प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें    
 
कुरुंदवाड - कोल्हापूरच्या पो. एजंटच्या देखरेखीखालचें एक संस्थान. येथील संस्थानिक पटवर्धन आडनांवाचे कोंकणस्थ ब्राह्मण असून संस्थानच्या थोरली पाती व धाकटी पाती अशा दोन शाखा आहेत. थोरल्या पातींत कुरुंदवाड हें शहर व इतर ३७ गांवें आहेत. सदरहु जहागीर पेशव्यांनीं लष्करी सरंजामासाटी पटवर्धनांस दिली होती. इ. स. १८११ सालीं कुरुंदवाड व शेडबाळ असे या संस्थानचे दोन विभाग झाले होते; पैकीं शेडबाळला वारस नसल्यानें तें इ. स. १८५७ त खालसा झालें. थोरल्या पातीचें क्षेत्रफळ १८५ चौ. मै. असून लोकसंख्या ४३ हजारांपर्यंत आहे. संस्थानांत मका, तांदूळ, गहूं, हरभरा व कापूस यांचें उत्पन्न असून हातमागाचा धंदा चालू आहे. इंग्रजसरकारास सालिना ९६१९ रु. खंडणी द्यावी लागते. संस्थानास न्यायदानाचे सर्व अधिकार आहेत. संस्थानिक हे दक्षिणेंतील पहिल्या वर्गाचे सरदार आहेत. उत्पन्न अडीच लाखांचें आहे. धाकट्या पातीचें क्षे. फ. ११४ चौ. मै. असून लो. स. ३४ हजार व उत्पन्न पावणे दोन लक्ष आहे. कुरुंदवाडास पंचगंगा नदी असून जवळच तिचा कृष्णेशीं संगम झाला आहे. शहरची लो. सं. साडेदहा हजार आहे. येथेंच दोन्ही पातींचें अधिपती रहातात. सरकारी वाड्यांखेरीज पहाण्यासारखें असें एक विष्णूचें देऊळ व नरसिंहवाडी जवळील कृष्णेचा घांट होय.

पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष हरभटबाबा यांचे तिसरे पुत्र त्रिंबकपंतआप्पा हे या संस्थानचे संपादक होत. हे प्रथम अक्कलकोटकर भोंसले यांच्या पदरीं होते. पुढें कापशीकर राणोजी घोरपड्यानें आप्पाकडून कर्ज घेऊन फेडीस कुरुंदवाड गांव लावून दिला (इ. स. १७३६). तेव्हांपासून आप्पा व त्यांचे पांचहि भाऊ (सर्व पटवर्धन मंडळी) येथेच राहूं लागले. स. १७५१ नंतर निरनिराळ्या गांवीं ही मंडळी रहावयास गेली. तरी पण सरदारी वडील माणसाच्याच तंत्रानें चालत असे. पुढें कापशीकरांनीं दिलेल्या कुरुंदवाड गांवाची इनामाची सनद करवीरकर छत्रपतीकडून स. १७८४ त पटवर्धनांनीं करून घेतली.

त्रिंबकरावास नीळकंठराव व कोन्हेरराव नांवाचे दोन शूर पुत्र होते. नीळकंठराव हैदरवरील १७७१ च्या स्वारींत आणि कोन्हेरराव सांवशीच्या लढाईत इ. स. १७७७ त सरकारकामास आले. सरकारी सरंजाम नीळकंठरावांच्या नांवें होता. नीळकंठरावास रघुनाथराव व शिवराव हे दोन मुलगे होते. या दोघांनीहि बर्‍याच लढायांत काम केलें. रघुनाथराव हे तर परशुरामभाऊंच्या बरोबर दरेक लढाईंत हजर असत. यांनां अनेक जखमा झाल्या आहेत. यानींच वरील विष्णूचें देऊळ इ. स. १७९५ त बांधिलें व घाटहि बांधिला. शिवराव यांनां (तसेंच कान्हेरराव यांनांहि) सुभेदार म्हणत असत. रघुनाथरावास त्रिंबकराव नांवाचा मुलगा होता. रघुनाथ यांच्या नांवानें कोल्हापूरकर छत्रपतींनीं कुरुंदवाढ गांवची सनद करून दिली होती. दरम्यान रघुनाथराव व शिवराव यांच्यांत तंटा लागून पेशवे सरकारांनीं त्यांनां जहागीर वाटून दिली. शिवराव यांच्याकडे शेडबाळ वगैरे पांच हजारांचीं गांवें गेलीं. कोन्हेररावांच्या मुलांनांहि वांटणी मिळाली व या मूळच्या जहागिरीचे वांटे पुढीलप्रमाणें झाले. त्रिंबक रघुनाथ हे कुरुंवाडकर (सरंजाम १ लक्ष २८ हजार), गणेश कोन्हेर हे कागवाडकर (१ लक्ष ७० हजार रुपये) व कृष्णाजी शिवराव हे वाडीकर शाखेचे मुख्य बनले. त्रिंबकराव यांच्या नांवें स. १८०० मध्यें २,४७,२८४ रु.चा सरंजाम कायम झाला. शिवराव यांच्या कृष्णराव व कोन्हेरराव या दोन मुलांत १८८२ मध्यें वांटणी झाली. त्रिंबकराव यांचा मुलगा केशवराव यानें इंग्रजांशीं तहनामा केला. हा मिरजकरांशीं झालेल्या तहाप्रमाणेंच होता. त्रिंबकराव १८२७ त वारला. त्याला चार पुत्र होते, ते रघुनाथ, हरिहर, विनायक व त्र्यंबक हे होत. हे अज्ञान असतां यांच्या मातोश्रींनीं मोठ्या दक्षतेनें कारभार केला. मातोश्रींचें नांव लक्ष्मीबाई. त्यांच्याबद्दल इंग्रज सरकारनें स्तुतिपर उद्‍गार काढले होते. रघुनाथरावांना १८३७ त अधिकार मिळाला. यांच्यावेळीं संस्थानास कर्ज वगैरे झालें. तेव्हां या चार भावांत स. १८५६ त जहागिरीच्या वांटण्या झाल्या. एकंदर पांच वांटण्या केल्या. दोन हिस्से रघुनाथराव यांस व बाकीचें तीन तिघांकडे. हे त्रिवर्ग एकत्र एके ठिकाणीं राहूं लागल्यानें या तिघांच्या जहागिरीस धाकटी पाती व रघुनाथरावांच्या घराण्यास थोरली पती म्हणूं लागले; यांनां शिकारीचा फार नाद होता. रघुनाथराव वारल्यानंतर त्यांचे पुत्र चिंतामणराव हे गादीवर आले. ते स. १९०८ मध्यें वारले. हेहि बापासारखे धिप्पाड व व्यायामशास्त्राचे अभिमानी होते. त्याच्या मागें त्यांचे वडील पुत्र श्री. भालचंद्रराव अण्णासाहेब हे राज्यावर आले असून हल्लीं तेच संस्थानिक आहेत. धाकटे पुत्रे श्री. केशवराव बाबासाहेब हे मिरज मळ्याचे (दत्तक जाऊन) अधिपति आहेत.

पटवर्धनांचें दैवत गणपति आहे. कुरुंदवाडास गणेश चतुर्थीचा उत्सव थाटाचा होतो. चिंतामणरावांनीं प्राथमिक व दुय्यम शिक्षणाचा फैलाव करून दवाखाने, पोलीस, न्याय, जमीनमहसूल वगैरे खात्यांची रचना चांगली केली. त्यांचें वक्तृत्व उत्तम होतें त्यांनीं एकदां कुरुंडवाडास पुनर्विवाहाच्या संबंधीं झालेल्या व्याख्यानसत्रांत पुनर्विवाहाचें खंडण केलें होतें. औद्योगिक बाबतींतहि त्यांनीं संस्थानांत कामें सुरू केलीं होतीं. यांचें दातृत्व प्रख्यात होतें. हे मुंबई कायदेकौन्सिलांत स. १८९५ व स. १९०३ मध्यें दोन वेळा (दक्षिणेंतील संस्थानिकांतर्फे) सभासद झाले होते. हल्लींचे संस्थानिक श्री. अण्णासाहेब हे बी. ए. असून संस्कृत भाषेच्या प्रावीण्याबद्दल त्यांनीं बक्षिसें मिळविली आहेत. यांनीं आपल्या राज्यांत प्राथमिक शिक्षण मोफत केलें आहे. हजार वस्तीच्या गांवीं प्राथमिक मुला-मुलींची शाळा, व पांच हजार वस्तीच्या गांवी इंग्रजी तीन इयत्तेच्या शाळा त्यांनीं उघडल्या आहेत.  लोकलफंडांतील १/ रक्कम शिक्षण व आरोग्य खातीं खर्च होतें. प्रजेनें वर्गणी करून व श्रीमंतांनीं पुष्कळशी भर घालून एक 'भालचंद्र मेमोरियल हॉल' म्हणून इमारत बांधिली आहे. सार्वजनिक वाचनालयास श्रीमंतांनीं बरींच मदत केली आहे. परस्पर सहाय्यकारक संस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शेतीकरितां पाण्याची योजना वगैरे सुधारणा संस्थानांत झाल्या आहेत. पूर्वीपेक्षां संस्थानांत असल्या सुधारणा पुष्कळ झाल्या आहेत. श्री. अण्णासाहेब हेहि वडिलांप्रमाणें १९१२ सालीं मुंबई कायदे कौन्सिलचे नामदार झाले होते.

धाकट्या पातीमधील हरिहरराव हे वारल्यानंतर त्यांचे पुत्र बापूसाहेब हे गादीवर आले. त्यांनीं संस्कृत व प्राकृत ग्रंथांचा संग्रह फार केला. हे कवि होते. यांचें गणेशपुराण, आर्याभट्टवंशकाव्य व गंगावर्णना हे काव्यग्रंथ प्रसिद्ध आहेत. पंचवटी स्थलनिर्णयासंबंधानें कै. वामन दाजी ओक यांच्याशीं यांनीं दोन हात केले होते. यांनीं इंग्रजी नाटकांचाहि अभ्यास केला होता व कांहींचें भाषांतरहि केलें. त्यांनीं देशी व्यापार व उद्योगधंदे यांना मदत केली होती. कुरुंदवाडास रेशमी व सुती कापडाचे हातमाग त्यांनींच सुरू केले होते व एक ज्योतिषशाळाहि स्थापिली होती. ते चित्रकारहि होते. हल्लीं यांचे पुत्र श्री. माधवराव भाऊसाहेब हे धाकट्या पातीचे अधिपति आहेत.

धाकट्या पातीबद्दल दुसरे विनायकराव हे इंग्रज सरकारचें सरकारदरबारीं काम करीत असत. संस्थानचे दिवाणी फौजदारी अधिकार हेच चालवीत. हे इ. स. १८६८ मध्यें मुंबई कायदे कौन्सिलचे नामदार सभासद होते. सरदारांचें एक कौन्सिल असावें व त्यामार्फत सर्व जहागिरदार, संस्थानिक यांनीं आपले हक्क वगैरेंचें संरक्षण करावें अशी त्यांनीं एक योजना तयार केली होती. त्यांनां व्यायामाचा नाद होता. त्यांचे पुत्र हरिरराव; यांनां पांच पुत्र झाले. पैकीं वडील श्री. विनायकराव हे हल्ली सर्व कारभार पाहतात.

धाकट्या पातींतील तिसरे त्रिंबकराव हे निपुत्रिक होते. त्यांनीं आपण होऊन आपला हिस्सा आपल्या दोघा बंधूंस (हरिहरराव व विनायकराव यांस) दिला.

वा डी क र घ रा णें.— रघुनाथ नीळकंठ व शिवराव नीळकंठ यांनीं १७९२ त परशुरामभाऊंच्या विद्यमानें वांटण्या केल्या. त्यावेळीं पेशव्यांनीं दिलेल्या सरंजामावरील हक्कांचा शिवरावांनीं राजीनामा देऊन अक्कलकोटकरांकडून प्रारंभीं मिळालेला गांव व कांहीं नेमणूक घेऊन वडील भावाचा पोटसरंजामदार म्हणून रहाण्याचें कबूल केलें व कुरुंदवाडाजवळ वाडी या गांवीं ते राहूं लागले. यांच्या वंशजास वाडीकर म्हणूं लागले. इ. स. १८२१ त शिवराव यांच्या मुलांनीं कुरुंदवाड जहागिरींतील हिस्सा मिळविण्याची खटपट केली होती. पण ती फुकट गेली. हे तीन भाऊ कृष्णराव, नीळकंठराव व कोन्हेरराव नांवाचे होते. पैकीं नीळकंठराव हे निपुत्रिक होते, त्यांचा हिस्सा इंग्रजांनीं खालसा केला. कृष्णरावास चिंतामण व त्र्यंबक हे दोन पुत्र होते. चिंतामणराव वारल्य़ावर त्यांचाहि हिस्सा इंग्रजांनीं खालसा करून फक्त इनाम गावें वंशजाकडें चालू ठेविलीं. शिवरावांचे तिसरे पुत्र कोन्हेरराव हे मिरजेस रहात. त्यांनां तीन मुलगे; वडील नीळकंठराव, हे कोन्हेररावांच्या पश्चात दोन वर्षांनींच वारले. यांचे चिरंजीव गंगाधरराव हे वारल्यानंतर यांचे पुत्र श्री. गणपतराव हे गादीवर आले. हल्लीं हेच वाडीचे संस्थानिक आहेत हे वाडीकर मिरज येथेंहि रहातात. वाडी संस्थानचें उत्पन्न अगदीं थोडें आहे व संस्थानहि लहान आहे, तरी पण यांना दिवाणीफौजदारीचा अधिकार आहे. कोन्हेर शिवराव यांचे दुसरे पुत्र श्री. विनायकराव हे पुण्यास असतात. यानीं वाडी संस्थानांत वांटा न मागतां नक्त नेमणूक मागितली, ती त्यांना मिळते.

का ग वा ड क र घ रा णें.— (कागवाड या लेखाखालीं थोडीशी माहिती दिली आहे ती पहा, तिच्या शिवाय जास्त माहिती येथें देतों) त्रिंबक हरि यांचे पुत्र कोन्हेरराव यांस गणपतराव नांवाचा मुलगा होता. तो पेशवाई बुडाली तेव्हां हयात होता. यास व कुरुंदवाडकर केशवराव रघुनाथ या उभयतांस कुरुंदवाडचा सरंजाम वांटून दिला होता. त्यांत कागवाडची वांटणी गणपतरावाकडे आल्यानें ते येथें राहूं लागले. इंग्रजांनीं केशवरावाशीं ज्या प्रकारचा तह केला होता तसाच गणपतरावाशींहि केला होता. यांना २० हजार रुपयांची जातीची तैनात मिळाली होती. तसेंच नौकरीच्या स्वाराबद्दल ९६१२ रु.ची नेमणूक ठरली होती. स. १८२१ त गणपतरावांनीं कृष्णराव वाडीकरांचा मुलगा त्रिंबकराव यांस चापलीनच्या संमतीनें दत्तक घेतलें त्यास आपल्या पश्चात् जहागिरदार करण्याबद्दल इंग्रजांस त्यांनीं थैली पाठविली होती. परंतु त्यावेळीं इंग्रजसरकारनें तें कबूल केलें नाहीं. गणपतराव १८४५ त वारले. त्रिंबकराव अज्ञान, म्हणून संस्थानचे कारभारी व त्र्यंबकरावांचे जनक वडील कृष्णराव यांनां कारभार पहाण्यास नेमून इंग्रजांनीं त्रिंबकरावास जहागिरदार मान्य केलें. पुढें कारभार चांगला चालला नाहीं. कृष्णरावानें कर्ज करून, गांव सावकाराकडे गहाण टाकलें. त्रिंबकराव प्रौढ झाल्यावर व त्यांच्या हातीं कारभार आल्यावर त्यांच्यानेंहि कारभार चांगला चालेना. संगत वाईट लागल्यानें उधळपट्टी होऊं लागली. त्यांना गाण्याचा व कविता करण्याचा नाद होता. कर्ज जास्त झालें, रयतेवर जुलूम होऊं लागला. त्यांनीं दत्तकाची परवानगी मागितली असतां इंग्रजानें दिली नाहीं. ते इ. स. १८५७ त वारले; तेव्हां सर्व दौलत इंग्रजसरकारनें खालसा केली; ते (नरगुंदकरांच्या) बंडांत सामील होते असें ठरवून जहागीर खालसा केली असा एक तत्रस्थ लोकापवाद आहे; मात्र त्यांच्या दोन बायकांकडे ८८ हजारांची जिंदगी ठेवून त्यांनां नक्त ११ हजारांची नेमणूक करून दिली. सन १८६१ त यांची धाकटी बायको वारली तेव्हां इंग्रजांनीं तिची नेमणूक खालसा केली. याप्रमाणें १ लक्ष १२ हजार वसुलाचा मुलुख खालसा झाला. या मुलुखांत ५६ गांवें बेळगांव जिल्ह्यांतील, १५ सोलापूर जिल्ह्यांतील व ३ पुणें जिल्ह्यांतील होती. कागवाडचा वाडा गणपतरावांनीं बांधिला, गणपतीचें देऊळ त्र्यंबकरावांनीं बांधिलें व त्याचा सभामंडप त्यांच्या कुटुंबा(पार्वतीबाई)नें बांधिला. त्र्यंबकराव हे गाणपत्य होते. त्यांना दृष्टांत झाल्यावर (व २१ वर्षें सेवा केल्यावर) त्यांनीं मांदराचे मुळाशीं सांपडलेल्या गणपतीची स्थापना सदर देवळांत केलीं. देवळाला व देवाच्या सर्व सेवेकर्‍यांना त्यांनीं इनामें दिलीं आहेत. श्री सवाई माधवरावसाहेबांनीं दिलेलें इनामगांव बोरगांव हें यांच्या वांटणीस आलें होतें. यांनां नारायणराव म्हणून औरस पुत्र होते, परंतु ते निवर्तल्यामुळें यांनीं गणपतराव म्हणून एक दत्तक पुत्र घेतल. हे गणपतराव १८९१ त वारले. त्यांचे पुत्र श्री. त्र्यंबकराव हे हल्ली विद्यमान आहेत. सभामंडप बांधणार्‍या पार्वतीबाई हल्लींच्या त्र्यंबकरावांची आजी होय. यांचें माहेर रामदुर्ग होतें. त्यांनां चोळीबांगडीकरितां रामदुर्गकरांनीं गोणगर हें गांव इनाम दिलें होते. तो गांव हल्लीं श्री. त्र्यंबकराव यांच्याकडे चालत आहे. यांनीं वाचनालयें वगैरेस मदत केली आहे.

कागवाडची देणगी इ. स. १७४५ च्या पूर्वीची आहे. असें म्हणतात कीं, इंग्रजसरकारानें सरंजामासंबंधीं जे नियम केलेले आहेत त्यांत असा स्पष्ट उल्लेख आहे कीं, स. १७५१ च्या पूर्वी जे सरंजाम बहाल झालेले आहेत, ते वंशपरंपरेनें चालवावेत; असा प्रकार असतां व हा सरंजाम १७४५ ते १८५७ पर्यंत चालला असतां पुढें बंद कां केला तें स्पष्ट समजत नाहीं. [इंपि. ग्याझे. पु. १६;  गो. वि. आपटे-पटवर्धन घराण्याचा इतिहास].

कुरुंदवाडकर घराण्याची वंशावळ खालीं दिली आहे. तींत ज्या व्यक्तीचा वंश खुंटला त्या व्यक्तीच्या खालीं ० अशी खूण दिली आहे.

कुरुंदवाडसंस्थानची वंशावळ

 

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .