प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें       

कुलाबा, जिल्हा.— मुंबई इलाख्याच्या दक्षिण भागांतील एक जिल्हा. याचें क्षेत्रफळ २१६९ चौरस मैल आहे. याच्या उत्तरेस मुंबई बंदर, कल्याण व मुर्बाड तालुके; पूर्वेस पश्चिम घाट, पुणें, सातारा जिल्हे व भोर संस्थान; दक्षिणेस व आग्नेयीस रत्‍नागिरी जिल्हा व पश्चिमेस जंजिरा संस्थान व अरबी समुद्र आहे.

कुलाबा जिल्ह्याचा मुलूख खडकाळ असून पश्चिम घाट व समुद्र यांच्यामध्यें हा प्रदेश असल्यानें या ठिकाणी पुष्कळशा टेंकड्या, शिखरें व डोंगराचें तुटलेले कडे दृष्टीस पडतात. पश्चिमघांट म्हणजे या जिल्ह्याची एक भिंतच आहे. याशिवाय बोरघांटापासून ईशान्येस, माथेरान व प्रबळपावतों एक टेंकड्यांची माळच लागलेली आढळते. पनवेल तालुक्याच्या मधून अशीच एक टेंकड्यांची माळ गेलेली असून ती दक्षिणेंस कर्नाळा टेंकडीला भिडते. पश्चिमेस पारसिक टेंकड्यांची ओळ असून दक्षिणेस जी टेकड्यांची रांग गेली आहे तींत माणिकगड नांवाचें एक तटबंदीचें शिखर आहे. या शिखराची उंची १८०० फूट आहे. मुंबई बंदराच्या दक्षिणेस व आग्नेयीस अशीच एक रांग गेली असून त्या रांगेंतील अगदीं उत्तरेकडील शिखर म्हणजे कनकेश्वर असून (उंची १००० फूट) दक्षिणेस सागरगड (उंची ११६४ फूट) आहे. या जिल्ह्यांतील सर्वांत उंच शिखर म्हणजे रायगड हें होय. या ठिकाणीं शिवाजीनें किल्ला बांधला व आपल्या राज्याची राजधानी केली.

या जिल्ह्याचा समुद्राभिमुख भाग, नारळी पोफळीच्या झाडांनीं आच्छादिलेला आहे. याच्या पाठीमागील मुलूख सपाट असून त्यांत भाताचें पीक येतें. या जिल्ह्यांतील खाड्यांच्या तीरांवर पुष्कळ मिठागरें आहेत. जिल्ह्याच्या पूर्वभागांत लहान लहान अशा बर्‍याच नद्या असून त्या जिल्ह्यामधून वहात जाऊन समुद्राला मिळतात. या नद्यांपैकीं महत्त्वाच्या नाद्या म्हणजे उल्हास, पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, मांदाड व सावित्री या होत. उलवें अगर पनवेल, अष्टें, नागोठणा, कुंडलिका, रोहा अगर चौल, मांदाड, बाणकोट या प्रमुख खाड्या आहेत. पेणच्या खाडींतून नेहमीं ७ टनांचीं व भरतीच्या वेळेस ३५ टनांचीं गलबतें जाऊं शकतात. जिल्ह्याच्या किनार्‍याच्या बाजूनें बर्‍याच ठिकाणीं धक्के बांधण्यात आले आहेत. नागोठण्याच्या जवळ अण्हेरी येथें व महाड तालुक्यांत शोण व कोडिवरी येथें ऊन पाण्याचे झरे आहेत.

या जिल्ह्यांतील खडक काळ्या फत्तरांचा पण सपाट असा आहे; पण टेंकड्यावरील दगड सपाट व गुंड या दोन्ही प्रकारचे आहेत. या खडकाचा पृष्ठभाग, धूसर असतो व त्यावरून त्यांत लोखंडाचे कण असल्याचें दिसून येतें.

कुलाबा जिल्ह्याच्या जंगलांत निरनिराळ्या प्रकारचीं झाडें आहेत. त्यांपैकीं साग, ऐन, जांब, किंजळ, हीं मुख्य होत. आपट्याचीं पानें विडीसाठीं उपयोगांत आणतात. खैराच्या झाडांपासून बैलगाड्यांचीं चाकें तयार करतात. येथें चिंचेचींहि झाडें बरींच आढळतात. आंब्याचें लांकूड तसेंच तिवर, फलशी, कण्हेरी, कुसर, गरुडवेल, इत्यादींचीं लांकडें सरपणासाठी उपयोगांत आणतात. याशिवाय रांटुर, सापसन, मातीसूल, शिकेकाई यांचींहि झाडें बरींच आहेत.

कुलाबा जरी डोंगराळ मुलुख आहे तरी त्यांत शिकारीला योग्य असे प्राणी फारच कमी आढळतात. चित्ते व वाघ हे क्वचित् आढळून येतात. पण तरस व कोल्हे हे या जिल्ह्यांत पुष्कळच आहेत. यांशिवाय गवा, सांबार, चितळ इत्यादि पशूहि थोडे थोडे आहेत. मृगयेला योग्य असे पक्षी बरेच आहेत, त्यांपैकीं मुख्य म्हणजे पाणलावे होत. यांशिवाय बदकें, पारवे, तित्तिर, लावे इत्यादि बरेच पक्षी आहेत. साप पुष्कळ आहेत पण विविध प्रकारचे व विषारी नाहींत. बंदराजवळील खेड्यांत राहणारे कोळी मासे पकडून ते खाडींमधून मुंबईस पाठवतात. या माशांवर उपजीविका करणारे लोक या जिल्ह्यांत सहा ते सात हजारपर्यंत आहेत.

ह वा व प र्ज न्य मा न- येथें जूनपासून पावसाळा सुरू होऊन आक्टोबरपर्यंत टिकतो. पावसाळ्यांतील हवा फार निरोगी असें मानण्यांत येतें. आक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत येथील हवा अर्धवट दमट व उष्म असते डिसेंबर ते मार्चच्या दरम्यान थंडी पडते व मार्चपासून जूनपर्यंत येथें उन्हाळा असतो. उन्हाळ्यांत कर्जत तालुक्यांत तर फारच उष्णता असते. मे महिन्यांत उष्णतेचें प्रमाण ९२० असतें. समुद्रकिनार्‍यापेक्षां आंतील भागांत पाऊस पुष्कळ पडतो. पण सर्वसाधारण पर्जन्याचें मान ८८ इंचांपर्यंत आहे.

इतिहास- कुलाबा जिल्ह्यावर आतांपर्यंत पुष्कळ निरनिराळीं राज्यें झालीं. प्राचीन काळीं कुलाब्यावर छोटेसंस्थानिक राज्य करीत असत. ख्रिस्ती शक सुरू होण्याच्या सुमारास व त्यानंतर आंध्रवंशीय राजांनीं कुलाब्यावर आपली सत्ता बसविली. हे राजे सर्व कोंकणपट्टीवर व दख्खनवर आपला अंमल चालवीत होतें. सुमारें ख्रिस्ती शकाच्या १५० च्या सुमारास ग्रीक भूगोलवेत्ता टॉलेमी हा हिंदुस्थानांत आला होता. त्यानें त्यावेळीं आंध्रवंशीय राजे कुलाब्यावर अगर त्यावेळचे ‘चौल’ यावर राज्य करीत असत असें म्हटलें आहे. सहाव्या शतकांत, चालुक्य राजांनीं कुलाबा व उत्तरकोंकण या भागांवर आपली सत्ता प्रस्थापि केली. पुढें तेराव्या शतकांत देवगिरीच्या यादवांचे राज्य या प्रदेशावर सुरू झालें. १३४७-१४८९ या अवधींत बहामनी राजांनी कुलाबा जिल्ह्यांतील चौल वगैरे ठिकाणे जिंकून आपल्या ताब्यांत आणलीं. नंतर गुजराथच्या राजांनीं या प्रदेशावर आपलें वर्चस्व बसविलें. १५०७-१६६० या अवधींत पोर्तुगीज लोकांचेहि राज्य या जिल्ह्यांवर सुरू झालें. याच वेळीं कुलाबा जिल्ह्यांतील बराचसा मुलुख मुसुलमानांनीं बळकावला होता. पुढें १६३२ सालीं शहाजीराजे भोसले यांनीं मोंगलांनां हांकून लावून हा मुलूख आपल्या ताब्यांत आणला. शिवाजी महाराजांनी या जिल्ह्यांतील घोसाळें व रायगड येथें मजबूत किल्ले बांधले. सुवर्णदुर्ग व विजयदुर्ग येथील किल्ल्यांची दुरुस्ती केली व रायगड हें राजधानींचे ठिकाण केलें. १६८० मध्यें शिवाजी महाराज वारल्यानंतर हा जिल्हा पुन्हां मोंगलांच्या ताब्यांत गेला. पुढें १६९० सालीं आंग्रे यांनीं तो प्रदेश मुसुलमानांपासून बळकावून घेतला (आंग्रे पहा). कान्होजी आंग्रे हा अत्यंत शूर होता. त्यानें शाहू, जंजीर्‍याचा शिद्दी, ब्रिटिश लोक यांपासून मोठ्या शौर्यानें आपल्या प्रदेशाचें रक्षण केलें. पण इ. स. १७३१ मध्यें कान्होजी मरण पावल्यानंतर त्याच्या दोघा मुलांत कलह माजले. त्यामुळे आंगर्‍याच्या सत्तेला उतरती कळा लागण्याला सुरुवात झाली. कान्होजीचा ज्येष्ठ पुत्र संभोजी हा शूर व धाडसी होता. त्यानंतर त्याचा मुलगा तुळाजी हा गादीवर बसला. याच्या कारकीर्दीत १७५८ मध्यें ब्रिटिशांनीं विजयदुर्ग किल्ला जिंकू घेतला. पुढें हा किल्ला ब्रिटिशांनीं पेशव्यांनां दिला. १८१८ सालीं पेशवाईचा र्‍हास झाल्यावर ब्रिटिशांकडे कुलाबा आला व आंग्रे हे ब्रिटिशांचे मांडलीक बनले. १८४० मध्यें दुसरा कान्होजी वारल्यानंतर कुलाबा जिल्हा मुंब सरकारनें आपल्या राज्यास जोडून घेतला, तेव्हांपासून आतांपर्यंत तो त्याच्याकडे तसाच चालू आहे.

ऐतिहासिक स्थळें— या जिल्ह्यांत पालें, कोलें, कुडें, कोंडाणें, अंबिवलि या ठिकाणीं बौद्धांचीं लेणीं आहेत. घारापुरी येथील "एलीफंटा" लेणीं ब्राह्मणी आहेत. पोर्तुगीज लोकांनीं या जिल्ह्यांत पुष्कळ प्रार्थनामंदिरें व किल्ले बांधले आहेत. शिवाय मराठ्यांनींहि व आंग्र्यांनींहि पुष्कळ किल्ले बांधविलें. त्यांपैकीं रायगड, कुलाबा, बीरवाडी, लिंगाणें, खांदेरी व उंदेरी इत्यादि प्रमुख किल्ले आहेत.

१९२१ सालीं कुलाबा जिल्ह्याची लोकसंख्या ५,६२,९४२ होती. या जिल्ह्यांमध्यें अलीबाग, कर्जत, महाड, माणगांव, पनवेल, पेण, रोहा हे सात तालुके असून खालापूर, उरण, नागोठणें हे पेटे आहेत. कुलाबा जिल्ह्यांत शहरें व खेडीं मिळून १४६१ गांवें आहेत. त्यापैकीं ४ शहरें ५००० वर लोकसंख्येचीं आहेत; १५ गावें २००० ते ५००० दरम्यान लोकसंख्येचीं आहेत; ७७ खेडीं १००० लोकसंख्येवर असून २१८ खेड्यांची लोकसंख्या दर खेड्यास ५०० वर आहे. ५०० खालच्या लोकसंख्येचीं खेडीं २१४७ आहेत. उरण, पेण, पनवेल, अलिबाग हीं मुख्य शहरें आहेत.

कुलाबा जिल्ह्यांत हिंदू, मुसुलमान, शीख, ख्रिश्चन या लोकांची वस्ती आहे. हिंदू लोकांचें प्रमाण शेंकडा ९४ असून मुसुलमान शेंकडा ३ आहेत. १९११च्या खानेसुमारींत या जिल्ह्यांत हिंदू ५,६०,२२६, मुसुलमान २८८७६, जैन १४११, ज्यू २०४१, ख्रिश्चन १२५८, पारशी ३०३, व शीख ९ होते. हिंदूमध्यें ब्राह्मणांची संख्या २२,१७६ असून त्यांत ११९०८ कोंकणस्थ व ३६५२ देशस्थ आहेत. मोठाल्या बागा व ताडाचीं वनें यांच्या मालकीचीं असून ते संपन्न आहेत. दक्षिण भागांत पुष्कळ खोत आहेत. याशिवाय प्रभूंची संख्या ६००० जवळ आहे. वाणी लोक ४४५४असून त्यांचा व्यापार हा धंदा आहे.  अगरी १६८११. हे मीठ तयार करण्याचा धंदा करतात. मराठे १५६७६० व कुणबी ४२,३७५. यांचा धंदा भात पिकवण्याचा आहे. २४६३३ कोळी लोक नावाडी असून शिवाय मासे धरून त्यावर उपजीविका करतात. भंडारी ५६३३. ह्यांचा धंदा ताडी तयार करण्याचा आहे व ११२६३ माळी लोक बागांची मशागत करतात. ठाकूर २००८८ व कातकरी ३३३११ या डोंगराळ जाती आहेत. हे लोक खुजे, कुरुप व काटक असतात. हें लोक फार प्रामाणिक असतात. हे व यांच्या बायका दिवसभर राबत असतात व ज्यावेळीं त्यांनां शेतीचा धंदा नसतो त्यावेळीं ते मोळीविक्याचा अगर इतर धंदा करतात. कातकरी लोक हे शेतीवर व मजूरीवर आपला उदरनिर्वाह करतात. कातकरी लोक वर्णानें इतर डोंगराळ लोकांपेक्षा अधिक काळे असून फार गलिच्छ असतात. गाय व वानर यांशिवाय बाकी सर्व प्रकारचें मांस ते खातात. दारु पिण्याचें व्यसन त्यांच्यांत फार आढळून येतें. वड्डर व वंजारी या भटक्या जाती आहेत. ते जात्या उर्मट असतात. जाती व हातचक्क्या करण्यांत हे कुशल आहे बेनीं इस्त्रायल अगर यहुदी लोक हे तेल्याचा धंदा करतात. ते घरीं मराठी भाषा बोलतात. उरण पेट्यांतील करंज बेटांत किरिस्तावांची वस्ती आहे. येथें १५३५ च्या सुमारास तीन प्रार्थनामंदिरें  होतीं. "दि युनैटेड फ्रीचर्च" "मिशन ऑफ स्कॉटलंड" व अमेरिकन मिशन यांच्याहि येथें संस्था आहेत. पहिल्या संस्थेनें एक हायस्कूल, दोन मुलींच्या शाळा व अस्पृश्यांकरितां तीन शाळा चालविल्या आहेत.

शा स न प द्ध ति.- जिल्ह्याचा मुख्य अधिकारी कलेक्टर हा असतो. जिल्ह्यांतील भागाचा अधिकारी असिस्टंट कलेक्टर अगर डेप्युटी कलेक्टर असतो. हा जिल्हा ठाण्याच्या सेशन्स भागांत मोडतो. ठाण्याचा डिस्ट्रिक्ट जज्ज हा कुलाब्यांतील दाव्यांवरील अपीलें ऐकतो. पावसाळ्यांत डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला सेशन्स जज्जाचे अधिकार असतात. जिल्ह्यांत पांच सबॉडिनेट जज्ज आहेत. प्रत्येक तालुक्यास मामलेदार, फौजदार व सबरजिस्ट्रार व प्रत्येक पेट्यास महालकरी, फौजदार, सबरजिस्टर हे कामगार आहेत. या जिल्ह्यांत अलीबाग, पेण, रोहाअष्टमी, महाड, पनवेल, उरण व माथेरान याठिकाणीं म्युनिसिपालिट्या आहेत. याशिवाय डिस्ट्रिक्ट बोर्ड, तालुका बोर्डेंहि स्थापन करण्यांत आलीं आहेत. जिल्ह्यांतील पोलिसखातें डिस्ट्रिक्ट सुपरिंटेंडंटच्या ताब्यांत असतें. त्याच्या हाताखालीं एक पोलिस इन्स्पेक्टर असतो. या जिल्ह्यांत एकंदर १२ पोलिस स्टेशनें आहेत. या जिल्ह्यांत नऊ दुय्यम तुरुंग आहेत.

१९०३-४ सालामध्यें जिल्ह्याचा एकंदर वसूल २४६३००० इतका झाला. त्यांत १३,५८,००० इतका जमीनीचा महसूल झाला.

व्या पा र व द ळ ण व ळ ण.- पेरणींचा हंगाम ज्यावेळीं नसतो त्यावेळीं बहुतेक शेतकरी मीठ तयार करण्याचा धंदा करितात. पेण व पनवेल या तालुक्यांत मीठ बरेंच तयार होतें. जिल्ह्यांत एकंदर १५५ मिठागरें असून त्यांतून २५ लक्ष मण मीठ दरवर्षी तयार होतें. चौल येथें रेशमीं कापड विणण्याचा व्यापार चालतो. पण तो हल्लीं जवळ जवळ बसलाच आहे. तीळ, भुइमूग, नारळ यांच्यापासून तेल काढण्याचा धंदाहि येथें बर्‍याच मोठ्या प्रमाणावर चालतो. पनवेल येथे बैलगाडीचीं चाकें तयार करण्याचा कारखाना आहे. उरण येथें दारू तयार करण्याचा धंदा चालत असून तो पारशी लोकांच्या ताब्यांत आहे.

पेण, पनवेल, कर्जत, नागोठणें, रेवदंडा, रोहा, गोरेगांव व महाड हीं व्यापारी गांवें आहेत. येथून तांदूळ, मीठ, सरपण, गवत, सागवान, भाज्या, फळें व सुकें मांस हीं बाहेरगांवीं जातात. मलबारी साग पितळेचीं भांडीं, खजूर, धान्य, तेल, तूप, लोणी, साखर, बटाटे, कापड, हळकुंडें इत्यादि वस्तूंची आयात होते. जिल्ह्यामध्यें पांच बंदरें आहेत. या बंदरांतून १९०३-०४ सालीं एकंदर १५३ लाख रुपयांच्या मालाची नेआण झाली. त्यांत आयात ३२ लाख रुपयांची व निर्गत १२१ लाखांची झाली. याशिवाय या जिल्ह्यांत तीस ठिकाणीं बाजार भरतो व वार्षिक जत्राहि भरतात.

या जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यांतून व खालापूर पेट्यांतून ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वेचा फांटा गेलेला आहे. मुंबईहून धरमतर, उल्वा वगैरे ठिकाणीं बोटी चालू आहेत. तसेंच बोरघाट, फिटजिराल्ड, व वरंधा घांटांतून गाडीरस्ता गेला आहे. या जिल्ह्यांत एकंदर ८७ मैल खडीचे रस्ते आहेत, व १६० मैल साधे रस्ते आहेत.  ३७ मैल रस्त्यांच्या बाजूनें झाडें लावण्यांत आलीं आहेत. माणगांव, नागोठणा इत्यादि ठिकाणीं पूल आहेत.

जं ग ल- कुलाब्यांत उत्कृष्ट प्रकारचीं जंगलें आहेत. या जंगलांत जें सागाचें लांकूड मिळतें तें मलबार सागाच्य खालोखाल आहे. येथील कांहीं झाडांचा नावा बांधण्याकडे उपयोग होतो. १९०३-०४ मध्यें एकंदरींत ४५८ चौरस मैल जंगल होतें. त्यापैकीं ४४९ मैल राखीव होतें. बहुतेक सर्व जंगलें डोंगरपठारावर अगर डोंगराच्या उतरणीवर आहेत. उत्तरेकडील भागांत कर्जत येथें व माथेरान – तवली या रांगेमध्यें मोठीं जंगलें आहेत. पनवेल येथेंहि जंगल आहे. तसेंच मध्यभागांत पेण, अलीबाग, रोहा या ठिकाणीं व महाड व माणगांव तालुक्यांतहि मोठीं जंगलें आहेत. या सर्व जंगलांतून सागाची निपज फार मोठी आहे. त्याच्या खालोखाल शिसवींचीं झाडें, ऐन, जांब व किंजळ यांची पैदास होते. याशिवाय, आपटा, आंवळा, चिंच, हिरडा, महु, नारळी, इत्यादि झाडेंहि बरींच आहेत.

कुलाब्यांत फक्त लोखंड धातूच आढळते. माथेरानच्या टेंकड्यांतून क्वचित, अल्युमिनियम आढळतें. पण तें फार नाहीं. इमारतीला लागणारा दगड मात्र सर्व जिल्हाभर मुबलक सांपडतो. वाळु, चुना, हेहि विपुल आहेत.

शेतकी.— या जिल्ह्यांतील जमीनीचे चार प्रकार आढळतात. या जिल्ह्याचा निम्म्याहून अधिक भाग, गद्दी जमीन आहे व त्यांत चुन्याचेंहि मिश्रण झालेलें आढळतें. डोंगराच्या उतरणीवरचा अगर पायथ्याचा भाग, कुरुंद व काळा फत्तर हें उखडून काढल्यानें जी जमीन तयार होते तसल्या जमीनीनें युक्त असून, या जमीनींत नागली, वरी, इत्यादि धान्यें पेरण्यांत येतात. ही जमीन फार भुसभुशीत असते. तिसरा जमीनीचा प्रकार म्हणजे 'खारपाट' हा होय. खडकावर माती सांचून जी जमीन बनलेली असते तिला खारपाट असें म्हणतात. चवथा प्रकार म्हणजे समुद्रकांठच्या जमीनीचा होय. ही जमीन बागाइतीसाठीं फार उपयुक्त आहे. जिल्ह्याचें मुख्य उत्पन्न तांदुळाचें होय. पिकाऊ जमीनीच्या १/३ भागाहून अधिक जमीनींत तांदूळ पेरला जातो. तांदुळाचा तांबडा व पांढरा अशा दोन जाती आहेत. यांच्या खालोखाल नागली, वरी, हरीक, वाल इत्यादि धान्यें पेरलीं जातात. महाड, माणगांव व रोहा इत्यादि ठिकाणीं तूर, मूग व उडीद यांचेंच विशेष उत्पन्न असून चणें वगैरे माणगांव, पनवेल, कर्जत या ठिकाणीं पिकतात. ताडमाडांच्या बागांच्या बागा या जिल्ह्यांत आहेत. १९०३-४ मध्यें पेराऊ जमीनीपैकीं तीन चौरसमैलाच्या जमीनीला विहिरी व तलाव यांच्यामुळें पाणी मिळत होतें. ह्या जिल्ह्यांतींल गुरेंढोरें साधारण खुजींच असतात. महाराष्ट्रांतून, शेळ्या व मेंढ्या या जिल्ह्यांत बर्‍याच प्रमाणावर येतात. त्याचप्रमाणें महाराष्ट्रामधूनच धनगर व वंजारी लोक खेचरें आणतात. दुधासाठीं मुसुलमान लोक शेळ्या पाळतात. या जिल्ह्यांत रयतवारी पद्धत सुरू आहे. खोत व इजारदार यांच्या ताब्यांतच जिल्ह्यांतील बरीचशी जमीन आहे. १९०३-४ सालीं ११७१ चौरस मैल जमीन लागवडीखाली होती व त्यापैकीं ७५० चौरसमैल खोत व इजारदार लोकांच्या ताब्यांत होती.

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .