प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें    
   
कुरुयुद्ध- हें महायुद्ध कौरव व पांडव (पांडवहि कुरुवंशांतील असल्यानें एक प्रकारें कौरवच होत) यांच्यामध्यें झालें. पांडवांचें राज्य त्यांनीं प्रतिज्ञा पुरी केल्यानंतरहि त्यांच्या हवाली करण्यास कौरव तयार होईनात म्हणून हें युद्ध उपस्थित झालें. तत्पूर्वी शिष्टाचाराप्रमाणे श्रीकृष्ण हे शिष्टाई करण्यास कौरवाकडे गेले होते; परंतु ती निष्फळ झाली व त्यामुळे युद्धाशिवाय दुसरा उपाय (पांडवांनां) उरला नाहीं. महाभारताचा मुख्य विषय हें युद्ध आहे व या युद्धास भारतीययुद्धहि म्हणण्याचा प्रघात आहे [महाभारत पहा.]

युद्धाचें सत्यत्व.- हेंच कांहींच्या मतें सिद्ध होत नाहीं. कां कीं वैदिक वाङ्‌मयांत धृतराष्ट्र, कौरव, परीक्षिति व जन्मेजय इत्यादिकांचा उल्लेख असून कुरुयुद्धाचा तेवढा उल्लेख नाहीं. तथापि या युद्धावर जें अनेक प्रकारचें वाङ्‌मय निर्माण झालें त्यावरून हें युद्ध झालें असावें असें गृहीत धरतां येईल. शिवाय असेंहि शक्य आहे कीं वैदिक संस्कृतींतील म्हणजे मात्र संस्कृतींतील सुशिक्षित वर्ग भारतीयुद्धानंतर कुरुक्षेत्रीं पूर्णपणें स्थापन झाला असावा व त्यामुळें धार्तराष्ट्रांचा किरकोळ उल्लेखच वैदिक वाङ्‌मयांत शिरला असावा.

कु रु यु द्ध का ल.- या युद्धाच्या काळाविषयीं अनेक मतें प्रसिद्ध आहेत. कै. मोडकांचें मत वगळून इतर मतें पाहिलीं असतां ख्रि. पू. १५०० व ख्रि. पू. ३००० या दोन मध्यांच्या आसपासचे काल भिन्न संशोधकांनीं मांडले आहेत. मुख्य कालनिश्चयाचीं अशीं पांच मतें आहेत तीं थोडक्यांत अशीं (१) कै. मोडक यांचें मतः- ख्रि. पू. ५००० वर्षें. या युद्धाच्या वेळीं ग्रहांची स्थिति निरनिराळ्या दोन नक्षत्रांवर (महाभारतांत) सांगितली आहे, तेव्हां एक नक्षत्र सायण व दुसरें निरयन मानलें पाहिजे; यावरून त्यावेळीं वसंतसंपात पुनर्वसू नक्षत्रांत होता. या हिशोबावरून गणित करून पाहतां युद्धाचा काळ ख्रि. पू. ५००० हा येतो. (२) आर्यज्योतिष्यांचें मत-: ख्रि. पू. ३१०१. या वर्षी "प्राप्‍तं कलियुगं विद्धि" (कलियुग लागलेंच असें जाण) अशा (शल्यपर्वांतील) श्रीकृष्णांच्या वाक्यावरून युद्ध झाल्यावर लवकरच चैत्रांत कलियुग लागलें असें धरलें, आणि कलियुग सर्व आर्यज्योतिष्यांच्या मतें ख्रि. पू. ३१०१ या वर्षी लागलें; अर्थातच तोच काल या महयुद्धाचा होय. (३) वराहमिहिर, काश्मीरी पंडित (विशेषतः बिल्हण) व आर्यसमाजाचे कांहीं विद्वान सभासद:- ख्रि. पू. २४४८ या वर्षी त्यांच्या मतें कलियुग सुरू झाल्यावर ६५३ वर्षांनीं युद्ध झालें. (४) रमेशचंद्रदत्त वगैरे पौर्वात्य व कित्येक पाश्चात्य पंडितः- ख्रि. पू. १४००. कारण पुराणांत बृहद्रथवंशांतील पांडवांचा समकालीन मगधराजा याच्यापासून नंदापर्यंतचा जो काल दिला आहे त्यावरून हा काल निश्चित होतो. (५) बिलंडी अय्यर:- आक्टोबर तारीख १४, ख्रि. पू. ११९४ (कार्तिक वद्य ११ चित्रा नक्षत्र).

या पांच काळांबद्दल निरनिराळ्या विद्वानांचीं मतें काय आहेत ती थोडक्यांत सांगतों. भारती युद्धापासून कलियुगाला प्रारंभ झाला अशीं वचने महाभारतांत दोन तीन ठिकाणीं आलीं आहेत तीं (१) 'प्राप्‍तं कलियुगं विद्धि'- शल्यपर्व. (२) 'एतत्कलियुगं नाम अचिराद्यत् प्रवर्तते'- वनपर्व. (३) 'अन्तरे चैव संप्राप्‍ते कलिद्वापरयोरभूत । स्यंमतपंचके युद्धं कुरुपांडवसेनयो:'- आदिपर्व. यावरून हें युद्ध कलियुगारंभीं झालें हीं समजूत महभारतकार सौति याच्या वेळीं (ख्रि. पू. ३००) पक्की रूढ होती. कुरुयुद्धकाल म्हणजे जसा श्रीकृष्णाचा काळ येतो तसाच कलियुगाचा प्रारंभकालहि येतो. तेव्हां हे दोन्ही काल ठरले म्हणजे आपोआपच युद्धकाल ठरेल असें या पक्षाचें म्हणणें आहे. श्रीकृष्णाचा काळ ठरविण्यास एक महत्त्वाचें बाह्य साधनाचें प्रमाण उपलब्ध  आहे, तें पुढील प्रमाणें मांडण्यांत येतें:- चंद्रगुप्‍त मौर्याच्या दरबारांत यवन (ग्रीक) मेग्यास्थिनीस हा वकील होता, त्यानें त्यावेळीं शोध करून श्रीकृष्णाच्या कालाबद्दल लिहून लेविलें आहे. ती ऐकीव माहिती खरी धरून कृष्णकाल काढण्याचें कांहींनीं साहस केलें आहे. मेग्यास्थिनीस म्हणतो "सँड्रकोट्स (चंद्रगुप्‍त) व डॉयानिसॉस (यांच्या भारतीय तुल्याचें नांव काय तें समजत नाहीं. दाक्षायण मनु ?) यांच्यामध्यें १५३ पिढ्या झाल्या व वर्षे ६०४२ झालीं. डॉयानिसॉस पासून हिराक्लीज (हरिकृष्ण; शौरीकृष्ण) हा ९५ पिढ्या अलीकडे झाला." म्हणजे १५३-१५=१३८ पिढ्या श्रीकृष्ण व चंद्रगुप्‍त यांच्या दरम्यान झाल्या. दर पिढीस २० वर्षे धरल्यास १३८X२०=२७६० वर्षांचा हा ठोकळ काळ येतो. चंद्रगुप्ताचा काळ ख्रि. पू. ३१२ असा ठरला आहे. तेव्हां २७६०+३१२=३०७२ ख्रि. पू. हा काल श्रीकृष्णाचा ठरतो. हा ख्रि. पू. ३१०१ या कलियुग कालाशीं जुळता आहे. हा कलियुगारंभाचा काळ (तारीख १७ फेब्रुवारी ख्रि. पू. ३१०१, मिति फाल्गुन कृष्ण अमावस्या गुरुवार मध्यरात्र) सूर्यसिद्धांताप्रमाणें काढिला आहे. वरील मेग्यास्थिनीसचा पुरावा फार प्राचीन (ख्रि. पू. ३१२) असल्यानें त्याला विशेष किंमत आहे. रा. ब. वैद्यांनीं वरील प्रमाणें हिशोब देतांना बरीच वैदुगिरी केली आहे. मेग्यास्थिनीसनें १५३ पिढ्या सांगितल्या आहेत तेवढेंच खरें धरावयाचें आणि त्यांनीं सांगितलेलीं वर्षे मात्र खरीं धरावयाचीं नाहींत या प्रकारच्या विवेचनपद्धतीची किंमत कशी ठरवावयाची ?

वराहमिहिरानें जो काल दिला आहे. तो सर्व ज्योतिष्यांच्या मताच्या विरुद्ध व महाभारतांतील प्रत्यक्ष वचनांच्या विरुद्ध गर्गाचार्याच्या "षडद्विकपंचद्वियुतः शककालस्तस्य राज्ञस्य" या वाक्यावरून दिला आहे. परंतु हें वचन गर्गाच्या नांवावर कोणीं तरी रचिलें असावें. कारण शककालापूर्वी एवढेंच नव्हें तर (महाभारतात त्याचें नाव प्रत्यक्ष येतें, त्यावरून तर) महाभारतापूर्वीच गर्ग होऊन गेला. कदाचित गर्गानें २५२६ हा आकडा आपल्या एखाद्या समकालीन राजांतील व युधिष्ठिरांतील अंतराचा निदर्शक म्हणूनहि दिला असावा. परंतु याचा समाधानकारक खुलासा होत नाहीं. मात्र हा अंक त्यानें एखाद्या राजवंशावळीवरून तयार केला असावा. कारण अशा वंशावळी त्यावेळीं सर्वत्र तयार ठेवीत असत. (राजतरंगिणी पहा.)  "सारांश इतर ज्योतिष्यांच्या मतांविरुद्ध (विशेषतः खुद्द महाभारतांतील वचनाविरुद्ध) या एकट्या वराहमिहिराच्या वचनास मान्यता देतां येत नाहीं," असें चिंतामणराव वैद्य म्हणतात. त्यांच्या मतें रोहिणी किंवा मृग नक्षत्रीं मार्गशीर्ष शुद्ध १३ या तिथीस युद्ध सुरू झालें. आम्हीं ह्या गर्गवचनाचा अनादर करण्यास तें वचन गर्गाचें नव्हें असें सिद्ध करण्याच्या भानगडींत पडत नाहीं. गर्ग संहिताकार गर्गशकोत्तर नसेल कशावरून? आम्हीं असें म्हणणार कीं शातवाहनकालीन मनुष्यानें हजार दोन हजार वर्षांपूर्वीची झालेल्या गोष्टींची नक्की तारीख सांगितली तर त्यानें केवळ "बाबा वाक्यं प्रमाणं" म्हणून स्वीकारलेली गोष्ट आहे असें म्हणून ती अजीबाद खोटी धरणार.

रमेशचंद्र दत्तादिकांचा ख्रि. पू. १४०० चा काळ, मुख्यत्वें विष्णुपुराणावरून ठरविलेला आहे. त्यांत पुढील वाक्य या काळाचें मूल म्हणून दर्शविलें जातें:— "यावत्परीक्षितो जन्म यावन्नंदाभिषेचनम् । एतद्वर्षसहस्त्रं तु ज्ञेयं पंचदशोत्तमरम् ।।" (असाच श्लोक भागवतांतहि आहे). या श्लोकांत परीक्षितांच्या जन्मापासून नंदाच्या अभिषेकापर्यंत १०१५ वर्षें झालीं असें म्हटलें आहे. परीक्षिति हा युद्धानंतर ४।५ महिन्यांनीं जन्मला तेव्हां युद्ध तों नंदाभिषेक १०१५ + त्या पुढील नऊ नंदांचीं १०० वर्षें + चंद्रगुप्ताचीं ३१२ मिळून एकंदर = १४२७ ख्रि. पू. हा भारतीयुद्धाचा काल आला. परंतु विष्णुपुराणांतील हेंच वचन (अंश ४ अध्याय २४) विष्णुपुराणांतीलच दुसर्‍या (अध्याय २३) एका वचनाच्या विरुद्ध आहे. त्यात भारतीयुद्धांतील जरासंधपुत्र सहदेव याचा वंश १००० वर्षे राज्य करील व नंतर प्रद्योतवंश १३८ वर्षें व त्यानंतर शिशुनागवंश ३६२ वर्षे राज्य करील असें म्हटलें आहें. म्हणजें एकंदर १०००+१३८+३६२=१५०० वर्षें होतात. तेव्हां या १५०० चा व पूर्वीच्या १०१५ चा मेळ मुळींच बसत नाहीं. पुराणकारांची माहिती ठोकळ स्वरूपाची आहे. म्हणून या विधानांकडे अधिक सूक्ष्मतेनें पाहिलें पाहिजे तथापि तेवढ्या असंगतीवरून विष्णु, भागवत वगैरेमधील या पुराणोक्त पिढ्या व वर्षे यांचा पुरावा मेग्यास्थीनीसच्या पुराव्यासमोर टिकत नाहीं असें जें चिंतामणरावांनीं मांडलें आहे त्याचा मुळींच स्वीकार करतां येणार नाहीं. मेग्यास्थीनीसच्या पुराव्याला महत्त्व द्यावयाचें म्हणजे त्यास आपणापेक्षां अधिक साहित्य निश्चितपणें खरे असलेले उपलब्ध झालें होतें व त्या साहित्यावरून त्यानें केलेला हिशोब अगदीं बिनचुक होता असें धरलें पाहिजे आणि तसें धरण्यास आधार काय ?

ऋग्वेदांतील दोन उल्लेखांवरून कुरुयुद्धाचा काल ख्रि. पू. ३१०० च्या वेळचाच निघतो. असेंहि मांडण्यांत आलें आहे. ऋग्वेदांत देवापि या ऋषीचें नांव येतें तेथें त्यास वेदाचें स्पष्टीकरण करणारांनीं वेदांनीं नव्हे- 'कौरव्यशंतनु' याचा भाऊ म्हटलें आहे. महाभारतांत, शंतनुचा वडील भाऊ म्हणून देवापीचें नांव येतेंच. तेव्हां शंतनु (अथवा देवापि विचित्रवीय-पंडु-पांडव मिळून १०० वर्षें होतात. ऋग्वेदांत दुसर्‍या एका ठिकाणीं सोमक साहदेव्य याचा उल्लेख आला आहे. महाभारतांत द्रुपदाचा पूर्वज सोमक असें म्हटलें आहे. सहदेव-सोमक- जंतुपृषत-द्रुपद मिळून १०० च वर्षे होतात म्हणजे ऋग्वेदानंतर १००, १५० वर्षांनीं भारतीयुद्ध झालें असें म्हणण्यास हरकत नाहीं. यजुर्वेदांत कुरु व पांचाल यांचीं नांवें येतात. तसेच काठक ब्राह्मणांत धृतराष्ट्र वैचित्रवीर्य याचा उल्लेख येतो आणि शुक्ल्यजुर्वेदांतर्गत शतपथ ब्राह्मणांत जनमेजय पारीक्षिताचा उल्लेख आहे. या सर्व उल्लेखांवरून त्या त्या वेद व वेदांगांपूर्वी भारतीय युद्ध झालें हें स्पष्ट आहे. शतपथ ब्राह्मणांत कृत्तिका या थेट पूर्वेस उगवतात असें एक (वर्तमानकालवाचक) वचन आहे कै. शं. बा. दीक्षित यांनीं गणित करून कृत्तिकेचा हा काळ ख्रि. पू. ३००० असा काढला आहे. तेव्हां शतपथापूर्वी (जनमेजय-परिक्षिती-अभिमन्यु-अर्जुन) निदान ६०।७५ वर्षे तरी भारतीय युद्ध झालें. शतपथापूर्वी कित्येक वर्षे ऋग्वेद तयार होत होता. तेव्हां ख्रि. पू. ३२०० हा ऋग्वेदाचा शेवटचा काळ धरण्यास हरकत नाहीं वर सांगितल्याप्रमाणें या कालानंतर १०० वर्षांनीं युद्ध झालें म्हणजे ख्रि पू. ३१०० हाच काल युद्धाचा येतो (याकोबी यानें ऋग्वेदाचा काळ ज्योतिषप्रमाणांवरून ख्रि. पू. ४ हजार वर्षे ठरविला आहे). तसेंच यजुर्वेदाचा काळ ३००० चा धरतात; त्यावरूनहि युद्धाचा काळ वरीलच निघतो.

चांद्रमान हिशेबानें पांडवांनीं आपला वनवास पुरा केला असें महाभारतांत वर्णन आहे. ही चांद्रमानाची पद्धत (पांच वर्षांनीं दोन महिने एकदम अधिक धरण्याचा संप्रदाय) तैत्तिरीय संहिता व ब्राह्मणकाळी होती व तीच भीष्मानें दुर्योधनाच्या शंकेस उत्तर म्हणून सांगितली. अर्थांत् तै. सं. व ब्राह्मणकालीं कुरुयुद्ध झाले. या प्रकारच्या मांडणींतील गुणदोष येणेंप्रमाणें :— शतपथ ब्राह्मणापूर्वी भारतीयुद्ध झालें हें मत स्वीकारतां येईल. तथापि देवापि व शंतनु यांचें बंधुत्व हें उत्तरकालीन कथाप्रमाणेंच दिसतें म्हणून धरतां येणार नाहीं. द्रुपद पूर्वज सोमक व ऋग्वेदोक्त सोमक हे एकच होते. याला आधार काय तर दोघांचेंहि नांव सोमक होतें हाच !!

उरलेल्या कृत्तिका वादाचा परामर्श यापुढें घेतला आहे. आमच्या मतें त्या उल्लेखावरून शतपथांचे प्राचीनत्व सिद्ध होत नाहीं. वेदांगांपूर्वी भारतीयुद्ध झालें हें सांगण्यांत तात्पर्य काय ? बरींचशीं वेदांगें तर फारच अर्वांचीन आहेत. मीमांसेत तर बौद्धांचा उल्लेख येतो. एवंच रा. चिं. वि. वैद्यांची इमारत अगदीं कच्च्या पायावर उभारलेली आहे. रा. वैद्य मोडकांच्या मतांचें खंडण करण्यासाठीं मांडणी करतात ती अशी:—

कै. मोडक यांनीं उद्योगपर्वांमध्यें व भीष्मपर्वामध्यें आलेल्या ग्रहस्थितीच्या वर्णनावरून युद्धकाल ठरविला आहे. तीं वचनें पुढीलप्रमाणें आहेत. (१) श्रीकृष्ण हे कार्तिक महिन्यांत रेवती नक्षत्रीं शिष्टाईस निघाले. (२) हस्तिनापुरास कर्णानें त्यांची भेट घेतली. त्यावेळीं त्यानें, शनि हा रोहिणीस पीडा देत आहे, महापात चित्रेला पीडा देत आहें, राहू सूर्याला ग्रासतो आहे, ज्येष्ठेचा मंगळ वक्री होऊन अनुराधेशीं संगत होतो आहे, असें वर्णन केलें आहे. (३) दुर्योधनानें पुष्य नक्षत्रीं प्रयाण केलें. (४) कार्तिकांत वद्य पक्षांत श्रीकृष्ण परतले. त्या पक्षांत १३ च दिवसांचा पंधरवडा होता (भीष्मपर्व) व सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण अशीं दोन्हीं ग्रहणें या महिन्यांत पडलीं. (५) युद्धारंभदिनास चंद्र मघा नक्षत्रीं होता (६) बलराम म्हणतो, मी पुष्प नक्षत्रावर यात्रेस गेलों आणि आज (युद्धाच्या शेवटच्या १८ व्या दिवशीं) श्रवणावर परतलों, इत्यादि वचनांवरून कै. मोडकांनीं काळ काढिला आहे तो ख्रि. पू. ५ हजार वर्षे हा होय. पण हें अनुमान काढतांना मुख्य अडचण येते ती ही कीं, सौतीनें भारत वाढविल्यामुळें मूळांतील वचनें कोणतीं तें समजणें अशक्य आहे. तसेंच कांहीं वचनें कूटार्थी असतात; हीं वचने बहुधा संख्येवर जास्त रचिलेलीं आहेत; त्यामुळें वरील अनुमान निःशंकपणें मानतां येत नाहीं. मात्र कार्तीकी अमावस्येस (शुक्रवारीं) सूर्यग्रहण पडलें होतें, असें मात्र गृहीत धरून हें गणितानें सिद्ध होत आहे व त्यावरून जो काळ निघतो तो (म्हणजे शके ३१८०) आर्यज्योतिष्यांच्या नेहमींच्या काळालाच अनुसरून म्हणजे ख्रि. पू. ३१०२ येतो. तेव्हां या दृष्टीनें हा पुरावाहि मजबूत आहे. मोडकांचा पांच हजारांचा काळ जुळत नाहीं. भारतांतील ही ग्रहस्थिति इतकी अनिश्चित आहे कीं, तीवरून गणितरीत्या काळ काढणें शक्यच नाहीं असें कै. दीक्षित यांचेंहि मत आहे.

कै. त्र्यं. गु. काळे यांनीं भारतीय युद्धाची रोजनिशी म्हणून एक लेख छापला आहे (विविधज्ञान विस्तार जुलै १९१३). त्यांत वरील ग्रहस्थितीच जमेस धरून, युद्ध मार्गशीर्षी पौर्णिमेला सुरू होऊन, पौष शुद्ध द्वितीयेला संपलें असें ठरविलें आहे. पुराणनिरीक्षण या ग्रंथांत त्यांनीं युद्धकाल ख्रि. पू. १२६३ दिला आहे.

रा. केशवराव दफ्तरी यांनीं या विषयावर वि. ज्ञा. वि. च्या १९१८ सालच्या अंकांत लेख लिहिले आहेत. त्यांचें म्हणणें कीं, "भारतांतील वाक्यें परस्परविरोधी असूनहि त्यांपैकीं ग्राह्य कोणतीं व त्याज्य कोणतीं हे ठरविण्याचा कोणींच प्रयत्‍न केला नाहीं; त्यामुळें त्यांचे प्रयत्‍न फसले; मी तो प्रयत्‍न केला आहे व तो सिद्धीस गेला आहे असें वाटतें." युद्धदिनाबद्दल त्यांचें मत, गणितानें येणार्‍या कार्तिकाच्या अमावास्येस, परंतु वास्तविक मार्गशीर्ष शुद्ध द्वितीयेस ज्येष्ठा किंवा मूळ नक्षत्रीं युद्ध सुरू झालें असें आहे. युद्धकालासंबंधीं लिहितांना, त्यांनीं भारतांत सांगितलेल्या उत्तरायणारंभकालावरून तो काल काढला आहे. आणि तो ख्रि. पू. ११९७ हा होय.

रा. करंदीकर हे युद्धाचा काल १५०० पूर्वी एक दोन शतकें इतका नेतात. पण त्यांच्या विधानांतहि ज्योतिर्विषयक विधानांवर अवलंबून रहाणारांमध्यें सांपडणारे दोष सांपडतात. युद्धाच्या कालाविषयीं इतकी अनिश्चितता असतां युद्धदिननिर्णयासाठीं प्रयत्‍न झाले आहेत.

रा. ज. स. करंदीकर यांनीं भारतीय युद्धदिननिर्णय अथवा गीताजयंति या आपल्या [चित्रमयजगत्. जानेवारी १९२१ च्या] लेखांत पुढील निष्कर्ष काढला आहे. यांनीं रा. वें. बा. केतकरांचें म्हणणें कीं "मार्गशीर्ष शु. पौर्णिमा मृग किंवा आद्रा नक्षत्रीं युद्धास सुरुवात झाली." हें खोडून काढलें आहे. कारण हा आरंभदिवस धरल्यास जयद्रथवधाच्या दिवशीं अमावस्या येते; परंतु भारतांत त्या दिवशीं पहाटें चंद्रोदयाचें वर्णन आहे म्हणून केतकरांचें म्हणणें चूक आहे. म्हणजे जयद्रथवधवर्णनावरून आमावास्याच निघते तर तें वर्णन किंवा त्या वर्णनावरून निघणारा निष्कर्ष अमान्य करून त्यावेळचें चंद्रोदय वर्णन हें मात्र अप्रक्षिप्‍त व प्रमाण असें रा. करंदीकर समजतात बिलंडी यांचें म्हणणें कीं, "कार्तिक कृ. ११ चित्रा नक्षत्रीं" आरंभ झाला हेंहि करंदीकर यांनीं खोडून काढलें आहे. कारण तो दिवस धरल्यास भीष्मनिर्याणाच्या दिवशीं ५८ वा दिवस येत नाहीं व युद्धारंभ मघानक्षत्रीं व युद्धशेवट श्रवण नक्षत्रींहि येत नाहीं व इतरहि प्रसंग जुळत नाहींत. रा. दफ्तरींची वर दिलेली तिथीहि करंदीकरांनीं खोडली आहे. कारण दफ्तरी यांनी तिथि व चंद्रोदयकाळ बरोबर ठरविले नाहींत; तसेंच दफ्तरी यांची तिथि ग्राह्य धरल्यास अश्वत्थाम्याचा छापा मार्गशीर्ष वद्य ५ ला म्हणजे लखलखीत शुभ्र चांदण्यांत पडल्याचें मानावें लागतें; व बलराम श्रवण नक्षत्रीं परत आल्याचेंह जुळत नाहीं. नीळकंठ चतुर्धर व रा. चिंतामणराव वैद्य यांचें म्हणणें "मार्गशीर्ष शु. त्रयोदशी रोहिणी किंवा मृग नक्षत्र" हेंहि जुळत नाहीं. कारण त्रयोदशीस मृग नक्षत्र येत नाहीं व घटोत्कचवधाची परिस्थिति जुळत नाहीं व भीष्मनिर्याणाला ५८ वी रात्र येत नाहीं. रा. करंदीकरांचें स्वतःचें मत "मघाविषयग: सोम:" या वचनावरून मघांचे अधिपती पितर, त्यांचा विषय-वसति-यमलोक या यम आहे विषय ज्याचा तें भरणी नक्षत्र, या भरणी नक्षत्रीं युद्ध सुरू झालें आणि त्या दिवशीं तिथि मार्गशीर्ष शु. ११ होती असें आहे. याच दिवशी श्रीकृष्णांनी गीता सांगितली म्हणून गीताजयंतीहि याच दिवशी येते असें ते म्हणतात. आणि उद्योगपर्वांत व भीष्मपर्वांत जीं जीं नक्षत्रें क्रूर ग्रहांनीं विद्ध झालीं असें सांगितलें आहे त्या त्या नक्षत्रीं कौरवांचा भयंकर संहार कसा झाला हेंहि त्यांनीं वरील तिथी नव नक्षत्रें धरूनच दाखवून दिलें आहे. या त्यांच्या पद्धतीनें भीष्मनिर्याण माघ वद्य ४ स येतें म्हणजे मार्गशीर्ष वद्य ५ ते माघ वद्य ४ पर्यंत ५८ दिवस होतात. हल्लीं माघ शु. ८ ही तिथी धरली जाते ती चांद्रमानानें धरलीं जाते असें त्यांचें म्हणणें आहे.

एकंदरींत या कुरुयुद्धाच्या काळाबद्दल अनेकांचीं अनेक मतें आहेत आणि त्यांची एकवाक्यता जशी आज होत नाहीं, तशी यापुढेंहि होणें शक्य नाहीं असें दिसतें. कारण अनेकक्षेपयुक्त महाभारतांतील अस्पष्ट व संदिग्ध व परस्परविरुद्ध अशा श्लोकांवरून हा कालनिर्णय करावयाचा आहे; तेव्हां साहजिकच जो तो आपल्या मताप्रमाणें त्याचा अर्थ लावून काल काढणार.

लो. टिळक यांनीं गीतारहस्यांत (परिशिष्ट भाग ५, हल्लींच्या गीतेचा काल या सदराखाली पुढील माहिती दिली आहे :— (१) जावा व बली बेटांत शके ४०० पूर्वी महाभारत गेलें होतें; (२) शके ३६७ च्या एका गुप्‍त राजाच्या शिलालेखांत महाभारताचा उल्लेख आहे;  (३) भासाच्या बर्‍याच नाटकांना भारताचा आधार आहे. भासाचा काल इ. स.चें २ रें शतक; (४) अश्वघोषानें बुद्धचरित्र व सौंदरानंद यांत महाभारतीय कथांचा उल्लेख केला आहे. त्याचा काल इ. स.चें पहिले शतक होय. (५) आश्वालायन गृह्यसूत्रांत महाभारताचा स्पष्ट उल्लेख आहे व बौधायन धर्मसूत्रांत महाभारतांतील श्लोक आहेत. बौधायनाचा काल ख्रि. पू. चौथें शतक. (६) महाभारतांत राशींचा उल्लेख नाहीं आणि नक्षत्रगणना आहे ती श्रवणादि (श्रवण नक्षत्रापासून उत्तरायणास सुरुवात होणें) आहे. हा काल गणितानें शकापूर्वी ५०० येतो. (७) वेदांगज्योतिषाच्या व परिक्षितीच्या जन्मापासून नंदाभिषेकापर्यंत १११५ (किंवा १०१५) वर्षें होतात." या वचनाच्या आधारें ख्रि. पू. १४०० वर्षे श्रीकृष्ण व भारतीययुद्ध यांचा काल होय.

प्रत्येक मताचीं साधकबाधक विधानें तपासण्यास येथें अवकाश नाहीं. तथापि महत्त्वाच्या विधानांचा परामर्श मधून मधून घेतलाच आहे.

भारतीय युद्धाचा काल काढण्यासाठीं जे प्रयत्‍न संशोधकांकडून झाले त्यांचे एकंदर तीन वर्ग पडतात.

(१) ज्योतिषविषयक प्रमाणांस कमी महत्त्व देऊन आणि परीक्षितीच्या जन्मापासून नंदाभिषेकापर्यंत १११५ वर्षें होतात. या विधानास व त्याचप्रमाणें पुराणांतील राजांच्या यादीस महत्त्व अधिक देऊन कालनिर्णय करण्याचा मार्ग.

(२) दुसरा मार्ग असा कीं राजांच्या याद्यांकडे दुर्लक्ष करून ज्योतिर्विषयक विधानांपैकीं कलियुग भारतीयुद्धाच्या अंताला सुरू झालें एवढेंच घेऊन ज्योतिष्यांनीं प्रारंभविषयक कलियुग जें लिहिलें आहे तें घेऊन त्यांत अत्यंत ग्राह्य मत शोधण्याचा मार्ग. या प्रयत्‍नांत महाभारताच्या आंत जे इतर ज्योतिर्विषयक उल्लेख आले आहेत ते अग्राह्य व अप्रमाण धरले आहेत;  हा मार्ग रा. वैद्यांनीं स्वीकारला आहे. व हा स्वीकारतांनां राजावलीचें प्रमाण दुर्लक्षिण्यास व ज्योतिषविषयक अंतर्गत विधानें दुर्लक्षिण्यास रा. वैद्य जीं कारणें मांडतात तीं अपुरीं वाटतात. तें मागें दाखविलेंच आहे.

(३) कलियुग कुल्युद्धांती सुरू झालें या मतास कमी महत्त्व देऊन अंतर्गत ज्योतिर्विषयक विधानांस महत्त्व देऊन त्यापासून काल काढण्याचा मार्ग. या मार्गाप्रमाणें शोधप्रयत्‍न करणारांत अनेक मतें निघाली आहेत. ज्योतिर्विषयक प्रमाणांत परस्परविरुद्धता आल्यामुळें त्यांत अनेक मतें निघणें स्वाभाविक आहे. आणि ही परस्परविरुद्धता अनेक क्षेपांच्यामुळें उत्पन्न झाली असेल. पहिल्या प्रकारचा मार्ग पतकरणार्‍यांनीं आपल्या मतास जुळतील तेवढे ज्योतिषाचेहि पुरावे घेतले आहेत.

वरील तीन पद्धतींपैकीं संशोधनास जास्त उपयुक्त कोणतीं तें पाहूं. या तीनहि मार्गांपैकीं स्थूलपणानें एवढें सांगता येईल कीं कलियुगप्रारंभाचा काल तोच कुरुयुद्धांताचा काल होय असें धरून व कलियुगविषयक ज्योतिषांची कल्पना घेऊन युद्धाचा काल काढणें अप्रयोजक आहे. कांकीं, कलियुगविषयक कल्पना जमत जमत तयार झालेली. भारतीय युद्ध आटपल्यानंतर आता दिवस वाईट आले म्हणून केवळ कवींनें जें म्हटलें त्याचेंच युद्धांतीं कलियुग सुरू झालें हें उत्तरकालीन रूपांतर होय. ज्या वेळेस युगकल्पना मुळींच वृद्धिंगत झाली नव्हती व अमुक युग संपत आलें आहे व आतां दुसरें युग सुरू होणार अशा तर्‍हेची कल्पना त्या वेळच्या लोकांनां असणें जरुर नाहीं. अनेक ग्रह एका राशीवर होते त्या कालापासून कलियुग सुरू झालें हीं ज्योतिषाची कल्पना मागाहून तयार झालेली व ती आपल्या कालगणनेस कोणता तरी प्रारंभबिंदु असावा या भावनेनें तयार झालेली. जो काल (प्रारंभबिंदु) गणितज्ञांनीं गणिताच्या साहाय्यानें शोधून काढला. त्याच कालांत नेमके युद्ध झालें अशी कल्पना करणें म्हणजे संशोधकवृत्तीस अजीबात फाटा देणें होय. आतां वाईट दिवस सुरू झाले म्हणजे कलियुग सुरू झालें असें एक विधान व ज्योतिषांनीं ज्योतिषशास्त्र वाढविल्यानंतर कलियुगविषयक केलेलें गणित ही अगदींच निराळी वाढ. या दोन गोष्टींचा भिन्न जन्म लक्षांत घेतला असतां कलियुगविषयक विधानावर कुरुयुद्धाच्या कालगणनेची तयारी करणें अप्रयोजक आहे असें दिसून येईल.

ज्योतिषविषक विधानें लक्षांत घेतलीं असतां व त्यांतील एकमेकांशीं असंगति पाहिली असतां आणि महाभारत ही अनेक क्षेत्रांची संहिता आहे ही गोष्ट लक्षांत घेतली असतां ज्योतिर्विषयक उतारे बरेच काळजीपूर्वक वापरले पाहिजेत. अमुक गोष्ट झाल्यानंतर रात्र झाली पुढें अणुक गोष्ट झाल्यानंतर चंद्रोदय झाला. इत्यादि प्रकारचीं धोपट व काल्पनिक वर्णनें कवि कालविषयक विचार विशेष मनांत न आणतां घालूं लागतो. आणि त्या प्रकारच्या विधानांचा आधार घेऊन म्हणजे सामान्य वर्णनाशीं गुरफटलेले आधार अजीबात बाहेर काढून कालशोधन निराळें झालें पाहिजे. तें तसें आज झालें नाहीं "मातानां मार्गशीर्षोहं ऋतूनांकुसुमाकरः" येवढ्यावरून त्या काळात मार्गशीर्षांत वसंत येत असे एवढी उडी एकदम घेतां यावयाची नाहीं. त्याप्रमाणेंच ऋतुंमध्यें वसंतास प्रामुख्य असलें तरी वसंतामुळेंच मार्गशीर्षास प्रामुख्य होतें हें कोठें सांगितलें आहे. त्यावेळेस मार्गशीर्ष हा आज कांहीं अज्ञात असलेल्या सामाजिक किंवा राजकीय कारणांनीं प्रामुख्य पावला असेल.

कृत्तिका या थेट पूर्वेस उगवतात म्हणून वर्तमानकाल वाचक जे उल्लेख आहेत त्यांवरून फारसें निश्चित कांहीच अनुमान काढतां येत नाहीं. हें वाक्य केव्हांचें तरी जुन्या काळचें असणें शक्य आहे. याज्ञवल्क्य तर इतका खंबीर दिसतो व सामान्य लोकांच्या व श्रोत्यांच्या संस्कृत भाषेच्या ज्ञानाविषयी त्यास इतका तिरस्कार होता कीं तो कोंबड्याच्या मंत्राचा विनियोग कुटण्याच्या कामीं करीत आहे: तर तो जुनें एखादें वाक्य त्यांत वर्तमान काल वाचक प्रयोग आहे म्हणून बदलण्याच्या फिकीरींत कशास पडतो.

ज्योतिर्विषयक असे महाभारतावर निश्चित प्रकाश पाडणारे पुरावे क्वचित असल्यामुळें शेवटीं पौराणिक राजावलींची यादी एवढीच कुरुयुद्धाच्या कालगणनेत ऐतिहासिक महत्वाची सामग्री आहे असें आम्हीं समजतों व त्या पद्धतीनुसार काढलेला काल सुमारें ख्रि. श. पूर्वी १५०० हा ग्राह्य धरतों.

कुरुयुद्धांत कोणकोणतीं राष्ट्रें सामील होतीं याचा एक नकाशा आम्ही ज्ञानकोशाच्या प्रस्तावनाखंडाच्या तिसर्‍या विभागांतील ५२८ व्या पृष्ठावर दिला आहे. तो पाहिला म्हणजे युद्ध्यमान राजांचीं (देशवाचक) नांवें आपोआपच लक्षांत येतील.

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .