विभाग अकरावा : काव्य - खतें
कुशध्वज— र्हस्वरोमा नांवाच्या जनकाच्य दोन पुत्रांतील दुसरा. सीरध्वज जनकाचा कनिष्ट बंधु. हा इंद्रदेशाच्या सांकाश्या नामक राजधानींत राज्य करीत असे. यास मांडवी आणि श्रुतकीर्ति दोघी कन्या असून, त्या यानें दशरथपुत्र भरत आणि शत्रुघ्न यांनां दिल्या होत्या. सीरध्वजास पुत्र नव्हता म्हणून हाच पुढें मिथिलेचा राजा झाला होता, यास पुत्र होता त्याचें नांव धर्मध्वजजनक (वाल्मिकी रा. बाल स. ७०)