेंत चालून आला. या वेळीं हसनशहाची तयारी चांगली होती. त्याचें सैन्य व संपत्ति पुष्कळ होती. मादण्णाची कारकीर्द सर्व हिंदूंनां प्रिय झाली होती. मात्र मुसुलमान सरदार त्याच्या विरुद्ध शहाचे कान भरीत, परंतु त्याने तिकडे, लक्ष दिलें नाहीं. नंतर (१६८५) संभाजी छत्रपतीस शहानें खंडणी दिली. एकमेकांचे दोस्त व शत्रू एकच व परस्परांनीं परस्परांस सहाय्य करावें असा तह शिवाजी महाराजांपासून अंमलांत होताच. औरंगझेबाच्या मनांत आतां गोवळकोंडें खालसा करावयाचें आलें. कारण कुत्बशहा हा वेळीं आदिलशहास मदत करतो, तेव्हां आधीं गोवळकोंडें घेतल्याशिवाय विजापूर पडत नाहीं. असें ठरवून कांहीं कुरापती काढून त्यानें स्वारी केलीं. त्यापूर्वीं आपल्या वकिलाकडून त्यानें कुत्बशहाचे अनेकदां अपमान केले होते. त्याची त्याला सांगीच होती कीं, “तूं कुत्बशहाचा नेहमीं अपमान करीत जा. म्हणजे केव्हां तरी तो तुझा अपमान करील व असें झालें म्हणजे मला लढाईस कारण सांपडेल.'' सारांश, शहानें १६५६ चा तह पाळला नाहीं. “खंडणी वेळेवर देत नाहीं, शिवाजी संभाजी सारख्या काफरांनां खंडण्या देतो'' वगैरे बाह्य कारणें दाखवून औरंगझेबानें लढाई पुकारली.

त्याचे सरदार सादतखान व खानजहान गोवळकोंड्यावर आले (१६८६). मादण्णानें सेनापति इब्राहिमला त्यांच्यावर पाठविलें. मलखेड येथें लढाई होऊन तींत मोंगलांचा पराभव झाला; तेव्हां औरंगाझेबानें सुलतान मुअज्जमला मदतीस पाठविलें. त्यावेळीं इब्राहिमनें फितूर होऊन त्यांनां अडविलें नाहीं. मोगंल हैद्राबादेस आला. तेव्हां मादण्णाचा सल्ला न ऐकतां भिऊन शहा गोवळकोंड्यास गेला. तिकडे इब्राहिमला औरंगझेबानें लांच देऊन फोडलें त्यामुळें मोंगलांचा सुखासुखी हैद्राबादेंत प्रवेश झाला. या गडबडींत मादण्णाचा खून त्याच्या मुसुलमान शत्रूंनीं केला. परंतु सैन्याची तयारी चांगली करून ठेविली होती. त्यामुळें विजापूरला मदतीची अपेक्षां असल्यानें औरंगझेबानें हैद्राबाद पडलें तरी दोन कोटींची खंडणी घेण्याचें ठरवून कुत्बशहाशीं तह केला व खंडणीवसुलीस मुअज्जमला तेंथे ठेविलें (१६८६). यानंतर विजापूर पडलें तेव्हां गोवळकोंडें घेण्याचें नक्की ठरवून व कुलबुर्ग्याच्या एका फकीराच्या थडग्याच्या दर्शनाचें निमित्त करून तो कुत्बशाहींत उतरला. तत्पूर्वीं कर्नाटक, अदवानी इकडील मदत गोवळकोंड्यास येऊन पोहोंचूं नये म्हणून त्या बाजूस त्यानें गाझीउद्दीन यास पाळतीवर ठेविलें (१६८७) व सादतखानाकडून गोवळकोंड्याच्या सैन्यांत फितुरी चालविली. तसेंच वाटेल त्या नीच युक्त्या अंमलांत आणून व धाकदपटशहा दाखवून त्यानें कुत्बशहाचा पैसा उपटण्याचा क्रम अव्याहत चालविला. शेवटीं तर शहानें आपल्या बायकोच्या अंगावरील दागिने सुद्धा दिले तरी औरंगझेबाला त्याची दया आली नाहीं. शेवटीं बदफैलीपणा, कारभारी ब्राह्मण नेमणें व मूर्तिपूजक संभाजी छत्रपतीशीं दोस्ती करणें वगैरे आरोप त्याच्यावर उघडपणें ठेवून औरंगझेबानें लढाईस सुरुवात केली. कुत्बशहा या कृत्यामुळें चिडला. अगदीं विश्वासू लोकांसह तो हैद्राबादहून गोवळकोंड्याच्या किल्ल्यांत गेला. यावेळीं मादण्णाची  त्याला फार आठवण झाली. औरंगझेबानें किल्ल्याला वेढा दिला. त्याचे सारे अंमलदार फितूर झाले. खजिना आधींच औरंगझेबानें रिता केला होता. आठ दहा महिने वेढा दिला असतांहि शहानें मोठ्या शौर्यानें किल्ला लढविला. अखेर वरील सर्व कारणें एकवटून व विश्वासघात होऊन मोंगलानें किल्ला घेतला. अबुहसन कुत्बशहा औरंगझेबाच्या हातीं पडला (१६६७ सप्टंबर). त्याला त्यानें कैद करून दौलताबादेच्या किल्ल्यावर कैदेंत टाकिलें; तेथें तो मरेपर्यंत होता. याच्या बदफैलीपणाबद्दल मोंगल इतिहासकारांनीं अवास्तव वर्णनें दिलीं आहेत. राज्यावर आल्यानंतर यानें आपलें वर्तन सुधारलें. त्याला पकडून नेल्यानंतर त्याच्यासाठीं त्याची प्रजा फार हळहळली. त्याच्या शौर्याच्या व न्यायाच्या अनेक गोष्टी अद्यापि त्या प्रांतीं ऐकूं येतात. या घराण्यानें १७५ वर्षें राज्य केलें. त्यांत सहा सुलतान झाले. त्यांनीं बांधलेल्या इमारती व कामें अद्यापि शिल्लक आहेत. हे सुलतान रयतेची, काळजी घेणारे होते यामुळें दंगेधोपे झाले नाहींत. या घराण्यांतील शहांच्या कबरी बहुधा गोवळकोंड्यास आहेत [मुसुलमानी रियासत; काफीरखान; द. हिं. घराणीं; मोडक; बील.]

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .