प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें       

कुशान- बाह्य यूएची हे हिंदुस्थानांत आल्यानंतर कांहीं शतकें राहिले व पुढें त्यांनीं जेव्हां हिंदुत्व स्वीकारलें तेव्हां त्यांनांच कुशान हें नांव मिळालें. [बुद्धोत्तर जग पृ. २५६ पहा.] कुशानांच्या कालाबद्दल अद्यापि एकमत नाहीं. स्मिथनें दिलेली या राजांची वंशावळी ही त्याची त्यालाच संशयास्पद वाटत आहे. कडफिसेस (पहिला) हा या वंशाचा पहिला राजा (इ. स. २०) होय. याचें राज्य उत्तर हिंदुस्थानांत होतें. यूएची व मोंगल यांच्या शारीरिक लक्षणांत बराच भेद आहे. त्यांच्या चालीरीती हियुंगुनु यांच्यासारख्या होत्या. त्यांची एकंदर संख्या १० लक्षांपर्यंत असावी (खि. पू. १६०). यांचें मूळ ठिकाण वायव्य चीनांतील कानसूचे होय. तेथून कांहीं काळानंतर ते तक्लमकान प्रांतात येऊन, तेथील वूसून लोकांचा पराभव करून व थोडीं वर्षें तेथें राहून, पुढे शकांचाहि पराभव करून ते उत्तरेकडील घाटांनीं हिंदुस्थानांत उतरले (ख्रि. पू. १५०). याच सुमारास त्यांनीं बॅक्ट्रिया जिंकला. त्यानंतर हे भटक्ये न रहातां स्थाईक झाले. तरी पण यांचा तत्कालीन इतिहास नक्की आढळत नाही. यांचा प्रख्यांत राजा कडफिसेस (पहिला) म्हणून झाला. तो गादीवर साधारणतः इ.स. १५ मध्ये बसला. कडफिसेस हें यूरोपियन लोकांनी दिलेलें नांव आहे. त्याच्या नाण्यावर कोझोल कडफेस, कोझौलकडफिसेस आणि कुजुलकरकडफिसेस अशीं नांवें कोरलेलीं आहेत. चिनी ग्रंथांत कीएयू- त्सीएयू-कीओ असें नांव येतें. परंतु या सर्व नांवांचा काय अर्थ होतो हें अद्यापि कोणासच समजलें नाहीं. कदाचित् या पदव्याहि असतील. कुशान राजे लौकिक शक मानीत असत. खरोष्ट्री लिपींत दीर्घ स्वर नसल्यानें असें नांव असावें असें स्मिथ म्हणतो; परंतु चिनी व सस्सानियन पुराव्यावरून कुशान असेंच नांव होते हें ठरतें; ‘रब्बाकुशान’ असें नांव दुसर्‍या होर्मज्दच्या नाण्यावर स्पष्ट आहे. कडफिसेसनें काफिरिस्तान व काबूल प्रांत बॅक्ट्रिआ व पार्थिआ, म्हणजे इराण पासून सिंधुनदापर्यंतचा सारा प्रदेश जिंकला (स. २२). व इंडो-पार्थिअन् व इंडो-ग्रीक यांनां हांकलून दिलें. त्याचा मुलगा कडफिसेस दुसरा हा नंतर गादीवर आला (स. ४५). यानें बहुधा पंजाब प्रांतावर स्वारी करून तेथें एखादा आपला लष्करी सुभेदार कांहीं काळपर्यंय ठेवला असावा, असें तत्कालीन कांहीं नाण्यांवरून दिसतें. या नाण्यांवर राजाचें नांव नसून, हीं काबूलपासून काशीपर्यंत व कच्छ काठेवाडांतहि आढळतात.  या दुसर्‍या कडफिसेसचें नाण्यावरील नांव विम (ऊएमो) असून चिनी नांव येन-कओ-चिंग असें आहे. याच्या नंतर कनिष्क हा गादीवर आला. या कुशानवंशांत कनिष्क (पहा) हाच कायतो प्रख्या राजा झाला. याने आपलें राज्य बरेंच वाढविलें. नंतर त्याने चिनी बादशहाकडे त्याच्या मुलीबद्दल मागणी घातली. त्यामुळें त्याला राग येऊन त्यानें आपलें सैन्य कनिष्कावर धाडिलें (९०). कनिष्कानेंहि आपला सेनापत सी यास ७० हजार सैन्यासह त्याच्यावर धाडिलें. परंत त्याची ताशकुर्घान या पर्वतातून जातां जाता फार खराबी झाली व अखेर यारकंद प्रांतांत त्याचा चिनी सैन्याकडून पूर्ण पराभव झाला. त्यामुळें कनिष्कानें चिनी बादशहाला खंडणी दिली. कडफिसेस (दुसरा) यानें सोन्याचें नाणें हिंदी पद्धतीचें सुरू केलें होतें, त्यांत कनिष्कानें सुधारणा केली. कनिष्काचें नांव तिबेट, चीन, मंगोलिया, हिंदुस्थान यांत फार प्रसिद्ध असून त्याचें चरित्र मात्र अगदींच थोडे उपलब्ध आहे. त्यांतहि त्याचा कालानुक्रम तर सर्वच शंकित आहे. स्मिथच्या मतें “कनिष्क हा इ.स ७८ मध्यें गादीवर आला; म्हणून हल्लीं जो शालिवाहन शक सुरू आहे, तो कनिष्काच्या राज्यारोहणापासून सुरू झाला असावा.” चिनी वाङ्‌मयांत याच उल्लेख येतो, परंतु तो ऐतिहासिक दृष्ट्या येत नसून बौद्धधार्मिक वाङ्‌मयांतून येते; त्यामुळे त्याची ऐतिहासिक किंमत कमी आहे. कनिष्काचा संबंध असलेले असे जवळ जवळ २० शिलालेख आतांपर्यंत आढळले आहेत. व त्यांत कालनिर्देशहि आलेला आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट ही कीं, त्या कालाच्या आंकड्याबद्दलच विद्वानांत मतभेद आहे. त्यावरून कोणीं त्याचा राज्यारोहणकाल ख्रि. पू. ५८ देतात, तर कोणीं इ.स. ७८ देतात. कांहींचें म्हणणें विक्रमसंवत हा त्याचा राज्यारोहणाचा काल होय. परंतु नुकतीच तक्षशिला नगरी खोदून काढल्यावर, तेथील एकंदर प्राचीन अवशेषांचें निरीक्षण करून डॉ मार्शलनें, कनिष्क हा बहुधा ख्रि. श.च्या दुसर्‍या शतकांत झाला असावा असें ठरविलें आहे. कनिष्क हा कडफिसेस (दुसरा) याचा मुलगा नव्हता. त्याच्या बापाचें नांव वझेशक (वझेशप) होय. कनिष्काचे राज्य वायव्य हिंदुस्थानांत पसरलें होतें. त्या प्रदेशास तत्कालीं गांधार हें नांव होतें. ह्युएनत्संगहि हा गांधारचा राजा होता असेंच म्हणतो. यानें सन ९९ त रोम येथें आपला वकील पाठविला होता. त्याने काश्मीरप्रांत हस्तगत करून तेथें अनेक स्तंभ उभारून आपल्या नांवचें कनिष्कपूर (हल्लीचें बिहार नदीवरील वारामूला व श्रीनगर रस्त्यावरील कानीसपूर) शहरहि वसविलें. दंतकथा सांगतें कीं, त्याने अश्वघोष नांवाच्या बौद्धपंडिताला आश्रय दिला होता. (याचा अर्थ ते समकालीन होते एवढाच येथें घ्यावयाचा.) महाराष्ट्रांतील नहपान क्षहराट व उज्जेनचा चष्टण सत्रप हे बहुधा कनिष्काचे मांडलिक असावेत असें वाटतें. कनिष्क हा म्हातारपणांत बौद्धधर्मीय झाला. याची राजधानी पुरुषपुर (पेशावर) होती. तेथें यानें एक स्तंभ उभारला होता. त्याला तेरा मजले असून, त्याची उंची ४०० फूट होती. तो सर्व नकशीवर लांकडाचा असून त्याचें शिखर मात्र मजबूत लोखंडाचें होतें. सहाव्या शतकारंभीं संगयून हा चिनी प्रवासी इकडे आला असतां त्यानें लिहून ठेविलें आहे कीं “हा स्तंभ तीन वेळ जळाला होता व तितकेहि वेळां श्रद्धाळू राजांनी तो पुन्हां बांधून काढला होता.” त्याच्या जवळच एक बौद्धमठ होता. तो नवव्या शतकापर्यंत चांगला भरभराटींत होता. त्यावेळीं सुद्धां तेथें बौद्धधर्माची एक पाठशाळा होती, असें नालंदविद्यापीठाचा कुलपति वीरदेव यानें म्हटलें आहे (८९०). स्तंभाबद्दल ह्युएनत्संग व अलबेरुणी हेहि माहिती देतात. अलबेरुणी त्याला कनिष्कचैत्य म्हणतो. मठाबद्दलहि ह्युएनत्संग माहिती देतो हल्लीं ही जागा उकरून काढली. त्यांत तेथें जुने अवशेष पुष्कळ सांपडले. त्यापैकीं महत्त्वाचा म्हणजे कनिष्काचा करंडा होय. त्यावर त्याची मूर्त असून एक शिलालेखहि आहे. कनिष्काचा एक पुर्‍या उंचीचा पुतळा मथुरा जिल्ह्यांतील मात गांवीं आहे. हल्लीं त्याचे मस्तक मात्र त्यावर नाहीं. त्याच्या अंगांत लांब पायघोळ अंगरखा असून त्याच्या आंत गुडघ्याइतका दुसरा अंगरखा आहे व त्यावर कमरपट्टा बांधलेला आहे. गळ्यांत मोत्याची माळ असून, उजव्या हातांत कमरेपासून पायापर्यंत पोहोंचवणारी म्यानबंद तरवार आहे. डाव्या हातांत कमरपट्ट्यांत अडकविलेली व घोट्यावर येईल इतक्या लांबीची दुसरी एक तरवार आहे. पायांत चढाव असून ते टांचेखाळून घोट्याजवळ बंदांनीं बांधलेले आहेत. पायांत विजार असावी असें दिसतें. असो, वर सांगितलेल्या कनिष्काच्या स्तंभाचा कायमचा निकाल महंमुद गिझनीकरानें लाविला. कनिष्कानें काशगर, यारकंद, खोतन, या चिनी साम्राज्यांतील प्रांतांवर पहिली स्वारी केली, तींत मागें सांगितल्याप्रमाणें त्याचा पराभव होऊन त्याला चीनच्या बादशहास खंडणीं देणें भाग पडलें होतें (९०). परंतु पुढें दुसरी स्वारी करून व चिनी सैन्याचा पराभव करून हे प्रांत त्यानें काबीज केले. या प्रांतातील कांहीं चिनी राजपुत्र त्यानें ओलीस ठेऊन घेतले. त्यांच्या रहाण्यासाठी त्यानें काबूलजवळ जे बौद्धमठ बांधिले होते तेच दिले. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तिन्ही काळांत त्यांनां निरनिराळ्या तीन मठांत ठेवीत. या राजपुत्रांनीं मठांतील बौद्ध भिक्षूंनां पुष्कळ देणग्या दिल्या होत्या. कनिष्कानें बौद्धधर्म स्वीकारण्याचें कारण दंतकथा सांगतें कीं, त्यानें लढायांत फार माणसें मारल्यानें त्याला पुढे पश्चात्ताप झाला व मग तो या धर्माचा अनुयायी झाला. परंतु ही गोष्ट अशोकाच्या गोष्टीची नक्कल दिसते. त्याच्या नाण्यांवरून एवढें ठरतें कीं, तो राजा झाल्यानंतर पुढें बौद्ध झाला असावा.  त्याच्या पहिल्या पहिल्या नाण्यांवर ग्रीक लिपींत व भाषेंत लेख असून त्यावरील सूर्यचंद्राचीं नांवेंहि (हेलिओस व सेलेने अशीं) ग्रीक भाषेंतीलच दिली आहेत. त्यापुढील नाण्यांवर ग्रीक लिपी मात्र ठेऊन भाषा जुनी इराणी योजली आहे. ग्रीक, इराणी व हिंदु लोक ज्यांची पूजा करीत आहेत असे कांहीं देव तेथें कोरले आहेत.

यापुढील नाण्यांवर मात्र बुद्धाची मूर्ती असून त्याचे नांव ग्रीक अक्षरांत लिहिलेले असतें. तरी पण तो बौद्ध कधीं झाला याचा नक्की शोध लागत नाहीं. याच्या वेळीं महायान पंथाचा बराच उत्कर्ष झाला होता. त्यामुळें गौतमबुद्धाला तेव्हां देवत्व प्राप्‍त झालें होतें. कनिष्कानें आपल्या राजवटींत एक बौद्धधर्माची मोठी समिति भरविली होती असें चिनी, तिबेटी व मंगोलियन दंतकथा सांगतात. सिंहली बखरींत अगर ग्रंथांत याबद्दल कांहींच उल्लेख केला नाहीं. या धम्मसंगीतीचा अध्यक्ष वस्तुमिश्र व उपाध्यक्ष अश्वघोष होता. कनिष्काचा गुरू पारस्व यानें ही सर्व तयारी केली. पांचशें भिक्षु जमले होते. ते सर्व सर्वास्तिवादी (हीनयान) पंथाचेच होते. सभा काश्मीरांत कुंडलवन येथें भरलीं. तींत त्रिपीटकांतील बहुतेक सर्व ग्रंथांचें शुद्धीकरण करून त्यावर “महाविभाषा” नांवाच्या टीका तयार करून त्या ताम्रपटावर कोरून एका स्तूपांत ठेवल्या. अद्यापि त्या स्तूपाचा शोध लागला नाहीं. पुढें मागें दैवगत्या शोध लागल्यास बौद्ध धर्माबद्दलची बरीच नवीन माहिती उजेडांत येईल. ही सभा बहुधा इ. स. १०० मध्यें भरली असावी. नंतर त्यानें सर्व काश्मीर प्रांताचें उत्पन्न या धर्माच्या खात्यास लावून दिलें. त्याच्या मृत्यूसंबंधीं पुढील एक दंतकथा आहे:- त्यानें पुष्कळ प्रांत जिंकले असतांहि त्याची राज्यलालसा सुटेना व लष्कर तर कंटाळून गेलें; तेव्हां लष्करानें कट करून त्याला ठार मारलें (इ. स. १२३). कनिष्काच्या नंतरच्या राजांची फारच थोडी माहिती आढळते. कनिष्काला वासिष्क व हुविष्क (हुष्क) असे दोन मुलगे होते.  पैकीं वासिष्क बहुधा बापाच्या देखतच मेला असावा. त्याचें अद्यापपर्यंत एकहि नाणें सांपडलें नाहीं हुविष्काचीं नाणीं फार सांपडतात. बापाच्या नंतर हा गादीवर आला. याचे राज्य काबूल, काश्मीर व मथुरा या प्रांतीं होतें. खुद्द मथुरेस त्यानें बांधलेला एक बौद्धविहार होता. हा धर्मानें बौद्धच होता. परंतु कट्टा नव्हता. याच्या नाण्यांवर हिराक्लीज (हरिकृष्ण) सरपीज, स्कंद, विशाख, फरो वगैरे ग्रीक, इराणी व हिंदू देवता कोरलेल्या असतात. मात्र बुद्धाची मूर्ति मुळींच नसते. साधारण तत्कालीन हे शकराजे बुद्धाचें अगदीं कट्टे अनुयायी नसत. त्यावेळीं बौद्धधर्म फार श्रीमंत व वजनदार होता. त्यामुळें कोणाहि तत्कालीन मुत्सद्दी राजानें त्याला वरवर अनुमति देऊन त्याच्या या परिस्थितीचा फायदा घेण्याचें सोडलें नाही; आणि त्याप्रमाणें कनिष्क व हुविष्क हे त्याला अपवाद नव्हते. त्यानें काश्मीरांत बारामूल घांटांत हुविष्कपूर म्हणून एक शहर बसविलें. ती त्या काळीं व्यापाराची फार मोठी उतारपेठ होती. तिला “पश्चिमवेस” असें सार्थ नांव मिळालें होतें. ह्युएनत्संग या ठिकाणीं गेला होता त्यावेळीं तेथे एक विहार होता. हल्लीं याचे नांव उष्कूर असून तेथें प्राचीन स्तूपाचा अवशेष आहे. हुविष्काचें चित्र जें नाण्यावर खोदलें आहे त्यावरून त्याच्या स्वरूपाचा बोध होतो. हा इ. स. १४० तं मेला असावा. याच्यानंतर (याचा पुत्र?) वासुदेव हा गादीवर आला. त्याच्या या हिंदु नांवावरून या बाह्यशकांवर तत्कालीन हिंदू संस्कृतीची छाप किती दाट बसली होती हें उघड दिसून येतें. त्याच्या नांवाप्रमाणेंच त्याच्या नाण्याचें स्वरूपहि पूर्णपणें हिंदू आहे. त्याच्या नाण्याच्या पाठीवर नंदीसह शंकर असून शिवाय पाश व त्रिशूळ हीहिं हिंदू राजचिन्हें आहेत. मथुरेस त्याचा जो शिलालेख आहे. त्यावरून त्यानें २५ वर्षें राज्य केलें असें दिसतें. त्याच्या उत्तरकाली त्याच्या राज्यास उतरती कळा लागली व त्याच्य मृत्यूनंतरही तें राज्य मोडलें व निरनिराळे सुभेदार स्वतंत्र झाले; तरीहि पुढें बरेंच दिवस नाण्यांवर त्याचाच छाप असे. याच सुमारास (इ. स. १६७) सर्व मध्यजगांत प्लेग सुरू झाला होता. बाबिलोनिया, रोमन व पार्थियन या साम्राज्यांतहि तो चालूं होता. नीब्रूहरच्या मतें प्राचीन जगाला या प्लेगमुळें जो जबरदस्त धक्का बसला त्यांतून तें पुन्हां धडपणें बाहेर पडलेंच नाहीं. बहुधा ही साथ ‘वासुदेवाच्य वेळीं त्याच्या राज्यांत पसरली असावी.

यानंतरचा पुढील इतिहास फारच अंधुक आहे. सस्सानियन लोकांचा धागा या सुमारास थोडासा उत्तरहिंदुस्थानांत लागलेला (नाण्यांवरून), दिसतो. परंतु त्या लोकांनीं स्वारी केली होती कीं काय व केली असल्यास त्यांनीं इकडे किती दिवस अधिकार गाजविला वगैरे माहिती (शिलालेख, नाणीं वगैरे वरून) कांहींच स्पष्ट आढळत नाहीं. एवढें खरे कीं उत्तरेकडे कुशान व दक्षिणेकडे आन्ध, या दोन्हीहि साम्राज्यांचा पत्ता एकाच वेळीं नाहींसा होऊन तेथें सर्वत्र अंधार दिसतो. बहुधा या तिसर्‍या शतकाच्या वेळीं सर्वत्र लहान लहान स्वतंत्र संस्थानें असावींत. पुराणांत यावेळीं आभीर, गर्दभील, शक, यवन, बाल्हीक या लोकांनीं हिंदुस्थानावर स्वार्‍या केल्या असा उल्लेख आहे. परंतु त्यांची साग्र व सुसंगत माहिती आढळत नाहीं रा. दा. बानजींच्या मतें वासुदेवानंतर दुसरा कनिष्क, दुसरा वासुदेव व तिसरा वासुदेव हे गादीवर आले. काबूलमध्यें मात्र हे कुशान राजे पांचव्या शतकापर्वे होते. त्यानंतर त्यांनां श्वेतहूणांनीं हांकलून दिलें. चौथ्या शतकाच्या प्रारंभी या कुशान राजांपैकीं एकाने आपली मुलगी इराणच्या (दुसर्‍या) होर्मज्दला दिली होती व इ. स. ३६०त (दुसर्‍या) शापुरला काबूलच्या एका राजाची मदत (रोमन स्वारींत) झाली होती असे उल्लेख आढळतात. पंजाबांतहि कांहीं ठिकाणीं हे कुशान बरेच दिवस टिकून होते. मात्र त्याचें महत्त्व बरेंच कमी झालें व ते इराणच्या सस्सानिअन वंशाच्या छापेखालीं बरेच गेले होतें असें दिसतें. सारांश कुशान व आंध्र यांचा लय (इसवी स. २२०) व गुप्तांचा उदय (इ. स. ३२०) यांमधील एक शतकाच्या हिंदुस्थानचा इतिहास सर्व अंधारांत डुबलेला आहे. जेव्हां त्याचा पत्ता लागेल तेव्हां खरें.

[संदर्भग्रंथ- स्मिथ- अर्लिहिस्टरी; वैद्य- मध्य. भारत; अय्यर- एन्शन्टइंडिया. जर्नल ७; रा. ए. सोसायटी १८८२; १०९१, १९०३ ते १९०८, १९१२ ते १३; चवनेज- तुर्क; हिरोडोटस ३; द्रुईन; ज. अ. टोम; ७; वॉटर्स; स्टीन-राजतरंगिणी कनिंगहॅम- न्यूमिस्म्याटिक क्रॉनालाजी १८९२; कॅट. कॉइन्स; इंडियन म्युझियम पु. १; डग्लस-चीन; स्टीन- खोतन, तुर्कस्तान; लेगी- ल्याटर हणाज्; इंडि. अँटि. १९०३, १९०८; एपि. इंडिका पु. ८; प्रोसिडिंग्ज एशियाटिक सोसा बंगाल. १८९६; प्रिंसेप-लेख, पु. १; रोमचा इतिहास पु. ९; मॅकक्रिंडल-एन्शन्ट इंडिया; मेरिव्हेल- रोमचा इति.; लेव्ही; फौचर- एन्शन्ट गंधार; तारानाथ; बील-रेकर्ड. पु. १; फाहीन; सचौ- अल्बेरुणी. पु. २; रॉलिन्सन- पार्थिआ; इलियट-हिस्टरी इंडिया पु. १; सलेत नचफोलजर. पृ. १९५; टाकाकुसुलेख; इत्सिंग; परमार्थ-वसु. चरि.; एशियाटिक रिसर्चेस पु. २०; शिफनर; गार्डनर- ब्रिटिश म्युझि.; कॅटलॉग जर्नल एशियाटिक सोसायटी बंगाल १९०८;ज्ञानकोश प्र. खं. वि ४].

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .