प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें   
 
कुंभारकाम- वेदकालापासून कुंभारकामाची माहिती आर्यांनां होती हें प्रसिद्ध आहे. श्रौतप्रकरणांतील अग्निचयन विधींमध्ये निरनिराळ्या आकृतींच्या विटांच्या वेदीचीं वर्णनें आली आहेत. विटांप्रमाणेंच शेगड्या बोळकीं, मडकीं, माठ, परळ, वगैरे कुंभारकामें त्यावेळीं प्रचारांत होतीं (ज्ञानकोश- प्र. खं. वि. दुसरा वेदविद्या, पृ. १२४-२५-२६ पहा). हिंदूंच्या अनेक धार्मिक विधींत मातीच्या पात्रांची गरज लागते. मुंज, विवाह, व और्ध्वदेहिकप्रसंगीं हीं पात्रें लागतात.

असुरिय प्रमाणें बाविलोनियांतहि ६ हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन लेख कोरलेल्या विटा सांपडतात. त्या मातीच्या वाळवून भाजलेल्या असून फार मजबूत व टिकाऊ आहेत. या शहराच्या जुन्या (तट, मनोरे, राजवाडे वगैरेंच्या) अवशेषांत या विटांचे ढीगच्याढीग आढळतात. आसपासचे लोक आपापली घरें बांधण्यास या विटा आज अनेक शतकें नेत आहेत. बाबिलोनियन व असुर लोक रंगीत व मिना कामाच्या विटा करण्यांत प्रख्यात होते. त्यांचा उपयोग ते शोभेसाठीं करीत असत. चिनी लोक आपल्याला या असुर लोकांच्याहि पूर्वींचे वीट कामांत दर्दी म्हणवितात. पण कांहींचें म्हणणें ही कला चिनी लोकांनीं हिंदुलोकांपासून घेतली असें आहे. प्रख्यात चिनी अजस्त्र भिंत ही भाजलेल्या व कच्च्या अशा दोन्ही विटांची बांधलेली आहे. परंतु ही अलीकडे (सुमारें ख्रि. पू. २२०) बांधलेली आहे. इस्त्रायल लोकांतहि विटाचें काम प्राचीन काळीं होत होतें. मात्र ते विटा न भाजतां उन्हांत सुकवीत. यांची माती नदीच्या गाळाची असे. त्यांत गवत किंवा लव्हाळे घालीत. हल्लींहि ईजिप्तमध्यें असल्या विटा पाडतात. ग्रीक लोक तीन प्रकारच्या विटा पाडीत असें प्लिनींनें म्हटलें आहे. रोमन लोक ही कला पौरस्त्यांपासून शिकले; आणि त्यांनींच ती सर्व पश्चिम यूरोपमध्यें पसरविली; इंग्लंडमध्यें १५ व्या शतकांत विटा उपयोगांत येऊं लागल्या. फ्ल्यांडर्समधून ही कला इंग्लंडमध्यें या सुमारास आली परंतु १६६६ च्या प्रख्यात प्लेगापर्यंत विटांची घरें अगदींच थोडीं असत. यापुढें मात्र विटांचा उपयोग बराच होऊं लागला. तेथील सरकारनें इ. स. १७८४ मध्यें प्रत्येक हजार विटांमागें ४ शि. ७ पे. चा कर बसविला होता. अमेरिकेंत पहिली विटांची इमारत १६३३ त झाली. मध्ययुगांत यूरोपमध्यें मुख्यत: डच व जर्मन हेच विटा तयार करणारे होते. इटालियनांनीं १५ व्या शतकांत रंगीत विटा तयार केल्या.

मडकीं, विटा, कौलें वगैरे स्वस्त पदार्थांना चिकणमाती लागते. अधिक उंची भांडीं करण्यास (बरण्या, चहाचे पेले, बशा व चित्रें वगैरे) चांगल्या प्रकारची चिनी माती लागते. मूस करण्याची माती गोंडवनाच्या ज्या भागांत दगडी कोळशाच्या खाणी आहेत त्या भागांत सांपडते.

विटा, कौलें करण्याचे कारखाने अलीकडे यूरोपियन लोकांनीहि इकडे काढले आहेत. इ. स. १८६६ राणीगंज येथें एक कारखाना निघाला व तेथें विलायती धर्तींच्या विटा पाडू लागले; पण थोड्यांच दिवसांत तो धंदा बुडाला. यूरोपियन लोकांनीं या कामांत आपल्यापेक्षां जास्त लक्ष घातलें आहे. न्हाणीघरांत वापरण्यांत येणार्‍या झिलईच्या सपाट विटा व दुसर्‍या आर्दतारोधक निळ्या व अनेक रंगांच्या विटा या यूरोपीयन कारखान्यांत तयार होतात. मुसुलमानी अंमलांत आपल्याकडेहि अशा मिन्याचें काम केलेल्या विटा तयार करीत असत, हें ठठ्ठाची मशीद, विजापूरच्या जुम्मामशिदींतील प्रसिद्ध रंगीत कमान वगैरे इमारती पाहिल्या म्हणजे समजतें. किल्ल्यांच्या व प्राचीन इमारतींच्या विटा लांब, रूंद पण कमी जाडीच्या असत. असुरिया देशांत तर या विटांवरच इतिहासलेखन करीत असत. त्या विटा ख्रि. पू. तीन चार हजार वर्षांच्या आहेत असें म्हणतात. त्या एक हात औरस चौरस असत. डॉ. स्टीननें हिंदुस्थानांतील कांहीं जुन्या विटा (इ. स. च्या ७ व्या ८ व्या शतकांतील) शोधून काढिल्या होत्या. दक्षिणेंत तिनवेल्ली, मदुरा व मलबार भागांत डॉ. पोप याला जमीनींत थडगीं खोदतानां इ. स. च्या ८ व्या शतकांतील मातींचीं निरनिराळ्या प्रकारचीं भांडी आढळलीं. अकबरानें आपल्या कारकीर्दींत कच्या, पक्कया विटांच्या किंमती निरनिराळ्या ठरविल्या होत्या. हल्लीं गरीब लोकांचीं घरें कच्च्या विटांचीं असतात. पूर्वीं बंगाल्यांत नक्षीदार विटा तयार होत असत. दिनाजपुरजवळील कंतनगड, चंद्रनगर व हुगळी येथील देवळांत विटा आढळतात. लाहोरकडेहि या नकशीच्या विटा होत असत. कलकत्याकडे विटांचे कारखाने बरेंच आहेत. तिकडलि अकरा गांवचा कारखाना सर्व हिंदुस्थानांत मोठा आहे असें म्हणतात. हल्लीं महाष्ट्रांतहि बर्‍याच ठिकाणीं कारखाने काढले आहेत. बडोद्यासहि एक कारखाना आहे. विटांत साध्या, कमानीच्या, बाह्यगोल वगैरे प्रकार असतात. विटांप्रमाणेंच कौलांचाहि खप असल्यानें त्यांचे कारखाने हिंदुस्थानांत लहानमोठ्या प्रमाणावर सर्वत्र आहेत. मात्र मंगलोरकडील कौलांचे कारखाने जास्त भरभराटले आहेत. याचें कारण तिकडील माती मूळचीच चिकणी असल्यानें साध्या मातींत चिकणाई उत्पन्न करण्याला इतर भागांतील कारखान्याला जो प्रांरभीचा बुडितखर्च करावा लागतो, तो तिकडे वांचतो. त्या प्रांतांत पूर्वीं यूरोपियन लोकांनीं कारखाने काढले होते. परंतु हल्लीं हिंदी भांडवलाचे व व्यवस्थेचे कांहीं कारखाने सुरू झाले आहेत. हिंदुस्थान देश साधारण उष्ण असल्यानें छपरावर घालण्यांत येणार्‍या कौलांत पुढील गुण असले पाहिजेत. त्यांच्यांत उष्णता सांचवून ठेवण्याची व ती खालीं वाहून न जाईल अशी शक्ति पाहिजे. तसेंच कौल हलकें पाहिजे व मजबूत पाहिजे. त्याचे सांधे एकमेकांत घट्ट बसले पाहिजेत म्हणजे चुकूनहि एखादी फट रहातां कामा नये, नाहींतर पावसाळ्यांत त्यांतून गळण्याचा संभव असतो. असलीं कौलें हातानें तयार केल्यास तीं परवडत नाहींत म्हणून यंत्रानें तीं पाडावीं लागतात. त्यांच्यातहि साधीं, ढाण्याचीं, कोपर्‍यावरचीं, खालीं उजेड व हवा जाणारीं वगैरे निरनिराळ्या आकारांचीं व आकृतींचीं कौलें असतात. पूर्वींची  साधीं नळीच्या आकारांचीं व चापट आकारांचीं कौलें असत. अद्यापिहि खेड्यांत व शहरांत  हीं कौलें बरींच प्रचारांत आहेत. मंगलोरी कौलें फार महाग पडत असल्यानें त्यांचा प्रसार सर्वत्र होत नाहीं. टिकाऊपणाच्या बाबतींत तीं साध्या कौलांपेक्षा जास्त सरस असतात. टिकाऊ सुबक व हलकीं आणि एक सांचाचीं कौलें करण्यास यंत्राचें साहाय्य अवश्य आहे. अद्यापिहि उत्तम कौलें, फरशीचीं कौलें व विटा यूरोपमधून इकडे येतात. इकडे राणीगंज, जबलपूर, अलीगड, बरेली, मंगलोर, ग्वालेर, बडोदें, कल्याण वगैरे ठिकाणीं विटा, कौलें व चिनीमातीचीं भांडीं, खेळणीं इत्यादि तयार करण्याचे कारखाने आहेत. या धंद्यांत कोठें कशी माती मिळते ह्याचा व तिच्या गुणधर्माचा शोध ठेवणें जरुर असते. हूपरनें ३३ प्रकारच्या मातींची परीक्षा केली होती. मुशीची माती निर्मळ पाहिजे. तिच्यांत क्षारयुक्त द्रव्य (अलकलाईन) नसावें. असल्यास ती लवकर वितळते. चिलमीची माती (पाईप क्ले) ही वाळूच्या कणाविरहित असल्यास फार चिकणी असते. अशी माती तेराणी व करई या प्रदेशांच्या दरम्यान सांपडते, असें मूर म्हणतो. मद्रासेकडील जंगलांतहि ही आढळते.

चिनीमातीचीं भांडीं वगैरेस लागणार्‍या मातीचे तीन वर्ग आहेत. (१) चिनी (केऑलिन) माती, (२) साधी पांढरी माती किंवा झिलईची भांडीं करण्याची व (३) लाल माती. कौलें किंवा कुंड्या करण्याच्या चिनी मातीचा उपयोग कागदांच्या कारखान्यांत कागद तयार करितांना होतो. हिचे पांढरे किंवा पिंवळट रंगांचे गोळे बाजारांत मिळूं शकतात. फेलस्पार नांवाच्या दगडावर हवा व पाणी यांची क्रिया होऊन ही माती तयार होतो. हिच्यांत मुख्यत्वें करून अल्युमिनियम सिलिकेट असतो ही हिंदुस्थानांत बहुतेक ठिकाणीं सांपडते.

मातीच्या ज्या भांड्यांत द्रव पदार्थ ठेवावयाचा असेल त्यानांच फक्त झिलई देण्यापासून फायदा असतो. झिलईपेक्षां लाख लावणें स्वस्त पडतें. हिंदुस्थानांतहि झिलईचीं मडकीं वगैरे फार पूर्वींपासून वापरीत असत. पेशावर, वेलोर, अर्काटकडे प्राचीन काळचीं भांडीं सांपडली आहेत. हा काल म्हणजे बौद्धकाल होय. उत्तरहिंदुस्थानांत कुंभार मडकीं वगैरे तयार करतो व कुझगार (हा  मुसुलमान असतो) त्यावर नकशीकाम खोदतो. चिनीमातीचीं भांडीं परदेशांतून बरींच येतात. ही आयात इंग्लंड, बिल्जम, जर्मनी येथून होते. त्यांत इंग्लंड शेंकडा पन्नासप्रमाणें माल पुरवितें. हिंदुस्थानांतून विटा, कौलें, भांडीं वगैरे माल थोडा  फार सीलोन व स्ट्रॉटसेटलमेंटमध्यें जातो. सिंध प्रांतांत ठठ्ठा व हाला येथें नकशीच्या विटा व चिनीमातीच्या बरण्या प्रख्यात आहेत. गुजराथेंत पट्टण येथें मातीचे खुजे व हुक्के होतात. दिल्ली, मुलतान येथें चिनी नकशीदार भांडीं होतात. तसेंच भांड्यांवर नाना तर्‍हेचे रंग व रोगण इकडे चांगलें चढवितात. गुजराणवाला व भावलपूर येथें कागदासारखी पातळ मडकीं तयार होतात. अजमगड येथील (वायव्यप्रांत) खुजे; लखनौच्या बशा, पेले, सुर्जा (बुलंद जिल्हा) येथील मडकीं, अल्लीगड, अमरोहा सहारणपुर येथील पातळ व वर्ख चढविलेली भांडीं हीं नांवाजण्यासारखीं आहेत. हल्लीं पुणें जिल्ह्यांत तळेगांव दाभाडें येथें पैसाफंड कांचकारखान्यानें हें काम हातीं घेतलें आहे ग्वालेर येथील काम नुक्तेंच सुरू झालें आहे.

विटांच्या मजबुतीचें एक कोष्टक पुढील प्रमाणें आढळतें. हातानें तयार केलेल्या विटा दर चौरस इंचावर ०.४ ते ०.९ टन वजन ठेवल्यास फुटतात तर यंत्रानें तयार केलेल्या विटादर चौ. इंचावर ०.७ ते १.३ टन वजन ठेवल्यास फुटतात; आणि खंगर विटा दर चौ. इंचावर २.९ ते ३.४ टन वजनानें चुरडतात. [रिपोर्ट जिऑलॉजिकल सर्व्हें ऑफ इंडिया. १९०५; अकबरी; वॅट-कमर्शि. प्रॉडक्टस्;]

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .