प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें      

कुरवा- कोरवा, कोरजा, कोरमा यांची (जात) लो. सं. (११९१) २,२४२,२१. पैकीं मद्रास इलाख्यांतच १,१०,१५७ कुरवा आहेत. बाकीं त्रावणकोर, म्हैसूर व मुंबई या भागांतून आहेत. महाराष्ट्रांत या लोकांनीं कैकाडी म्हणतात. हे लोक निरनिराळ्या नांवांनीं ओळखले जातात. अर्काट जिल्ह्यांत कोरवा, कोरचा आणि येद्रकाला या तीन नांवांनीं ते ओळखले जातात. कलकत्ता येथें तें `वैदूं’चा धंदा करतात. कांहीं कोरवा लोक वेल्ला म्हणून समजले जातात. पल्ली, कवराइ, इडाइयन् व रड्डी अशींहि त्यांचीं नांवें आहेत. कटक, मिदनापूर, पुरी, तिनेवेल्ली, मुंबई, पाटणा, तंजावर वगैरे ठिकाणीं कांहीं कोरवा जातीचे लोक वस्ती करून राहिले आहेत. केपमारीप्रमाणेंच कोरवा जातीपैकीं कांहीचा धंदा चोर्‍या करणें, घरें फोडणें, दरवडे घालणें अशा प्रकारचा आहे. साधारणत: मूळव्याधीसारखे रोग बरे करण्यासंबंधीं त्यांची प्रसिद्धि आहे. कांहीं लोक शेती व मजुरी करतात, कांहीं ज्योतिष सांगतात. ते एकमेकांस कुरु अथवा कुरा असें संबोधतात. कोरवा व येरुकाला यांच्या भाषेंत कानडी, तेलगू व तामीळ या शब्दांचाच मुख्यत: भरणा असतो. येरुकाला जातीच्या भाषेस ओड्रा अथवा ओरिया म्हणतात. यावरून ते उत्तरेकडून आले असावे असें दिसतें. परैयन, यानाडी, मंगला व साकल या जातींखेरीज इतर जातींच्या लोकांनां कोरवा लोक आपल्यांत घेतात. सातेपाटी, कावडी, मेंद्रागुट्टि व मानपाटी असे कोरवा जातीचे चार मुख्य वर्ग आहेत व त्यांपैकीं पहिले दोन श्रेष्ठ दर्जाचे आहेत. पट्टापू व धूरपू असे दोन वर्ग येरुकाला जातीचे आहेत. कोरवा जातीमध्यें नानाविध पंथ असून प्रत्येक पंथाचीं निरनिराळीं देवकें असतात. कोनेटी व समुद्राल असेहि पंथ असून शंख हें समुद्रालांचे देवक असतें. रामेश्वरी पंथाचे लोक कासव खात नाहींत. परंतु कित्येक कोनेटी लोक विशिष्ट प्रसंगीं तें मुद्दाम खातात.

पूर्वीं कोरवा व्यापारी चिंच, गूळ, मीठ इत्यादि पदार्थांच्या गोण्या बैलांच्या किंवा गाढवांच्या पाठीवर लादून फिरस्तेगिरी करीत असत. मिठाचा व्यापार करणार्‍यांनां उप्पू कोरवा म्हणतात. कुंचू नांवाचे लोक जंगलांतील मुळ्या गोळा करून त्यांचे कोष्ट्यांच्या उपयोगाकरितां कुंचले तयार करतात. हे लोक शिकारी म्हणूनहि फार प्रसिद्ध आहेत. कांहीं लोक जंगलांतील वेळू तोडून आणून दुसर्‍यास विकतात. त्यांच्या स्त्रिया गोंदण्याचाहि धंदा करतात. मासे, विंचू, किल्ले, घरें इत्यादि आकृती शरीरावर मोठ्या कौशल्यानें हे गोंदतात. भविष्य वर्तविण्याच्या कामीं कोरवा स्त्रिया फार वाकबगार असतात. कोणतेंहि भविष्य सांगण्यापूर्वीं  त्या व्यक्तीचा स्वभाव व इतर माहिती हेरून ठेवण्याच्या कामीं त्या फार चतुर असतात. यूर अथवा खेडेगांवांतील कोरवा लोंकांनीं रानटीपणा सोडून देऊन शेती करण्याचें अलीकडे मनावर घेतलें आहे असें दिसतें. यांपैकीं बरेच लोक हल्लीं पोलीस, जंगल वगैरे खात्यांत आहेत. पामुला नांवाचे लोक गारुड्याचा धंदा करतात. कांहीं टोपल्या विणतात. पुसलवाडू, उटलबाडू, काडुकटुकिरावर इत्यादि अनेक नांवें निरनिराळ्या धंद्यांवरून पडलीं आहेत. कुट अथवा कोठ्ठी लोक नीतिबाह्य मार्गानें उपजीविका करतात. त्यांच्यांतील स्त्रियांची नर्तनाबद्दल प्रसिद्धि आहे. मुलींनां पळवून नेण्याचीहि प्रवृत्ति त्यांच्या आहे.

कोरवांचे घरगुती देव विष्णु व शिव हेच होत. शिव, कुमार, सुब्रह्मण्य यांचीहि कोरवा उपासना करतात. लक्ष्मीव्यंकटेशस्वरुपी विष्णुची उपासना येरुकाला लोक करतात. मारिअम्मा कोल्हापुरी अम्मा, पेरुमालस्वामी अथवा तिरुपतीचा व्यंकटेश्वर या देवतांचीहि उपासना करण्यांत येते. गुन्हेगार कोरवा जातीची मुख्य देवता मोथेवी नांवाची असते. पुष्कळ लोक या निद्रादेवतेला दरवडेखोरींत यश यावें म्हणून आळवितात. भविष्य सांगतानां कोल्हापुरी अम्मा व पोलेरम्मा  या देवतांची प्रार्थना करण्यांत येते.

लग्नाचा मुहूर्त ठरविण्याचें काम ब्राह्मणावर सोंपविण्यांत येतें आणि जातिभ्रष्टांची शुद्धि चेट्टी लोक करतात. पंचायतीची सभा अशा प्रसंगीं भरते व तेथें गुन्हेगारास क्षौर करावयास लावतात व त्याची गाढवावरून धिंड काढतात. नंतर त्यानें दिलेल्या दक्षिणेपैकीं कांहीं भाग चेट्टी घेतो. गुन्हेगारास भोजनार्थ जातीस बोलवावें लागतें. विधवेशी किंवा परजातीशीं गमन करणार्‍या अपराध्याला वरील शासन करण्यांत येतें.

कोरवा जात जुन्या वेडगळ समजुतींना चिकटून राहणारी असून तिच्यांत अनेक धर्मभोळेपणाचे मासले असलेले आढळतात. चोरी करण्यास निघण्यापूर्वीं बरेवाईट शकून पाहण्यांत येतात. एखादें बकरें कोल्हापुरी अम्मा किंवा पेरुमाल यांस बळी देऊन नारळ फोडण्यांत येतात. बकरें मारण्यापूर्वीं तें कापूं लागलें तर तो शुभशकून समजला जातो. कोंबडें मारण्याचाहि त्यांचा प्रघात आहे. गुन्हेगारीस बाहेर पडतांना विधवादर्शन, दुधाचीं भांडीं; कुत्र्याचा मूत्रोत्सर्ग, बैलवाहक आणि वृषभगर्जना इत्यादि गोष्टी अपशकुन म्हणून मानल्या जातात. प्रत्यक्ष घर फोडतांना बैल डुरकला तर तो शुभ शकुन होतो. चोरीस निघतांना बैलास झोपडीत असलेला मनुष्य पाहिला तर तो शुभशकुन होतो. घरें फोडण्यापूर्वीं त्यावर मूत्र शिंपडण्यांत येतें. दुष्ट भाषेनें होणारा अपशकुन टाळण्यास चिखलाचा एक मनुष्य करून त्याच्या तोंडांत कांटें भरण्यांत येतात. सात हा अंक अपेशी असा मानला जातो. रविवार, सोमवार, बुधवार व शनिवार हे वार अशुभ मानले जातात.

वडील माणसांकडून साधारणपणें लग्नें ठरविण्यांत येतात. वराचा बाप वधुसंशोधन करितो व त्यास योग्य अशी वधू सांपडल्यास उभय पक्ष प्रथम ताडीच्या दुकानांत प्रवेश करतात व त्याठिकाणीं भावी व्याही वधूवरांचें कल्याण चिंतून यथेच्छ सुरापाना करतात. लग्नांत वधूच्या मामाचा मोठा मान असतो व कन्याविक्रयाची रक्कम त्यासच द्यावयाची असते.

वधूवरांनां एका कांबळ्यावर उभे करून वराकडून काळ्या मण्यांची माळ वधूच्या गळ्यांत घालवितात व अक्षता टाकून धार्मिक समारंभ पूर्ण होतो. तालीबंधन, कंकणबंधन, मिरवणूक व मेजवानी वगैरे गोष्टी करण्यांत येतात. उत्तर अर्काटमध्यें अविवाहित मुलींनां गहाण टाकण्यांत येते असें म्हणतात. (कास्टस अँड ट्राइब्ज ऑफ इंडिया, पान ४८७). चिंगलपेट व तंजावर येथेंहि ही चाल आहे. मद्रास येथें कोरावा लोक आपल्या बायका गहाण ठेवून कर्ज काढितात. (कित्ता पान ४८८) वारंवार विधवा होऊन किंवा काडीमोड करून एकाच जन्मांत सात नवरे करणार्‍या स्त्रीय `बेड्डाबोयिसानी’ असें म्हणतात व ती प्रतिष्ठित बाई म्हणून लग्नकार्यांत मानली जाते.

नामकरणप्रसंगीं मुलाच्या खांद्याच्या जवळ डाग देतात. अल्बेरुणी यानें इ. स. १०३९ मध्यें त्यांची ही चाल नमूद करून ठेविली आहे. तो म्हणतो कीं, जेव्हां मूल जन्मतें तेव्हां त्याच्या बापाकडे कोरवा लोकांचें जितकें लक्ष्य जातें तितकें तें आईकडे जात नाहीं. रेव्हरंड. जे. केन साहेब म्हणतों कीं, जेव्हां एखाद्यां स्त्रीस प्रसववेदना होऊं लागतात त्यावेळीं तिचा नवरा कपाळास मळवट फांसून व लुगडें पांघरून बाजेवर ठेवितात. बाळंतिणीप्रमाणें बापासहि सर्व औषधें घ्यावीं लागतात. बापानें हे सोहाळे कां भोगावे याबद्दल कोरवा जातींत बर्‍याच दंतकथा आहेत. कोरवा मुलांस लहानपणीं `मला माहीत नाहीं.’ या वाक्याचा ओनामा शिकवितात. नंतर चोरीच्या विविध पद्धतीचें त्यास शिक्षण देऊन भिंतीतून, खिडतींतून व दारांतून घरांत प्रवेश कसा करावा ही विद्याहि त्यांस शिकवितात.

तामीळ भाषेंत अशी म्हण आहे कीं, मृत वानर व मृत कोरवा हे अद्याप कोणीच पाहिलेलें नाहींत. वानराप्रमाणें कोरवा लोक मृतांची तत्काल व्यवस्था लावितात. त्यांच्यांत सुतक पाळणें, पिंड देणें वगैरे प्रकार आहेत असें म्हणतात. म्हैसूर येथील कारेवा जातीच्या लोकांत अशी चाल आहे कीं, विधवेशीं त्याच दिवशीं कोणी तरी प्रथम लग्न करून नंतर तिच्या नवर्‍याचें प्रेत जाळण्यास न्यावयाचें असतें.

मलबार, कोचीन, त्रावणकोर येथें रहाणारे कोरवा, मलयालम् भाषा बोलणारे आहेत. कांहीं लोक दोरावर नाच करून पैसे मिळवितात. कांहीं शेती करितात. कित्येक गवताच्या टोपल्या तयार करतात. त्यांच्या स्त्रिया ज्योतिषपणा व मुलींचे कान टोंचण्याचा धंदा करतात. १८८५ सालीं या जातीला सुधारण्याचे प्रयत्‍न करणाच्या कामी स्टीव्हन्सन यांनें फार मेहनत घेऊन त्यांची एक वसाहतहि स्थापिली. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाहीं. १९०७ च्या पोलीस खात्याच्या रिपोर्टावरून दिसतें कीं, असल्या फिरत्या गुन्हेगार टोळ्यांनां जमीनी देऊन सुधारण्याचा यत्‍न करून पाहण्यांत येत आहे. [थर्स्टन. से. रि.]

मुंबई इलाख्यांत कोरवा हे बेळगांव, विजापूर, धारवाड या जिल्ह्यांत मुख्यत्वेंकरून आढळतात. यांमध्यें रजस्वला बायकांचा विटाळ कानडी लोकांप्रमाणें मानीत नाहींत. प्रेतें पुरलीं जातात. हे लोक फक्त मोठाले हिंदुसण पाळतात. दिव्यें करून गुन्हा शाबित करण्याची चाल यांमध्यें आहे. यांच्या भाषेंत तेलगु, तामीळ व कानडी या भाषांचें मिश्रण आहे. यांचे ९ पोटभाग असून त्यांमध्यें कानडी पोटभागांतील लोक सर्वांत श्रेष्ठ मानिले जातात. यांमध्यें चार कुळें आहेत. कांहीं परिस्थितींत पुनर्विवाहहि करतां येतो. घटस्फोट मात्र करितां येत नाहीं असें म्हणतात. हे मांस खातात व दारूहि पितात. मारुती, यल्लामा, मारायाम्मा व हुलीगेव ह्या त्यांच्या देवता आहेत.

प्रत्येक खेड्यांत व शहरच्या प्रत्येक पेठेस एक पंचायत असून या पंचायतींत ४ सभासद व सरपंच हे असतात. सामाजिक खटल्यांचे निकाल पंचायतींत दिले जातात. एका पंचायतींत एकमतानें निकाल न झाल्यास तो खटला दुसर्‍या पंचायतीकडे जातो. [सेन्सस रिपोर्ट (मुंबई) १९११. एन्थावेन].

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .