विभाग अकरावा : काव्य - खतें
कुर्हा— वर्हाड. उमरावती जिल्हा. चांदूर तालुक्यांतील एक गांव लोकसंख्या ३७७६. येथें बारी, मुसुलमान, कुणबी, माळी आणि रजपूत इतक्या जातींची वस्ती आहे. येथें एक मशीद असून तिला १५० एकर जमीन इनाम आहे. येथील तलाव फार चांगला आहे. चांदूर आणि तिवसा या गांवांच्या दरम्यान हा गांव आहे. हा चांदूर- तिवसा रस्ता इ. स. १९०० च्या दुष्काळांत तयार केला. प्रसिद्ध बंडखोर नंदू हा येथील रहिवासी होता.